अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केलेल्या अर्थसंकल्पाला वेगवेगळे कंगोरे आहेत. लोकसभा निवडणुकीत जे जे मुद्दे महत्वाचे ठरले त्या मुद्द्यांशी संबंधित घटकांविषयी घोषणा करण्याची विशेष काळजी या अर्थसंकल्पात घेतल्याचं दिसतंय. बेरोजगारी, शेतकऱ्यांचे प्रश्न लोकसभा निवडणुकीत ऐरणीवर आले होते. त्याचे पडसाद या बजेटमध्ये कसे पहायला मिळाले...समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Jul 24, 2024•8 min
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी आपण राष्ट्राध्यक्षपदाच्या शर्यतीतून बाहेर पडत असल्याचं अखेर जाहीर केलं. त्यांनी हा निर्णय घ्यावा असं आवाहन अनेकांकडून गेल्या काही आठवड्यांमध्ये करण्यात आलं होतं. बायडन हे आता त्यांचा राष्ट्राध्यक्षपदाचा उर्वरित कार्यकाळ जानेवारी 2025 पर्यंत पूर्ण करतील. राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक पक्षाद्वारे कमला हॅरिस यांना उमेदवारी देण्यासही त्यांनी समर्थन जाहीर केलंय. डेमोक्रॅटिक नॅशनल कन्व्हेन्शन महिन्याभरावर आलेलं असताना बायडन यांनी जाहीर केलेल्या या निर्णयामुळ...
Jul 24, 2024•6 min
गुजरात राज्यात आतापर्यंत चांदीपुरा व्हायरसचे 12 संशयित रुग्ण आढळले असून त्यापैकी 6 जणांचा मृत्यू झाला असल्याचं गुजरात सरकारने म्हटलंय. या रुग्णांच्या रक्ताचे नमुने तपासासाठी पुण्यातल्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरलॉजीकडे (NIV) पाठवण्यात आलेयत. 1965 साली नागपुरातल्या एका परिसरातल्या रुग्णांच्या रक्तामध्ये एक व्हायरस आढळला. ज्या गावात ६५ साली हा व्हायरस सापडला, त्याचं नाव व्हायरसला देण्यात आलंय. - चांदीपुरा विषाणू. किती घातक आहे हा विषाणू? य़ाचा प्रसार आणि संसर्ग कसा होतो? आणि मुलांसाठी तो जीवघेणा...
Jul 23, 2024•3 min
पृथ्वीचा केंद्रबिंदू जमिनीपासून साधारण 5000 किमी खोल आहे. त्यापैकी 12 किमी खोल भागाबद्दलच आपल्याला माहिती मिळाली आहे. कॅलिफोर्निया विद्यापीठ आणि चायनीज अकॅडमी ऑफ सायन्सेसने शोध लावला आहे की, पृथ्वीचा गाभा हा पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या तुलनेत विरुद्ध दिशेला फिरतो. वैज्ञानिकांच्या एका टीमच्या असं लक्षात आलं आहे की, पृथ्वीच्या गाभ्याचा परिवलनाचा वेग 2010 पासून म्हणजे गेल्या 14 वर्षांपासून कमी झाला आहे. आता या परस्पर विरोधी दिशांना फिरण्याचा पृथ्वीवर काय परिणाम होईल? निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अ...
Jul 23, 2024•4 min
वैज्ञानिकांना पहिल्यांदाच चंद्रावर गुहा सापडली आहे. किमान 100 मीटर खोली असणारी ही गुहा कदाचित माणसांना राहण्यासाठी योग्य असू शकते. इथे एक कायमचा तळ तयार करता येऊ शकतो असा संशोधकांचा कयास आहे. अशा अजूनही न सापडलेल्या शेकडो भूमिगत गुहा असण्याची शक्यता असल्याचंही संशोधकांचं म्हणणं आहे. कशी आहे ही चंद्रावरची गुहा? ती किती मोठी आहे? कोणी आणि कशी शोधली ? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - जॉर्जिना रेनार्ड निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Jul 23, 2024•5 min
जगामध्ये भारतात सर्वाधिक म्हणजे 80 लाख ते 1 कोटी लग्नं होतात. कारण भारतामध्ये तरूण लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यांच्यापैकी 34% लोकसंख्या लग्नाच्या वयाची, 20 ते 39 वयोगटातली आहे. भारतापाठोपाठ चीनमध्ये दरवर्षी 70 ते 80 लाख लग्नं होतात. तर अमेरिकेत वर्षाला 20 ते 25 लाख लग्नं होतात. भारतामध्ये एखाद्या कुटुंबात शिक्षणासाठी होणाऱ्या खर्चाच्या दुप्पट खर्च लग्नामध्ये होतो, असं एक रिसर्च सांगतो. किती मोठी आहे भारतातली वेडिंग इंडस्ट्री? आणि मुळात लग्नांवर इतका खर्च का केला जातो? समजून घेऊयात सोपी ...
Jul 22, 2024•5 min
ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर प्रकरणामध्ये एक उल्लेख झाला तो त्यांनी 'नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट' वापरल्याचा. काय असतं हे नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट? ते कोणाला मिळू शकतं? आणि त्याचे फायदे काय आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Jul 12, 2024•3 min
जगाची लोकसंख्या संख्या सध्या 820 कोटी आहे आणि ती वाढून 1030 कोटी होणार असल्याचं युनायटेड नेशन्सच्या ताज्या अहवालात म्हटलंय. जगाची लोकसंख्या 2080च्या मध्यात सर्वोच्च असेल आणि त्यानंतर ती कमी होऊ लागेल असं 'वर्ल्ड पॉप्युलेशन प्रॉस्पेटक्ट्स' नावाच्या या अहवालामध्ये म्हटलंय. आज जन्माला आलेल्या मुलांचं सरासरी आयुर्मान 73.3 वर्षांचं असून 1995 पासून हे सरासरी आयुर्मान 8.4 वर्षांनी वाढल्याचंही हा अहवाल सांगतो. संयुक्त राष्ट्रसंघाचे सदस्य असणाऱ्या देशांच्या जनगणनेचा डेटा, जन्म आणि मृत्यू दर आणि लोकसंख्ये...
Jul 11, 2024•5 min
8 जुलैला मुंबईत धो-धो पाऊस पडला, पाणी तुंबलं, ट्रेन्स बंद झाल्या. 9 जुलैलाही पावसाचा रेड अलर्ट होता. म्हणून मग मुंबई, नवी मुंबई, ठाणे, पुणे या महापालिकांनी शाळांना सुटी दिली. आणि पाऊसच पडला नाही... असं का होतं? भरपूर पाऊस पडणार, असं हवामान खातं सांगत असताना, पाऊस न पडणं वा अतिशय कमी पडण्याचं कारण काय? भारतातल्या हवामान खात्याकडे खरंच किती अत्याधुनिक यंत्रणा आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Jul 10, 2024•6 min
मंगळावरच्या भविष्यातल्या कॉलनीसाठी कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या असतील, त्यासाठी मानवाला कोणती कौशल्यं शिकून घ्यावी लागतील, तिथपर्यंतचा मोठा प्रवास लोकांना कसा करता येईल आणि तिथल्या कठीण परिस्थितीत कसं राहता येईल या सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी नासाने एक प्रयोग केला. अमेरिकेतल्या टेक्सास राज्यामध्ये ह्यूस्टनमधल्या नासाच्या जॉनसन स्पेस सेंटरमध्ये मंगळ ग्रहासारखंच वातावरण आणि भूभाग असणारी फॅसिलिटी - कृत्रिम मंगळ ग्रह तयार करण्यात आला आणि नासाचे 4 संशोधक तिथे वर्षभर राहिले. या काळात या वैज्ञा...
Jul 10, 2024•5 min
केरळमध्ये गेल्या काही महिन्यांत 3 मुलांचा मृत्यू ब्रेन इटिंग अमिबा म्हणजेच मेंदू पोखरणाऱ्या अमिबाच्या संसर्गामुळे झाला आहे. हा अमिबा कोणता आहे? आणि त्याचा संसर्ग कसा आणि कधी होऊ शकतो? असं झाल्यास मृत्यू अटळ आहे का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - शरद बढे
Jul 09, 2024•4 min
एपिलेप्सीचा गंभीर त्रास असणाऱ्या मुलाच्या कवटीमध्ये फीट नियंत्रणात आणण्यासाठी पहिल्यांदाच एक उपकरण बसवण्यात आलंय. एपिलेप्सी म्हणजे अपस्मार. या आजारात Seizures येतात. म्हणजे फीट किंवा आकडी येणं. यालाच मिर्गी असंही म्हणतात. कवटीमध्ये बसवण्यात आलेला हा न्यूरोसिम्युलेटर मेंदूच्या आतवर इलेक्ट्रिकल सिग्नल्स पाठवेल. ओरान नॉल्सनला दिवसा येणाऱ्या फीटचं प्रमाण यामुळे 80 टक्क्यांपर्यंत कमी झालंय, तो आता अधिक आनंदात असून आयुष्य अधिक चांगल्यारीतीने जगू शकत असल्याचं त्याची आई जस्टिन यांनी सांगितलंय. कसं आहे ह...
Jul 06, 2024•5 min
युकेमध्ये निवडणुका झाल्या आणि त्यात सत्ताधारी कन्झर्व्हेटिव्ह पार्टीचा पराभव करत लेबर पार्टी तब्बल 14 वर्षांनी सत्तेत आलीय. सर किएर स्टार्मर युकेचे नवे पंतप्रधान असतील. कन्झर्व्हेटिव्ह पार्टीच्या पराभवाची कारणं काय आहेत? आणि मजूर पक्ष सत्तेत आल्याचा भारतासोबतच्या संबंधांवर काय परिणाम होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - झुबैर अहमद निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Jul 06, 2024•6 min
3 जुलै 2024 ला मुंबई शेअर बाजाराच्या सेंसेक्स निर्देशांकाने 80,000 ची पातळी ओलांडली. सार्वत्रिक निवडणुकांच्या निकालाच्या दिवशी सर्वाधिक घसरण झालेला शेअर बाजार महिन्याभराच्या काळात उच्चांकी पातळीवर कसा पोहोचला? स्टॉक मार्केटच्या या घोडदौडीमागे काय कारणं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Jul 05, 2024•4 min
लोकसभेत आपण बोलत असताना आपला माईक बंद करण्यात आल्याचा आक्षेप विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी घेतला. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी याला उत्तरही दिलं. सदनामध्ये विरोधकांचे माईक्स बंद करण्यात येत असल्याचा आरोप यापूर्वीही विरोधकांनी केलेला आहे. विरोधक भाषण करत असताना त्यांच्या चेहरा टीव्हीवर फारसा दाखवत नसल्याचा आरोपही करण्यात आलेला होता. संसदेच्या सभागृहातील माईक आणि कॅमेरा यावर नियंत्रण कुणाचं? विरोधकांची गळचेपी करण्यासाठी या गोष्टी वापरल्या जातायत का? अध्यक्ष आणि विरोधक याबद्दल काय म्हणतायत? य...
Jul 05, 2024•6 min
अमेरिकेतही 2024मध्ये राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक होतेय. 5 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल आणि नवीन राष्ट्राध्यक्ष जानेवारी 2025मध्ये पदभार स्वीकारतील. पण असं असलं तरी त्यासाठीची प्रक्रिया सुरू झालेली आहे.या राष्ट्राध्यक्षीय निवडणुकीतील 'प्रेसिडेन्शियल डिबेट' गुरुवारी (27 जून) रात्री जो बायडन आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्यात होत आहे. नेमकी निवडणुकीची प्रक्रिया कशी आहे, प्रेसिडेन्शियल डिबेट म्हणजे काय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Jun 28, 2024•7 min
26 जून हा दिवस अंमली पदार्थांचा दुरुपयोग आणि अवैध तस्करी विरोधी आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून पाळला जातो. अंमली पदार्थ आणि व्यसनांविरोधातला जागतिक लढा बळकट करण्यासाठी 1987मध्ये युनायटेड नेशन्सने हा दिवस पाळायला सुरुवात केली. Drugs म्हणजे असे घटक वा पदार्थ ज्यांचा शरीरावर परिणाम होतो. ड्रग्सबद्दलच्या बातम्या, चर्चा सध्या सतत कानावर येत असतात. उत्तेजकं, ओपिऑईड्स, मेफेड्रोन, फेंटानिल असे वेगवेगळे शब्द कानावर पडत असतात. याचा अर्थ काय? या मादक पदार्थांमध्ये असं काय असतं, ज्याची सवय लागते? आणि या सेवनाचे ...
Jun 26, 2024•8 min
वजन घटवणं किंवा Weight Loss याविषयी सगळीकडे चर्चा सुरू असतात. त्यासाठी वेगवेगळे सल्ले दिले जातात. वजन घटवण्यासाठीचा असाच एक मार्ग - एक शॉर्टकट धोक्याचा धरू शकतो असा इशारा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने दिला आहे. हा इशारा आहे वेट लॉससाठीच्या एका औषधाबद्दल...हे औषध कोणतं आहे? आणि WHOने त्याबद्दल काय म्हटलंय? Ozempic हे औषध सध्या 'Weight Loss Drug' म्हणजे वजन घटवणारं औषध म्हणून प्रसिद्ध झालंय. याला Skinny Jab असंही म्हटलं जातंय. पण याच प्रसिद्धीमुळे या औषधाचा अनेकदा तुटवडा निर्माण होतोय आणि सोबतच याच्य...
Jun 24, 2024•7 min
प्राण्यांना जाणिवा असतात का? ते विचार करू शकतात का? शास्त्रज्ञांना, संशोधकांना गेली काही शतकं हा प्रश्न छळतोय. पण प्राणी विचार करू शकतात, त्यांना संवेदना असतात हे डार्विन यांचं म्हणणं तेव्हाच्या वैज्ञानिक समजांपेक्षा वेगळं होतं. मग आता शास्त्रज्ञांचं म्हणणं काय आहे? प्राण्यांना conscious - म्हणजेच जाणिवा, संवेदना असतात का? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - पल्लब घोष निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले
Jun 17, 2024•5 min
GCC म्हणजे गल्फ कोऑपरेशन काऊन्सिलमध्ये सहा देश आहेत - सौदी अरेबिया, युनायटेड अरब एमिरेट्स (UAE), ओमान, बहारिन, कतार आणि कुवेत. 1981 मध्ये या गटाची स्थापना करण्यात आली. या सहा देशांमध्ये नोकरी - रोजगाराच्या निमित्ताने स्थलांतरित होणाऱ्यांचं प्रमाण मोठं आहे. आखाती देशांमधील कामगारांच्या परिस्थितीबाबत अनेकदा बातम्या येतात, दुर्घटनांनंतर याबद्दलची चर्चा होते. पण जगण्या-राहण्यासाठीची परिस्थिती इतकी बिकट असूनही भारतीय कामगार कामासाठी आखाती देशांमध्ये का जातात? कधीपासून जातात? समजून घेऊ आजच्या सोपी गोष...
Jun 15, 2024•8 min
भारतामध्ये जून - जुलै महिन्यात शैक्षणिक वर्ष सुरू होतं आणि एप्रिल - मे महिन्यात संपतं. पण आता मात्र विद्यापीठांना वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया घेण्याची परवानगी UGCने दिलीय. जगभरातल्या अनेक विद्यापीठांमध्ये सध्या वर्षातून दोनदा प्रवेश प्रक्रिया होते. म्हणजे अमेरिकेत ऑगस्ट - सप्टेंबरमध्ये फॉल (Fall) सीझनच्या ॲडमिशन्स होतात, तर जानेवारीमध्ये स्प्रिंग (Spring) सीझनच्या ॲडमिशन्स होतात. वर्षातून दोनदा ॲडमिशन्स होणार, म्हणजे नेमकं काय होणार? त्याने विद्यार्थ्यांचा कसा फायदा होईल? युजीसीने नेमकं काय ...
Jun 13, 2024•4 min
NEET म्हणजे National Eligibility cum Entrace Test. वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांच्या कॉलेज प्रवेशासाठीची ही प्रवेश परीक्षा असते. 5 मे रोजी यावर्षीची नीट परीक्षा झाली. या परीक्षेसाठी 24 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 23.33 लाख विद्यार्थी परीक्षेला बसले. 4 जूनला निकाल जाहीर करण्यात आला. परीक्षेच्या इतिहासात पहिल्यांदाच 67 मुलांना पैकीच्या पैकी 720 गुण मिळाले आहेत. पूर्ण मार्क्स मिळवणाऱ्या 67 टॉपर्सपैकी 6 जणांनी हरियाणा राज्यातल्या झज्जर जिल्ह्यातल्...
Jun 11, 2024•4 min
भाजपच्या नेतृत्त्वाखालील एनडीए आघाडीचं सरकार आता भारतात स्थापन होईल. लोकसभा निवडणुकीत भाजपला 240 जागी विजय मिळाला पण पूर्ण बहुमत मिळालं नसल्याने त्यांना संयुक्त जनता दल (JDU) आणि तेलगु देसम पार्टी (TDP)ची मदत घेऊन सरकार स्थापन करावं लागेल. आंध्र प्रदेशला Special Category Status - विशेष श्रेणी दर्जा देण्यात यावा ही मागणी गेल्या दशकभरापासून अधिक काळ करण्यात येतेय. विशेष म्हणजे काँग्रेसच्या जाहीरनाम्यामध्ये आंध्र प्रदेशाला असा विशेष दर्जा देण्याचा मुद्दा होता आणि आपण हे वचन पूर्ण करू असं त्यांनी म्...
Jun 07, 2024•4 min
मतदान करून बाहेर पडणाऱ्या व्यक्तींकडून एक्झिट पोल्स केले जातात. निवडणुकीत मतदान झाल्यानंतर निकालाबद्दलचे अंदाज याद्वारे व्यक्त करण्यात येतात. हे अंदाज कोणत्या संस्था बांधतात? ते किती अचूक असतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - इक्बाल अहमद निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
Jun 01, 2024•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
May 30, 2024•6 min
पुण्यात मध्यरात्री दारूच्या नशेत पोर्शे कारने धकड दिल्याने दोन निष्पाप व्यक्तींचा जीव गेला. तेव्हा एक अल्पवयीन मुलगा दारूच्या नशेत कार चावलत असल्याचं समोर आलं आहे. पण 19 मेच्या रात्री जेव्हा त्या मुलाच्या रक्ताचे सँपल घेतले आणि त्याची चाचणी केली. तेव्हा या संपूर्ण प्रक्रियेत छेडछाड झाल्याचं आता पुणे पोलिसांना सांगितलं आहे. खरंच शरीरातील दारूचं प्रमाण जाणून घेण्यासाठी रक्ताची चाचणी लवकर करणं किती महत्त्वाचं असतं? या चाचणीचे रिपोर्ट कोर्टात सबळ पुरावा म्हणून वापरला जाऊ शकतो का? हेच मुद्दे आपण आजच्...
May 30, 2024•6 min
केंद्र सरकारने एप्रिलमध्ये पांढऱ्या कांद्यावरची आणि मे महिन्यात लाल कांद्यावरची अशी सरसकट निर्यातबंदी उठवली. याचा शेतकऱ्यांना फायदा होणं अपेक्षित होतं, पण दुसरीकडे सरकारने तब्बल 40% निर्यात शुल्क लावलं. कांद्याची निर्यातबंदी, निर्यातशुल्क, बाजारातल्या कांद्याच्या किमती आणि शेतकऱ्याचा/व्यापाऱ्यांचा फायदा – तोटा या सगळ्या गोष्टींबद्दल आपण सतत ऐकतो, पण यांचं एकमेकांशी काय नातंय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन - गणेश पोळ निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
May 28, 2024•6 min
जगातल्या 143 देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता दिलीय, पण त्यांच्याकडे स्वतःची अशी एक जमीन नाही, ते वेगवेगळ्या भूभागांवर राहतात. अशातच आणखी तीन युरोपीय देशांनी पॅलेस्टाईनला मान्यता देण्याची घोषणा केलीय. यामुळे काय बदलेल? इस्रायलला यामुळे नुकसान होईल का? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
May 25, 2024•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
May 23, 2024•7 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
May 22, 2024•5 min