देऊळ मोठ्या भक्तिभावाने आपण देवळात जातो, प्रार्थना करतो. एक वेगळंच समाधान, शांती आपल्याला मिळते. पण या देवळांचाही एक अनोखा बाजार झालेला आजकाल दिसून येतोय. बघुयात देवळांची व्यथा. 1. देऊळ कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 2. देवळाच्या गाभाऱ्यात कवी - अरुणा ढेरे कवितासंग्रह - मंत्राक्षर #marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #पॉडकास्ट #मराठीपॉडकास्ट #मराठी...
Jan 19, 2024•8 min•Season 1Ep. 107
तुकोबा संत तुकाराम हे व्यक्तिमत्त्व किती मोठं. त्यांनी खूप केलं आणि खूप दिलं. आजही त्यांचं कार्य आपल्याला प्रेरणा देत राहतं. चला तर बघुया काय म्हणतायत कवी मंडळी. 1. तुकोबा कवी - दासू वैद्य कवितासंग्रह - तूर्तास 2. एक पत्र तुकोबांना कवी - वसंत बापट कवितासंग्रह - तेजसी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jan 12, 2024•7 min•Season 1Ep. 106
संत ज्ञानेश्वर लहान वयातच मोठ्या मोठ्या पंडितांना चकित करून टाकणाऱ्या, रेड्याच्या मुखी गीता वदवणाऱ्या, गीतेचे सार सर्वसामान्य माणसांसाठी आणणाऱ्या या संताची महती जितकी सांगावी तितकी कमीच. खूप दिलं ,देतायत आणि देतच राहतील. चला तर मग जाऊया ज्ञानबांच्या गावा. १.ज्ञानदेवी माझी कवी - बा.भ. बोरकर कवितासंग्रह - कैवल्याचे झाड २. कै. ज्ञानेश्र्वर विठ्ठल कुळकर्णी कवी - ग्रेस कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jan 05, 2024•7 min•Season 1Ep. 105
नववर्ष : याला तयारी पाहिजे २०२४ च्या स्वागताची जय्यत तयारी सुरू झालेली आहे. कोणी पार्टीचे, कोणी फिरायचे, तर कोणी कशाचे मनसुबे रचत आहेत. या वर्षापेक्षा पुढचं वर्ष नक्की चांगलं असेल अशी उमेद उरी बाळगूनच आपण पुढं पाऊल टाकणार आहोत. चला तर मग करूया जल्लोषात स्वागत नववर्षाचे. 1. दोन दिवस कवी - नारायण सुर्वे कवितासंग्रह - सुर्वे 2. त्याला तयारी पाहिजे कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - जातक #marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marath...
Dec 29, 2023•6 min•Season 1Ep. 104
माणूस म्हणजे या पृथ्वीतलावर अधिराज्य गाजवणारा एकमेव घटक म्हणजे माणूस. पण चंद्रपर्यंत भरारी मारूनही आपल्याला खरंच माणूस म्हणजे काय कळलं का हे आजही कोडंच आहे. प्रत्येकाचा अनुभव, व्याख्या निराळीच. चला बघुया सुटतंय का कोडं. 1. माणूस म्हणजे कवी - आरती प्रभू कवितासंग्रह - दिवेलागण 2. माणूस कवी - राम मोरे कवितासंग्रह - बालभारती #marathipodcast #मराठीकाव्य #मराठीभाषा #maharashtra #marathisahitya #marathisahitya #marathisahitya #कविता #marathipoetry #महाराष्ट्र #मराठी #महाराष्ट्रीयन #मीमराठी #मराठीभाषा #...
Dec 22, 2023•6 min•Season 1Ep. 103
थेंब एखाद्या थेंबाचे महत्व जेव्हा तो खूप मौल्यवान गोष्टीचा असेल तरच खूप वाटतं. मग भले तो महागड्या अत्तराचा असेल किंवा कुठल्या धातूचा असेल. पण तो एक एक ना थेंब असतो म्हणूनच तर सागर बनतो. प्रत्येक थेंबाचे योगदान हे असतंच. चला तर मग कवितरूपी पावसातून काही थेंब झेलुयात. 1. थेंब कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी 2. थेंब कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मुक्तायन Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Dec 19, 2023•5 min•Season 1Ep. 102
माहेराची वाट विवाहित स्त्रिया असोत किंवा कामानिमित्त बाहेर राहणारी मुले मुली असोत ' माहेर ' सगळ्यांनाच लागू पडतं. ते गोड घर, प्रेमळ माणसं, अमूल्य असंख्य आठवणी यांची शिदोरी तर तिथे असतेच. पण एक वेगळाच विसावा मनाला अन् तनाला तिथे मिळतो सगळ्यांना. चला तर मग रमुया परत एकदा माहेरच्या आठवणीत. 1. माहेराची वाट कवी - बहिणाबाई चौधरी कवितासंग्रह - बहिणाबाईंच्या कविता 2. माहेर कवी - ग दि माडगूळकर कवितासंग्रह - पुरिया Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Dec 15, 2023•5 min•Season 1Ep. 101
पेपर : चहाचा सोबती सकाळी आपल्या सर्वांच्याच दिवसाची सुरुवात वर्तमानपत्राने होते. तो आपल्या चहा - नाश्त्याचा सोबतीच असतो. घरबसल्या आपण त्याच्यासोबत जगाची सफर करून येतो. कधी उसासे देतो, कधी टाळ्या पिटतो तर कधी नवीन गोष्टी शिकतो. असा हा पेपर कुटुंबातल्या प्रत्येकाचा लाडका असतो पण वेगवेगळ्या कारणांसाठी. चला तर काव्य पक्तींतून बघुया पेपर काय म्हणतोय ते. 1. थेंब कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी 2. थेंब कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मुक्तायन Hosted on Acast. See acast.com/privacy for more inf...
Dec 12, 2023•7 min•Season 1Ep. 100
लग्न म्हणजे काय? सप्तपदी करून दोन व्यक्ती एकमेकांचा हात हातात धरून जीवनभर एकमेकांना साथ देण्याचं वचन देतात. एक अनोख्या मोठ्या प्रवासाला त्यांची सुरुवात होते. खूप मोठा सोहळा केला काय किंवा नाही केला काय हा प्रवास त्या दोघांनाच न डगमगता , एकमेकांना समजून घेऊन पार करायचा असतो. तो जितका सुंदर वाटतो तितकाच तो खडतर असतो. चला तर बघुया हा सोहळा कवितेच्या माध्यमातून. 1. लग्न म्हणजे काय असतं कवी - रोहिणी रणदिवे 2. सप्तपदी कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम Hosted on Acast. See acast.com/privacy for ...
Dec 08, 2023•6 min•Season 1Ep. 99
सुंदरता आकाश, नद्या, झाडं, फुलं, पक्षी असे निसर्गाचे असंख्य घटक सौंदर्य म्हणजे काय हे आपल्याला शिकवत राहतात. सुंदरता पाहणाऱ्याच्या नजरेत असते. एखादं भग्न मंदिरही कोणाला मोहिनी घालू शकतं तर कोणाला प्राजक्ताचा सडाही सुंदर नाही वाटू शकत. नीट पाहिलं तर हे विश्व इतकं सुंदर आहे ना की आपल्या डोळ्याचे नुसते पारणे फिटेल. चला तर बघुया काय काय सुंदर आहे ते. 1. सुंदरता कवी - ना घ देशपांडे कवितासंग्रह - शीळ 2. सुंदरतेची भेट कवी - विजया वाड कवितासंग्रह - बालभारती Hosted on Acast. See acast.com/privacy for mor...
Dec 05, 2023•5 min•Season 1Ep. 98
प्रार्थना भले काही संकट असो किंवा नसो प्रार्थना आपण कोणत्या न कोणत्या कारणाने करतच असतो. प्रार्थना ही आशा , सकारात्मकता, दिलासा देणारी गोष्ट. एक छोटीसी प्रार्थना पूर्ण चित्रच पालटून टाकते. अवघड परिस्थितीचा सामना करण्यासाठी एक वेगळंच बळ मिळतं. चला तर मग करूयात प्रार्थना. 1. प्रार्थना कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - नवा दिवस 2. प्रार्थना कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - छंदोमयी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Dec 01, 2023•5 min•Season 1Ep. 97
आव्हान माझे या जीवनप्रवासात आव्हानं झेलतच पुढचं स्टेशन गाठावं लागतं. कधी आपण आशा सोडून देतो, कधी त्यांच्याशी लढतो. फक्त दृष्टिकोन बदलला की चित्र वेगळंच दिसायला लागतं. चला तर मग दोन हात करूया आव्हानांनसोबत. 1. आव्हान कवी - अशोक थोरात कवितासंग्रह - बालभारती 2. आव्हानशृंग कवी - भा रा तांबे कवितासंग्रह - भा रा तांबे यांची समग्र कविता Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Nov 28, 2023•5 min•Season 1Ep. 96
खोट्या पैश्याचे गाणे पैसा कमावण्यासाठी आपण सगळेच जीवाची वाताहात करत असतो. ' दाम करी काम ' हे नाकारता तर येणारच नाही. पण या पैश्याच्या हव्यासापायी माणूस काय काय करतो हे तर सांगायलाच नको. चला तर बघुया दामाची कवितरुपी कहाणी. 1. खोट्या पैशाचे गाणे कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - धृपद 2. दामायण कवी - रामदास फुटाणे कवितासंग्रह - सफेत टोपी लाल बत्ती Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Nov 24, 2023•4 min•Season 1Ep. 95
आला शिशिर हिवाळ्याची सुरुवात या ऋतूपासून होते. स्वेटर, शाली, टोप्या हळूहळू कपाटातून बाहेर येतात. गरम - गरम चहा आपला दिवसभराचा सोबती होऊन जातो. झाडांची पानगळती होते. एक वेगळंच वातावरण तयार होतं. चला तर मग करूया शिशिर ऋतूचं स्वागत कवितेच्या माध्यमातून. 1. शिशिर ऋतुचं गान कवी - वा रा कांत 2. शिशिर कवी - अनिल कवितासंग्रह - बालभारती Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Nov 21, 2023•5 min•Season 1Ep. 94
समुद्र अथांग, निळाशार असा हा सागर. त्याच्या किनारी बसून पाण्याशी खेळणं, उसळत्या लाटा पाहणं, सूर्यास्त पाहणं याची गंमत काही न्यारीच असते. प्रत्येकवेळी आपल्याला त्याची नवी मनोवेधक रूपं बघायला मिळतात. चला तर मग जाऊया दर्याकिनारी कवितेच्या होडीतून. 1. समुद्र कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी.. वगैरे.. 2. सागर कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - बालभारती Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Nov 17, 2023•7 min•Season 1Ep. 93
लहानपण देगा देवा बालपणाचा काळ तो सुखाचा. आईचा मार अन् प्रेम, मित्र - मैत्रिणींसोबत केलेल्या गमती - जमती , शाळेतले प्रसंग अश्या असंख्य सुंदर गोष्टींचा खजाना म्हणजे बालपण. प्रत्येकालाच ते प्रिय असतं. तिथं रमायला आवडतं. चला तर मग जगुयात ते सुवर्णक्षण पुन्हा एकदा. 1. बाळ होऊनी कुशीत यावे कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - मृदगंध 2. बाळपण कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Nov 14, 2023•5 min•Season 1Ep. 92
झुळूक ती सुंदर, आल्हाददायक झुळूक किती आराम देते आपल्याला. असती छोटीच पण तीच किमया खूप मोठी असते. नुसती सगळीकडे पळत असते. झाडांची पाने हलव, फळं पाड, फुलांना गुदगुल्या कर, पाण्यावर रांगोळी काढ असे उद्योग करत राहते. चला तर मग कवितेची गोड झुळूक घेऊयात. 1. झुळुक कवी - दामोदर अच्युत कारे कवितासंग्रह - बालभारती 2. एक झुळुक कवी - ग. दि. माडगूळकर कवितासंग्रह - पूरिया Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Nov 10, 2023•6 min•Season 1Ep. 91
आली दिवाळी सण तेजाचा, प्रकाशाचा. उटण्याची- सुवासिक तेलाची आंघोळ, दिवे - आकाशकंदील - रांगोळीची आरास, खमंग फराळाने भरलेले ताट आणि पोट, कुटुंबासोबतचा गोड वेळ या सगळ्या गोष्टींची बरसात करणार सण कोणाला प्रिय नसेल. परिसरासोबत मनातलाही अंधार दूर करणारा दीपोत्सव. चला तर मग लक्ष दिव्यांची रोषणाई करूयात कवितेच्या माळेसोबत. 1. दीपावली कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - शेला 2. भाऊबीज कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Nov 07, 2023•5 min•Season 1Ep. 90
इच्छा इच्छा - आकांक्षा असतात सर्वांच्याच. म्हणून तर आपण काहीतरी करत राहतो, धडपडतो. या इच्छा आपल्याला मोठं करतात, मार्गदर्शन करतात. काही इच्छा मजेशीर, गोड अन् कधी कधी अवघडही असतात. पण त्या आपण कधी खरोखर तर कधी स्वप्नात जगतो. चला तर जाऊया इच्छांच्या गावा. 1. इच्छा कवी - रवींद्रनाथ टागोर (अनुवाद : पु. ल. देशपांडे) कवितासंग्रह - बालभारती 2. इच्छा मेली कवी - संदीप खरे कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Nov 03, 2023•8 min•Season 1Ep. 89
फुलपाखरू रंगीबेरंगी , फुलांवरून एकडून - तिकडे उडणारी ही सुंदर फुलपाखरे. सारेजण ह्यांच्या प्रेमात असतात. ती दिसली की नजर त्यांच्यावरून हटतच नाही. मन प्रसन्न करणारी, जग किती सुंदर आहे हे दाखवणारी , उडत रहा असा संदेश देणारी. चला तर मग मारुया गिरकी यांच्यासोबत. 1. फुलपाखरू कवी - अ ज्ञा पुराणीक कवितासंग्रह - बालभारती 2. फुलपाखरें कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - आनंदऋतू Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Oct 31, 2023•7 min•Season 1Ep. 88
साऱ्याच पायवाटा डोंगर - दऱ्यातून आपल्याला मार्गदर्शन करणाऱ्या या पायवाटा. छोट्या पण तितक्याच महत्वाच्या. आपल्याला इच्छित ठिकाणी पोचविण्याचा मार्ग सोप्या करणाऱ्या या पायवाटा खूप भारी असतात.चालुयात या पायवाटांवरती कवितेची साथ घेऊन. 1. पायवाट कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मुक्तायन 2. साऱ्याच पायवाटा कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Oct 27, 2023•5 min•Season 1Ep. 87
बाहुली गोड - गोड दिसणाऱ्या, आपली सखी सवंगडी असणाऱ्या, लहानपणी आपलं सगळं ऐकून घेणाऱ्या या बाहुल्या. त्या असतात नेहमीच तिथं. फक्त आपण दूर गेलो असतो. उगाच कोणत्यातरी आविर्भावात जगत राहून आपलं स्वत्व हरवून बसतो. चला तर मग जाऊयात या मजेशीर दुनियेत परत. 1. बाहुली कवी - रजनी परूळेकर कवितासंग्रह - स्वीकार 2. बाहुल्या कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - बाहुल्या Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Oct 24, 2023•8 min•Season 1Ep. 86
अजून उशीर झालेला नाही पर्यावरणाचा समतोल ढासलळा आहे हे आपण गेली कित्येक वर्षं पाहतो आहोत. त्याचे दुष्परिणाम दरवर्षी वाढतच चालले आहोत. म्हणून आपण हातावर हात धरून बसून चालणार नाही. आशेवर सारं जग चालतं. आपण सर्वांनी एकत्र येऊन आपल्या परीने प्रयत्न केले तर परिस्थिती नक्कीच बदलेल आणि हे विश्व परत सुंदर होईल. चला तर मग लागुया तयारीला कारण अजून उशीर नाही झालेला. 1. अंतिम स्फोट कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - पाथेय 2. अजून उशीर झालेला नाही कवी - अरुणा ढेरे कवितासंग्रह - जावे जन्माकडे Hosted on Acast. See ...
Oct 20, 2023•8 min•Season 1Ep. 85
दर्शन आपल्या सर्वांच्याच लाडक्या देवाचं दर्शन घेण्यासाठी आपण खूप धडपड करतो. भरपूर प्रवास करतो, ताटकळत रांगेमध्ये उभे राहतो, उन्हातान्हात चालतो. का? तर फक्त त्या विधात्याची एक झलक पाहायला मिळावी म्हणून. पण दर्शन काय फक्त देवलायामध्येच होतं का? याचं उत्तर पाहूया काव्यारुपात. 1. दर्शन कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मी आणि माझा आवाज 2. दर्शन कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Oct 17, 2023•7 min•Season 1Ep. 84
साडे तीन मुहूर्तापैकी एक असा हा सोनेरी सण. याची सुरुवात घटस्थापना करून होते. खूप उत्साहाने नवरात्र साजरी केली जाते. आदिशक्तीची वेगळी रुपे, त्याचं महत्व, त्याचा अनुभव घेणं हे प्रचंड भारी असतं. चला तर सोनं बनुया, सोनं लुटुया कवितेच्या खजिन्यासोबत. 1. नवरंगांची उधळण कवी - उमा पाटील 2. दसरा कवी - गोविंदाग्रज कवितासंग्रह - पिंपळपान Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Oct 13, 2023•6 min•Season 1Ep. 83
खिडकीशी बसून लहान मुलापासून ते वृद्ध व्यक्तीपर्यंत सर्वांनाच खिडकी प्रिय असते.ती आणते वाऱ्याची झुळूक, पावसाचे थेंब, सोनेरी किरणे आणि सुंदर करून टाकते आजुबाजूच जग. खिडकीत बसून आपण स्वप्न रंगवतो, दुनिया पाहतो, स्वतःशीच गप्पा मारतो. चला तर मग उघडूयात खिडकीची दारे कवितेच्या दारातून. 1. खिडकीशी बसून कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम 2. खिडकी कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Oct 10, 2023•6 min•Season 1Ep. 82
घर कौलारू सर्वांना विसावा ,ऊब आणि प्रेम देणारं घर. प्रत्येकालाच आपलं घर प्रिय असतं. त्या फक्त भिंती नसतात, तिथं आपलं बालपण, गोड आठवणी आणि असंख्य आवडत्या गोष्टी असतात. जगातला कोणताच महाल आपल्या घराची जागा घेऊ नाही शकत. चला तर मारुया फेरफटका घराकडे कवितांसोबत. 1. घर कौलारू कवी - अनिल भारती 2. घर कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - रंगबावरी #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवित...
Oct 06, 2023•7 min•Season 1Ep. 81
वर्तमान आपल्यातले किती जण वर्तमानात जगतात? आपण एक तर भूतकाळात जाऊन स्वतःला आणि झालेल्या गोष्टींना दोष देत बसलो असतो किंवा उद्याच्या भविष्याची रंगीत स्वप्नं रेखाटत गुंग झालो असतो. पण जे होऊन गेलं त्याचा विचार हा व्यर्थ आणि जे व्हावं असं वाटतंय त्याबद्दल आज काम करावं लागेल. पण आपण हे पुरते विसरतो. चला या आता या वर्तमानात जगूया 1. वर्तमान कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना 2. वर्तमान कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मौनांची भाषांतरे #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisa...
Oct 03, 2023•7 min•Season 1Ep. 80
जन्मदिवस या पृथ्वीतलावर आपण जेव्हा आलो तो खास दिवस,आपला वाढदिवस. केक, फुगे, औक्षण, थोरांचे आशीर्वाद अन् खूप सारं प्रेम यांनी भरलेला हा दिवस. यामुळेच तर आपल्याला हे सुंदर जग बघण्याची अन् आयुष्य जगण्याची सुवर्णसंधी मिळते. त्यामुळे या दिवशी जितकं नाचावं , गावं, कृतज्ञता व्यक्त करावी ती थोडीच. तर मग स्विकार करा कवितांची ही अमूल्य भेट तुमच्या खास दिवसासाठी. 1. जन्मदिवस कवी - अमोल शिंगणे 2. औक्षण कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - बाहुल्या Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Sep 29, 2023•8 min•Season 1Ep. 79
भिंत भिंती किती प्रकारच्या असतात ना. काही भिंती उभारून नवीन जग बनवता येतं, तर काही भिंती उभारून असलेलं जग विभागलं जातं. काही भिंती निधड्या छातीने आपलं रक्षण करतात तर काही भिंती लोकांच्या मनामध्ये फूट पाडून शांतीचं भक्षण करतात. त्यांच्या पल्याड काही छानही असेल याची वेडी आशा दाखवतात पण कधी त्यांच्या निगरगट्ट स्वभावाने मनं तोडतात. बघुयात या भिंतीमुळे मनाची घरे कशी पडतात आणि उभी राहतात. 1. भिंती कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना 2. जेव्हा भिंती स्तब्ध होतात कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेश...
Sep 26, 2023•6 min•Season 1Ep. 78