15 जानेवारी 2022 रोजी टोंगामधील बेटावर झालेल्या ज्वालामुखी उद्रेकानंतर विस्फोटाच्या लहरी पॅसिफिक महासागरातच नाही, तर भारतात आणि थेट ब्रिटनमध्येही जाणवल्या. या ज्वालामुखीनं इतका विनाश का केला? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
Jan 21, 2022•5 min
अंजनाबाई गावित, रेणुका शिंदे आणि सीमा गावित या तीन महिलांनी किरण शिंदेच्या साथीनं 13 लहान मुलांचे अपहरण आणि त्यातील 9 मुलांची निघृण हत्या केली होती. नव्वदच्या दशकात घडलेल्या या बालहत्याकांडाचा विषय निघाला की आजही अंगावर शहारे येतात. संशोधन – स्वाती पाटील लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
Jan 19, 2022•6 min
शेअर मार्केटमधील गुंतवणुकीमधून मोठा नफा कमवून देण्याचं आमिष दाखवत विशाल फटे नावाच्या व्यक्तीने बार्शी, सोलापूरातील अनेकांना कोट्यवधींचा गंडा घातला आहे. यापूर्वीही असे प्रकार घडलेले आहेत. अशा प्रकारच्या आमिषांना बळी न पडता गुंतवणूक कशी करायची? समजा आपल्याकडे भरपूर परतावा देणारी योजना असल्याचं कोणी सांगितलं, तर कोणकोणत्या गोष्टी तपासून पहायच्या? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. संशोधन : अमृता दुर्वे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
Jan 18, 2022•7 min
कोरोनाचे रुग्ण कमी होतायत असं वाटेपर्यंत ओमिक्रॉनमुळे तिसरी लाट आली. कोरोनाची साथ नेमकी कधी संपणार असा प्रश्न अनेकांना असतो. 2022 च्या वर्षात कोरोना पँडेमिककडून एंडेमिककडे जाईल का? हा आजार किती काळ गंभीर राहील? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन- मयांक भागवत व्हीडिओ एडिटिंग- निलेश भोसले
Jan 17, 2022•5 min
एखाद्या व्यक्तीनं बिलांची थकबाकी देणं बंद केलं तर काय होतं? तुम्हाला पैशाच्या मागणीसाठी त्रास देणारे फोन येतात, धमक्यांची पत्रं येतात आणि त्यानंतर तुमच्या इतर मालमत्तांवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो. मग एखादा देश दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर येतो तेव्हा काय होतं? श्रीलंकेत सध्या काय सुरू आहे? कर्ज, परकीय चलन आणि महागाई यांचा एकमेकांशी काय संबंध? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्ये. संशोधन : रजनीश कुमार लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Jan 14, 2022•7 min
महाराष्ट्रातली सर्व दुकानं आणि आस्थापना म्हणजे commercial establishments च्या पाट्या मराठीत असाव्यात असा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत म्हणजे कॅबिनेटमध्ये घेण्यात आला. आधीच्या नियमांतल्या पळवाटा बंद करणारा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतल्याचं उद्योग आणि मराठी भाषा विभाग मंत्री सुभाष देसाई यांनी सांगितलं. दुकानांच्या पाट्यांबद्दल आताच निर्णय घेण्यामागचं काय कारण आहे? दुकानांच्या पाट्या मराठीत करून नेमकं काय साध्य होईल? संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले...
Jan 13, 2022•8 min
व्होडाफोन आयडिया लिमिटेडमधले 35.8% शेअर्स सरकारला देण्याच्या प्रस्तावाला कंपनीच्या संचालक मंडळाने मान्यता दिली आहे. BSNL - MTNL ची वाईट असताना दुसरीकडे व्होडाफोन - आयडियामध्ये सरकारी भागीदारी कशाला? नेमकी ही काय भानगड आहे? यात Vodafone-Idea कंपनीचा काय फायदा? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Jan 12, 2022•6 min
कोव्हिड 19मुळे झालेला लॉकडाऊन, कोरोनाची पहिली आणि दुसरी लाट यातून सावरत असलेल्या अर्थव्यवस्थेमध्ये नोकऱ्यांचं प्रमाण अजूनही पूर्वीइतकं नाही. ओमिक्रॉनच्या संसर्गामुळे पुन्हा एकदा रोजगारांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात येतेय. भारतातलं नोकऱ्यांचं संकट हे वाटतं त्यापेक्षा अधिक गहन असल्याची भीती तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. भारतातल्या बेरोजगारीचा दर डिसेंबर 2021मध्ये 8% पर्यंत गेला होता. देशातला रोजगार आणि पगारी नोकऱ्यांची संख्या कमी झालेली आहे. काय आहे यामागचं कारण? समजून घेऊयात या सोपी गोष्टमध्य...
Jan 12, 2022•8 min
मागच्या 24 तासात भारतात एक लाखांच्या वर नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. थोडक्यात रुग्णांचा आकडा पुन्हा एकदा जोमाने वाढतोय. आणि यावेळी आधी लस घेतलेल्या लोकांनाही संसर्ग झाल्याच्या केसेस आहेत. जगभरातच ओमिक्रॉन व्हेरियंटच्या प्रसारानंतर लस घेतल्यानंतर झालेला ब्रेकथ्रू संसर्ग पाहायला मिळाला आहे. लस घेतल्यावरही कोरोना संसर्ग का होतो? तिसरा लशीचा डोस त्यावर प्रभावी ठरेल का? पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीस लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
Jan 12, 2022•5 min
1984 साली इंदिरा गांधींची त्यांच्या अंगरक्षकांनी हत्या केली आणि त्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यानंतर Special Protection Groupची स्थापना झाली. त्यांचं काम कसं चालतं? त्यांच्याव्यतिरिक्त पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी कुणाकडे असते? ऐकू या या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – सिद्धनाथ गानू, टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
Jan 07, 2022•5 min
इंटरनेटवर फ्री अॅप सुरू करून त्यावर प्रथितयश मुस्लीम महिलांबद्दल अश्लील मजकूर छापणे आणि त्यांना ट्रोल करण्याचं आणखी एक प्रकरण पुढे आलं आहे. यावेळी मुंबई पोलिसांनी कारवाई करत 18 वर्षांची एक तरुणी आणि 21 वर्षांच्या दोन तरुणांना ताब्यात घेतलं आहे. लहान वयात ही मुलं असे उद्योग का करतात? मुस्लीम समाजातल्या मुलींवर याचा काय परिणाम होतोय, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… [https://www.youtube.com/watch?v=5NZkcGZ5XL8] संशोधन - ऋजुता लुकतुके, मयांक भागवत लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले Twit...
Jan 05, 2022•4 min
महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाची तिसरी लाट आली आहे. पण रुग्णालयात दाखल होण्याचं आणि मृत्यूचं प्रमाण सध्या कमी आहे. त्यामुळे तीव्र संसर्गजन्य असूनही ओमिक्रॅान व्हेरियंट कोरोना विरोधातील लढाईत 'नॅचरल व्हॅक्सीन' असल्याचा दावा काहींनी केला आहे. पण अनेक तज्ज्ञांनी तो खोडून काढला आहे. संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
Jan 04, 2022•6 min
2022 सालात आणखी कुठला कोरोना व्हेरियंट त्रास देईल की, लशीमुळे सगळे सुरक्षित असू? वर्क फ्रॉम होममध्ये काही बदल होईल का? मेटाव्हर्स, 4जी यामुळे आपलं जग किती बदलेल? असे अनेक प्रश्न तुम्हाला पडले असतील. त्याचीच उत्तरं शोधूया आजच्या सोपी गोष्टमध्ये… [https://www.youtube.com/watch?v=RHqZmep_MlA] संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
Jan 03, 2022•6 min
भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी विधानसभेत केलेलं हे वक्तव्य. सुधीर मुनंगटीवारांनी प्रश्न विचारला की एखादा व्यक्ती LGBTQA समुदायाचा आहे की नाही हे कसं कळणार? एखाद्या पुरुषाला पुरुषाबद्दल आकर्षण आहे, याचं सर्टिफिकिट कोण देणार? त्याची व्याख्या काय? सुधीर भाऊंना पडलेल्या या प्रश्नांची सोप्या भाषेत वैज्ञानिक आणि कायदेशीर उत्तर शोधू या, आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अनघा पाठक एडिटिंग - निलेश भोसले
Dec 31, 2021•5 min
कोरोनाची तिसरी लाट आल्याची शक्यता अनेक जाणकारांनी मांडली आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्य आणि केंद्र सरकारनं ओमिक्रॅान व्हेरियंटचा प्रसार कुठे आणि किती प्रमाणात झालाय याचा शोध सुरू केला आहे. सर्वेक्षणाचं हे काम कसं सुरू आहे? संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले
Dec 30, 2021•6 min
नारायण राणे कुटुंबीय आणि शिवसेना यांच्यातला वाद तसा जुना आहे. नारायण राणेंनी शिवसेना सोडल्यापासूनच ही आग भडकली होती. पण नव्यानं ठिणगी पडली आहे ती संतोष परब हल्ला प्रकरणानं. हे प्रकरण काय आहे आणि त्याचा राणे-ठाकरे वादाशी काय संबंध आहे? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
Dec 28, 2021•5 min
उत्तराखंडच्या हरिद्वारमध्ये आणि छत्तीसगडच्या रायपूरमध्ये भरलेल्या धर्म संसदेत साधू-महंतांच्या वादग्रस्त विधानांची सध्या सगळीकडे चर्चा आहे. पण धर्म संसद म्हणजे नेमकं काय असतं? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
Dec 27, 2021•5 min
ऑनलाईन खरेदी किंवा कोणत्याही प्रकारच्या देवाण-घेवाणीसाठी तुम्ही डेबिट किंवा क्रेडिट कार्ड वापरता का? एक क्लिक केलं आणि आवडता ड्रेस, आवडते शूज ऑर्डर झाले, ओटीटीचं सबस्क्रिप्शन झालं, इतकंच काय मोबाईलचं, लाईटचं बिलही भरलं गेलं अशी तुम्हाला सवय आहे का? मग आता तुम्हाला आपल्या सवयी बदल्याव्या लागतील. तुमच्या क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड वापरण्याबदद्ल नवे नियम 1 जानेवारी पासून लागू होणार आहेत. कोणते आहेत नियम? जाणून घेऊया.
Dec 24, 2021•5 min
ओमिक्रॉन हा कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट आलाय हे तर एव्हाना तुमच्या कानावर आलं असेल. पण हा सौम्य व्हेरियंट आहे म्हणून अनेक जण त्याला हलक्यात घेत आहेत. पण पण ओमिक्रॉन खरंच सौम्य आहे का? जर तो सौम्य आहे, तर मग अनेक देशांतल लॉकडाऊन का लागत आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.
Dec 23, 2021•5 min
अनेकदा सेलेब्सवर, किंवा आपल्या नेत्यांवरही पैसा लपवल्याचे, करचोरीचे आरोप लागतात. असा बेकायदेशीर पैसा लपवण्याचे अनेक मार्ग असतात. त्यातलाच एक म्हणजे हवाला. हाही शब्द तुम्ही अनेकदा ऐकला असेलच. पण हा हवाला नक्की काय असतो? त्याचं रॅकेट कसं चालतं? आणि ही सिस्टिम नेमकी आली कुठून? जाणून घेऊया आजच्या बीबीसी मराठीच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन आणि निवेदन - अनघा पाठक एडिटिंग - निलेश भोसले
Dec 23, 2021•6 min
समाजवादी पार्टीच्या खासदार जया बच्चन संसदेत भडकल्याची ही काही पहिली वेळ नव्हती. पण यावेळी त्या कशामुळे चिडल्या, ते नेमकं कळू शकलं नाही. त्यांच्या वैयक्तिक जीवनाबद्दल सत्ताधारी बाकांमधून कुणी कमेंट केली, त्यामुळे त्यांना राग आला एवढंच कळलं. पण कुणी काय म्हटलं हे गदारोळात ऐकू आलं नाही. पण त्या चिडल्या त्याच सुमारास त्यांच्या सूनबाई आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चन यांची पनामा पेपर्स प्रकरणी एडीने चार तास चौकशी केली. पनामा पेपर्स काय आहेत आणि ऐश्वर्याने नेमकं असं केलंय ज्यामुळे त्यांची चौकशी होतेय?...
Dec 21, 2021•5 min
लग्न करण्यासाठी मुलींचं कायदेशीर वय आता 18 वरून 21 करण्याचा केंद्र सरकारचा मानस आहे. या प्रस्तावाला केंद्रीय मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे आणि आता हे बिल संसदेत मांडलं जातंय. पण या निर्णयाला देशातले अनेक राजकीय पक्ष विरोध करत आहेत. मुलीचं लग्नाचं वय नक्की का वाढवलं, मोदी सरकारच्या या निर्णयाचा राजकीय पक्ष का विरोध करत आहेत? आणि मुख्य म्हणजे याने खरंच स्त्री पुरुष समानता येईल का? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.
Dec 20, 2021•5 min
पुढच्या दोन दशकांमध्ये चीनची अर्थव्यवस्था अमेरिकेला मागे टाकून जगात क्रमांक एकची अर्थव्यवस्था होईल असा तज्ज्ञांचा होरा आहे. चीनने मिळवलेलं हे यश मागच्या वीस वर्षांत मिळवलेलं आहे. पण, सध्या अमेरिका आणि इतर युरोपीयन देश तसंच गरीब देशांनाही ते सलतंय. असं नेमकं का? चीनच्या या घोडदौडीत जगाला नेमका काय धोका आहे? जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - फैसल इस्लाम, ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
Dec 18, 2021•7 min
फेब्रुवारी 2022मध्ये चीनमध्ये हिवाळी ऑलिम्पिक स्पर्धा होणार आहेत. पण चीनमधल्या शिनजियांग प्रांतामध्ये वीगर मुस्लिमांवर होणाऱ्या अत्याचारांच्या निषेधार्थ आपण या स्पर्धांवर डिप्लोमॅटिक बहिष्कार टाकत असल्याचं अमेरिका, युके, कॅनडाने म्हटलंय. धोरणात्मक किंवा राजनैतिक बहिष्कार म्हणजे नेमकं काय? त्यातून काय साध्य होईल? आणि या सगळ्यावर चीनचं म्हणणं काय आहे? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले
Dec 17, 2021•7 min
काश्मीर खोऱ्यात श्रीनगर शहराच्या बाहेर झेवनमध्ये एका पोलीस व्हॅनवर झालेल्या कट्टरतावाद्यांच्या हल्ल्यात तीन पोलीस अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला तर अकरा जण जखमी झाले. काश्मीरमध्ये मागच्या काही महिन्यात सामान्य नागरिक आणि पोलिसांवरील हल्ल्याचं प्रमाण वाढलं आहे. काश्मीर पोलिसांच्या मते आंतरराष्ट्रीय आतिरेकी संघटनांचे छोटे छोटे गट हे संघटित हल्ले घडवून आणत आहे. ही झाली पोलिसांची बाजू. पण, काश्मीरमध्ये नेमकं काय घडतंय? सामान्य नागरिक आणि पोलिसांवर असे हल्ले का होतायत? पोलिसांनी जबाबदार धरलेली काश्मीर टायग...
Dec 15, 2021•6 min
जगभरात सगळीकडे ओमिक्रॉन व्हेरियंटचा प्रसार होत असतानाच आता युकेमध्ये या व्हेरियंटमुळे पहिला मृत्यू झाल्याची बातमी आली आहे. पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांना मग सांगावं लागलं की, ओमिक्रॉनला हलक्यात घेऊ नका. त्यांनी आणखी एक गोष्ट स्पष्ट केली. युकेमध्ये पुढच्या वर्षी जून महिन्यापर्यंत सगळ्यांना बुस्टर डोस देणार अशी घोषणा करून टाकली. युकेच नाही तर जगभरात नवीन व्हेरियंट्सशी लढण्यासाठी बुस्टर डोसकडे आशेनं बघितलं जातंय. तसं जगभरातल्या संशोधकांना का वाटतंय. आणि भारताची बुस्टर डोसबद्दलची भूमिका नेमकी काय आहे ...
Dec 13, 2021•6 min
महाराष्ट्रातल्या 83 लाखांपेक्षा जास्त लोकांनी कोव्हिड 19 विरोधातल्या लशीचा दुसरा डोस घेतलाच नसल्याचं समोर आलंय. कोरोना व्हायरसच्या विरोधात परिणामकारक ठरण्यासाठी लशीचे दोन्ही डोस घेणं महत्वाचं आणि गरजेचं असल्याचं तज्ज्ञांनी सुरुवातीपासून सांगितलेलं आहे. मग असं असताना केवळ एक डोस घेऊन पुरेसं संरक्षण मिळेल का? दुसरा डोस घेतलाच नाही तर काय होईल? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Dec 10, 2021•7 min
रशियाने युक्रेनलगतच्या त्यांच्या सीमेजवळ सैन्य तैनात केल्याने सध्या या भागावर युद्धाचे ढग जम होताना दिसत आहेत. आपला असा कोणताही इरादा नसल्याचं रशियाने म्हटलं असलं तरी युक्रेनच्या नेत्यांनी मात्र 2022च्या सुरुवातीला हल्ला होण्याची भीती व्यक्त केली आहे. रशिया आणि युक्रेनमध्ये नेमकं काय बिनसलं आहे? जगातल्या कोणत्या देशांचा युक्रेनला पाठिंबा आहे? आणि जगातले देश रशियावर कशी कारवाई करू शकतात? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश...
Dec 10, 2021•7 min
6 डिसेंबरला सुप्रीम कोर्टाने ओबीसींना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आरक्षण देणाऱ्या राज्य सरकारच्या अध्यादेशाला स्थगिती दिली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत ओबीसींना 27 टक्के आरक्षण देता येणार नाही, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने राज्य निवडणूक आयोगाला दिले.त्यामुळे राज्यातल्या निवडणुका पुढे ढकलण्याची मागणी करण्यात येतेय. ओबीसी आरक्षणाचा उल्लेख केल्यावर ज्या मंडल आयोगाचा संदर्भ येतो, तो काय होता? OBC आरक्षण द्यायला कधीपासून सुरुवात झाली? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशो...
Dec 08, 2021•5 min
नागालँडमध्ये लष्कराच्या हातून 14 नागरिकांचा मृत्यू झाला. देशातल्या अशांत क्षेत्रात काम करताना सशस्त्र दलांना विशेषाधिकार देणारा AFSPA कायदा रद्द करण्याची मागणी केली जाते आहे. नागालँड तसंच मेघालयच्या मुख्यमंत्र्यांनी ही मागणी केली आहे. हा कायदा काय आहे? तो लष्कराला कोणते अधिकार देतो? या कायद्याविरोधात कोणते आक्षेप आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागातून. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
Dec 07, 2021•8 min