सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

मोहम्मद पैगंबर विधेयक नेमकं काय आहे? । BBC News Marathi

भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपुर शर्मा यांच्या मुस्लीम प्रेषित महम्मद पैगंबर यांच्यावरील वक्तव्याचे पडसाद अजूनही देशभर उमटत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रात धार्मिक द्वेष विरोधी एक विधेयक संमत होण्याची मागणी होत आहे. 17 तारखेला या विधेयकाच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने मुंबईत एक मोर्चाही आयोजित केला आहे. ‘महम्मद पैंगबर विधेयक’ या नावाने चर्चा होत असलेलं हे विधेयक नेमकं काय आहे आणि राज्यात ते संमत होऊ शकतं का, पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - दीपाली जगताप लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके ए...

Jun 16, 20226 min

मोदी सरकार दहा लाख नोकऱ्या आणणार कुठून? BBC News Marathi

केंद्रसरकारने येत्या 18 महिन्यांमध्ये 10 लाख सरकारी नोकऱ्यांची घोषणा केली आहे. यात रेल्वे, गृहखातं आणि संरक्षण खात्यातल्या नोकऱ्यांची संख्या सर्वाधिक आहे. सरकारने घोषणा तर केली. पण, एवढ्या नोकऱ्या सरकार आणणार कुठून? आणि सरकारी नोकऱ्यांमधून बेरोजगारीचा खरा प्रश्न सुटेल का? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 15, 20227 min

नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे? BBC News Marathi

नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची दोन दिवस चौकशी झाली. वर्तमानपत्राची 2000 कोटी रुपये किमतीची मालमत्ता चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. तर काँग्रेसनं राजकीय सूडबुद्धीने गांधी कुटुंबीयांना त्रास दिला जात असल्याचा आरोप केलाय. 2012मध्ये समोर आलेलं हे नॅशनल हेराल्ड प्रकरण नेमकं काय आहे, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 14, 20227 min

परवेझ मुशर्रफ यांना नेमका काय आजार झालाय? BBC News Marathi

पाकिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष परवेझ मुशर्रफ यांच्या मृत्यूबद्दल काही दिवसांपूर्वी अफवा पसरली होती. शेवटी त्यांच्या कुटुंबीयांनी एक पत्रक काढून ही अफवा असल्याचं स्पष्ट केलं. त्याचबरोबर मुशर्रफ यांना नेमकं काय झालंय याचीही माहिती दिली. मुशर्रफ यांना बरा न होण्यासारखा एक दुर्धर आजार झालाय अँमीलॉयडॉसिस. हा आजार अमेरिकेतही दोन लाख लोकांमागे एखाद्यालाच होतो. असा हा दुर्मीळ आजार नेमका काय आहे आणि परवेझ मुशर्रफ सध्या कसे आणि कुठे आहेत जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये… संकलन - ऋजुता लुकतुके लेखन, निव...

Jun 13, 20226 min

UPI मधून क्रेडिट कार्डचे पैसे खर्च करण्यात तुमचा फायदा आहे का? BBC News Marathi

आपला फोन वापरून UPI च्या माध्यमातून तुम्ही आपल्या बँक अकाउंटमधले पैसे खर्च करत असाल. पण आपल्याकडे नसलेले पैसे खर्च करायचे असले तर? म्हणजे क्रेडिट कार्डवरचे पैसे तुम्ही UPI मधून खर्च करू शकलात तर? Reserve Bank ने तशी घोषणा केलीय. पण यामुळे काय साध्य होणार आहे? यातून तुमचा फायदा होईल का? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 10, 20225 min

राज्य सभा निवडणूक कशी होते? मतदानाची प्रक्रिया काय असते? BBC News Marathi

राज्यसभेच्या निवडणुकांकडे आपलं सहसा लक्ष तजात नाही. पण यावेळी महाराष्ट्रात होणारी निवडणूक अत्यंत चुरशीची आहे. सहा जागांसाठी सात उमेदवार रिंगणात आहेत आणि दोन्ही बाजूंनी विजयाचा दावा केलाय. राज्यसभा निवडणुकीचं गणित अत्यंत किचकट असतं. हे खासदार कसे निवडले जातात? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - शरद बढे

Jun 08, 20227 min

प्रेषित पैगंबरांचं चित्र का दाखवलं जात नाही? BBC News Marathi

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मांनी प्रेषित पैगंबराबद्दल काही उद्गार काढले आणि मोठा वाद झाला. पैगंबरांबद्दल बरंच काही लिहीलं गेलंय. पण त्यांची प्रतिमा किंवा मूर्ती कधीच का पाहायला मिळत नाही? इस्लाममध्ये अल्लाह आणि प्रेषितांच्या प्रतिमा रेखाटण्यावर बंदी आहे का? जेव्हा जेव्हा अशाप्रकारे प्रेषितांच्या प्रतिमा दाखवण्याचा प्रयत्न झाला तेव्हा इतकी तीव्र प्रतिक्रिया का उमटली? पाहा ही सोपी गोष्ट संशोधन - जॉन मॅकमेनॉस, संकलन – जान्हवी मुळे लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर...

Jun 07, 20226 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट - नुपूर शर्मा आणि प्रेषित पैगंबर प्रकरणात भारताने मुस्लीम देशांपुढे नमतं का घेतलं?

भाजपच्या प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेटमध्ये प्रेषित पैगंबराबद्दल काही वादग्रस्त उद्गार काढले. यावरून अरब, आखाती आणि हळुहळू अनेक मुस्लीम देशांमधून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. भाजपने या प्रवक्त्यांची पक्षातून हकालपट्टी केली पण अजूनही टीका थांबलेली नाही. प्रश्न हा आहे की भारतातून प्रतिक्रिया उमटली तेव्हा भाजपने कारवाई केली नाही, पण मुस्लीम देशांच्या विरोधानंतर चक्रं फिरली. असं का झालं? पाहा ही सोपी गोष्ट संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 07, 20226 min

UFO किंवा उडती तबकडी खरंच अस्तित्वात आहे का? सोपी गोष्ट | BBC News Marathi

कोल्हापूरमध्ये मध्यंतरी आकाशात पांढऱ्या रंगाची एक गूढ वस्तू तरंगताना दिसली होती. ही उडती तबकडी असल्याच्या चर्चाही तेव्हा झाल्या. त्याचवेळी अमेरिकेत सर्वोच्च स्तरावर एक संशोधनही सुरू होतं, ते म्हणजे उडत्या तबकड्या किंवा UFOच्या अस्तित्वावर…या संशोधनातून नेमकं काय बाहेर आलं? खरंच उडत्या तबकड्या जगात आहेत का? त्या परग्रहावरून येतात का, पाहूया सोपी गोष्टमध्ये…. लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 03, 20226 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बनावट नोटांचं प्रमाण दुपटीने का वाढलं?

रिझर्व्ह बँकेनं दिलेल्या माहितीनुसार, आर्थिक वर्षं 2021-22 मध्ये देशात बनावट नोटांमध्ये मोठी वाढ झाली आहे. हे बनावट चलन कसं पसरलं? खोट्या नोटा कशा ओळखायच्या आणि त्यांचा एवढा सुळसुळाट झालाय, संशोधन – ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/india-61667088

Jun 02, 20226 min

काश्मिरात पुन्हा हत्यांचं सत्र सुरू झालंय का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

अवघ्या दोन आठवड्यांत दोन काश्मिरी पंडितांची हत्या झाली आहे. असं नेमकं का होतंय? काश्मीर पोलीस सांगतायत की दहशतवादी संघटना हे हल्ले करतायत, पण स्थानिक नेत्यांनुसार भाजपचं राजकारण आणि अगदी काश्मीर फाईल्स या सिनेमानेही काश्मीरमधलं वातावरण चिघळवलंय. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Jun 01, 20225 min

पुतिन यांचा खरंच मृत्यू झाला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ब्रिटिश गुप्तहेर संघटना एमआयसिक्सच्या एका सूत्राने ब्रिटिश मीडियाला मुलाखत देऊन व्लादिमीर पुतिन यांच्या मृत्यूची शक्यता व्यक्त केली आहे. पुतिन यांच्या मृत्यूची अफवा पसरण्याची ही खरंतर पहिलीच वेळ नाही. पण, यावेळी एका देशाच्या आंतरराष्ट्रीय गुप्तचर यंत्रणेनं तशी शक्यता व्यक्त केलीय. पण, यात कितपत तथ्य आहे. आणि युद्धाच्या वेळी अशा बातम्या का आणि कशा पसरवल्या जातात? लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद पवार

May 31, 20226 min

आधार कार्ड मास्क वापरून सुरक्षितता जपू शकाल का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आधार कार्डाच्या सुरक्षिततेवरून पुन्हा एकदा गोंधळ निर्माण झाला आहे. आधार प्राधिकरणाने 27 मेला एक पत्रक काढून हॉटेल, मॉल अशा खाजगी संस्थांना आधारची प्रत देऊ नका, अशा सूचना ग्राहकांना केल्या. त्यावरून भरपूर टीका झाल्यावर हे पत्रकही मागे घेतलं. आधारच्या प्रती जोडणं का धोकादायक आहे. त्यामुळे खरंच सुरक्षितता धोक्यात येते का आपल्या आधारमधील माहितीची सुरक्षितता कशी जपायची पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

May 31, 20225 min

कुतुब मिनारच्या जागी पाडलेली हिंदू, जैन मंदिरं पुन्हा उभारण्याची मागणी का होतेय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

ताज महाल, ज्ञानवापी मशीद यांच्यावरून वाद होत असतानाच आता त्यात कुतुब मिनारचीही भर पडली आहे. कुतुब मिनारच्या परिसरात प्रार्थना करण्याची, तसंच इथली पाडलेली जैन आणि हिंदू मंदिरं पुन्हा उभारण्याची विनंती काहींनी कोर्टाला केली आहे. कुतुब मिनार नेमका कुणी बांधला? तो कसा बांधला? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

May 27, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट - नरेंद्र मोदींच्या या 8 निर्णयांनी अच्छे दिन आणले का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

गेल्या 8 वर्षांत पंतप्रधान मोदींनी अनेक मोठे निर्णय घेतले. या निर्णयांनी ‘अच्छे दिन’ आणले का? त्यांचा तुमच्या आमच्यावर कसा परिणाम झाला? पंतप्रधान म्हणून मोदींच्या 8 वर्षांच्या कारकीर्दीतील 8 मोठ्या निर्णयांचा हा आढावा. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

May 26, 20228 min

अमेरिकेत बंदुका सहज का मिळतात? हा हिंसाचार कसा थांबवता येईल? सोपी गोष्ट पॉडकास्ट

8 वर्षांच्या एका मुलाने अमेरिकेतल्या टेक्सास राज्यात एका प्राथमिक शाळेवर हल्ला केला आणि त्यात 19 मुलांचा आणि 2 जणांचा मृत्यू झाला. ज्या वयात आपल्याकडे गिअरच्या गाडीचं पक्कं लायसन्स मिळतं त्या वयात या मुलाकडे रायफल आली कुठून? उघडपणे बंदुका बाळगण्याचं स्वातंत्र्य अमेरिकेत का आहे? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

May 26, 20227 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मंकीपॉक्स आजार काय आहे?

युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सध्या मंकीपॉक्स या आजाराची चर्चा आहे. कांजिण्या आणि देवी रोगासारखं पुरळ अंगभर उठतं आणि जोडीला ताप आणि सांधेदुखीमुळे लोक हैराण होतात. भारतातही मंकीपॉक्सचा धोका आहे का? त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

May 21, 20225 min

मंकीपॉक्स आजार काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

युरोप, अमेरिका आणि ऑस्ट्रेलियात सध्या मंकीपॉक्स या आजाराची चर्चा आहे. कांजिण्या आणि देवी रोगासारखं पुरळ अंगभर उठतं आणि जोडीला ताप आणि सांधेदुखीमुळे लोक हैराण होतात. भारतातही मंकीपॉक्सचा धोका आहे का? त्याची प्राथमिक लक्षणं काय आहेत, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

May 20, 20225 min

राजीव गांधींच्या मारेकऱ्याची सुटका झाली कारण | सोपी गोष्ट पॉडकास्ट

21 मे 1991 रोजी राजीव गांधींची तामिळनाडूत निवडणूक प्रचारादरम्यान हत्या झाली होती. त्यांच्या मारेकऱ्याला अलिकडेच सुप्रीम कोर्टाने दोषमुक्त केलं. या प्रकरणाची ही सोपी गोष्ट.

May 19, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट - ‘या’ घटस्फोट खटल्याची जगभरात चर्चा का होतेय?

‘जॉनी डेपला कोकेन आणि दारूचं व्यसन होतं. तो मला मारहाण करायचा आणि गायब व्हायचा.’ असा आरोप अभिनेत्री अँबर हर्डनं केला आहे. ‘अँबर कधीकधी थोबाडीत मारायची, कधी टीव्हीचा रिमोट फेकून मारायचr,कधी वाईन फेकायची असा हिंसक स्वभाव तिचा होता.’ असा आरोप अभिनेता जॉनी डेपने केला आहे.

May 18, 20226 min

प्रार्थना स्थळांचा कायदा काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

देशात प्रार्थना स्थळांवरून नवीन वाद निर्माण होऊ नयेत यासाठी 1991मध्ये केंद्रसरकारने प्रार्थना स्थळांविषयीचा कायदा अस्तित्वात आणला. आताही ज्ञानवापी मशिदीच्या निकालादरम्यान हा कायदा महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. त्या निमित्ताने हा कायदा नेमका काय आहे, आणि बदलत्या काळात त्याचं महत्त्व काय जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

May 17, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: गहू निर्यात बंदीमुळे गव्हाचे दर कमी होतील का?

भारताने नुकतीच गव्हाच्या निर्यातीवर तात्पुरती बंदी घातली आहे. देशात गहू आणि एकूणच अन्नधान्याच्या किमती वाढत आहेत. त्या आटोक्यात आणण्यासाठी हे पाऊल उचलल्याचं केंद्रसरकारने म्हटलंय. पण, त्याचा किती उपयोग होईल. आणि शेतकऱ्यांचं नुकसान होणार नाही का? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

May 17, 20226 min

आकाशगंगेच्या ब्लॅक होलचा फोटो काय गूढ उकलणार? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आपल्या आकाशगंगेच्या केंद्रस्थानी एक महाकाय कृष्णविवर आहे. त्याचं नाव Sagitarrius A. त्याचा पहिला फोटो शास्त्रज्ञांनी अपार मेहनतीने मिळवला आहे. त्यातून आपल्याला काय नवीन माहिती मिळेल? संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

May 13, 20225 min

ताज महाल की तेजोमहालय? 22 बंद खोल्यांचं गूढ काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट

शाहजहानने आपल्या मृत पत्नीसाठी बांधलेला हा महाल एका शिवमंदिराच्या जागेवर उभाय का? 1631 ते 1653 या काळात संपूर्ण ताज महालाचा परिसर उभा राहिला. ज्या 22 खोल्या बंद आहेत त्या उघडून तिथे असलेल्या मूर्ती आणि शिलालेखांचा शोध घ्यायला कोर्टाने पुरातत्व विभागाला सांगावं अशी याचिका अलाहाबाद हाय कोर्टात दाखल केली गेली. कोर्टाने मात्र ही याचिका फेटाळून लावली आहे. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

May 12, 20225 min

ज्ञानवापी मशीद काशी विश्वनाथ मंदिर पाडून उभारली होती का?

वाराणसीतल्या ज्ञानवापी मशिदीच्या भीतींवर हिंदू मूर्ती आहेत आणि तिथे प्रार्थना करण्याची परवानगी मिळाली अशी याचिका दिल्लीतल्या पाच महिलांनी केली आहे. यावर कोर्टात सुनावणी सुरू आहे. बाबरीप्रमाणेच ज्ञानवापी मशिदीचाही वाद आहे का? औरंगजेबाने विश्वनाथ मंदिर पाडून तिथे मशीद बांधली असं म्हणतात यात किती तथ्य आहे? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

May 11, 20225 min

रुपयाची घसरण नरेंद्र मोदी सरकार थांबवू शकतं का? सोपी गोष्ट पॉडकास्ट

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत डॉलरच्या तुलनेत रुपयाचे भाव गडगडले. रुपयाने आजवरची निचांकी पातळी गाठली. रुपया स्वस्त झाल्याचा तुमच्या खिशावर काय परिणाम होईल? येत्या काळात रुपया पुन्हा वधारेल का? संशोधन – सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर

May 10, 20225 min

भारताचे कोरोना मृतांचे आकडे मोदी सरकारने कमी दाखवले की WHO ने फुगवले? सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोव्हिडमुळे भारतात 47 लाख मृत्यू झाले असं WHO चा अहवाल सांगतो. भारताने हा आकडा पावणे पाच लाखांच्या घरात म्हटलाय. WHO ची आकडेवारी आणि ती मोजण्याची पद्धत विश्वास ठेवण्यालायक नाही अशीही टीका केलीय. प्रश्न हा आहे की भारताचे कोव्हिड मृत्यू मोदी सरकारने लपवले की WHO ने फुगवले? पाहणार आहोत आजची सोपी गोष्ट लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

May 06, 20227 min

रेपो दरवाढीचे आपल्यावर होणारे ‘पाच’ परिणाम | सोपी गोष्ट पॉडकास्ट

अखेर रिझर्व्ह बँकेनं रेपो दरात 40 अंकांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला. महागाई दर आटोक्यात ठेवण्यासाठी हे पाऊल बँकेला उचलावं लागलं. येणारा काळ आणखी मोठ्या व्याजदर वाढीचा असेल असा अंदाज तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. अशावेळी सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया रेपो दर वाढल्यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

May 06, 20227 min

गर्भपाताचा निर्णय कुणाच्या हातात हवा? सोपी गोष्ट पॉडकास्ट

गर्भपात करण्याचा अधिकार किंवा हक्क महिलांना असावा का, यावरून पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. निमित्त आहे अमेरिकेत फुटलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या ड्राफ्टचा. तिथे न्यायालयाने आपला निकाल अजून दिलेला नाही. पण, हा ड्राफ्ट तशाच्या तशा अंमलात आला तर अमेरिकन महिलेला असलेला हा अधिकार काढून घेतला जाईल. भारतातही गर्भपात कायदा अस्तित्वात आहे. पण, त्यात निर्णयाचं किती स्वातंत्र्य महिलांना आहे हा प्रश्नच आहे. सोपी गोष्टमध्ये याच मुद्यावर चर्चा करूया… संशोधन - बीबीसी टीम, ऋजुता लुकतुके लेखन,...

May 04, 20226 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: LICIPO मध्ये गुंतवणूक कशी करावी?

एलआयसीचा बहुचर्चित आयपीओ येत्या चार तारखेपासून बाजारात येत आहे. भारतातील आतापर्यंतची हा सगळ्यात मोठा आयपीओ असला तरी रशिया-युक्रेन युद्धामुळे आर्थिक अस्थिरता वाढलेली असताना एलआयसी कंपनी शेअर बाजारात उतरत आहे. अशावेळी या आयपीओमध्ये सहभागी व्हावं का? गुंतवणुकीची रणनिती नेमकी काय असावी, आज बघूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

May 03, 20226 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android