सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणा का वाढतो आहे?। BBC News Marathi

भारतात लहान मुलांमध्ये लठ्ठपणाचं प्रमाण वाढत असल्याचं समोर आलं आहे. वेळीच उपाय केले नाहीत तर यातून आरोग्याच्या नव्या समस्या उभ्या राहतील असा इशाराही तज्ज्ञांनी दिला आहे. संशोधन – गीता पांडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Aug 02, 20226 min

रणवीर सिंगला न्यूड फोटोशूट प्रकरणी शिक्षा होऊ शकते का? BBC News Marathi सोपी गोष्ट

आपल्या न्यूड फोटोग्राफीमुळे बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंह सध्या वादात सापडलाय. त्याच्यावर मुंबई पोलीसांकडे तक्रारही दाखल झाली आहे. अमेरिकन मासिकासाठी काढलेले फोटो रणवीर सिंह यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरही शेअर केले होते. हे फोटो अश्लील असल्याचा आरोप होतोय. पण, अश्लीलतेविषयीचा भारतीय कायदा काय सांगतो? त्यानुसार रणवीरला शिक्षा होऊ शकते का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - प्रियंका झा लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

Jul 29, 20225 min

भारतीय नागरिकत्व सोडून परदेशात जाणाऱ्यांची संख्या का वाढतेय? BBC News Marathi सोपी गोष्ट

दरवर्षी दीड लाखांच्या वर उच्चशिक्षित, कुशल भारतीय तरुण भारतीय नागरिकत्वाचा त्याग करतात. अर्थात, भारत सोडून ते अमेरिका, युरोप किंवा ऑस्ट्रेलिया अशा प्रगत देशांचा आसरा घेतात. तिथलं राहणीमान, शिक्षण - नोकरीच्या संधी यांची भुरळ तरुणांना पडते. पण, त्यामुळे भारतात ‘ब्रेनड्रेन’ सारखी परिस्थिती उद्भवते. तरुण स्थलांतराची ही समस्या आणि त्याची कारणं पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - शुभम किशोर लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 28, 20225 min

कोरोना विषाणूचा उद्रेक वुहान मांस बाजारातूनच झाला - अहवाल | BBC News Marathi सोपी गोष्ट

2019च्या डिसेंबरमध्ये कोरोना विषाणूचा प्रसार चीनच्या वुहानमधल्या मांस विक्री बाजारातूनच झाला असे निष्कर्ष आता ताज्या अहवालातूनही निघाले आहेत. संशोधकांच्या दोन वेगवेगळ्या गटांनी उपलब्ध डेटा आणि माहितीच्या आधारे तसे सबळ पुरावे असल्याचं म्हटलं आहे. हे अहवाल कोरोना विषाणूविषयी आणखी काय माहिती सांगतात, कोरोनाचा उद्रेक आटोक्यात आला आहे का, पाहूया सोपी गोष्ट क्रमांक 650… लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 27, 20224 min

म्यानमारमध्ये खरंच नागरी युद्ध सुरू होईल का? । BBC News Marathi

आपला शेजारी देश श्रीलंका सध्या आर्थिक अडचणी सापडलाय. तर दुसरीकडे, म्यानमारमध्येही यादवी युद्धा सदृश परिस्थिती आहे. परिस्थिती वेळोत आटोक्यात आली नाही तर तिथे नागरी युद्ध सुरू होईल असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघानेच दिलाय. असं नेमकं तिथं काय घडतंय? लष्कराच्या उठावानंतर परिस्थिती कशी चिघळली, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - बीबीसी बर्मीज् लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 26, 20225 min

द्रौपदी मुर्मूंना राष्ट्रपती करण्यामागे भाजपची रणनिती काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट 648

द्रौपदी मूर्मू यांनी देशाच्या पंधराव्या राष्ट्रपती म्हणून आज शपथ घेतली. त्याचबरोबर त्या देशाच्या दुसऱ्या महिला आणि पहिल्या आदिवासी राष्ट्रपती आहेत. हीच त्यांची ओळख सध्या राजकीय दृष्ट्या चर्चेची बनलीय. भारतीय जनता पार्टीने आदिवासी महिलेला मुख्यमंत्री करून नेमकं काय साध्य केलं, यामागे पक्षाची काय रणनिती आहे यावर चर्चा सुरू आहे. सोपी गोष्टमध्ये शोधूया याच प्रश्नांची उत्तरं… संशोधन - सरोज सिंह लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 25, 20225 min

भारत श्रीलंकेला इतकी मदत का करतोय? । BBC News Marathi

श्रीलंका आर्थिक संकटात सापडल्यानंतर यावर्षी भारताने श्रीलंकेला चीनपेक्षा जास्त आर्थिक मदत केली आहे. पण, श्रीलंकेतल्या एका गटाकडून या मदतीवर टीकाही होतेय. काही आंदोलनकर्त्यांनी ‘देश अमेरिका, भारताकडे गहाण टाकू नका,’ सूर लावला आहे. तर काही नागरिकांनी भारताच्या मदतीचं कौतुकही केलंय. मूळात भारताबद्दल श्रीलंकन नागरिकांचं नेमकं मत काय आहे, तिथे चीनवर भारत वरचढ ठरेल का, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - अनबरासन एथिराजन लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 22, 20226 min

इम्रान खानना पंजाबमधील विजयामुळे संजीवनी । BBC News Marathi

पाकिस्तानचं पंतप्रधानपद गमावल्यावर इम्रान खान बॅकफूटवर गेले होते. पण नुकतंच पंजाब प्रांतातल्या पोटनिवडणुका जिंकून त्यांच्या पक्षानं कमबॅक केलं आहे. पाकिस्तानसाठीच नाही तर दक्षिण आशियासाठीही हा विजय महत्त्वाचा कसा आहे ? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Jul 21, 20225 min

संजय पांडे अडचणीत का आले? BBC News Marathi

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि राज्याचे माजी प्रभारी महासंचालक संजय पांडे यांना सक्तवसुली संचलनालयानं मंगळवारी 19 जुलैला अटक केली होती. दिल्लीतील कोर्टानं त्यांना 9 दिवस ईडीच्या कोठडीत पाठवलं आहे. शेअर बाजारासंदर्भातील एका प्रकरणात अवैधरित्या फोन टॅपिंग केल्याचा आरोप संजय पांडे यांच्यावर आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Jul 20, 20225 min

ऋषी सुनक आणि युकेच्या पंतप्रधानपदाची शर्यत BBC News Marathi

बोरिस जॉन्सन यांच्या राजीनाम्यानंतर आता युकेच्या पंतप्रधानपदाच्या शर्यतीत भारतीय वंशाच्या ऋषी सुनक यांचं नाव आघाडीवर आहे. ते ब्रिटनचे पहिले भारतीय वंशाचे पंतप्रधान ठरू शकतात. पण ऋषी सुनक ही शर्यत जिंकू शकतात का? त्यांची आजवरची वाटचाल कशी होती? हे जाणून घेण्याआधी मुळात ब्रिटिश पंतप्रधानांची निवड कशी होते, त्याची माहिती करून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Jul 19, 20225 min

रुपया घसरल्यामुळे माझ्या खिशावर काय परिणाम होईल । BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया आतापर्यंतच्या नीचांकी स्तरावर जाऊन पोहोचलाय. गुरुवारी तो काही सेकंदांसाठी का होईना 80 च्याही पार गेला. आणि तज्ज्ञांचं तर असं म्हणणं आहे की येणाऱ्या काळात तो आणखी खाली म्हणजे अगदी 81 रुपयापर्यंत घसरू शकतो. असं नुसतं ऐकायला थोडंस किचकट वाटतं ना! आणि याचा माझ्याशी काय संबंध असंही तुम्हाला वाटेल. पण, रोजच्या जीवनात आपल्या खिशावर याचा अप्रत्यक्ष परिणाम होतच असतो. आणि देशाच्या अर्थव्यवस्थेवर तर दूरगामी परिणाम होतो. म्हणूनच सोपी गोष्टमध्ये आज समजून घेऊया रुपया आणि डॉलरच्या ...

Jul 16, 20226 min

उबर फाईल्स प्रकरण काय आहे? । BBC News Marathi

ओला किंवा उबर टॅक्सी आपल्या सगळ्यांसाठी सोयीची. आणि आरामदायी प्रवासामुळे आपली या सेवांना पसंती असते. पण, अलीकडेच उबर कंपनीतं कामकाज कसं चालतं किंवा कसं बेकायदेशीर पद्धतीने चालतं याचा खुलासा कऱणाऱ्या काही फाईल्स कंपनीच्याच माजी अधिकाऱ्याने उघड केल्या आहेत. त्यावरून जगभर गाजलेली ही सेवा किती सुरक्षित आहे असा प्रश्न निर्माण झालाय. उबर कंपनीविषयी असं या फाईल्समध्ये नेमकं काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 14, 20226 min

श्रीलंकेपासून भारताने काय धडा घ्यावा । BBC News Marathi

श्रीलंका देशावर जशी दिवाळखोरीची वेळ आली आहे, तशीच ती भारतावर येईल का अशी चर्चा सध्या सगळीकडे सुरू आहे. काहींनी भारतातल्या महागाईकडेही बोट दाखवलं. आणि अशीच परिस्थिती भारतातही येऊ शकते, अशी भीतीही व्यक्त केली. खरंच भारतात महागाई नियंत्रणाबाहेर जाऊ शकते का? आणि श्रीलंकेच्या संकटातून भारताने काय धडा घ्यायला पाहिजे, हे आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया… संशोधन - सरोज सिंह लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

Jul 14, 20227 min

K2 हा धूमकेतू पृथ्वीवर आदळेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

येत्या 14 जुलैला पृथ्वीच्या अगदी जवळून ‘के2’ हा मोठा धूमकेतू जाणार आहे. हा धूमकेतू तब्बल 18 किमी लांब आहे. त्यामुळे साध्या दुर्बीणीला तो दिसू शकणार आहे. त्याच्यापासून पृथ्वीला धोका आहे का? हे धूमकेतू कुठून आणि का येतात? आणि ते आदळले तर काय होऊ शकतं? सगळ्या प्रश्नांची उत्तरं पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 12, 20225 min

श्रीलंकेचं आर्थिक गणित कुठे फसलं? । BBC News Marathi

श्रीलंकेतली आर्थिक प्रश्न दिवसेंदिवस चिघळतोय. महागाई आणि वस्तूंच्या तुटवड्यामुळे वैतागलेल्या आंदोलनकर्त्यांनी रविवारी राष्ट्राध्यांच्या सरकारी निवासस्थानावरच हल्ला केला. या आंदोलनामुळे अध्यक्ष गोटाबाया राजपक्षे यांना निवासस्थान सोडावं लागलं. आणि ते पळून गेले. देशात परकीय चलनाचा अभूतपूर्व तुटवडा जाणवतोय. पण, मूळात श्रीलंकेवर ही परिस्थिती काय ओढावली? देशाचं आर्थिक गणित कुठे बिघडलं? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - आयेशा परेरा लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 11, 20227 min

काँग्रेस पक्षाने तीन वेळा निवडणूक चिन्ह का बदललं? BBC News Marathi | सोपी गोष्ट

एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर त्यांच्या गटाने वारंवार आपणच शिवसेना असल्याचा दावा केला आहे. आणि फक्त पक्षावरच नाही तर पक्षचिन्ह म्हणजे धनुष्य-बाणावरही त्यांनी दावा आहे. तर उद्धव ठाकरे यांनीही धनुष्य बाण आपलाच असल्याचं म्हटलंय. यावरून पक्ष आणि पक्षाचं निवडणूक चिन्ह याविषयीही चर्चा होऊ लागलीय. त्या निमित्ताने सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया भारतातल्या सगळ्यात जुन्या पक्षाविषयी ज्यांनी तीनदा निवडणूक चिन्ह बदललंय. लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 09, 20227 min

'रॉकेट्री' फेम नंबी नारायण, ज्यांना गद्दारीच्या आरोपात अडकवलं गेलं... सोपी गोष्ट BBC News Marathi

आर माधवन आणि शाहरुख खान यांच्या मुख्य भूमिका असलेला रॉकेट्री सिनेमा सध्या गाजतोय. इस्त्रोचे माजी शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांच्या आयुष्यावर तो बेतलेला आहे. ही कहाणी खरंच थरारक आहे. रॉकेट तंत्रज्ञान परस्पर पाकिस्तानला विकल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. देशाने त्यांच्यावर गद्दारीचा आरोप केला. पण, शेवटी गुन्हे अन्वेषण विभागाने चार वर्षांनी त्यांना क्लिनचिट दिली. आता आपल्याविरोधात बनावट कट रचणाऱ्यांचा तपास व्हावा अशी नारायणन यांची इच्छा आहे. त्यांचं हे सिनेमालाही लाजवेल, असं कथानक समजून घेऊया सोपी गोष्...

Jul 07, 20226 min

सेक्स स्कँडलमुळे पडणार युकेमध्ये बोरीस जॉन्सन सरकार? BBC News Marathi सोपी गोष्ट

महाराष्ट्रात जसं मागचे पंधरा दिवस एक सत्तानाट्य घडून आलं, तसंच वातावरण सध्या युकेमध्ये आहे. पंतप्रधान बोरिस बेकर यांच्यावर त्यांच्याच पक्षाचे खासदार नाराज आहेत. आणि त्यातून मागच्या एका महिन्यात दुसऱ्यांदा त्यांच्यावर पंतप्रधानपद गमावण्याचं संकट घोंघावतंय. यावेळी केंद्रस्थानी आहेत त्यांचे निकटचे सहकारी आणि खासदार ख्रिस पिंचर. असं नेमकं काय घडतयं युकेमध्ये? पाहूया सोपी गोष्ट… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 06, 20225 min

रेस्टॉरंटकडून बिलामध्ये आकारला जाणारा सर्व्हिस चार्ज कसा रद्द कराल?। BBC News Marathi

आपल्या हॉटेल्स किंवा रेस्टॉरंटच्या बिलामध्ये सर्व्हिस चार्ज आकारला जातो. सर्व्हिस चार्ज म्हणजेच सेवाशुल्क. अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर ही एकप्रकारची 'टिप' असते जी ग्राहकांकडून सक्तीने वसूल केली जाते. पण आता सर्व्हिस चार्ज रद्द करण्याचे आदेश केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकारणाने दिले आहेत. संशोधन, लेखन - दीपाली जगताप निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 06, 20224 min

एकनाथ शिंदे आणि चंद्राबाबू यांच्या बंडातील साम्य । BBC News Marathi

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेलं बंड आणि 27 वर्षांपूर्वी आंध्रप्रदेशमध्ये तेलगू देसममध्ये झालेलं एक बंड यामध्ये राजकीयदृष्ट्या भरपूर साम्य आहे. तिथेही बंडखोर नेते चंद्राबाबू नायडू यांच्या गळ्यात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. आणि पुढे जाऊन पक्षाचं अध्यक्षपदही त्यांच्याकडेच आलं. याबाबतीत एकनाथ शिंदे यांचा शिवसेनेवर दावा असला तरी तो मुद्दा न्यायालयात जाणार आहे. पण, आंध्रमधलं ‘ते’ बंड उद्धव ठाकरेंसाठी भीती वाढवणारं तर शिंदे गटासाठी दिलासा देणारं ठरू शकतं. पाहूया सोपी गोष्ट… संशोधन - नीलेश धोत्रे लेखन,...

Jul 04, 20225 min

नवे कामगार कायदे सोप्या शब्दात । BBC News Marathi

जुलै महिन्यापासून नवीन कामगार कायदे प्रत्यक्षात आणण्याचा केंद्रसरकारचा प्रयत्न आहे. आणि तसं झालं तर आपली कामाची पद्धत आणि आपल्याला हातात मिळणारा पगार असे मूलभूत बदल आपल्या प्रोफेशनल आयुष्यात होणार आहेत. काय आहेत हे नवे कामगार कायदे आणि मूळ कायद्यांमध्ये नेमके काय बदल झाले आहेत हे समजून घेऊया… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jul 01, 20226 min

एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, पण अडचणी कायम? | BBC News Marathi

एकनाथ शिंदे यांनी भाजपच्या पाठिंब्यानं मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. पण त्यांच्यासमोरच्या अडचणी संपलेल्या नाहीत. आम्ही शिवसेनेतच आहोत, आम्ही पक्ष सोडलेला नाही, असे शिंदे समर्थक आमदार वारंवार करत आहेत. पण आता ते भारतीय जनता पक्षात विलीन होणार की आणखी कोणतं पाऊल उचलणार? त्यांच्यासमोर कोणते पर्याय आणि अडचणी आहेत? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61994342

Jul 01, 20225 min

बहुमत चाचणीत ऐनवेळी कहानीमे ट्विस्ट? । BBC News Marathi

सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्राच्या विधानसभेतली बहुमत चाचणी रोखण्यास नकार दिला आहे. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारला उद्या फ्लोअर टेस्टला सामोरं जावं लागेल. पण या बहुमत चाचणीत एखादा ट्विस्ट पाहायला मिळाला तरी आश्चर्य वाटायला नको. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517

Jun 30, 20225 min

एकनाथ शिंदे प्रकरणात चर्चेत आलेला नबाम रेबिया खटला काय आहे? । BBC News Marathi

शिवसेना आणि एकनाथ शिंदे गटाचा संघर्ष आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचला आहे. पण या सुनावणीदरम्यान वारंवार एका खटल्याचा दाखला देण्यात येत होता, तो म्हणजे नबाम रेबिया प्रकरण. पण नेमकं हे प्रकरण काय आहे? महाराष्ट्रातील आत्ताच्या राजकीय परिस्थितीत या प्रकरणाला नेमकं का महत्त्व आलंय? आणि त्याच्या आधारे कोर्टात काय युक्तीवाद झाला आहे? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61955517

Jun 28, 20225 min

अमेरिकेत गर्भपातावरून वाद, भारतात कायदा काय सांगतो? । BBC News Marathi

अमेरिकेतल्या गर्भपाताच्या कायद्यासंदर्भातला एक निर्णय, म्हणजे रो विरुद्ध वेड खटला सध्या जगभर चर्चेत आहे आणि अमेरिकेचा जगावरचा प्रभाव पाहता या घटनेचा जगातल्या प्रत्येक स्त्रीशी संबंध आहे. नेमका हा निर्णय काय आहे? गर्भपाताच्या बाबतीत अमेरिकेच्या तुलनेत भारतात महिलांची स्थिती चांगली आहे का? लेखन – अनघा पाठक, मानसी दास निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/international-58761820 https://www.bbc.com/marathi/international-61938721...

Jun 28, 20226 min

एकनाथ शिंदेंना धनुष्य बाण मिळेल का? । BBC News Marathi

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत केलेल्या बंडामध्ये त्यांच्याकडे दोन तृतियांश आमदार असल्याचं स्पष्ट झालं आहे. आतापर्यंत आपण खरे शिवसैनिक आहोत, अशी त्यांची भूमिका कायम आहे. अशावेळी ते शिवसेनेवरच दावा करतील का? आणि पुढे जाऊन पक्ष चिन्ह म्हणजे धनुष्य-बाण आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करतील का? किंबहुना ते तसं करू शकतील का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

Jun 25, 20228 min

एकनाथ शिंदेंची 'नाराजी' हे 'ऑपरेशन लोटस'च आहे, कारण...। BBC News Marathi

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार अंतर्गत विरोधांमुळे पडेल, असं राज्यातले भाजपचे नेते सतत म्हणत होते. पण आता सरकार खरंच पडायला आलेलं असताना मात्र हीशिवसेनेतली अंतर्गत समस्या आहे, असा पवित्रा त्यांनी घेतलेला दिसतो. पण हा खरंच 'शिवसेनेचे अंतर्गत विषय' आहे का? की या बंडखोरीचा रिमोट कंट्रोल भाजपकडे आहे? विश्लेषण – आशिश दीक्षित निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61905235

Jun 23, 20227 min

एकनाथ शिंदेंनी पक्षांतर केलं तर सरकार पडेल? । BBC News Marathi

एकनाथ शिंदेंनी शिवसेनेतील काही आमदारांसह सुरत गाठलं आणि ते भाजपात जाण्याची शक्यता वर्तवली जाऊ लागली. पण एका पक्षातून दुसऱ्या पक्षात असं थेट जाता येतं का? शिंदेंनी हे पाऊल उचललं, तर पक्षांतरबंदी कायद्यानुसार त्यांची आमदारकी रद्द होईल का? शिंदे आणि त्यांचे सहकारी आमदार पक्ष बदलून आपली आमदारकीही कायम ठेवू शकतात का? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61862782

Jun 21, 20225 min

अग्निपथसारख्या योजना भारताशिवाय कुठल्या देशांत आहेत? BBC News Marathi

भारत सरकारने मंगळवारी (14 जून) लष्करातील अल्पकालीन नियुक्तीची अग्निपथ योजना जाहीर केली. जगात असे अनेक देश आहेत जिथं सैन्यात अल्प कालावधीसाठी भरती करण्यात येते. पण इथं महत्त्वाची गोष्ट म्हणजे या देशांमध्ये लष्करात सेवा करणं सक्तीचं आहे. अशा योजनांचा काय परिणाम होतो? संशोधन – टीम बीबीसी लेखन – जान्हवी मुळे निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

Jun 20, 20225 min

माऊंट एव्हरेस्टचा बेस कँप का हलवला जातोय? । BBC News Marathi

नेपाळ सरकारने माऊंट एव्हरस्टचा बेस कँप दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतलाय. आता जिथं कँप आहे ती जागा ग्लेशियरवर आहे. आणि तिथला बर्फ झपाट्याने वितळतोय. आणि ठिसूळही झालाय. कसा आहे नवा बेस कँप? आणि नेपाळ सरकारवर ही वेळ का आली? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद बढे

Jun 17, 20226 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android