सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

डीप फेक म्हणजे काय? आमिर, रणवीर यांनी खरंच लोकसभा निवडणूक प्रचार केला? BBC News Marathi

अभिनेता आमिर खान आणि रणवीर सिंहचे व्हीडिओ गेले काही दिवस सोशल मीडियावर फिरतायत. यात हे अभिनेते एका राजकीय पक्षाबद्दल बोलत आहेत. खरंच या अभिनेत्यांनी राजकीय प्रचार केला का? डीपफेक म्हणजे काय? असे बनावट फोटो - व्हीडिओ कसे ओळखायचे? जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

Apr 19, 20245 min

VVPAT पडताळणीचा वाद काय आहे? VVPAT सोबत छेडछाड होऊ शकते का?

ईव्हीएम मशीनवर मतदान केल्यावर (VVTAP) व्हीव्हीपॅटद्वारे मिळणाऱ्या पावत्या 100 टक्के पडताळून पाहाणे शक्य आहे का असा प्रश्न सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोग आणि सरकारला केलाय. मतदान प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी VVPAT प्रणाली आणली गेली होती, मग VVPAT – EVM बद्दल पुन्हा इतकी चर्चा का होतेय? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये निवेदन – अभिजीत कांबळे एडिटिंग – निलेश भोसले

Apr 02, 20245 min

जगभरात 105 कोटी टन अन्न जातं फुकट! युनायटेड नेशन्सचा अहवाल BBC News Marathi

या अहवालानुसार जगभरात खाण्यासाठी उपलब्ध असलेल्या - खाण्यायोग्य अन्नापैकी 19% अन्न दरवर्षी वाया जातं. घरामध्ये, स्टॉल्स - खानावळ - रेस्टोरंटसारख्या फूड सर्व्हिस आणि रिटेल दुकानांमध्ये वाया जाणाऱ्या अन्नाचं हे एकूण वर्षातलं प्रमाण आहे. लेखन - अमृता दुर्वे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Apr 02, 20245 min

विमा सरेंडर केल्यास किती पैसे मिळणार? BBC News Marathi

तुमच्याकडे लाईफ इन्शुरन्स पॉलिसी किंवा आयुर्विमा आहे का? आणि ती पॉलिसी सरंडर करण्याचा विचार तुम्ही करताय का? तसं असेल 1 एप्रिलपासून काही नियमांमध्ये बदल होतायत. कोणते बदल आहेत हे? समजून घेऊया या सोपी गोष्टमध्ये. लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले

Apr 02, 20243 min

सुशिक्षित तरुणांना भारतात नोकऱ्या का मिळत नाहीयत? BBC News Marathi

इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन - ILO आणि इन्स्टिट्यूट फॉर ह्यूमन डेव्हलपमेंटने प्रसिद्ध केलेल्या भारतातल्या रोजगाराच्या परिस्थितीविषयीच्या या अहवालात भारतातील रोजगार आणि बेरोजगारीसंदर्भातली महत्त्वाची निरीक्षण नोंदवण्यात आलेली आहेत. लेखन - अमृता दुर्वे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Apr 02, 20246 min

नवीन आर्थिक वर्ष 1 एप्रिल पासूनच सुरू का होतं? BBC News Marathi सोपी गोष्ट

1 जानेवारी म्हणजे जगभरात हॅप्पी न्यू ईयर. तर मराठी नवीन वर्ष गुढी पाडव्यापासून, म्हणजे चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून सुरू होतं. पण नवीन आर्थिक वर्ष सुरू होतं 1 एप्रिलपासून... असं का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन - अमृता दुर्वे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Mar 28, 20244 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android