सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

मूल दत्तक घेण्यासाठीच्या नियमांमध्ये झाले ‘हे’ बदल BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतातल्या मुलं दत्तक घेण्याच्या कायद्यामध्ये अलीकडेच काही बदल करण्यात आले. त्यानुसार, दत्तक ग्रहणाची कायदेशीर प्रक्रिया आणि त्याची सुनावणी न्यायालयासमोर न होता जिल्हा न्यायदंडाधिकाऱ्यांसमोर होईल. न्यायालयांवरचा अतिरिक्त ताण कमी करण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतलाय. पण, त्यामुळे दत्तक ग्रहणाची प्रक्रिया आधीपेक्षा सुटसुटित आणि लवकर पूर्ण होईल अशी अपेक्षा होती. पण, प्रत्यक्षात या प्रक्रियेच्या अंमलबजावणीचा गोंधळ वाढलेला दिसतोय. कायद्यातले बदल आणि त्यामुळे लोकांचा गोंंधळ का उडायला, समजून घेऊया सोपी ...

Sep 15, 20225 min

कोहिनूर हिरा कुठे आहे? दूर करा हे 6 गैरसमज BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोहिनूर हिरा जगातल्या सगळ्यात मौल्यवान आणि वजनदार हिऱ्यांपैकी एक हिरा मानला जातो. भारतीयांच्या मनात या हिऱ्याचं एक वेगळं स्थान आहे. पण, त्याचबरोबर ब्रिटिशांनी हा हिरा भारताकडून लुटून नेला असा एक समज भारतीयांच्या मनात आहे. त्याचबरोबर या हिऱ्याबद्दल आख्यायिकाही खूप आहेत. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोहिनूरविषयीचे सहा मोठे गैरसमज… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Sep 14, 20225 min

ताडोबातले हत्ती जामनगरला हलवण्याला विरोध का होतोय? । BBC News Marathi

महाराष्ट्राच्या ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आणि गडचिरोली इथून तेरा हत्ती गुजरातच्या जामनगरमधल्या खाजगी प्राणी संग्रहालयात पाठवण्याचा निर्णय मे 2022मध्ये वन विभागाने घेतला. या निर्णयाला राज्य आणि केंद्रसरकारनेही परवानगी दिली आहे. पण, प्रश्न हा आहे की, आपल्या नैसर्गिक अधिवासात राहणाऱ्या प्राण्यांना बंदिस्त प्राणी संग्रहालयात का पाठवायचं? त्यासाठीच प्राणीहक्क संघटना आणि स्थानिक लोकांनीही याला विरोध केला. पण, त्याचा उपयोग झाला नाही. आणि वन विभागाने पत्रक काढून या निर्णयाची अंमलबजावणीही सुरू केली. ...

Sep 14, 20225 min

महाराणी एलिझाबेथ द्वितीय यांचे अंत्यसंस्कार कसे होणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

एलिझाबेथ द्वितीय यांनी ब्रिटिश साम्राज्यावर 71 वर्षं राज्य केलं. देशाला दुसऱ्या महायुद्धातून सावरताना बघितलं आणि पुढेही अशी अनेक स्थित्यंतरं पाहिली. ब्रिटिश जनतेशी आणि महत्त्वाचं म्हणजे ब्रिटिश राजघराणं तसंच परंपरांशी त्या प्रामाणिक राहिल्या. आता त्यांच्यावरचे अंत्यसंस्कारही ब्रिटिश परंपरेला धरून आणि शासकीय इतमामात पार पाडण्यात येतील. पुढचे काही दिवस ब्रिटिश जनतेसाठी नेहमीसारखे नसतील. त्यांच्यासाठी काय बदलेल आणि ब्रिटिश परंपरेनुसार, शाही अंत्यसंस्कार नेमके कसे पार पडतात आज जाणून घेऊया सोपी गोष्ट...

Sep 09, 20225 min

भारत जोडो पदयात्रा राहुल आणि काँग्रेसला तारेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो पदयात्रा’ तामिळनाडूच्या कन्याकुमारीपासून सुरू झाली आहे. भारतीय जनतेला एकत्र आणण्यासाठी या पदयात्रेचं आयोजन करण्यात आलं असलं तरी राजकीय हेतूही लपवून ठेवलेला नाही. कारण, 2024 ची सार्वत्रिक निवडणूक आणि काँग्रेस पक्षाला तसंच राहुल यांच्या नेतृत्वाला उभारी देण्यासाठी देशातल्या सगळ्यात जुन्या पक्षाचा हा निकराचा प्रयत्न आहे हे उघड आहे. पण, सध्याचा देशातला सर्वशक्तिशाली पक्ष आणि निवडणूक यंत्रणेत माहीर असलेल्या भाजपला ही पदयात्रा आव्हान देऊ शकेल का, पा...

Sep 08, 20226 min

राजपथाचा कर्तव्यपथ का केला जातोय? त्याचा इतिहास काय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

राजपथाचं नाव आता कर्तव्य पथ असं केलं जाणार आहे. पण असा निर्णय का घेण्यात आला आहे? या रस्त्याचा इतिहास आणि महत्त्व काय आहे? संशोधन – विवेक शुक्ला लेखन - जान्हवी मुळे निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Sep 08, 20225 min

पाकिस्तानात प्रलय कशामुळे आला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पाकिस्तानला गेले काही दिवस भीषण पुराचा सामना करावा लागतो आहे. एरवी कोरड्या आणि शुष्क मानल्या जाणाऱ्या इथल्या प्रांतांमध्येही अतीवृष्टीनं कहर केला आहे. यामागे काय कारणं आहेत? संशोधन – जॉर्जिना रेनार्ड निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा : https://www.bbc.com/marathi/international-62256081

Sep 06, 20225 min

INS विक्रांत युद्धनौका भारतीय नौदलासाठी किती महत्त्वाची? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारताची सर्वांत मोठी, स्वदेशी युद्धनौका INS विक्रांत 2 सप्टेंबर 2022ला भारतीय नौदलात दाखल झाली. 262 मीटर लांब, 45 हजार टन वजनी आणि 7500 हजार मैलांची रेंज असलेली ही युद्धनौका तयार व्हायला तब्बल २० हजार कोटी रुपये आणि १३ वर्षं लागली. आज भारताजवळच्या समुद्रात अनेक आंतरराष्ट्रीय हालचाली पाहायला मिळत आहेत. या सगळ्यात INS विक्रांतमुळे भारतीय नौदलाची शक्ती खरंच कशी वाढणारे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – जुगल पुरोहित लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले अधिक वाचा : htt...

Sep 03, 20225 min

काँग्रेस आणि भाजपमध्ये अध्यक्षपदाची निवडणूक कशी होते? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

लोकसभा निवडणुकीतील पराभवाची जबाबदारी घेत राहुल गांधींनी 2019च्या जुलैमध्ये काँग्रेस अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. तेव्हापासून सोनिया गांधी याच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्ष आहेत. आता तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा पक्षात अध्यक्षपदाच्या निवडीसाठीच्या हालचालींना वेग आला आहे. खरंच काँग्रेस आणि भाजपसारखे राष्ट्रीय पक्ष आपले अध्यक्ष कसे निवडतात? वार्तांकन - सरोज सिंग लेखन आणि निवेदन - दिपाली जगताप एडिटिंग - निलेश भोसले

Sep 01, 20225 min

मोदक कुठून आले? भारतात कुठे कुठे मोदक बनतात? । BBC News Marathi

श्रीगणेशाला मोदकांचा नेवैद्य आवडतो असं वर्णन पुराणापासून चालत आलं आहे. आई पार्वतीने गणेशाला अमृतयुक्त मोदक खायला दिला अशी कथा आहे. पण, ही पुराणातली कथा झाली. आपल्याकडे मोदक नक्की कुठून आले? गणपतीला मोदक दाखवण्याची परंपरा कधी आणि कुठून सुरू झाली? महाराष्ट्राखेरीज इतर कुठल्या राज्यांत मोदक बनवले जातात, पाहूया सोपी गोष्टमध्ये… निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 31, 20224 min

दुधाच्या किंमती कशामुळे वाढल्या? । BBC News Marathi

दूध हा अनेक भारतीयांसाठी रोजच्या आहारातला महत्त्वाचा घटक आहे. पण गेल्या काही दिवसांत दुधाच्या किंमतींमध्ये मोठी वाढ होताना दिसते आहे. यामागची कारणं काय आहेत? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले

Aug 30, 20224 min

माणूस पुन्हा चंद्रावर का चालला आहे?। BBC News Marathi

माणसाला पुन्हा चंद्रावर नेणारी मोहीम म्हणून नासाच्या आर्टेमिस प्रकल्पाकडे पाहिलं जातंय. यातला पहिला टप्पा म्हणजे आर्टेमिस-1. तांत्रिक कारणामुळे आर्टेमिस-1चं प्रक्षेपण पुढे ढकलण्यात आलं आहे. ही मोहीम नेमकी काय आहे आणि ती का महत्त्वाची आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Aug 29, 20225 min

बेनामी संपत्ती म्हणजे काय? त्याविषयीचा कायदा वादात का सापडला? । BBC News Marathi

सर्वोच्च न्यायालयाने अलीकडेच बेनामी संपत्ती (प्रतिबंधक) सुधारणा कायदा 2016 मधल्या काही तरतुदी घटनाबाह्य ठरवल्या आहेत. या तरतुदींचा उपयोग सत्ताधारी पक्ष राजकीय सूडबुद्धीने करत असल्याचा आरोप होत होता. या नेमक्या कुठल्या तरतुदी आहेत? मूळात बेनामी संपत्ती म्हणजे काय? अशी कायद्याची गरज काय होती, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 26, 20226 min

अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत अन्नटंचाई का निर्माण झालीय? BBC News Marathi सोपी गोष्ट 671

कोरोनाचा उद्रेक, मंदी सदृश वातावरण आणि रशिया, युक्रेनमधील युद्धामुळे जगभरात महागाई वाढलीय. तसंच अमेरिकेपासून श्रीलंकेपर्यंत, जगाला अन्न टंचाईचा मुकाबला करावा लागतोय. जगभरात नेमकी काय परिस्थिती आहे? त्या मागची कारणं काय? आणि ही परिस्थिती किती काळ राहील पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 25, 20226 min

रशिया, युक्रेन युद्ध अजून संपत का नाहीए? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

रशिया आणि युक्रेन मधील युद्धाला म्हणता म्हणता सहा महिने झाले. 24 ऑगस्टला खरंतर युक्रेनचा स्वातंत्र्यदिन आहे. पण, हा देश सध्या आपलं स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी लढतोय. दुसरीकडे रशियाचंही युद्धात मोठं नुकसान झालंय. तरीही दोन्ही देश मागे हटण्याचं नाव घेत नाहीएत. त्यामुळे युद्ध चिघळतंय. रशिया - युक्रेन युद्धात सध्या नेमकं काय सुरू आहे? संयुक्त राष्ट्रसंघ आणि पाश्चात्य देशांची नेमकी भूमिका काय आहे, पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 24, 20226 min

सरकारी बँकांचं खाजगीकरणाने लोकांचं आर्थिक हित जपलं जाईल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

बँकांच्या खाजगीकरणाचा मुद्दा अधून मधून कायम गाजतो. केंद्रसरकारने दोन सरकारी बँकांच्या खाजगीकरणाची तयारी सुरू केलेली असतानाच अलीकडे रिझर्व्ह बँकेनं आपल्या वेबसाईटवर एक संशोधनात्मक निबंध प्रसिद्ध केला. आणि यात चक्क सरकारी बँकांचं महत्त्व सांगताना खाजगीकरणासाठी अधिक व्यापक दृष्टिकोण ठेवण्याची गरज व्यक्त करण्यात आलीय. देशाच्या मध्यवर्ती बँकेनं अशाप्रकारे लेख प्रसिद्ध केल्यामुळे हा सरकारला ‘घरचा आहेर’ आहे का, यावरही चर्चा रंगली. आणि दुसऱ्याच दिवशी रिझर्व्ह बँकेला एक स्पष्टीकरणही प्रसिद्ध करावं लागलं?...

Aug 23, 20226 min

हेरगिरीच्या या जहाजामुळे भारत-चीन संबंध आणखी चिघळतील? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चीनचं एक हेरगिरी करणारं जहाज मागचे काही दिवस श्रीलंकेच्या हंबनटोटा बंदरात तैनात आहे. तिथं ते युद्धाभ्यास करणार आहे. पण, त्यामुळे भारताची चिंता मात्र वाढलीय. या जहाजात अत्याधुनिक रडार यंत्रणा आहे, ज्यामुळे चीन भारतीय क्षेपणास्त्रांची अचूकता आणि टप्पा यांचा माग काढू शकेल. आणि दुसरं म्हणजे चीन हंबनटोटा या लंकन बंदाराचा लष्करी कारवायांसाठी वापर करेल अशी भीती भारताला वाटतेय. तर चीन दक्षिण चिनी समुद्रात आपलं वर्चस्व वाढवण्याच्या प्रयत्नात आहे. ही एक धोक्याची घंटा आहे. भारत - चीन संबंध यामुळे बिघडू शकत...

Aug 20, 20226 min

जॅकलिन फर्नांडेझला अडचणीत आणणारं खंडणी प्रकरण काय आहे? । BBC News Marathi

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडेझ सध्या भलत्याच अडचणीत सापडली आहे. दोनशे कोटी रुपयांच्या खंडणीच्या एका प्रकरणात सक्तवसुली संचालनालयाने तिच्यावर आरोपपत्र दाखल केलं आहे. या खंडणी प्रकरणाबद्दल तिला माहिती होती. पण, तिने ती तपास यंत्रणेला वेळेवर दिली नाही, असा तिच्यावर आरोप आहे. हे नेमकं प्रकरण काय आहे? आणि जॅकलिनशी याचा संबंध कसा आला पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 18, 20225 min

बिल्किस बानो खटल्यातल्या दोषींची सुटका कशामुळे झाली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या अकरा दोषींची अलीकडेच सुटका करण्यात आली. गुजरात सरकारच्या 1992मधल्या शिक्षा माफी धोरणाला अनुसरून हे निर्देश देण्यात आले. पण, सामूहिक बलात्कार आणि सात जणांची हत्या असे गंभीर आरोप असलेल्या गुन्हेगारांना शिक्षा माफी मिळावी का? आणि जुन्या शिक्षा माफी धोरणात बदलाची आवश्यकता आहे का, यावरही चर्चा सुरू झाली आहे. केंद्रात आणि गुजरातमध्येही सत्तेत असलेल्या गुजरात सरकारवर टीका होतेय. ज्या शिक्षा माफी धोरणामुळे या अकरा गुन्हेगारांची सुटका झालीय ते धोरण समजून घेऊया स...

Aug 17, 20226 min

देश विकसित आहे की, विकसनशील हे कसं ठरवलं जातं? । BBC News Marathi

2047 पर्यंत देशाला पुन्हा विकसित देश बनवा, सामर्थ्यशाली बनवा अशी हाक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने दिली. भारत हा विकसनशील देश आहे, तर अमेरिका, जर्मनी यासारखे देश म्हणजे विकसित देश, असं आपण ऐकत आलो आहोत. पण, मूळात विकसित देश आणि विकसनशील देश कुठले हे कसं ठरतं? जीडीपीचा आकार गृहित धरला तर भारत जगात पाचव्या स्थानावर आहे. तरीही आपण विकसनशील कसे? संयुक्त राष्ट्रसंघाने विकसित आणि विकसनशील देशांची केलेली वर्गवारी कशावर आधारित आहे? या सगळ्या गोष्टी समजून घेऊया सोपी गोष्टमध्...

Aug 17, 20226 min

मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरचे अपघात कधी थांबणार? । BBC News Marathi

शिवसंग्राम पक्षाचे प्रमुख विनायक मेटेंच्या निधनानंतर मुंबई पुणे एक्सप्रेसवेच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. या रस्त्यावरचा हा काही पहिलाच अपघात नाही आणि इथे दुर्घटनेत एखाद्या मोठ्या व्यक्तीचा जीव जाण्याचीही ही पहिलीच वेळ नाही. पण अनेक अपघात होऊनही इथे परिस्थिती का सुधारत नाही, असा प्रश्न अनेकांनी विचारला आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Aug 15, 20225 min

रुपी बँक का बंद झाली? । BBC News Marathi

रिझर्व्ह बँकेनं अखेर पुण्याच्या जुन्या रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द केला. 22 सप्टेंबरपासून बँक कुठलेही व्यवहार करू शकणार नाही. 112 वर्षं जुन्या बँकेवर ही वेळ का आली? आणि महत्त्वाचं म्हणजे राज्यातल्या सहकारी बँकांना नेमकं कुणाचं ग्रहण लागलंय? कारण, आकडेवारी असं सांगते की, 2017 पासून तब्बल 67 सहकारी बँका बंद झाल्या आहेत. आणि इतर अनेक बँका याच मार्गावर आहेत. तेव्हा सहकारी बँकांवर ही वेळ का आली तेच पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

Aug 15, 20226 min

नितिश कुमार विरोधी पक्षाचे पंतप्रधानपदाचे उमेदवार होऊ शकतील का ? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नितिश कुमार यांनी बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना थेट भाजपा आणि नरेंद्र मोदींना आव्हानच देऊन टाकलं. पक्ष संपण्याची भीती की राष्ट्रीय महत्त्वाकांक्षा... नेमकं काय कारण आहे जे नितीशकुमारांना इथपर्यंत घेऊन आलंय? स्वतःचा पक्ष वाचवण्याबरोबरच नितिशकुमार नरेंद्र मोदींना राष्ट्रीय पातळीवर आव्हान देऊ शकतील का? नितिश कुमार यांच्यासाठी काय आहेत जमेच्या बाजू आणि कुठल्या त्यांच्या विरोधात जाऊ शकतात, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर...

Aug 11, 20226 min

डोनाल्ड ट्रंप यांच्या घरावर एफबीआयने छापे का मारले? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या फ्लोरिडातल्या घरावर अलीकडेच एफबीआयने छापा मारला. एका माजी अध्यक्षाच्या घरावर सरकारी यंत्रणेचा छापा पडण्याची ही पहिलीच खेप आहे. आणि त्यावरून अमेरिकेत भरपूर चर्चा होत आहे. ट्रंप यांनी अर्थातच हा त्यांच्याविरोधातला राजकीय डाव असल्याचं म्हटलंय. तर विरोधकांनी ट्रंप यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी केलीय. अमेरिकेत नेमकं काय सुरू आहे. आणि ट्रंप यांच्या घरावर छापा का पडला जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेक...

Aug 10, 20226 min

नितिश कुमार आणि भाजपा मध्ये वादाची ठिणगी कुठे पडली? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

महाराष्ट्रातील सत्तानाट्य अजून पुरतं संपलेलं नाही. इतक्यात दूर बिहारमध्ये नवीन नाट्य आकार घेतंय. जनता दल युनायटेडचे अध्यक्ष नितिश कुमार यांनी भाजपाबरोबर काडीमोड घेण्याचा निर्णय घेतलाय. आणि सगळं अपेक्षेप्रमाणे घडलं तर तिथे जदयू, राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेस असं महागठबंधन सरकार अस्तित्वात येऊ शकतं. भाजपा आणि नितिश कुमार यांचे संबंध कायम तिखट-गोडच होते. पण, सरकार पाडण्या इतकं अलीकडे काय घडलं? या वादाची ठिणगी कुठे पडली? आणि बिहार नाट्याचं महाराष्ट्रातील नाट्याशी काय कनेक्शन आहे? पाहूया सोपी गोष्टम...

Aug 09, 20227 min

वादग्रस्त ठरलेला फौजदारी प्रक्रिया कायदा नेमका काय आहे? । सोपी गोष्ट 658

अलीकडेच देशात फौजदारी प्रक्रिया (ओळख) 2022 कायदा लागू झाला आहे. संसदेच्या दोन्ही सभागृहात हा कायदा संमत झाला असला तरी गदारोळ दोन्ही ठिकाणी झाला. आणि या नव्या कायद्याला विरोधही होतोय. गुन्हेगारांबरोबरच ‘इतर व्यक्तीं’ची जैव-शारीरिक माहिती साठवून ठेवण्याची तरतूद या कायद्यात आहे. आणि हा त्या लोकांच्या गोपनीयता आणि खाजगीपणाच्या अधिकारावर घाला आहे, असा आरोप होतोय. हा नेमका कायदा काय आहे आणि त्याला इतका विरोध का होतोय पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर...

Aug 08, 20227 min

शिंदे-फडणवीस सरकारने केलेल्या नवीन प्रभाग रचनेचा भाजपला फायदा? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रिमंडळाच्या पहिल्याच बैठकीत एक महत्त्वाचा निर्णय जाहीर केलाय तो आगामी महानगरपालिका निवडणुकांसाठी प्रभाग रचना पुन्हा एकदा बदलण्याचा. 2017 साली तेव्हाच्या देवेेंद्र फडणवीस सरकारने घेतलेला बहुसदस्यीय प्रभाग रचनेनुसारच आता महापालिका निवडणुका होतील. हा निर्णय का महत्त्वाचा आहे आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 05, 20227 min

सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता किती वाढला? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

सणासुदीचे दिवस तोंडावर आले असताना केंद्रसरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना एक खूशखबर दिली आहे. त्यांच्या महागाई भत्त्यांत 4%ची वाढ होणार आहे. तसंच निवृत्ती वेतनाच्या वितरण प्रणालीतही सुटसुटीतपणा येणार आहे. सातव्या वेतन आयोगाच्या आखणी कुठल्या शिफारसींना केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. आणि त्याने आपल्या पगारावर काय परिणाम होणारए पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 04, 20225 min

गोल्ड एक्सचेंजमुळे सोन्याचे दर कमी होतील का? BBC News Marathi सोपी गोष्ट

अलीकडेच देशाचं पहिलं आंतरराष्ट्रीय बुलियन एक्सचेंज स्थापन करण्यात आलंय. सोनं आणि चांदी फिजिकल स्वरुपात इथं ट्रेड होणार आहे. त्यामुळे सोनार आणि इतर वित्तीय संस्थाही थेट आंतरराष्ट्रीय बाजारातून सोनं विकत घेऊ शकतील. याआधी रिझर्व्ह बँकची मान्यता असलेल्या काही बँका आणि संस्थाच सोनं बाहेरून आणू शकत होत्या. याचा परिणाम सोन्याचे दर कमी होण्यावर होईल का? ग्राहकांना इतर काय फायदे यातून मिळू शकतील? पाहूया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 03, 20225 min

संजय राऊत प्रकरण: राजकीय नेत्यांनी ईडीचा धसका का घेतलाय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या अटकेनंतर पुन्हा एकदा ईडीचा राजकीय वापर झाल्याचे आरोप होत आहेत. असे आरोप नरेंद्र मोदी सरकारवर सातत्याने होत आलेले आहेत. नेत्यांवरील कारवाई ईडीला शक्य होते ती मनी लाँडरिंग विरोधी कायद्याचा वापर करून. आणि 2005मध्ये हा कायदा लागू झाल्यापासून त्यात अनेकदा असे बदल किंवा सुधारणा करण्यात आल्यात ज्यामुळे या नेत्यांना जामीन मिळणं कठीण झालंय. या कायद्यामध्ये झालेले बदल आज समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Aug 02, 20226 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android