सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

मेंदूत चिप बसवली तर फक्त विचार करून काॅम्प्युटर चालवता येईल का? | BBC News Marathi

उद्योगपती इलॉन मस्क यांच्या कंपनीने माणसाच्या मेंदूत चिप बसवण्याचा प्रयोग यशस्वी ठरल्याची माहिती दिलीय. आता मेंदूतल्या विचारांच्या जोरावर मोबाईल, कम्प्युटर किंवा कोणतंही डिजिटल डिव्हाईस चालवता येईल असं मस्क म्हणालेत. नेमका हा प्रयोग काय आहे? शस्त्रक्रिया करून मेंदूत चिप बसवली तर त्याचा माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Feb 01, 20244 min

गर्भाशयाच्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देईल का? BBC News Marathi

दरवर्षी सर्व्हायकल कॅन्सर म्हणजेच गर्भशयाच्या मुखाच्या कॅन्सरमुळे जगभरात तब्बल ३ लाख महिलांचा मृत्यू होतो. पण एका नवीन लशीमुळे या गर्भाशयाच्या कॅन्सरचा धोका नव्वद टक्के कमी होऊ शकतो अशी माहिती समोर आली आहे. काय आहे ही HPV लस? कोणत्या कॅन्सरपासून ही लस संरक्षण देऊ शकते? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे एकदा ही लस घेतली की किती वर्ष संरक्षण मिळू शकतं? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – निलेश भोसले

Jan 26, 20244 min

कोरोनासारखीच आणखीन एक महामारी येईल का? | BBC News Marathi

जानेवारी 2024 ला दावोसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख डॉ. टेड्रॉस घेब्रेयेसुस यांनी भविष्यात कोरोनापेक्षा गंभीर आजाराची साथ येऊ शकते असा इशारा दिलाय. 'Disease X' म्हणजे नेमकं काय? यामुळे आणखीन एक जागतिक साथ येऊ शकते का? आणि भविष्यात असा रोग आलाच तर त्यासाठी काय तयारी केली जात आहे? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Jan 24, 20244 min

वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? त्यापासून वाचायचं कसं? BBC News Marathi

युट्युबचे काही व्हिडिओ लाईक करा आणि घरबसल्या पैसे कमवा, दिवसातले दोन तास द्या आणि हजारो रुपये कमवा या आणि अशा अनेक जाहिराती तुम्ही बघितल्या असतील. तर हा वर्क फ्रॉम होम स्कॅम नेमका काय आहे? वर्क फ्रॉम होम स्कॅमचे किती प्रकार आहेत? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे या फसवणुकीपासून वाचण्यासाठी कोणते उपाय केले पाहिजेत? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

Jan 19, 20243 min

जगातली गरिबी संपायला अजून 230 वर्षं लागतील, ऑक्सफॅमचा अहवाल आणखी काय सांगतो? | BBC News Marathi

एकीकडे येत्या दशकात जगाला पहिला Trillionaire मिळेल तर दुसरीकडे याच काळात आणखीन कितीतरी लोक गरिबीत ढकलले जातील. ऑक्सफॅमचा रिपोर्ट नेमका काय आहे आणि वाढत चाललेल्या आर्थिक विषमतेचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टीच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – मयुरेश वायंगणकर

Jan 18, 20245 min

भारताच्या नाराजीचा मालदीववर काय परिणाम होऊ शकतो? | BBC News Marathi

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लक्षद्वीप दौऱ्याचे काही फोटो शेअर केले आणि सोशल मीडियावर एका नवीन वादाला तोंड फुटलं आहे. अनेक भारतीयांनी असं ट्विट केलंय की आता मालदीवऐवजी लक्षद्वीपला पर्यटनासाठी जायला हवं. पण मालदीवच्या काही मंत्र्यांनी याला विरोध केला आणि सोशल मीडियावर एक वॉर सुरु झालं. खरंच भारतीय लोकांनी मालदीवचा बहिष्कार केला तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – शरद बढे

Jan 09, 20244 min

महाराष्ट्रात जानेवारी उजाडला तरी थंडी का आली नाही? | BBC News Marathi

कॅलेंडरवर हिवाळा सुरु झाला, पण अजून महाराष्ट्रात थंडी दिसत नाही. डिसेंबर महिन्यात सरासरीपेक्षा जास्त तापमान होतं पण आता जानेवारीतही थंडी येणार नसल्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागाने वर्तवला आहे. नेमकं असं का होतंय? मागच्या वर्षीचं तापमान नेमकं किती होतं? जानेवारी ते मार्च या थंडीच्या महिन्यांमध्ये नेमका कुठे पाऊस पडेल आणि याचा पिकांवर काय परिणाम होऊ शकतो? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Jan 03, 20245 min

'बॉक्सिंग-डे' क्रिकेट मॅचचा बॉक्सिंगशी काही संबंध आहे का? | BBC News Marathi

नाताळच्या दुसऱ्या दिवशी इंग्लंड आणि काही राष्ट्रकुल देशांमध्ये बॉक्सिंग डे साजरा केला जातो. हा दिवस कधीच रविवारी येत नाही. गरिबांना भेटवस्तू देण्याच्या परंपरेतून सुरु झालेल्या या दिवसाचं स्वरूप आता कसं बदललं आहे? आणि याच दिवशी इंग्लंड, ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये क्रिकेटचे सामने का भरवले जातात? याचाच रंजक इतिहास, पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

Jan 01, 20243 min

हूती बंडखोरांनी समुद्रात केलेल्या हल्ल्यांमुळे भारतात महागाई वाढणार? | BBC News Marathi

येमेनची माजी राजधानी सनावर ज्यांचा ताबा आहे अशा हूती बंडखोरांनी भारताकडे येणाऱ्या व्यापारी जहाजांवर हल्ले केले. इस्रायल-हमास संघर्षात हूती बंडखोरांच्या हल्ल्यामुळे एक नवीन आघाडी उघडली गेली आहे. याचा जागतिक व्यापारावर काय परिणाम होईल? भारतात यामुळे महागाई वाढेल का? पाहूया या प्रश्नांची उत्तरं, सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

Dec 29, 20235 min

नवीन फौजदारी कायद्यांचा सामान्य माणसावर काय परिणाम होऊ शकतो? | BBC News Marathi

गृहमंत्री अमित शहा यांनी संसदेत मांडलेल्या नवीन फौजदारी कायद्यांमुळे होणारे बदल नेमके काय आहेत? सामान्य माणसाच्या आयुष्यात यामुळे कोणते महत्त्वाचे बदल होऊ शकतात? आणि विरोधकांनी या कायद्यांमुळे केंद्र सरकारवर का टीका केलीय? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

Dec 27, 20236 min

आई कुणबी असेल तर मुलांना कुणबी प्रमाणपत्र देता येईल का? | BBC News Marathi

महाराष्ट्राच्या माजी आरोग्य मंत्री विमल मुंदडा यांच्या मुलाला त्यांच्या आईची जात लावता आली नव्हती पण तशाच एका प्रकरणात न्यायालयाने गुजरातमध्ये मुलाला आईची जात लावण्याची परवानगी दिली होती. भारतासारख्या पुरुषप्रधान संस्कृती असणाऱ्या देशामध्ये आईची जात मुलांना लावण्याबाबत कायदा काय सांगतो? याआधी अशी प्रकरणं घडली आहेत का? पाहुयात सोपी गोष्टच्या या भागात. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

Dec 26, 20235 min

राजकीय सल्लागार निवडणुका जिंकून देऊ शकतात का? BBC News Marathi

हरणाऱ्या आणि जिंकणाऱ्या चेहऱ्यांमागचे कलाकार तुम्हाला क्वचितच ठाऊक असतील. उमेदवारांच्या आणि नेत्यांच्या नावावर प्रचार होतो, तो करण्यासाठी जसे पक्षाचे कार्यकर्ते असतात तसेच प्रोफेशनल कार्यकर्तेही असतात. हे राजकीय सल्लागार किंवा पॉलिटिकल कन्सल्टंट्स कोण असतात? खरंच राजकीय सल्लागार निवडणुका जिंकण्या – हरण्यात इतकी महत्त्वाची भूमिका बजावतात का? लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Dec 05, 20235 min

निवडणूक आयोगाने एकाच राज्याचे निवडणूक निकाल एक दिवस उशीराने का दिले?

निवडणूक आयोग निवडणुकीच्या तारखा ठरवताना कोणत्या कायद्याचा आधार घेतं? निवडणूक प्रक्रियेच्या तारखा ठरवण्यासाठी कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्या जातात? पाहुया आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Dec 04, 20234 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android