सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

हवामानामुळे 9 महिन्यांत इतकं नुकसान का झालं? BBC News Marathi

नोव्हेंबरच्या दोन दिवसांत महाराष्ट्रात असा पाऊस पडला की 1 लाख हेक्टर क्षेत्र बाधित झालं, त्यापूर्वी 55 वेळा वीज पडून 70 लोकांचा जीव गेला तर पूर आणि दरड कोसळून 103 लोक दगावले. हे नेमकं काय घडतंय? हवामान बदलाबद्दल आपण अनेकदा बोलतो पण हे त्याचे दृश्य परिणाम आहेत. भारतात जानेवारी ते सप्टेंबर 2023 या 9 महिन्यांमध्ये जवळपास दर दिवशी तीव्र हवामानाची एकादी घटना घडते आणि यात अपरिमित हानी झालीय. गेल्या 9 महिन्यांत भारताला बसलेल्या हवामानाच्या या तडाख्याची ही सोपी गोष्ट.

Nov 30, 20235 min

रॅट होल माइनिंग काय आहे? त्यामुळे उत्तरकाशीत मजूर कसे वाचले? BBC News Marathi

अखेर 17 दिवसांनंतर उत्तरकाशीच्या बोगद्यात अडकलेले मजूर बाहेर आले. खरंतर त्यांच्या सुटकेसाठी वेगवेगळ्या यंत्रणा आणि मोठाली यंत्रं एकत्र काम करत होती, पण अखेरच्या टप्प्यात जेव्हा यंत्रंही निकामी व्हायला लागली, तेव्हा शेवटचे काही मीटर खोदण्याची जबाबदारी रॅट होल मायनर्सनी पार पाडली. उंदराच्या बिळावरून नाव पडलेल्या या खाणकामाच्या पद्धतीवर देशात बंदी आहे, पण उत्तरकाशीत त्यामुळेच एवढे जीव कसे वाचले? मुळात हे रॅट होल मायनिंग काय आहे? देशात ते कुठे-कुठे वापरलं गेलंय आणि त्याच्यावर बंदी का आली? पाहूया, आज...

Nov 29, 20236 min

अवकाळी पाऊस म्हणजे काय? | BBC News Marathi

अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे सध्या महाराष्ट्रात शेतीचं बरंच नुकसान झालं आहे. पण अवकाळी पाऊस म्हणजे नेमका कोणता पाऊस? तो पडण्यामागची कारणं काय आणि त्यामुळे होणारं नुकसान कसं टाळता येईल? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

Nov 28, 20235 min

मोदींना पनौती म्हटल्याने राहुल गांधींना नोटीस, निवडणूक आयोगाने काय म्हटलं? BBC News Marathi

राजस्थानमध्ये प्रचाराला गेलेल्या राहुल गांधींनी त्यांच्या भाषणात पनौती हा शब्द वापरल्यामुळे निवडणूक आयोगाने त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली . हा शब्द निवडणूक आयोगाला वादग्रस्त का वाटला? पनौती शब्दाचा जन्म कसा झाला? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Nov 24, 20235 min

जाहिरातींनी दिशाभूल करू नये म्हणून भारतात काय नियम आहेत? BBC News Marathi

रामदेव बाबांची पतंजली आयुर्वेद ही कंपनी अनेक कारणांनी अनेकदा वादात अडकलेली दिसते. अध्येमध्ये कुठल्यातरी जाहिरातींवरून वाद झालेले आपणही पाहिले असतील. एखादी जाहिरात दिशाभूल करते म्हणजे नेमकं काय? काय आहेत दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींबाबतचे नियम? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Nov 23, 20235 min

ChatGPT आणणाऱ्यालाच कंपनीने का काढून टाकलं? BBC News Marathi

फक्त ChatGPTच नव्हे तर OpenAI कंपनीने Dall-E हे आणखी एक AI tool विकसित केलंय, ज्यात एका ओळीचं टेक्स्ट टाकल्यावर काही सेकंदात ते दाखवणारं एक चित्र तयार होतं. गेल्या वर्षभरात या दोन्ही तंत्रज्ञानांवर वेगवेगळ्या ॲप्स विकसित झाल्या, ज्यामुळे लोक वाटतील तसे काल्पनिक फोटो आणि व्हीडिओ तयार करू लागले, एका झटक्यात 500 शब्दांचे निबंध, काल्पनिक बातम्या आणि अगदी व्हीडिओ सहज तयार करू लागले. सॅम ऑल्टमन यांची यात महत्त्वाची भूमिका होती, पण त्यांना Open AI ने का काढून टाकलं? लेखन - आशय येडगे निवेदन - गुलशनकुमार...

Nov 21, 20235 min

बोगद्यात अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्याचा हा आहे प्लॅन BBC News Marathi

12 नोव्हेंबर 2023 ला उत्तरकाशी जिल्ह्यातला एक बोगदा कोसळला आणि तिथे काम करणारे 41 मजूर आठ दिवसांपेक्षा जास्त काळ त्यात अडकून पडले आहेत. भारत सरकारच्या वेगवेगळ्या संस्थांसोबत जगभरातले तज्ज्ञ त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांच्यासमोर कोणकोणते पर्याय आहेत? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Nov 20, 20234 min

इस्रायलविरोधात लढण्यासाठी हमासला कोण पैसे देतंय? BBC News Marathi

हमास आणि इस्रायल यांच्यातील युद्धामुळं हमासला कोणते देश, संघटना मदत करतात किंवा या मोठ्या इस्लामिक संघटनेकडं पैसा कुठून येतो? कोणकोणते देश हमासला मदत करतात? हमास क्रिप्टोमधून पैसे कसे मिळवतं? पाहा सोपी गोष्टच्या या भागात लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Nov 17, 20235 min

कालवा काढण्यासाठी इस्रायल आपल्या वाळवंटात 520 अणुबॉम्ब फोडणार होतं का? BBC News Marathi

भूमध्य समुद्र आणि तांबड्या समुद्राला जोडणारा जगातला एकमेव मार्ग म्हणजे इजिप्तचा सुएझ कालवा. पण राजकीय परिस्थिती बदलली की हा कालवा अनेकदा अडचणीत सापडतो. याला पर्याय म्हणून अमेरिका आणि इस्रायलने संयुक्तपणे इस्रायलच्या वाळवंटात अणुस्फोट करून एक नवीन कालवा बनवण्याची योजना तयार केली होती. इस्रायलचे पहिले पंतप्रधान बेन गुरियन यांच्या नावे असलेली ही योजना वारंवार चर्चेत का येते? पाहा सोपी गोष्टच्या या भागात. लेखन – आशय येडगे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले

Nov 16, 20235 min

पाऊस आला की हवेतलं प्रदूषण कमी का होतं? BBC News Marathi

मुंबई, नवी मुंबई, पुणे आणि महाराष्ट्रातल्या इतर शहरात प्रदुषणाची पातळी वाढत चालली आहे. त्यासाठी नुकतीच राज्यात एक खास मीटिंगही झाली. यात अनेक उपायांवर चर्चा झाली त्यात एक उपाय होता क्लाऊड सीडिंगचा, म्हणजे कृत्रिम पावसाचा. पण कृत्रिम पावसाने खरंच प्रदुषणाची पातळी कमी होते का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - अनघा पाठक निवेदन - एडिटिंग - सिद्धनाथ गानू

Nov 10, 20235 min

ओबीसी कोट्याविना मराठ्यांना आरक्षण देणं शक्य आहे का? BBC News Marathi

एवढ्या मोठ्या समाजाचं आरक्षण संपवण्याचा घाट गेल्या काही दिवसांपासून घातला जातोय. त्यासाठी मंत्रालयापासून खालपर्यंतचे लोकं जबाबदार आहेत.” छगन भुजबळांच्या या विधानानंतर राज्यात ओबीसी विरुद्ध मराठा असा वाद सुरू झाल्याचं दिसतंय. मराठा आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागता कामा नये असा ओबीसी संघटनांचा आग्रह आहे. सरकारही तेच म्हणत आलंय पण कुणबी प्रमाणपत्रं देऊन मराठा समाजाला ओबीसी दर्जा देणं म्हणजे आतापर्यंत ओबीसी गणल्या गेलेल्या जातींना फटका असं या आंदोलकांचं म्हणणं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का न ल...

Nov 09, 20235 min

मोर्चे, आयोग, उपोषण - मराठा आरक्षण आंदोलनाच्या इतिहासाची सोपी गोष्ट |BBC News Marathi

22 मार्च 1982ला अण्णासाहेब पाटील यांनी मंडल कमिशनला विरोध करत मुंबईत मराठा आरक्षणासह इतर 11 मागण्यांसाठीचा पहिला मोर्चा काढला. आर्थिक निकषावर मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणीही त्यावेळी करण्यात आलेली होती. मात्र त्यांची एकही मागणी मान्य न झाल्याने अण्णासाहेब पाटील यांनी आत्महत्या केली आणि आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाज एकत्र यायला सुरुवात झाली. लेखन - नामदेव काटकर निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Nov 01, 20235 min

अपार क्रमांक म्हणजे काय? केंद्र सरकारची ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना काय? BBC News Marathi

भारतातल्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची असणारी ‘एक देश, एक विद्यार्थी’ योजना नेमकी काय आहे. अपार क्रमांक काय आहे? आधार क्रमांक आणि अपार क्रमांक यामध्ये काही फरक आहे का? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आधार क्रमांक असताना या नवीन अपार क्रमांकाची गरज आहे का? लेखन - आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 31, 20234 min

इस्रायल - गाझा युद्धात हिजबुल्लाह उडी घेईल का? BBC News Marathi

इस्रायल हमासबरोबर युद्धात गुंतलेलं असताना तिकडे लेबनॉन मधून हिझबुल्लाह इस्रायलवर हल्ला करू शकते का? हिझबुल्लाह राजकीय पक्ष आहे की कट्टरतावादी संघटना? पाहा सोपी गोष्ट.

Oct 20, 20235 min

इस्रायलवर हमासने हल्ला केला, पण त्यामागे इराणचा हात होता? BBC News Marathi

7 ऑक्टोबरला हमासने गाझामधून इस्रायलवर हल्ले केले. गेली अनेक वर्षं काहीशी बॅकफुटवर वाटत असलेली हमास संघटना इतका मोठा हल्ला केवळ स्वतःच्या जोरावर करू शकते का, हा प्रश्न लगेचच उभा राहिला आणि संशयाची सुई वळली इराणकडे. खरंच हमासचा हल्ला इराणच्या पाठिंब्याने झाला होता का? पाहू या या सोपी गोष्टमध्ये

Oct 19, 20235 min

इस्रायलने जेव्हा 6 दिवसांच्या युद्धात गाझा काबीज केलं BBC News Marathi

इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष नवीन नाही. 1948 साली स्थापना झालेल्या इस्रायलने आजवर अनेकदा आपल्या शेजाऱ्यांशी लढाई केली आहे. 1967 साली झालेल्या लढाईत इस्रायलने निर्णायक विजय मिळवला होता. फक्त 6 दिवसांत इस्रायलने सीरिया, जॉर्डन आणि इजिप्तचा भूप्रदेश काबीज करत विजय मिळवला होता. काय होतं हे युद्ध? पाहा. निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 17, 20235 min

इस्रायल - पॅलेस्टाईन संघर्ष होतोय ती गाझा पट्टी आहे तरी काय? BBC News Marathi

मासच्या ताब्यात असलेल्या गाझा पट्टीतून आधी इस्रायलवर हल्ला झाला आणि त्यानंतर इस्रायलने गाझावर बॉम्बहल्ले सुरू केले. आकाराने मुंबईपेक्षा लहान असणारा हा भाग या युद्धात एवढा महत्वाचा का आहे? तिथे राहणाऱ्या सामान्य लोकांची परिस्थिती नेमकी काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 12, 20235 min

इस्रायल की पॅलेस्टाईन? भारत नेमका कुणाच्या बाजूने? BBC News Marathi

भारताच्या फाळणीच्या काळातच इस्रायलचा जन्म होत होता. त्या दरम्यान गांधीजींनी इस्रायलच्या स्थापनेलाच विरोध केला होता, त्यामुळे भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारताच्या परराष्ट्र धोरणावर बराच काळ गांधींचा प्रभाव राहिला. मात्र मागील तीन दशकांमध्ये भारत इस्रायलचा मित्र बनला आहे. नेमके भारत इस्रायल संबंध आणि पॅलेस्टाईनबद्दलची भारताची भूमिका कशी बदलत गेली? पाहा ही सोपी गोष्ट निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 12, 20236 min

राज ठाकरेंचं टोल आंदोलन, पण टोल कुठे, कसा आकारला जाऊ शकतो? BBC News Marathi

आधी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नंतर राज ठाकरे यांच्या वक्तव्यानंतर राज्यात पुन्हा एकदा टोलमुक्तीचा प्रश्न चर्चिला जातोय. पण मुळात टोल का घेतात? टोलचे नियम काय आहेत? रोड आणि टोल टॅक्स वेगळाय का? याच प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा हा प्रयत्न निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 11, 20235 min

इस्रायल हमास संघर्षाचा आपल्यावर काय परिणाम? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

हमास या सशस्त्र कट्टरतावादी संघटनेने इस्रायलवर 7 ऑक्टोबरला मोठमोठे मिसाईल हल्ले केले. प्रत्युत्तरात इस्रायलने गाझा पट्टीसह पॅलेस्टिनी गडांवर हल्ले केले आहेत. आतापर्यंत शेकडो मृत्यू झालेत, हजारो विस्थापित झालेत, आणि कित्येक जण अजूनही या संघर्षात अडकलेत. पण जगात आणखी एक युद्ध का पेटलंय? आणि त्याचे आता आपल्यावर काय परिणाम होतील? पाहा तुमच्या मनातल्या 5 प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - टीम बीबीसी लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 10, 20236 min

महादेव बेटिंग ॲप काय आहे? बॉलिवूडशी या सगळ्याचं काय नातं आहे? BBC News Marathi

सोशल मीडियावरून लोकप्रिय झालेलं हे ॲप देशभर पसरलं. बघता बघता काही महिन्यांतच 12 लाखांहून अधिक सट्टेबाज 'महादेव बुक'मध्ये सामील झाले. हजारो प्रकारच्या बँक खात्यांमधून पैशांचे व्यवहार सुरू झाले, क्रिकेटपासून ते निवडणुकांपर्यंत सगळ्याच गोष्टीवर सट्टा लावला जाऊ लागला. ईडीने तपास हाती घेतल्यानंतर काही सिने आणि टीव्ही अभिनेत्यांनाही समन्स पाठवलं आहे. लेखन - आशय येडगे निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 06, 20234 min

जागतिक बँक म्हणते ‘स्वच्छ भारत’ अभियानाचा वेग कमी झाला BBC News Marathi

: स्वच्छ भारत अभियानाच्या घोषणेनंतर भारतातील शौचालयांमध्ये वाढ झाली पण बांधलेल्या शौचालयांचा वापर किती होतोय याबाबत जागतिक बँकेचा एक अहवाल प्रकाशित झाला आहे. भारतात शौचालये वापरणाऱ्यांचं प्रमाण किती आहे? अनुसूचित जाती जमातींमध्ये शौचालय वापरण्याचं प्रमाण कमी होत आहे का? देशातील श्रीमंत आणि गरीब राज्यांची परिस्थिती काय आहे? पाहुयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन : आशय येडगे निवेदन - सिध्दनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 05, 20235 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android