Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast - podcast cover

Vechleli Phule | वेचलेली फुले - Marathi Podcast

Vechleli Phuleshows.acast.com

Welcome to 'Vechleli Phule'. You will get to listen to beautiful poems in Marathi on different topics. It's one of the most forgotten part of literature. It's our sincere attempt to put forth that treasure in front of you'll. Hope you will love it! Let's dive into the amazing world of words and all things inspiring !!


'वेचलेली फुले' या चॅनल वरती तुमचं खूप खूप स्वागत. तुम्हाला आम्ही मराठीतील सुंदर मनाला भावणाऱ्या कविता ऐकवणार आहोत. कविता हा साहित्याचा खूप महत्वाचा भाग मागं पडत चाललाय. तो खजिना तुम्हां सर्वांसाठी खुला करण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न. चला तर मग हरवून जाऊयात या न्याऱ्या दुनियेत.

Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

रंगमंच | Rangmanch

रंगमंच चेहऱ्यावर रंग लाऊन स्टेजवरती ते पात्र करणं जेवढं अवघड आहे तितकंच अवघड तुमचं आयुष्यातलं पात्र समाजाच्या नियमांनुसार निभावणं. हा जीवनाचा रंगमंच आपल्याला बहुपात्री/बहुरंगी बनायला भाग पाडतो. या तारेवरच्या कसरतीचा चित्रपट काव्यारुपात कसा सजला आहे ते बघूया. 1. रंगमंच कवी - ग दि माडगूळकर कवितासंग्रह - पूरीया 2. रंगमंच कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - मेंदी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Jun 09, 20236 minSeason 1Ep. 47

शीळ | Shil

शीळ मनाला वेड लावणारी, दाद देणारी, मजेशीर वाटणारी अशी ही शीळ. याचेही खूप प्रकार असतात. ती एका तऱ्हेची कलाच. ही धून कशी अडकलीय या काव्यरुपी माळेमध्ये. 1. शीळ कवी - ना घ देशपांडे कवितासंग्रह - शीळ 2. शीळ कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

Jun 06, 20235 minSeason 1Ep. 46

पालखी | Palakhi

विविध प्रकारच्या पालख्या आपण सगळ्यांनीच अनुभवल्या आहेत. त्यांच्याबद्दल कौतुक, आदर तर असतोच. कारण पालख्या खूप महत्त्वाच्या व्यक्तींना, गोष्टींना वाहून नेतात. पाहुयात आज कोण घेतायत पालखीची स्वारी. 1. पालखी कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - चित्कळा 2. पालखी कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी.. वगैरे.. Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

Jun 02, 20236 minSeason 1Ep. 45

मुखवटे | Mukhvate

मुखवट्यानी अख्ख जग व्यापले आहे. जो तो ते घालूनच रोजचं आयुष्य जगतोय. काळाची गरज होऊन बसले आहेत हे मुखवटे. भावनाशून्य, नाटकी असे हे मुखवटे कधी कधी खूप त्रासदायक ठरतात. आपण स्वत्व हरवत चाललोय याची खंत भासवतात. 1. मुखवटे कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 2. मुखवटा कवी - प्रकाश खोटे कवितासंग्रह - साधना Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

May 30, 20237 minSeason 1Ep. 44

मेंदी | Mendi

मेंदीचा तो रंग, सुगंध मनाला खूप मोहून टाकतो. आपण स्वप्नांत हरवून हरवून जातो त्या नक्षिसोबत. खूप हवीशी वाटणारी ही गोड मेंदीही आपल्या कवितेच्या शब्दांनीही सजली आहे. बघूया कसा रंग चढतोय. 1. मेंदी कवी - शांता शेळके कवितासंग्रह - कळ्यांचे दिवस फुलांच्या राती 2. मेंदी कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी वगैरे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

May 26, 20237 minSeason 1Ep. 43

हुरहूर | Hurhur

कोणाला आठवून, काहीतरी हरवल्यानंतर, कधी विनाकारण हुरहूरही लागतेच. ती आपला वेळ आणि चैन दोन्ही हिरावून घेते. पण काही गोष्टींची हुरहूर खूप गोड असते. चला बघूया कशाची हुरहूर लागलीय आपल्या लाडक्या कविवर्याना. 1. हुरहूर कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रसवंतीचा मुजरा 2. हुरहूर कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - सहवास Hosted on Acast. See acast.com/privacy for more information.

May 23, 20236 minSeason 1Ep. 42

गुंता | Gunta

गुंता अगदी एखाद्या कपापासून ते घरापर्यंत सगळ्या गोष्टींमध्ये आपण गुंतत जातो. त्यापासून दूर होणं आपल्याला खूपच अवघड होऊन बसतं. या गुंत्यामध्ये आपण इतके गुंतून पडतो की आपण सारं काही विसरून बसतो. चला बघूया या गुंत्यातून बाहेर पडता येतं का कवितांचा आधार घेऊन. 1. नाही गुंतून जायचे कवी - सुधीर मोघे कवितासंग्रह - पक्ष्यांचे ठसे 2. पाऊल तरी उचलू कशी कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

May 19, 20236 minSeason 1Ep. 41

गंध | Gandh

मोगरा, धूप-दीप, पहिला पाऊस यांचा सुगंध मनाला वेगळाच आनंद देऊन जातो. त्या-त्या सुवासाच्या आठवणी आणि त्यांचे संदर्भ वेगवेगळे असतात पण ते विस्मरणीय असतात. चला तर मग हरवून जाऊयात या काव्यरुपी गंध गाभाऱ्यात. 1. गंधांतून गूढ उकलते कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - जिप्सी 2. गंध कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

May 16, 20235 minSeason 1Ep. 40

आई | Aai

आईची महती काय सांगावी. ती शब्दात बसवणं शक्यच नाही. ती आपला पहिला गुरू तर असतेच पण असंख्य भूमिका पार पाडते. डॉक्टर, मैत्रीण, आधार. नेहमी पाठीशी घालणारी, आपल्याला समजून घेणारी आईच असते. अश्या या माऊलीची थोरवी कशी मांडलीय बघूया कवी मंडळींनी. १. आई कवी - अनिल कवितासंग्रह - सांगाती २. आईचे मन कवी - यशवंत कवितासंग्रह - पाणपोई ३.आई कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असेच होते ना तुलाही ४.आईची आठवण कवी - माधव ज्युलीन कवितासंग्रह - स्वप्नलहरी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

May 12, 202310 minSeason 1Ep. 39

Touch Screen

विज्ञानाच्या साह्याने मानवाने गगनभरारी घेतलीय. आपलं आयुष्य आता मोबाईल, टीव्ही, लॅपटॉप या गोष्टींशिवाय अपूर्ण वाटतं. प्रत्येक कामासाठी विज्ञानाचा टेकू घ्यायची वाईट खोडचं लागलीय आपल्याला. बघूया कवितेच्या शब्दांमध्ये सापडते का ही विज्ञानाची घोडदौड. 1. √-1 कवी - विंदा करंदीकर कवितासंग्रह - मृदगंध 2. Touch screen कवी - मिलिंद जोशी कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही 3. थँक गॉड कुसुमाग्रज! कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी वगैरे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

May 09, 202312 minSeason 1Ep. 38

चित्र | Chitra

सर्वांना आवडणारी चित्रं. त्यांच्या रंगांच्या, छटांच्या आपण प्रेमात पडतो. कोणी कागदावर तर कोणी मनात पण चित्रं सगळेच काढतात. रोज वेगवेगळे घटक, रंग त्याचा भाग बनत राहतात. चला तर मग कवितेच्या शब्दांनी सजवलेलं चित्र पाहायला. 1. हे चित्र कवी - शंकर वैद्य 2. हाय काय न्हाय काय कवी - वैभव जोशी कवितासंग्रह - मी वगैरे 3 . चित्र कवी - शांता शेळके कवितासंग्रह - पूर्वसंध्या Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

May 05, 202310 minSeason 1Ep. 37

सावली | Sawali

धगधगत्या उन्हापासून जीवाला गारवा देणारी सावली. अशी ही हवीशी वाटणारी सावली रात्री आपल्याला नकोशी वाटते. तिची रूपं बदलतात. हरवून जाऊयात कवितांच्या सावल्यांत. 1. सावली कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मारवा 2. सावली कवी - वि स खांडेकर कवितासंग्रह - वि स खांडेकरांच्या कविता 3 . सावली कवी - ग्रेस कवितासंग्रह - चंद्रमाधवीचे प्रदेश Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

May 02, 20239 minSeason 1Ep. 36

जय महाराष्ट्र | Jai Maharashtra

शिवरायांचे शौर्य,सह्याद्रीचे सौंदर्य आणि पंढरीच्या माऊलीने पावन केलेला आपलं राज्य. अभिमानाने छाती फुलून यावी असा ऐतिहासिक, सांस्कृतिक वारसा आपल्याला लाभला आहे. ही गौरवपताका नेहमीच अशी महाराष्ट्रावर फडकत राहो. साजरी करूया महती आपल्या लाडक्या महाराष्ट्राची. 1. महाराष्ट्र गीत कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - मारवा 2. महाराष्ट्र-गीत कवी - माधव ज्युलियन कवितासंग्रह - स्वप्नलहरी 3. नवा महाराष्ट्र कवी - यशवंत कवितासंग्रह - कमंडलू Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Apr 28, 202310 minSeason 1Ep. 35

पाणी...पाणी... | Pani.. Pani..

पाण्यामुळे ही सृष्टी जिवंत आहे. ते आहे तर आपण आहोत. त्याचा निखळ प्रवाह, मुबलकता समृध्दी आणते. पाणी अत्यंत कमी होत चाललंय. त्याचं महत्व ओळखून आपण जागरूकतेने वागायला हवे. बघूया या जीवन देणाऱ्या पंचमहाभूताबद्दल काय म्हणतायत कवी मंडळी. 1. पाणी कवी - श्रीपाद प्रभाकर जोशी कवितासंग्रह - चोरकप्पा 2. पाणी...पाणी... कवी- इंदिरा संत कवितासंग्रह - गर्भरेशीम 3. पाणी कवितासंग्रह - दिवेलागण कवी - आरतीप्रभू 4. पाणी कवी ना धों महानोर कवितासंग्रह पक्ष्यांचे लक्ष थवे Hosted on Acast. See acast.com/privacy for more...

Apr 25, 202311 minSeason 1Ep. 34

वासुदेव आला | Vasudev Aala

वासुदेव, गारुडी, सारंगीवाला, विदूषक ही व्यक्तिमत्वं अचाट असतात. त्यांच्या कलागुणांनी आपल्याला भारून टाकतात. लहानथोरापासून सर्वांनाच त्यांचं कौतुक वाटतं. बघूया कविवर्य यांची महती कशी कवितेत बांधतायत. 1. चिमणा वासुदेव कवी के नारखेडे कवितासंग्रह आठवणीतल्या कविता भाग 3 2. सारंगीवाला कवी - यशवंत कवितासंग्रह - पाणपोई 3. गारुडी कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Apr 21, 202310 minSeason 1Ep. 33

आवाज | Awaj

आपला आवाज हा आपल्या व्यक्तिमत्त्वाचा आरसा असतो. त्यातून आपण कोणाला उमेद देऊ शकतो तर कोणाला उमेद हरवून बसण्याची वेळही आणू शकतो. अन्यायाविरुद्ध आवाज उठवला म्हणून जगभरात विविध क्रांत्या घडून आल्या. बघूया कवितांचा आवाज आज कवींच्या शब्दरुपी माध्यमातून. 1. मुक्या माझ्या व्यथा कथा कवी - बा भ बोरकर कवितासंग्रह - चित्रवीणा 2. मी अन माझा आवाज कवी - संदीप खरे कवितासंग्रह - मी अन माझा आवाज 3. ताजा उष्ण आवाज कवी - अरुणा ढेरे कवितासंग्रह - मंत्राक्षर Hosted on Acast. See acast.com/privacy for more information...

Apr 18, 202311 minSeason 1Ep. 32

पहाटतो सूर्य | Pahatato Surya

सूर्याच्या प्रकाशाने अख्खी धरती उजळून निघते. तो आपल्याला जीवन तर देतोच पण रोज नवीन आशा देतो. या सुवर्णयज्ञावर काय कवितेचा प्रकाश टाकलाय बघूया कवी मंडळींनी. 1. अरूण कवी बालकवी कवितासंग्रह फुलराणी 2. सूर्य कवी कुसुमाग्रज कवितासंग्रह छंदोमयी 3. अर्घ्य कवी अनिल कवितासंग्रह सांगाती 4. सूर्य कवी सुधीर मोघे कवितासंग्रह आत्मरंग Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Apr 14, 20239 minSeason 1Ep. 31

मोदक, गुलाबजाम आणि आपण | Modak, Gulabjam ani aapan

आपल्याकडे किती पदार्थांची रेलचेल असते ना. तोच पदार्थ किती वेगवेगळ्या प्रकारे बनवला जातो. ह्या गोष्टी आपल्याला किती सुखावून जातात. मज्जा आणतात जीवनात. चला तर मग मारुयात ताव कवितांचा आस्वाद घेऊन. 1. काय वाढले पानावरती कवी - ग दि माडगूळकर 2. मोदक कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - मुखवटे 3. गुलाबजाम कवी - अरुण साळगावकर 4. वडापाव Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Apr 11, 202314 minSeason 1Ep. 30

ही माणसे | Hee Manase

माणसांनी अख्ख्या पृथ्वीला आपल्या इच्छेनुसार बदललय. खूप गोष्टींचा शोध लावला. बोटे तोंडात घालायला लावेल अशी प्रगती केली. पण माणूस म्हणून आपण खरंच पुढं गेलोय का. का हरवून बसलोय माणूसपणाला. चला बघूया या मनुष्य प्राण्याविषयी काय विचार आहेत कवींचे. १. माणसे कवी - वलय मुळगुंद कवितासंग्रह - एक झाड शब्दांचं २. कवी - बा सी मर्ढेकर कवितासंग्रह - मर्ढेकरांची कविता ३. मानवाचे अंती | एक गोत्र कवी - विं. दा.करंदीकर कवितासंग्रह - धृपद #marathi #marathikavita #marathisahitya #podcast #marathipodcast #kavita #mar...

Apr 07, 202313 minSeason 1Ep. 29

तरीही झाडं म्हणत नाहीत.. | Tarihi jhade mhanat nahit

झाडांच्या अस्तित्वाने सारं जग सुंदर बनवलंय. मनाला शांती, तनाला सावली आणि डोळ्याला गारवा देणारी ही झाडं. किती प्रकारचा आनंद देतात ना आपल्याला. अगदी निःस्वार्थपणे. पाहुयात या लाडक्या हिरव्या मित्राबद्दल काय म्हणतात कवीवर्य. १.पिंपळ कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - पिंपळ २.माडाचे भावगीत कवी - बा.भ.बोरकर कवितासंग्रह - आनंदभैरवी ३. कवी - संदीप अवचट Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Apr 04, 20239 minSeason 1Ep. 28

स्वप्नशहारे | Swapnashahare

स्वप्नांची दुनिया किती भारी असते ना. आपल्याला हव्या त्या गोष्टी आकारात आणता येतात. स्वप्ने पाहिल्यानेच तर ती सत्यात उतरतात. पण काही स्वप्ने मात्र पायाखालची जमीन सरकवतात. बघूया गोड स्वप्नं आपल्या कवी मंडळीसोबत. १. स्वप्ने पडून कवितासंग्रह - चैत्रपुनव कवी - बा.भ.बोरकर २.स्वप्न कवितासंग्रह - प्रिय मित्रास कवी - शशी डंभारे ३.स्वप्ने कवितासंग्रह - सांगाती कवी - अनिल ४.स्वप्नशहारे कवितासंग्रह - रंगबावरी कवी - इंदिरा संत Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Mar 31, 202310 minSeason 1Ep. 27

चंद्र : सोहळा | Chandra : Sohala

चंद्र हा अगदीच सगळ्यांच्या आवडीचा विषय.मग ते लहान मूल, कवी, प्रेमी किंवा कुणीही असो. तो नेहमीच आपल्याला त्याच्या सौंदर्याची भुरळ पाडतो. त्याच्या चंद्रकोरीपासून ते पूर्ण आकारापर्यंत त्याचं स्थान खूप मोठं आहे या दुनियेत. बघूया या चांदमामावर काय प्रकाश टाकलाय कवी महाशयांनी. १. चंद्र : सोहळा कवी : आरती प्रभू कवितासंग्रह : दिवेलागण २. उदार चंद्र कवी : भा.रा.तांबे कवितासंग्रह : तांबे यांच्या समग्र कविता ३. न्यूयॉर्कमधील चंद्रास कवी : बा. भ. बोरकर कवितासंग्रह : कांचनसंध्या ४. हा चांद कवी : कुसुमाग्रज क...

Mar 28, 202313 minSeason 1Ep. 26

ते वळण | Te Valan

वळण कसलंही असू दे, थोडा धक्का बसतोच. नात्याचं आयुष्याचं, रस्त्याचं वळण वेगळ्याच गोष्टी आपल्या पुढ्यात आणून ठेवत. पण ते आपल्यासाठी खूप महत्त्वाचं होऊन बसतं. बघुयात कवी मंडळी या वळणावरती काय खजिना शोधतात. १. वळण कवी - प्रभा अत्रे कवितासंग्रह - अंत:स्वर २. वळण कवी - सुरेश भट कवितासंग्रह - सप्तरंग ३. वळण कवी - शशी डंभारे कवितासंग्रह - प्रिय मित्रास Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Mar 24, 20236 minSeason 1Ep. 25

गुढीपाडवा | Gudhi Padva

मराठी नववर्ष. गुढी, पुरणपोळी,कडुनिंबाची गोड कटू चटणी, साखरहार; अशी सगळी गंमत घेऊन येतो गुढीपाडवा. आपल्या संस्कृतीची जोपासना करायला लावणारा, जीवनाचं गोड कडू सत्य सांगणारा. कविवर्य काय म्हणतात बघूया. 1. पाडवा कवी - आरती प्रभू कवितासंग्रह - दिवेलागण २. पाडवा कवी - भा रा तांबे कवितासंग्रह - तांबे यांची समग्र कविता ३. गुढी उभारणी कवी - बहिणाबाई चौधरी कवितासंग्रह - बहिणाबाईंची गाणी Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Mar 21, 20236 minSeason 1Ep. 24

डोळ्यांतली गाणी | Dolyatali Gani

डोळे आपल्याला सारं जग दाखवतात. खरं काय खोटं काय शिकवतात. प्रेमातही पाडतात. पण आपण खरंच डोळस असून आंधळे बनतो कधी - कधी. पाहूया दृष्टिकोन कविवर्यांचा या जुलमी डोळ्यांकडे. १. कविता - नेत्र कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - पाथेय २. कविता - दृष्ट कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - बाहुल्या ३. कविता - आंधळ्यांची माळ कवी - गोविंदाग्रज कवितासंग्रह - पिंपळपान २. कविता - तुझ्या डोळ्यांतली गाणी कवी - अरुणा ढेरे कवितासंग्रह - प्रारंभ Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Mar 17, 20238 minSeason 1Ep. 23

आरसा | Aarsa

रोज ज्यात पाहून आपण आपलं रूप निहारतो, स्वतःला एक ओळख देतो असा आरसा. खूप गोष्टी दाखवतो ज्या त्यात दिसत नाहीत त्याही. तुम्ही जेवढं खोल बघाल तेवढं तेवढं जास्त दाखवणारा. सगळ्यांच्या आवडीचा. चला बघूया बिंबा- प्रतिबिंबाची मजा कवितेच्या आरशातून. १. कविता - आरसा कवितासंग्रह - असंच होतं ना तुलाही कवी - मिलिंद जोशी २. कविता - बिंब कवितासंग्रह - आनंदऋतू कवी - मंगेश पाडगांवकर ३. कविता - आरसा कवितासंग्रह - मी अन् माझा आवाज कवी - संदीप खरे Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Mar 14, 20238 minSeason 1Ep. 22

रंगांचे ढंग | Ranganche Dhang

रंग प्रत्येक गोष्टीला असतो. त्यामुळेच तर त्यांची रंगत वाढते. आपण रंगांचा महोत्सव जरवर्षी साजरा करतो. पण रंग हे फक्त वस्तूंचे असतात का? उलगडूया रंगांची बेढंगी बाजू कवितांच्या साह्याने. 1.रंग कवी - ग्रेस कवितासंग्रह- चंद्रमाधवीचे प्रदेश 2.रंग कवी - मंगेश पाडगावकर कवितासंग्रह - सूर आनंदघन 3.रंगबंध कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - रंगबावरी 4.रंग माझा वेगळा कवी - सुरेश भट कवितासंग्रह - रंग माझा वेगळा #marathikavita #marathi #marathisahitya #kavita #marathipodcast #podcast #मराठी #marathipoem # holi # r...

Mar 10, 20239 minSeason 1Ep. 21

दुर्गाच ती | Durgach Ti

स्त्रिया आज प्रत्येक क्षेत्रात आघाडीवर आहेत. जग कितीही पुढं गेलं तरीही बायकांची आजही वाताहत होतेच. पण त्या झगडत राहतात आणि बनतात सावित्रीबाई फुले, आनंदीबाई जोशी, इंदिरा गांधी, मेरी कॉम. महिलांच्या जिद्दीला आणि त्यांच्या धडाडीला सलाम. १.कविता - बायका कवितासंग्रह - निरंजन कवी - अरुणा ढेरे २. कविता - एकटी कवितासंग्रह - वंशकुसुम कवी - इंदिरा संत ३.कविता - तिचे स्वप्न कवितासंग्रह - बाहुल्या कवी - इंदिरा संत ४.कविता - पन्नाशी उलटूनही कवितासंग्रह - गोंदण कवी - शांता शेळके ५.कविता - तुझी तू रहा कवी - सं...

Mar 07, 202314 minSeason 1Ep. 20

वसंत आला दारी | Vasant Aala Dari

वसंत ऋतूचे आगमन खूप सुंदर गोष्टींची बरसात करून जातं. कोकिळेच्या गाण्यांनी, आंब्यांचे मोहर, झाडांची नवीन पालवी यांनी सजून जाते आपली बाजूची दुनिया. बघूया कवी कसं स्वागत करतायत या लाडक्या ऋतूचं. १. कविता - ग्रीष्माची चाहूल कवी - कुसुमाग्रज कवितासंग्रह - विशाखा २. कविता - वसंत आला दारी कवी - मंगेश पाडगांवकर कवितासंग्रह - सूर आनंदघन ३. कविता - वसंतऋतू जो कवी - इंदिरा संत कवितासंग्रह - चित्कळा Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Mar 03, 20237 minSeason 1Ep. 19

द्वैत सुखदुःखाचे | Dwait SukhDukhanche

सुखदुःखाची व्याख्या प्रसंगानुसार, व्यक्तीनुसार बदलत राहते. माणूस म्हणून खूप धडे शिकवणाऱ्या या दोन गोष्टी. जसा त्यांच्याकडे बघू तसं रूप बदलत राहतात. बघूया कविवर काय म्हणतात या सुखदुःखाच्या जोडगोळीवरती. १. सुखदुःख कवितासंग्रह - पिंपळ पान कवी - गोविंदाग्रज २. सुखाच्या शोधात कवितासंग्रह - मृद् गंध कवी - विंदा करंदीकर ३. सुख आणि दुःख कवितासंग्रह - सप्तरंग कवी - सुरेश भट Hosted on Acast. See acast.com/privacy for more information....

Feb 28, 202310 minSeason 1Ep. 18
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android