Sleep Apnea म्हणजे झोपेमध्ये श्वसनक्रियेत अडथळा येऊन श्वास थांबणं. यात मेंदू सतर्क होऊन आपल्याला जागं करतो आणि श्वासोच्छवास पुन्हा सुरू होतो. पण यामुळे शांत झोप लागत नाही. दीर्घकाळ असं झालं तर त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. स्लीप अॅप्नियाची लक्षणं कोणती? याचे धोके कोणते आहेत? आणि यावर उपचार काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Sep 10, 2024•6 min
पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशरर्फ यांच्या कुटुंबाच्या मालकीच्या उत्तर प्रदेशच्या बागपतमधल्या जमिनीचा लिलाव नुकताच शत्रू संपत्ती कायद्यानुसार करण्यात आला. पण हा शत्रू संपत्ती कायदा काय आहे? यामध्ये कोणत्या संपत्तीचा समावेश होतो? आणि ती कधी विकता येते? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Sep 09, 2024•5 min
एका नवीन औषधाला ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया म्हणजे DCGI ने मान्यता दिलीय. हे आहेत PresVu नावाचे डोळ्यांत टाकायचे ड्रॉप्स. जवळचं वाचण्यासाठी चष्मा वापरावा लागणाऱ्यांना या आयड्रॉप्समुळे दिलासा मिळू शकतो. पण काय आहेत हे PresVu आयड्रॉप्स? त्यात नेमकं काय आहे? याचा खरंच फायदा होतो का? आणि या ड्रॉप्सचा वापर किती सुरक्षित आहेत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Sep 06, 2024•7 min
जगामध्ये अशी एक गोष्ट आहे जिचा जगभरातल्या 99% जनतेला त्रास होतोय... आणि दरवर्षी जवळपास 40 लाख लोक याला बळी पडतात. ही गोष्ट आहे - वायू प्रदूषण - Air Pollution 7 सप्टेंबर हा दिवस इंटरनॅशनल डे ऑफ क्लीन एअर फॉर ब्लू स्काईज म्हणून पाळण्याचं 2020 मध्ये युनायटेड नेशन्सने जाहीर केलं. हवेच्या प्रदूषणाचे परिणाम किती गंभीर होऊ शकतात? जगभरात यामुळे कोणते आजार भेडसावतायत? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Sep 05, 2024•6 min
ममता बॅनर्जींनी महिला आणि लहान मुलांच्या सुरक्षेसाठी अपराजिता विधेयक आणलं आहे. कोलकात्यातल्या आर. जी. कर मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये महिला डॉक्टरचा बलात्कार आणि खून झाल्यानंतर मोठी निदर्शनं झाली. त्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभेने अपराजिता नावाचं एक विधेयक मंजूर केलं. पण काय आहे हे विधेयक? समजून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Sep 04, 2024•6 min
7 ऑक्टोबरच्या हमासच्या हल्ल्यापासून इस्रायलने गाझाला लक्ष्य केलं आणि हमासविरोधात कारवाया तीव्र केल्या. पण ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात इस्रायली सैन्याने वेस्ट बँक भागावर मोठा हल्ला चढवला. इथला बराचसा प्रदेश आधीपासूनच इस्रायलच्याच ताब्यात आहे. मध्यपूर्वेतल्या अत्यंत संवेदनशील ठिकाणांपैकी एक असं वेस्ट बँक काय आहे? त्यावर नेमकं नियंत्रण कुणाचं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Sep 03, 2024•7 min
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर या दोन अंतराळवीरांना घेऊन गेलेलं बोईंग स्टारलायनर अंतराळ यान आता या दोन अंतराळवीरांशिवायच पृथ्वीवर परतणार आहे. या यानात निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणींमुळे ते अंतराळवीरांना पृथ्वीवर परत घेऊन येण्यासाठी सुरक्षित आहे का, याबद्दल साशंकता निर्माण झाली होती. त्यानंतर हे दोन अंतराळवीर आणखी काही महिने स्पेस स्टेशनलाच मुक्काम करून स्पेस एक्सच्या यानाने परततील, असं नासाने जाहीर केलं. आता बोईंग स्टारलायनर यान परतीचा प्रवास मानवरहित करणार आहे. बोईंग स्टारलायनर पृथ्वीवर कधी ...
Sep 03, 2024•6 min
पावसाचा अंदाज वर्तवताना त्यामध्ये कमी दाबाच्या पट्ट्याचा नेहमी उल्लेख होतो. काय असतो हा कमी दाबाचा पट्टा? त्याचा पाऊस पडण्याशी काय संबंध असतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Aug 31, 2024•4 min
रिलायन्स आणि डिस्नी इंडिया यांच्या विलिनीकरणला मान्यता मिळाल्याने भारतातल्या मीडिया इंडस्ट्रीतली अनेक गणितं बदलणार आहेत. विलिनीकरणातून तयार होणारी कंपनी ही 70,350 कोटी रुपयांचं मूल्यांकन - Valuation असणारी भारतातली मीडिया क्षेत्रातली अवाढव्य कंपनी असेल. आणि या नवीन कंपनीच्या वाढीसाठी रिलायन्स इंडस्ट्रीज यात रु.11,500 कोटींची गुंतवणूक करेल. नेमका कोणता करार झालाय रिलायन्स आणि डिस्ने मध्ये? Jio Cinema आणि Disney+ Hotstar हे दोन्ही OTT प्लॅटफॉर्म एकत्र होणार का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये लेखन आण...
Aug 30, 2024•6 min
नासाच्या संशोधकांना मंगळावर पृष्ठभागाखाली खोल पाण्याचे साठे सापडले आहेत. मंगळाच्या पृष्ठभागाखाली पाणी असेल तर त्यामुळे मंगळावर पृष्ठभागाखाली जीवसृष्टी असण्याची शक्यताही निर्माण होते. पृथ्वीवर पृष्ठभागाखाली एक प्रचंड मोठं जैविक विश्व असल्याचं गेल्या काही दशकांमध्ये अभ्यासातून समोर आलंय आणि मंगळावरही कदाचित हीच परिस्थिती असू शकते. मंगळावर जीवसृष्टी असलीच तर ती पृष्ठभागाखाली असण्याची शक्यता आहे. रिपोर्ट - मायकल मार्शल निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Aug 29, 2024•7 min
लहान कर्जं घेणाऱ्या, ग्रामीण भागातल्या ग्राहकांना कर्ज मिळणं सोपं जावं म्हणून रिझर्व्ह बँक एका नवीन प्रणालीवर काम करत असल्याचं RBI चे गव्हर्नर शक्तीकांता दास यांनी जाहीर केलंय. Unified Lending Interface. Lending म्हणजे कर्ज देण्याची प्रक्रिया सोपी - सुरळीत करण्यासाठीची ही प्रणाली आहे. गेल्यावर्षी या ULI ची चाचणी सुरू करण्यात आली आणि त्यातल्या निष्कर्षांवरून ही प्रणाली देशभरात लाँच कधी करायची, हे रिझर्व्ह बँक ठरवेल. ही नवी प्रणाली कशासाठी आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता ...
Aug 29, 2024•4 min
केंद्र सरकारने UPS म्हणजेच युनिफाईड पेन्शन स्कीमला मंजुरी दिलीय. जुनी पेन्शन योजना (Old pension Scheme) पुन्हा लागू करावी यासाठी काही राज्यांत आंदोलनं झाली, काही राज्यांनी ही Old Pension Scheme लागू केली. आणि अचानक ही नवीन - एकीकृत पेन्शन योजना जाहीर झाली. युनिफाईड पेन्शन स्कीम काय आहे? जुनी पेन्शन योजना म्हणजेच Old Pension Scheme आणि NPS पेक्षा यामध्ये काय बदल करण्यात आले आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Aug 29, 2024•5 min
चंद्रावर पाणी आहे का, बर्फ आहे का अशी अनेक कोडी उलगडण्याचा प्रयत्न गेला बराच काळ सुरू आहे. पण आता चंद्रावर वितळलेल्या लाव्हाचा समुद्र होता का याचं काही प्रमाणात उत्तर मिळालेलं दिसतंय. भारताच्या चंद्रयान 3 ने चंद्राची जमीन कशी तयार झाली याबाबत महत्त्वाचा शोध लावलाय. त्याबद्दलच जाणून घेऊया, आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - जॉर्जिना रन्नार्ड, बीबीसी विज्ञान प्रतिनिधी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - शरद बढे
Aug 26, 2024•4 min
मुंबईलगतच्या ठाणे जिल्ह्यातील बदलापूरमध्ये अवघ्या चार वर्षांच्या दोन मुलींवर शाळेमध्ये लैंगिक अत्याचार झाले. शाळा मुलांसाठी किती सुरक्षित आहे, हे तपासण्यासाठी किंवा शाळा मुलांसाठी सर्वतोपरी सुरक्षित वातावरण तयार करू शकेल, यासाठी काही नियम, सूचना आहेत का? कामाच्या ठिकाणी महिलांच्या सुरक्षितेबद्दलची विशाखा समिती असणं जसं बंधनकारक आहे, त्याच धरतीवर शाळांमध्ये सखी सावित्री समिती असणंही आवश्यक आहे. काय आहे ही सखी सावित्री समिती? ती काय काम करते? सुरक्षेच्या दृष्टीने शाळांमध्ये इतर कोणत्या उपाययोजना अ...
Aug 22, 2024•5 min
जगातल्या काही मोजक्या देशांमध्ये मान्यता मिळालेली औषधं आता भारतात चाचण्या झाल्या नसल्या, तरी मिळू शकणार आहेत. औषध कंपन्यांची भारतातील नियामक - ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DGCI) ने आता एका महत्त्वाच्या ऑर्डरद्वारे आंतरराष्ट्रीय मान्यता मिळालेली औषधं भारतात येण्याचा मार्ग मोकळा केलाय. एखाद्या औषधाला जगात इतरत्र मान्यता मिळालेली असली, तरी आतापर्यंत भारतामध्ये क्लिनिकल टेस्टिंग करून, मान्यता मिळाल्यानंतरच हे औषध फार्मा कंपन्यांना भारतामध्ये विकता येत होतं. पण ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया (DCGI) ने...
Aug 21, 2024•5 min
UPSC च्या वेबसाईटवरची नोकऱ्यांसाठीची जाहिरात वादात सापडलीय. Joint Secretary म्हणजे सहसचिव, Director - संचालक आणि Deputy Secretary म्हणजे उप-सचिव पदासाठीच्या Lateral Entry म्हणजे थेट नियुक्तीसाठीची ही जाहिरात आहे. दिल्लीमधील विविध मंत्रालयं आणि खात्यांच्या मुख्यालयांमध्ये कंत्राटी पद्धतीने या नेमणुका होतील. या नेमणुका 3 वर्षांच्या कालावधीसाठी असतील आणि हा काळ 5 वर्षांपर्यंत वाढवला जाऊ शकतो. या नेमणुका कशा होणार? किती पदं अशा प्रकारे भरली जाणार? या नोकऱ्यांमध्ये आरक्षण का नसणार? यावर विरोधी पक्षान...
Aug 20, 2024•5 min
भारतामध्ये विकसित करण्यात येणाऱ्या डेंग्यूच्या लशीची तिसऱ्या टप्प्यातली ट्रायल सुरू करण्यात आल्याची घोषणा केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने केलीय. ICMR - इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च आणि पॅनेशिया बायोटेक (Panacea Biotec) कंपनी मिळून ही लस विकसित करत आहेत. डेंग्यूच्या एका प्रकारावरची लस दुसऱ्या प्रकारापासून संरक्षण देत नाही. हीच गोष्ट लस विकसित करण्यात आव्हान आहे. या प्रक्रियेत आणखी कोणती आव्हानं आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Aug 19, 2024•7 min
आफ्रिका खंडातल्या देशांमध्ये पसरलेली एम् पॉक्स (Mpox) ची साथ ही सार्वजनिक आरोग्यासाठीची आणीबाणीची स्थिती असून जागतिक चिंतेचा विषय असल्याचं वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटलंय. या आजाराला पूर्वी मंकीपॉक्स (Monkeypox) म्हटलं जात असे. किती धोकदायक आहे हा संसर्ग? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - शरद बढे
Aug 16, 2024•6 min
6 ऑगस्टला युक्रेनने रशियाच्या भूभागात शिरून हल्ला केला. मॉस्कोच नाही, तर युक्रेनमधले अनेकजण आणि या युद्धावर लक्ष ठेवून असणाऱ्या जगभरातल्या अनेकांसाठी हा आश्चर्याचा धक्का होता. आठवडा उलटल्यानंतरही रशियन सैन्याला अजूनही या भूभागात पुन्हा वरचस्मा प्रस्थापित करण्यासाठी झगडावं लागतंय. युक्रेनने रशियाच्या भागावर केलेला हल्ला हा अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का होता. सैन्याचा तुटवडा असताना असा धाडसी हल्ला करण्याचा निर्णय कीव्हने का घेतला? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्...
Aug 16, 2024•6 min
मंगळावरच्या खडकाळ पृष्ठभागाच्या खोलवर आत वैज्ञानिकांना पाण्याचा साठा सापडला आहे. नासाच्या मार्स इनसाईट लँडर (Mars Insight Lander) च्या डेटाचा अभ्यास करताना हा शोध लागला आहे. 2018 साली नासाचा हा लँडर मंगळावर उतरला होता. मंगळाच्या ध्रुवांवर गोठलेलं पाणी आणि वातावरणामध्ये पाण्याच्या वाफेच्या अस्तित्त्वाचे पुरावे यापूर्वीच आढळले आहेत. पण मंगळावर द्रव स्थितीतलं पाणी असल्याचं पहिल्यांदाच आढळलं आहे. कसा लागला हा शोध? मंगळावर कुठे पाणी आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - व्हिक्टोरिया गिल निवेदन ...
Aug 16, 2024•5 min
सेबीच्या अध्यक्षा माधबी बुच आणि त्यांचे पती धवल बुच यांची अदानी समूहाच्या आर्थिक अनियमिततेशी संबंधित असलेल्या ऑफशोअर कंपन्यांमध्ये गुंतवणूक असल्याचा आरोप हिंडनबर्ग रिसर्चच्या रिपोर्टमधून करण्यात आला आहे. हिंडनबर्ग रिसर्च कंपनी काय आहे? ती काय काम करते? या कंपनीच्या नव्या रिपोर्टमधून अदानी उद्योग समूह आणि सेबी संबंधित कोणते आरोप करण्यात आले आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Aug 16, 2024•6 min
वक्फ दुरुस्ती विधेयक संसदेच्या संयुक्त समितीकडे पाठवणार असल्याचं केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजुजू यांनी म्हटलंय. 8 ऑगस्टला हे दुरुस्ती विधेयक संसदेत सादर करण्यात आल्यानंतर विरोधकांनी त्यावर आक्षेप घेतला होता. सर्वपक्षीय नेत्यांशी चर्चा करून समिती स्थापन करण्याचा निर्णय घेणार असल्याचं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटलंय. वक्फ बोर्ड म्हणजे काय? या वक्फ कायद्यामध्ये कोणत्या सुधारणा सरकारतर्फे सुचवण्यात आल्या आहेत? आणि त्यावर आक्षेप काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. समजून घेऊयात सोपी...
Aug 09, 2024•7 min
दरवेळी कोणत्याही प्रकारच्या विम्याचा - Life Insurance, Medical Insurance, Term Insurance चा हप्ता आपण भरतो, तेव्हा त्यावर GST आकारला जातो. सध्या आरोग्य आणि आयुर्विम्यावर म्हणजेच Health Insurance आणि Life Insurance वर 18% GST दर आहे. महाग होत जाणाऱ्या प्रिमियम्समुळे पॉलिसी रिन्यू करणाऱ्यांचं प्रमाण घटत असल्याने हा GST 18% वरून कमी करून 5% करण्यात यावा, अशी मागणी केली जातेय. GST मुळे आरोग्य विमा आणि आयुर्विम्याच्या हप्त्यांवर कसा परिणाम झालाय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृत...
Aug 08, 2024•4 min
बांगलादेशतलं विद्यार्थ्यांचं आंदोलन एवढं चिघळलं की पंतप्रधान शेख हसीना राजीनामा देऊन देश सोडून गेल्या आहेत. आरक्षणाच्या मुद्द्यावरून हे आंदोलन सुरू झालं होतं, पण त्या आंदोलनानं सरकारविरोधी चळवळीचं रूप घेतलं. त्यानंतर बांगलादेशात बऱ्याच वेगानं घडामोडी घडल्या. नेमकं काय झालं आणि त्यावर नजर ठेवणं भारतासाठी का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग - शरद बढे
Aug 06, 2024•5 min
पिंपरी चिंचवड येथे 15 वर्षीय मुलाने ऑनलाइन गेमिंगपायी 14 व्या मजल्यावरून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. एका गेमममध्ये बाल्कनीतून उडी मारायचा एक टास्क होता. तो फॉलो करायच्या नादात या मुलाचा जीव गेला आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. यापूर्वीही ब्लू व्हेल चॅलेंजची लाट आली, तेव्हा हे घडलं होतं. टाईमपास म्हणून सुरू होणारे व्हीडिओ गेम्स जीवघेणे ठरायला लागतात, तेव्हा काय करायचं? आपण एका गेमच्या आहारी गेलोय, हे मुलांना जाणवू शकतं का? त्यांच्याबाबतीत असं काही घडू नये, म्हणून पालक काही करू शकतात का...
Aug 02, 2024•6 min
31 जुलैला राजधानी दिल्लीमध्ये काही तासांत 228 मिलीमीटर पाऊस पडला. शहरामध्ये अनेक ठिकाणी पाणी साचलं, घरांमध्ये शिरलं. मुंबईमध्येही अनेक भागांत 21 जुलैला दोन तासांत 100 मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आणि पाणी साचलं. कमी काळामध्ये असा धो - धो पाऊस पडण्याचं प्रमाण का वाढलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - जान्हवी मुळे, अमृता दुर्वे निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे
Aug 02, 2024•4 min
ब्राझीलच्या किनाऱ्याजवळ आढळणाऱ्या शार्क्सच्या शरीरात कोकेनचे अंश कसे सापडले याचा तपास सध्या संशोधक करतायत. रिओ दी जानेरोच्या किनारपट्टीजवळच्या 13 शार्कची तपासणी ओस्वाल्ड क्रूझ फाऊंडेशनच्या जीवसंशोधकांनी केली आणि त्यात त्यांना या शार्क्सचे स्नायू आणि यकृतात मोठ्या प्रमाणात कोकेन सापडलं. पहिल्यांदाच असं शार्क्सच्या शरीरात कोकेन सापडलंय आणि इतर समुद्रीय प्राण्यांत आढळलेल्या कोकेनपेक्षा हे प्रमाण 100 पटींनी अधिक आहे. आणखी काय सांगतं हे संशोधन? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - फिलीप सुझा आणि लि...
Aug 02, 2024•5 min
हिजबुल्लाहने गोलन हाईट्सवर डागलेल्या रॉकेटमुळे 12 मुलं आणि तरुणांचा जीव गेल्याचं इस्रायलने म्हटलंय. गेले नऊ महिने इस्रायल आणि हिजबुल्लाहमध्ये दररोजच्या चकमकी सुरू आहेत. हिजबुल्लाहवर अनेक वर्षांपासून बॉम्बस्फोट तसंच इस्रायल आणि अमेरिकन तळांवर लक्ष्य करणारे कट रचल्याचा आरोप आहे. पाश्चात्य देश, इस्रायल, अरब आखाती देश आणि अरब लीग हिजबुल्लाहला 'दहशतवादी' संघटना मानतात. हिजबुल्लाह नेमके कोण आहेत? लेबनॉन - इराण - इस्रायल या समीकरणात हिजबुल्लाहची काय भूमिका आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - ट...
Jul 30, 2024•4 min
फ्रेंच राज्यक्रांतीचा इतिहास असणाऱ्या फ्रिज टोपी ही पॅरिस ऑलिम्पिक 2024 चा मॅस्कॉट म्हणजेच बोधचिन्ह आहे. एखादा प्राणी द्योतक न करता या टोपीची निवड का करण्यात आली? ही टोपी कशाची खूण आहे? इतिहासात असं काय घडलं होतं? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
Jul 29, 2024•5 min
अर्थसंकल्पामध्ये टॅक्सचे स्लॅब्स बदलले, तुमच्यातल्या काही लोकांना कदाचित याचा फायदा होईल. लाँग टर्म कॅपिटल गेन्स टॅक्स मध्ये बदल केल्याचंही तुम्ही वाचलं - ऐकलं असेल. पण या बजेटमध्ये आणखी एक बदल झालाय, ज्याचा परिणाम तुम्ही घर विकत असताना होणार आहे आणि त्यासाठी 2001 हे वर्षं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. तुम्ही तुमच्या मालकीचं घर विकलंत, तर तुम्हाला जास्त टॅक्स भरावा लागणार का, हे या 2001 वर अवलंबून असेल. काय बदललंय नेमकं...जाणून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन :अमृता दुर्वे एडिटिंग : शरद बढ...
Jul 25, 2024•4 min