सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

भारतीय निवडणूक आयोगाचं काम कसं चालतं? वाद आणि इतिहास | BBC News Marathi

भारतात निष्पक्ष निवडणुका घेण्याची जबाबदारी भारतीय निवडणूक आयोगावर असते. दिल्लीत मुख्यालय असलेली ही संस्था 1950 पासून देशातल्या संसदीय आणि विधिमंडळ निवडणुकांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावते. निवडणूक आयोगाची रचना कशी असते, त्यांच्या जबाबदाऱ्या काय आहेत आणि निवडणूक आयुक्तांविषयी जाणून घेऊया. पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

Mar 12, 20246 min

अनंत अंबानींचा वनतारा प्राणी संग्रहालय प्रकल्प वैध आहे की नाही? BBC News Marathi

जामनगरमध्ये शेकडो एकर जमिनीवर अंबानींनी Greens Zoological Rescue and Rehabilitation Centre आणि Radhe Krishna Temple Elephant Welfare Trust अशा दोन संस्थांच्या माध्यमातून वनतारा प्रकल्प उभा केलाय. यात विविध दुर्मिळ प्राण्यांचं संवर्धन करण्याची त्यांची योजना आहे. पण एखाद्या व्यक्तीकडे जमीन असेल, पैसे असतील तर त्याला अशा पद्धतीचं प्राणिसंग्रहालय उभं करता येतं का? हा खरा प्रश्न आहे. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

Mar 12, 20245 min

महिलांची पुरुषांपेक्षा जास्त प्रगती झाली आहे का? BBC News Marathi

शिक्षण, आरोग्य, राजकारण, नोकरी आणि व्यवसायात महिलांची भागीदारी वाढली आहे हे विविध सर्वेक्षणांमधून सिद्ध तर झालंय पण एकूण लोकसंख्येच्या तुलनेत महिलांना न्याय मिळाला आहे का? शिक्षणातील महिलांचं प्रमाण वाढत असलं तरी त्यांना पुरुषांएवढाच पगार मिळतो का? भारत याबाबत कसं काम करतो आहे? या आणि महिलांबाबतच्या काही महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात लेखन - रित्विक दत्ता निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Mar 12, 20245 min

फेसबुक, इन्स्टाग्राम बंद पडल्यामुळे तुम्ही अस्वस्थ का झाला होता? BBC News Marathi

सोशल मीडिया आणि नैराश्य यांचा थेट संबंध असल्याचं अनेक संशोधनांमधून दिसून आलं आहे. फोर्ब्सच्या अहवालानुसार सोशल मीडिया वापरल्याने 67% किशोरवयीन मुलांना त्यांच्या आयुष्याबाबत नकारात्मक विचार येतात. एका अभ्यासानुसार भारतात एक माणूस दररोज सरासरी 141.6 मिनिटांचा वेळ फेसबुकवर घालवतो. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Mar 07, 20245 min

गर्भपाताच्या अधिकाराला फ्रान्सने घटनात्मक संरक्षण का दिलं?

संसदेतील सदस्यांनी महिलांना 'स्वातंत्र्याची हमी' या 1958 च्या कायद्यात सुधारणा करण्यासाठी नुकतंच मतदान केलं. संसदेत या कायद्याच्या सुधारणेच्या बाजूने 780 मतं पडली. तर विरोधात 72 मतं होती. फ्रान्समध्ये 1975 पासून गर्भपात करणं कायदेशीर आहे परंतु देशाच्या 85 टक्के नागरिकांचा कल हा अधिकार राज्यघटनेतून मिळावा याकडे होता. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Mar 06, 20245 min

मुलांंचं लैंगिक शोषण होऊ नये यासाठी पालकांनी कसं जागरुक राहावं? BBC News Marathi

खरं तर आजचे पालक नवीन आव्हानांना तोंड देतायत. दोन्ही पालक working असणं, काम संपेल पण कामाचा ताण नाही ही बहुधा प्रत्येकच घरातली परिस्थितीय. अभ्यासासोबतच इतर अ‍ॅक्टिव्हिटीजमध्ये भाग घेण्याचा ताण, या सगळ्याचा परिणाम मुलांच्या वागण्यात सुद्धा डोकावतो. कित्येकदा मुलं आपल्यासमोर असतात पण सुसंवादात कमी असतो. अशा परिस्थितीत Safe- Unsafe Touch, Well- being यासारख्या विषयांवर संवाद होणं कठीण असू शकतं. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Mar 04, 20246 min

शेतकऱ्यांसाठी अचूक हवामान अंदाज का गरजेचा? | BBC News Marathi

उन्हाळ्याची चाहूल लागली की गाव खेड्यात शेतीच्या मशागतीची कामं सुरु होतात. या काळात प्रत्येक शेतकऱ्याच्या मनात एकच प्रश्न असतो - यंदा पाऊस कसा असेल. शेतकऱ्यांना अचूक हवामानाचा अंदाज दिला तर त्यांना त्याचा कसा फायदा होईल? कमी पाऊस झाल्याने होणारं नुकसान कसं टाळता येईल? याविषीय अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठाने केलेलं संशोधन नुकतंच प्रकाशित झालं. त्यात काय सांगितलं आहे, जाणून घ्या. लेखन – आशय येडगे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Mar 01, 20245 min

पेटीएम फास्टॅग बंद करून पैसे परत कसे मिळवाल? | BBC News Marathi

सुरुवातीला लोकप्रिय ठरलेल्या पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयने कारवाई केली आहे. त्यानुसार आता 15 मार्च 2024 नंतर पेटीम फास्टॅग रिचार्ज किंवा टॉपअप करता येणार नाही. तुम्ही हा फास्टॅग अजूनही वापरत असाल तर तो निष्क्रिय करण्याची प्रक्रिया आणि त्यातल्या पैशांचा रिफंड।मिळवण्याची प्रक्रिया समजून घेऊया सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – अमृता दुर्वे एडिटिंग – अरविंद पारेकर

Mar 01, 20244 min

महाराष्ट्रात गरीब विद्यार्थ्यांना खासगी शाळांची दारं बंद? | BBC News Marathi

आर्थिकदृष्ट्या मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शालेय शिक्षण मिळावं यासाठी शिक्षणहक्क कायदा बनवण्यात आला. या कायद्यानुसार राज्यातल्या खासगी शाळांमध्ये या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी 25 टक्के जागा राखीव ठेवण्यात आल्या होत्या. पण आता या कायद्यात बदल केल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांना या आरक्षणापासून वंचित रहावं लागणार आहे. या कायद्यात कोणता बदल केला गेलाय? त्याचे परिणाम काय होऊ शकतात? आणि सरकारने हा निर्णय का घेतलाय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - दीपाली जगताप निवेदन – सिद्धना...

Feb 28, 20246 min

इस्रायल हमास युद्ध : रफा बॉर्डर काय आहे? तिथे लाखो लोक का जमले आहेत? BBC News Marathi

इजिप्त आणि गाझाच्या सीमेवर रफा शहरात इस्रायल मोठा जमिनी हल्ला करेल अशी शक्यता व्यक्त केली जाते आहे. त्यामुळे रफामधल्या लाखो निर्वासितांच्या मनात चिंता आणि भीतीचं सावट आहे. रफा शहर महत्त्वाचं का आहे आणि इस्रायल इथे बाँबहल्ले तीव्र का करत आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

Feb 13, 20245 min

कॉपी रोखण्यासाठीचा कायदा काय आहे? तो किती उपयुक्त ठरेल? BBC News Marathi

परीक्षेत कॉपी करणाऱ्यांसाठी भारतात वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या शिक्षेची तरतूद होती पण आता यासाठी स्वतः केंद्र सरकारनेच एक कायदा बनवलाय. केंद्र सरकारचा कॉपी रोखण्यासाठीचा हा कायदा नेमका काय आहे? परीक्षेत कॉपी केली किंवा एखाद्याला कॉपी करण्यात मदत केली तर किती वर्षांचा तुरुंगवास होऊ शकतो? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कोणकोणत्या परीक्षांसाठी हा कायदा बनवला गेला आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

Feb 09, 20244 min

लिव्ह इन रिलेशनविषयी उत्तराखंडच्या समान नागरी कायद्यात काय म्हटलंय? | BBC News Marathi

उत्तराखंडच्या भाजप सरकारनं राज्याच्या विधानसभेत समान नागरी संहिता 2024 विधेयक पास केलं. पण या कायद्यातल्या लिव्ह इन म्हणजे एकत्र राहणाऱ्या अविवाहित जोडप्यांबाबतच्या नियमाने जास्त लक्ष वेधून घेतलं आहे. या कायद्यात आहे तरी काय? आणि त्यावरून वाद का होतोय? पाहा ही सोपी गोष्ट लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Feb 08, 20246 min

शरद पवारांच्या हातून राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळाचं चिन्ह का गेलं? | BBC News Marathi

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि त्यांचं घड्याळ हे निवडणूक चिन्ह अजित पवारांकडे राहील असा मोठा निर्णय निवडणूक आयोगानं 6 फेब्रुवारी 2024 रोजी दिला. राज्यसभा निवडणुकीच्या तोंडावर हा निर्णय शरद पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. निवडणूक आयोगानं कोणत्या नियमांच्या आधारे हा निकाल दिला, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

Feb 07, 20245 min

कलम 370 रद्द झाल्यानं लडाखला फटका बसला का? स्थानिक का रागावलेत? | BBC News Marathi

लडाखची राजधानी लेहमध्ये 3 फेब्रुवारीला हजारो लोक आंदोलनासाठी रस्त्यावर उतरले होते. लडाखचे प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुकही या आंदोलनात सहभागी झाले होते. पण हे आंदोलन कशासाठी होतं? लडाखमध्ये काय सुरू आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

Feb 06, 20245 min

पाकिस्तान निवडणुकीचा भारतावर काय परिणाम होईल? | BBC News Marathi

पाकिस्तानात सलग तिसऱ्या सार्वत्रिक निवडणुका होऊ घातल्या आहेत. 8 फेब्रुवारी 2024 रोजी या देशात मतदान होणार आहे. सध्या तिथे सत्तेच्या खेळात नवाझ शरीफ, इम्रान खान आणि बिलावल भुट्टो यांच्यात त्रिकोणी राजकीय चढाओढ सुरू आहे. नेमकी काय समीकरणं आहेत आणि त्यांचा भारतावर काही परिणाम होईल का, जाणून घ्या. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

Feb 06, 20245 min

प्लॅस्टिकचे कण शरीरात गेल्यामुळे काय दुष्परिणाम होऊ शकतात? | BBC News Marathi

जमिनीत मिसळलेल्या प्लॅस्टिकमुळे शेकडो एकर जमीन खराब झाल्याचं एक संशोधन सांगतं. मायक्रोप्लॅस्टिकचे कण पोटात गेल्याने अनेक गंभीर आजारही होऊ शकतात. प्लॅस्टिकच्या प्रदूषणापासून स्वतःला कसं वाचवायचं? आणि हे प्रदूषण कमी करण्याचे उपाय काय आहेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

Feb 02, 20244 min

पेटीएम वॉलेटमध्ये पैसे ठेवणं कितपत सुरक्षित? BBC News Marathi

भारतात सुमारे 9.3 कोटी लोक पेटीएम वापरतात. पण 31 जानेवारी 2024 ला रिजर्व्ह बँक ऑफ इंडियाने पेटीएम पेमेंट्स बँकेला नवीन ग्राहक जोडण्यास मनाई केली. आता पेटीएम वापरणाऱ्या ग्राहकांवर याचा नेमका काय परिणाम होईल? रिजर्व्ह बँकेने कोणते निर्बंध लादले आहेत? भारतीय डिजिटल पेमेंट क्षेत्रात एकेकाळी पहिल्या नंबरवर असणाऱ्या पेटीएमवर अशी वेळ का आली? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे, गुलशनकुमार वनकर निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले

Feb 02, 20246 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android