डेरिंग-फिरिंग मानव जातीने कितीही प्रगती केली असली तरी ती आपल्याला मिळालेल्या निसर्गाच्या साथीमुळे. एखादा सिनेमा पाहिला की आपल्याला वाटतं मी पण असाच या नायकासारखं जग बदलवून टाकेन. पण आपलं आयुष्य आपल्या घर - ऑफिस या वर्तुळापर्यंतच मर्यादित राहातं. मग कुठलं जग बदलणार. आपल्या प्रगतीचा झेंडा गर्वाने मिरवणाऱ्या या मनुष्य प्राण्याने हे विसरू नये की तो या विश्वाची निर्मिती आहे. बघुयात कवी मंडळी कसं जागं करतायत आपल्याला. 1. पुस्तकांचे कौतुक कवी - ओम कंटाळे 2. ग्रंथ आमुचे साथी कवी - मंगेश पाडगावकर कवितासं...
Sep 22, 2023•8 min•Season 1Ep. 77
कविता तिच्या फक्त २ ओळींनी हसवणारी, प्रेरणा देणारी ही कविता. किती श्रेष्ठ असते. पण तिला समजणं, कागदरुपी जाळ्यात पकडणं तितकच कठीण काम. पण ती जेव्हा येते तेव्हा नुसती बहार आणते. चला तर मग कवितेच्या गावांत कवितांच्या नावेतून. 1. कविता 1 कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मौनाची भाषांतरे 2. कविता कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही.. Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Sep 19, 2023•7 min•Season 1Ep. 76
बाप्पा मोरया आपल्या सर्वांचं अत्यंत लाडकं दैवत - गणपती बाप्पा. तो आला की सगळीकडे नुसता उत्साहाला उधाण येते. आरत्या, आरास, मोदकाचा नैवेद्य यांनी वातावरण मंगलमय होऊन जाते. त्याच्या आगमनाने जणू आपल्याला एक मित्र भेटायला आल्यासारखं वाटतं. तो बुध्दीचा देवता, विघ्नहर्ता अन् सुखकर्ता तर आहेच. पण तो नक्कीच एक जादूगार आहे असं मला वाटतं. त्याच्या फक्त आगमनाने आपल्याला संकटांचा सामना करण्याचं धैर्य मिळतं. चला तर मग जल्लोषात स्वागत करूया मोरयाचं कवितांच्या ढोल ताशांच्या गजरात. १.गणेशा, ये आम्हा उध्दरू कवी -...
Sep 15, 2023•5 min•Season 1Ep. 75
आशा उद्याची वादळं नेहमीच येत असतात आपल्या आयुष्यात. आपण सगळी उमेद हरवून बसतो. पण आशेचा हात धरून आपण एक एक पाऊल टाकत जातो. मग दिसते ती सुंदर सोनेरी सकाळ. आशेच्या जोरावरच आजपर्यंत मानवाने इतकी प्रगती केली आहे. या आशेची कास धरूया कवितांच्या पक्तींतून. 1. जिवलगा, खिन्नता का ही? कवी - सुधीर मोघे कवितासंग्रह - आरसपानी 2. आशा कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मुक्तायन Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Sep 12, 2023•7 min•Season 1Ep. 74
पुस्तकांची किमया पुस्तकं काळी - पांढरी, अबोल पण बोलकी, निर्जीव पण तितकीच सजीव, छोटी पण तितकीच महान. आपल्या पानातून वेगळ्याच दुनियेत नेऊन सोडतात. खूप लोकांशी संपर्क येतो, आपल्याला आयुष्याचे धडे मिळतात. अनेक न पाहिलेले प्रसंग आपण परत जगतो. अशी जादूमय असतात ही पुस्तकं. भरुभरून आनंद, प्रेरणा, ज्ञान देतात. चला तर मग स्वार होऊयात पुस्तकांच्या जगात कवितेच्या विमानातून. 1. पुस्तकांचे कौतुक कवी - ओम कंटाळे 2. ग्रंथ आमुचे साथी कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - नवा दिवस Hosted on Acast. See acast.com/priv...
Sep 08, 2023•6 min•Season 1Ep. 73
जिप्सी जगरहाटीची फिकीर न करता पायाची भिंगरी करुन फिरणारे हे भटके. त्यांना कोणतीही बंधनं नसतात. येईल तो दिवस आनंद अन् कुतूहल यांनी भरलेला ठेवतात. कशाचीच त्यांना भीती नसते. एक वेड मनाशी घेऊन ते फक्त फिरत राहतात. बघूया निदान काव्याचं जाळं तरी अडवू शकतं या जिप्सीना. 1. जिप्सी कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह -जिप्सी 2. जिप्सी कवी - शशी डंभारे कवितासंग्रह - प्रिय मित्रास #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मरा...
Sep 05, 2023•8 min•Season 1Ep. 72
मनमोहन श्रावणघन हिरव्यागार धरतीने नटलेला, इंद्रधनुष्याच्या रंगांनी सजलेला, आणि मृदगंधाच्या अत्तराने बहरलेला श्रावण. हा महिना धरतीसोबतच आपल्या मनालाही न्हाऊ घालतो. सगळं जग कसं नवीन चित्तवेधक रूप धारण करतं.सणांची अन् गोडधोडाची रेलचेल, पाऊस ऊनाचा खेळ, पावसाची गाणी, चहा भजी यांनी तर नुसती धमाल येते आयुष्यात. असा हा मनमोहक श्रावण बघुयात कवितेच्या वर्षावातून. 1. श्रावणाचा पारिजात कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - निराकार 2. मनमोहन श्रावणघन कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - पाउसगाणी Hosted on Acast. See ...
Sep 01, 2023•6 min•Season 1Ep. 71
रेशीम धागा | रक्षाबंधन विशेष भावाबहिणींच्या नात्याचा गोडवा साजरा करण्यासाठीचा खास सण. हा रेशीम धागा बांधून ठेवतो मनाचेही घट्ट धागे घट्ट अन् हो मिठाईचा डब्बाही राहत नाही मागे. प्रसंगी एकमेकांवर भांडताना तुटून पडणारे ही दोघंजणं तितक्याच खंबीरपणे उभी राहतात प्रसंगी. चला तर मग राखीपौर्णिमा साजरी करूया कवितेच्या गोडव्यासोबत. 1.राखी पोर्णिमा कवी : प्रा.विजय पोहनेरकर 2. बालपणाचे गाव कवी : प्रभाती बेनाडे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Aug 29, 2023•7 min•Season 1Ep. 70
आयुष्याचा ग्रंथ एक एक पान या ग्रंथाचं आपण रोज वाचतो. कधी - कधी लिहायलाही बघतो. आपले अनुभव, काही व्यक्ती, प्रसंग त्यात भर टाकतात आणि आपण त्या परीने भर टाकत राहतो त्या ग्रंथात. पण तो ग्रंथ सर्वतो परी सुंदर व्हावा म्हणून किती प्रयत्न करतो आपण. बघूया काही क्लृप्त्या कवितेच्या ओळीमधून. 1. आयुष्याच्या पायापाशी कवी - संदीप खरे कवितासंग्रह - नेणिवेची अक्षरे 2. आयुष्याचा ग्रंथ कवी - वि स खांडेकर कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya...
Aug 25, 2023•6 min•Season 1Ep. 69
नदीकिनारी नदी कोणाला प्रिय नाही?.गंगा, यमुना, सरस्वती यांनी फक्त नदीकाठच नाही तर सुकलेल्या मनाचे कोपरेही त्यांच्या वाहत्या पाण्याने नुसते हिरवेगार करून टाकले आहेत. या नद्या निसर्गाला रूप आणतात, सर्व जीवांना पोसतात. फक्त प्रवाहासोबत वाहत राहिल्याने आपण कसे निर्मळ राहतो हा धडा शिकवत राहतात. चला तर मग बसुया नदीकिनारी आणि विसरून जाऊयात चिंता सारी. 1. नदीकाठ कवी - ना धों महानोर कवितासंग्रह - पक्ष्यांचे लक्ष थवे 2. नदीकिनारी कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - विशाखा #podcast #marathikavita #maharashtra #क...
Aug 22, 2023•6 min•Season 1Ep. 68
पाहुणे ' पाहुणे येती घरा तोची दिवाळी दसरा ' ही म्हण उगाचच नाही आली. कोणी पाहुणे येणार म्हटलं की घरात गोडधोडाची रेलचेल. खूप गप्पा, आठवणींची उजळणी आणि परत लवकरच भेटण्याच्या आणाभाका, हे अगदी ओघानं आलंच. काही पाहुणे खूप लाघवी तर काही अगदी तिखट नकोसे. पण गंमत तर आणतातच. बघूया पाहुण्यांचा कवितारुपी आगथ्य सोहळा. 1. पाहुणा कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - महावृक्ष 2. पाहुणा कवी - सुधीर मोघे कवितासंग्रह - स्वतंत्रते भगवती #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marat...
Aug 18, 2023•7 min•Season 1Ep. 67
स्वातंत्र्यलक्ष्मी १५ ऑगस्ट हा सर्व भारतीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा आणि मानाचा दिवस. या दिवशी ७७ वर्षापूर्वी आपण पारतंत्र्यातून मुक्त होऊन देशाची सूत्रं आपल्या हातात घेतली. यासाठी अनेक गांधी, टिळक, आगरकर आपल्याला गमवावे लागले. पण हा सोनियाचा दिवस त्यांच्यामुळेच आपल्याला लाभला आणि आपण हे स्वातंत्र्य आज अनुभवतो आहोत. चला तर मग वंदन करूया या महान व्यक्तींना आणि भारत मातेला. 1. वंदे मातरम! कवी - ग दि माडगूळकर कवितासंग्रह - पुरीया 2. गाऊ त्यांना आरती कवी - यशवंत कवितासंग्रह - पाणपोई Hosted on Acast. S...
Aug 15, 2023•8 min•Season 1Ep. 66
पोकळी काही व्यक्ती, वस्तू, जागा अतिशय महत्वाच्या असतात आपल्या आयुष्यात. त्यांच्या नसण्यामुळे एक मोठी पोकळी निर्माण होते. ती भरून कधी शक्य होतं कधी नाही. ही जाणीव खूपच उशिरा सर्वांना. बघुयात या पोकळीबद्दल कवीवर्य काय म्हणतायत 1. पोकळी कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना 2. पोकळी कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही.. #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्ट्र #मराठी #मराठीभाषा #मराठीकवी #कविता_वाचन #कवित...
Aug 11, 2023•7 min•Season 1Ep. 65
चहा आपल्या सर्वांचा लाडका चहा. त्याच्याशिवाय आपला दिवस सुरूच होत नाही. तो आपल्याला फक्त तरतरीच अन् उबच नाही तर साथही देतो. कधी - कधी नवीन नात्यांच्या सुरुवातीचं तो गोड कारण असतो. अश्या सर्वगुण संपन्न अश्या लाडक्या पेयाच कौतुक कवितारुपी स्तुतीसुमनांनी झालं नाही तर नवलच. चला तर मग घेऊया आस्वाद. 1. गवती चहा कवी - वलय मूळगुंद कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं 2. चहा कवी - शशी डंभारे कवितासंग्रह - प्रिय मित्रास #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast...
Aug 08, 2023•8 min•Season 1Ep. 64
' जीवन ' त्यांना कळले हो आयुष्याचे टप्पे - टोणपे कधी आपल्याला उंच उडवतात तर कधी जोरात जमिनीवर आपटतात. पण काही धडे मात्र नक्की शिकवतात. आपल्या मानव जातीचा अहंकार काही क्षणात धुळीस मिळवला जातो. पण खरंच आपल्याला जीवन कळतं का , कळलं तर मग ते खरंच आपण ते खरंच जगतो का असे नाना प्रश्न उभे राहतात. पाहुयात कवीवर्यांचा काव्यमय दृष्टिकोन. 1. कुणि मारावे कवी - बा सी मर्ढेकर कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता 2.जीवन त्यांना कळले हो कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह - आनंदभैरवी / बोरकरांची कविता #podcast #marathikavi...
Aug 04, 2023•6 min•Season 1Ep. 63
आकाशवेड प्रत्येकालाच त्याच्या क्षेत्रात काहीतरी करून दाखवायचं असतं, आकाशाला गवसणी घालायची असते. हे उंच, विस्तीर्णग आकाश त्याच्या सुंदर रूपांनी तर आपल्याला भरुळ घालतेच पण आपण किती उंच उडू शकतो याची जाणीवही करून देते. आपल्याला त्याच्या प्रेमात पाडणाऱ्या आणि नवीन भरारी घेण्यास प्रेरणा देणाऱ्या या आभाळाला कवितातून गवसणी घालूया. 1. आपले आभाळ कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मौनांची भाषांतरे 2. आकाशवेडी कवी - पद्मा गोळे #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marat...
Aug 01, 2023•8 min•Season 1Ep. 62
झोका झोका म्हणजे नुसती धमाल. हे समीकरण अगदी ठरलेलं. झोक्यावर बसलं की वेगळ्याच जगात आपण फिरतो आहोत असं वाटतं. त्याच्या सोबत आकाशाला गवसणी घालत भरारी घेण्यासारखी मज्जा दुसरी काय असू शकते. चला बसुया या कवितांच्या झोक्यावर. 1. झोका कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 2. झोका कवी - ग्रेस कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश #marathi #marathikavita #marathisahitya #podcast #marathipodcast #kavita #मराठी #marathipoem #marathipoetr y Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jul 28, 2023•5 min•Season 1Ep. 61
आनंदाची उधळण करणारा हा पावसाळा. मातीचा सुगंध, हिरवळ, इंद्रधनू यांची नुसती बरसात करत राहतो. सर्वांच्या चेहऱ्यावर एक समाधानाचं हसू आणतो. चला तर मग चिंब भिजून जाऊयात कवितांच्या वृष्टीत. 1. पाऊस कवी - ना धों महानोर कवितासंग्रह - पावसाळी कविता 2. पावसाचा शृंगार कवी - सावनी शेंडे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jul 25, 2023•7 min•Season 1Ep. 60
हिमालयाची हाक उत्तुंग पर्वत नेहमीच आपल्याला विविध गोष्टी देत राहतो. त्यांच्याकडे फक्त पाहिलं तरी खंबीरपणा ज्याला म्हणतात ते हेच असावं वाटतं. प्रत्येक ऋतूत वेगळंच रूप ते धारण करतात. कधी हिरवागार, कधी सोनेरी. त्यांच्या माथ्यावरून दिसणाऱ्या सुंदर दृश्यांना तोड नाही. त्यांची महती काव्यातून पाहूया. 1. हिमालयाची हाक कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह - आनंदभैरवी 2. गिरीगान कवी बी कवितासंग्रह - फुलांची ओंजळ Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jul 21, 2023•8 min•Season 1Ep. 59
साडी साडी हा सर्व भारतीय स्त्रियांचा, मुलींचा अगदी जिव्हाळयाचा विषय. वय कितीही असो, साड्या भुरळ पाडतातच. लग्नाच्या शालू, भावाची साडी, ओटी भरणाची अश्या विविध प्रसंगांच्या साड्या वेगळीच रंगत आपल्याला कपाटाला आणत राहतात. मिरवूया या लाडक्या साड्यांना कवितेच्या बाजारात. 1. मऊ रेशमाची घडी कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम 2. पैठणी कवी - शांता शेळके कवितासंग्रह - गोंदण Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jul 18, 2023•7 min•Season 1Ep. 58
देव्हारा घरातला, मनातला असा आल्हाददायक कोपरा जो खूप काही देतो, आणि खूप काही घेतो आपल्या काळज्या, मागण्या, प्रार्थना. धूपदीप, फुलं आणि आपली श्रध्दा अशा गोष्टींनी सजलेला देव्हारा जगात कुठंही असू शकतो. एखाद्या जागेत, एखाद्या माणसात, एखाद्या दगडात सुद्धा. पाहुयात कवितारुपी माळांनी देव्हारा कसा सजवला आहे ते. 1. देवदेव्हारा मांडला कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - बाहुल्या 2. देव्हारा कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मराठी माती Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jul 14, 2023•6 min•Season 1Ep. 57
कवी कोण? आपणा सर्वांना त्यांच्या काव्य प्रतिभेने आनंद आणि जीवनाचं सूत्र सांगणारे हे कवी. अगदी उजेडापासून ते अंधारापर्यंत कोणतीही गोष्ट यांच्या काव्यजाळात अडकली नाहीये असं झालं नाहीये. जगातल्या सगळ्या भाषांमध्ये कविता रचल्या गेल्या आणि त्यांनी नेहमीच सर्वांना प्रसन्नता दिली. पाहुयात कविंबद्दल कविलोक काय म्हणतायत. 1 सृष्टी आणि कवी कवी - केशवसुत कवितासंग्रह - समग्र केशवसुत 2. कवी कोण? कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह - प्रतिभा Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jul 11, 2023•8 min•Season 1Ep. 56
लोक काय म्हणतील रोज वावरताना आपण चार चौघात बरोबर वाटू असंच आपण वागत राहतो. अगदी आयुष्यभर. खूप इच्छांना मुरड घालत बसतो. समाजाच्या चौकटीत बसण्याची धडपड करत असतो नेहमी. त्यामुळे खूप वेगळं काही करायची इच्छा असूनही ते न केल्यामुळे शेवटी फक्त पश्चात्ताप उरतो. बघुयात काय काय आहेत अश्या गोष्टी कविवर्यांच्या सोबत. 1. पण .. लोक काय म्हणतील कवी - गुरू ठाकूर 2. जन पळभर म्हणतील हाय हाय कवी - भा रा तांबे कवितासंग्रह - भा रा तांबे याची समग्र कविता #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marath...
Jul 07, 2023•6 min•Season 1Ep. 55
निसर्ग सूर्योदय, खळखळ वाहणारे धबधबे, चांदण्यांनी भरलेले आकाश अश्या असंख्य मनोवेधक दृश्यांची उधळण निसर्ग आपल्यावर नेहमी करत असतो. ह्या गोष्टी फक्त डोळ्यांनाच नाही तर मनाला प्रसन्न करून टाकतात. निसर्ग आपल्याला जगायला लागणाऱ्या आणि जीवनाचा आनंद घ्यावा अश्या नेहमीच मुबलक प्रमाणात देत असतो. चला हरवून जाऊयात या रंगांमध्ये कवितांच्या सहवासात. 1. निसर्ग कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी कवितासंग्रह - चोरकप्पा 2. निसर्ग कवी - शांता ज शेळके कवितासंग्रह - वर्षा #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीका...
Jul 04, 2023•9 min•Season 1Ep. 54
आठवणी बालपण, शाळा, कॉलेज मग नोकरी या आयुष्याच्या प्रवासात असंख्य आठवणी आपण मनाच्या कोपऱ्यात साठवत असतो. काही गोड, काही कटू पण त्यांच्या सोबत आपण काही क्षण पुन्हा जगतो. त्या आपल्याला खूप लोकांशी, घटनांशी जोडायला मदत करतात. चला तर हरवून जाऊयात आठवणीच्या गावी. 1. आठवण कवी - बी कवितासंग्रह - फुलांची ओंजळ 2. तुझी आठवण कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी..वगैरे.. Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jun 30, 2023•6 min•Season 1Ep. 53
विठ्ठल विठ्ठल हा नाद मनात, जीभेवर ठेऊन अख्खी मांदियाळी पंढरीकडे वाटचाल दरवर्षी तितक्याच उत्साहाने करते. कित्येकांना त्यांची माऊली, त्यांचा सखा, पाठीराखा विठ्ठलामध्ये सापडतो. भक्त्यांच्या वेड्या मायेपुढे तर तो हतबल आहेच पण काव्यारुपी मायाजळात तर तो गेली कित्येक वर्षे प्रेमाने अडकून आहे. चला तर मग विठोबाची महती आज कवितेच्या संगतीने ऐकू. १. पांडुरंग कवी - बा.भ. बोरकर कवितासंग्रह - चिन्मयी २. विठाई कवी - वलय मूळगुंद कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं Hosted on Acast. See acast.com/privacy for more inform...
Jun 27, 2023•6 min•Season 1Ep. 52
जुई आपल्या सुगंधाने भारून टाकणारे ते जुईचे नाजूक फुल. त्याच्या प्रेमात कोणी पडणार असं होऊच शकत नाही. चांदण्याप्रमाणे दिसणारी ही सुंदर गोड फुलं कवितेच्या माळेमध्ये काय बहार आणतात ते पाहूया. 1.जुई कवी - अनिल कवितासंग्रह - दशपदी 2. फुलांचे भांडण कवी - दा वि फफे कवितासंग्रह - आठवणीतल्या कविता 3 Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jun 23, 2023•8 min•Season 1Ep. 51
झंझावात एखादा झंझावात पूर्ण आयुष्याचं चित्रच बदलून टाकतो. काहीवेळा तो आपल्याला आपल्या प्रतिभेची ओळख करून देतो. नवीन गोष्टींची कल्पना अचानक होते. कधी - कधी स्वतःलाच झंझावात बनून जीवनाला आव्हान द्यावं लागतं. बघूया कसा सामना करतात या वादळाचा कविवर्य. 1. झंझावात कवी - सुरेश भट कवितासंग्रह - एल्गार 2. झंझावात कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - शेला Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....
Jun 20, 2023•7 min•Season 1Ep. 50
बाप अख्ख्या घरासाठी रात्रंदिवस राबणारा तो बाप. त्यांच्या भावना, समस्या ते सहसा बोलून दाखवत नाहीत. लढत राहतात जगाशी सर्वांच्या सुखासाठी. आपला भक्कम आधार असणाऱ्या अश्या या आपल्या लाडक्या बाबांविषयी काय म्हणतायत कविवर्य. 1. माझी कन्या कवी - बी कवितासंग्रह - फुलांची ओंजळ 2. बाप कवी - इंद्रजीत भालेराव Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.
Jun 16, 2023•9 min•Season 1Ep. 49
शाळा आपल्या सर्वांच्या आयुष्यातला सुवर्णकाळ. वर्ग, मित्र, शिक्षक, पुस्तकं, शिक्षा, मैदान या गोष्टींनी किती दिलंय आपल्याला. आपल्याला फक्त पुस्तकातलेच नाही तर जीवनाचे पण धडे शिकवले या शाळेने. तिचं ऋण आपण कधीच फेडू नाही शकणार. बघूया कवितेच्या शब्दात शाळेची गोडवी जिथं आपण हे शब्द बनवायला शिकलो. 1. शाळेचा रस्ता कवी - ना गं लिमये 2. शाळा कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी कवितासंग्रह - चोरकप्पा #podcast #marathikavita #maharashtra #कविता #मराठीकाव्य #marathisahitya #कविता #marathipodcast #marathipoem #महाराष्...
Jun 13, 2023•7 min•Season 1Ep. 48