19 जानेवारी 1990 हा दिवस काश्मिरी पंडितांसाठी खूप वेदनादायी आहे. यात दिवशी काश्मिरातून पंडितांचं पलायन सुरू झालं. पाकिस्तानधार्जिण्या घोषणा आणि हिंदूंना धमकवणाऱ्या घोषणांचा जोर वाढत असताना जीव मुठीत धरून अनेक काश्मिरी हिंदू कुटुंबं काश्मीर खोरं सोडून गेली. हे सगळं का आणि कसं झालं? सोपी गोष्टच्या या भागातून जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Mar 14, 2022•5 min
महाराष्ट्राचा 2022-23 साठीचा अर्थसंकल्प अजित पवारांनी मांडला. महाराष्ट्राला 1 ट्रिलियनची अर्थव्यवस्था करण्याचा निर्धार व्यक्त करत अजित पवारांनी अनेक घोषणा केल्या. काही जुन्या, काही नव्या. या अर्थसंकल्पाचा अर्थ आणि त्याचा तुमच्यावर होणारा परिणाम जाणून घ्या 7 सोप्या मुद्द्यांमध्ये. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Mar 11, 2022•8 min
भाजप नेत्यांना संपवण्यासाठी राज्य सरकारने कट केल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. जामनेरचे आमदार गिरीश महाजन यांच्या एका जुन्या प्रकरणात मकोका लावण्यासाठी राज्य सरकारने वकिलांना हाताशी धरून कट रचला असा फडणवीसांचा आरोप आहे. पण हे मूळ प्रकरण काय होतं? संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Mar 10, 2022•6 min
गंगूबाई काठियावाडी, झुंड आणि पानवखिंड हे चित्रपट बॉक्स ऑफिसवर जोरात सुरू आहेत. पण त्याचवेळी यांच्याभोवती काही नवीन प्रश्न उभे राहिले. कोणत्या चित्रपटाला पसंती द्यायची यावरून सुरू झालेली चर्चा जातीय अस्मितांवर कशी पोहोचली? बहुजन विरुद्ध अभिजन असं या सगळ्याला स्वरुप का आलं? जाणून घेऊ या सोपी गोष्टच्या या भागातून. संशोधन – जान्हवी मुळे लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Mar 10, 2022•6 min
युक्रेन रशिया युद्धात रशिया अण्वस्त्र वापरेल का ही भीती व्यक्त केली जात आहे. अण्वस्त्र आहेत म्हणून एखाद्या देश ती सहज वापरू शकतो का? जगात असे कोण लोक आहेत ज्यांच्याकडे ती वापरण्याचा अधिकार आहे? जाणून घ्या या सोपी गोष्ट मधून. संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Mar 08, 2022•7 min
ठाकरे सरकार आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यातलं सख्य जगजाहीर आहे. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या उद्घाटनाला, राज्यपालांना आपलं अभिभाषण अर्ध्यात सोडून जावं लागलं. राज्य सरकार राज्यपालांबद्दल राष्ट्रपतींकडे तक्रारही देणार आहे. या तक्रारीतून काय साध्य होईल? राज्य सरकारकडे राज्यपालांना पदावरून बाजूला करण्याचा अधिकार आहे का? संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 04, 2022•5 min
रशियन अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी नुकतीच देशाच्या अण्वस्त्र यंत्रणेला सतर्कतेचा इशारा दिला आहे. युद्धासाठी सज्ज राहण्याचे आदेश त्यांना आहेत. पण, ही धमकी आहे की, पुतिन खरंच अण्वस्त्राचा वापर करायला मागे पुढे पाहणार नाहीत. या दोन्ही परिस्थिती या युद्धाचं स्वरुप काय असेल. देशात किती देश आहेत ज्यांच्याकडे अण्वस्त्र आहेत? पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
Mar 01, 2022•7 min
युक्रेन आणि रशियात युद्ध भडकलंय. युरोपाबरोबरच सगळ्या जगाचं लक्ष त्याकडे लागलंय. पण इथे भारतात बसून तुमच्या माझ्यावर याचे परिणाम कसे होऊ शकतात? आपला याच्याशी थेट संबंध कसा येणार आहे? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागामधून. संशोधन – सरोज सिंह लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले
Feb 25, 2022•5 min
दोन शेजारी देशांमधल्या कुरबुरी तशा नव्या नाहीत. पण युक्रेन आणि रशियामधला संघर्ष युद्धाच्या शक्यतेपर्यंत पोहोचला आहे. त्यात पुतिन यांनी युक्रेनमधल्या दोनेस्क आणि लुहांस्क या दोन भागांचं स्वातंत्र्य मान्य केलं आहे. तसंच युक्रेन स्वतंत्र राष्ट्र म्हणून कधी अस्तित्वात नव्हताच अशा आशयाचं विधानही त्यांनी केलंय. पुतिन यांच्या मनात युक्रेनविषयी एवढी चीड का आहे? लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – नीलेश भोसले
Feb 24, 2022•5 min
रशियाने युक्रेनमध्ये रणगाडे घुसवल्याचा आरोप करत आता ग्रेट ब्रिटनने रशियावर निर्बंध लादले आहेत. युरोपमध्ये आता खऱ्या अर्थाने युद्धाचे ढग जमू लागले आहेत. रशियाने मात्र आपली भूमिका हल्ला करण्याची नाही हीच ठेवली आहे. पण, त्याचबरोबर युक्रेन सीमेवर दोन लाखांच्या जवळपास सैनिक उभे करत त्यांनी आपली युद्धसज्जताही दाखवून दिली आहे. जर रशियाने खरंच हल्ला केला तर त्यांच्यासमोर कुठले तीन पर्याय आहेत हे युद्ध रणनिती तज्ज्ञांशी बोलून बीबीसीने जाणून घेतलं आहे. पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निव...
Feb 22, 2022•7 min
‘रशिया, युरोप आणि जगावर दुसऱ्या महायुद्धानंतरचं मोठं युद्ध लादण्याच्या उंबरठ्यावर आहे,’ असं मोठं विधान ब्रिटिश पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी केलं आहे. त्यामुळे रशिया आणि युक्रेनमध्ये संघर्ष झालाच तर तो अख्खं जग व्यापेल अशी भीती पाश्चात्य देशांमध्ये स्पष्ट दिसतेय. नेमकं या दोन देशांमध्ये काय सुरू आहे, युद्ध होईल का, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
Feb 21, 2022•6 min
‘राईट टू बी फरगॉटन’ म्हणजे विसरण्याच्या अधिकारावर सध्या मीडियामध्ये भरपूर चर्चा होतेय. गोपनीयतेच्या अधिकाराशी मिळताजुळता असा हा प्रकार आहे. तुमच्या बद्दल इंटेरनेटवर उपलब्ध असलेली विशिष्ट जुनी सार्वजनिक माहिती डिलिट करण्याचा हा अधिकार आहे. आणि असा कायदा युरोपीयन देशांमध्ये अस्तित्वातही आहे. अशा कायद्याची आवश्यकता काय आणि भारतात केंद्रसरकारची यावर काय भूमिका आहे आज बघूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - गीता पांडे लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
Feb 18, 2022•6 min
भारतीय सैन्याकडे एकदा सोडून तीनदा लाहोर जिंकण्याची संधी होती…पण, काँग्रेसनं ती गमावली असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंजाबमध्ये निवडणूक प्रचारसभे दरम्यान केलं आहे. आता निवडणुकीचा प्रचार आहे म्हटल्यावर हे विधान राजकीयदृष्ट्या प्रेरित असणार हे आपण धरून चालूया. पण, इतिहासाच्या कसोटीवर हे विधान कितपत तग धरू शकतं. ज्या तीन युद्धांचा दाखला मोदींनी दिलाय तेव्हा खरंच भारतीय सैन्य लाहोर काबीज करण्याच्या जवळ होतं का, आणि समजा केलं असतं तर ते टिकवून ठेवू शकलो असतो का, पाहूया आज सोपी गोष्टमध्ये… लेख...
Feb 18, 2022•7 min
ज्येष्ठ संगीतकार बप्पी लाहिरी यांचा मृत्यू स्लीप ॲप्नियामुळे झाल्याचं निदान डॉक्टरांनी केलं आहे. त्यानंतर या आजाराविषयी सगळीकडे कुतुहल निर्माण झालं आहे. सोप्या शब्दात सांगायचं तर स्लीप ॲप्निया म्हणजे झोपेत श्वास घ्यायला अडथळा होणं. घोरणं हा ही त्याचाच एक सौम्य परिणाम आहे. पण म्हणजे या आजारामुळे एखाद्याचा जीव जाऊ शकतो का? स्लीप ॲप्नियाबद्दल जाणून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन - टीम बीबीसी लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
Feb 18, 2022•6 min
विजय माल्या, नीरव मोदी यांच्या कर्ज घोटाळ्यालाही मागे टाकेल असा 22,492 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा मागच्या आठवड्यात समोर आला आहे. आणि तो घडवून आणणारे एबीजी शिपयार्ड कंपनीने मालक आणि संचालक देश सोडून फरारही झाले आहेत. हा देशातला आतापर्यंतचा सगळ्यात मोठा बँक घोटाळा मानला जातोय. एबीजी कंपनीने एकूण 28 बँकांची फसवणूक कशी केली, समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर
Feb 18, 2022•8 min
अमरावतीमध्ये शिवाजी महाराजांच्या अनधिकृत पुतळ्याचं प्रकरण अजून मिटलेलं नाही. त्यात गेल्या आठवड्यात तिथल्या महापालिका आयुक्तांवरही शाईफेक करण्यात आली. नेमका वाद काय आहे आणि पुतळे उभारण्याविषयीची नियमावली काय सांगते? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – जान्हवी मुळे, नितेश राऊत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Feb 15, 2022•6 min
भारतातील आणि आशियातीलही सर्वात श्रीमंत व्यक्ती कोण हे ठरवण्यासाठी सध्या गौतम अदानी आणि मुकेश अंबानी यांच्यामध्ये जोरदार चुरस दिसून येत आहे. 29 जानेवारी आणि 8 फेब्रुवारी या दोन दिवशी गौतम अदानी यांनी चक्क मुकेश अंबानी यांना मागेही टाकलं. पण, मुकेश यांनी दुसऱ्याच दिवशी आपली जागा परत मिळवली. मुकेश अंबानी मागची दहा वर्षं आशियातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहेत. पण, गौतम अदानींनी मागच्या दहा वर्षांत मोठी मजल मारून त्यांना आव्हान दिलं आहे. आज सोपी गोष्टमध्ये पाहूया गौतम अदानींनी मुकेश अंबानींना कसं मागे...
Feb 11, 2022•7 min
कर्नाटकच्या दोन शहरांमधून सुरू झालेला वाद आता देशभरात पोहोचलाय. मुलींनी कॉलेजमध्ये हिजाब घालून यायचा की नाही यावरून वादंग पेटलाय. हिजाब घालणं हा धार्मिक स्वातंत्र्याचा भाग आहे. पण ते शैक्षणिक संस्थेच्या परिसरात घालण्याचाही अधिकार आहे का? त्यावर निर्बंध घालता येऊ शकतात का? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
Feb 09, 2022•5 min
लता मंगेशकर आणि आशा भोसले, सख्ख्या बहिणी आणि श्रेष्ठ गायिका. एकाच काळात हिंदी, मराठी तसंच विविध भाषांमध्ये संगीत क्षेत्रात दोघी कार्यरत होत्या. पण या दोघींमध्ये स्पर्धा होती का? कधी एकमेकींमुळे संधी हुकली असं घडलं का? संगीत सौजन्य - सारेगामा, सोनी संशोधन – अमृता कदम लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
Feb 07, 2022•5 min
भारत सरकार मराठी भाषेला अभिजात दर्जा कधी देणार हा प्रश्न गेली काही वर्षं विचारला जातोय. महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीने त्यासंर्भातला अहवाल 2013 साली सादर केला. केंद्र सरकारने नेमलेल्या तज्ज्ञ समितीने त्यासंदर्भातली शिफारस करणारा अहवाल मोदी सरकारला काही वर्षांपूर्वीच सादर केला. तेव्हापासून हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचं सरकार सांगत आलंय. मग गोष्टी कुठे अडल्या आहेत? संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
Feb 04, 2022•7 min
महाराष्ट्रात किराणा दुकानात वाईन विक्रीच्या निर्णयाबरोबरच वाईनच्या आरोग्यावर होणाऱ्या चांगल्या-वाईट परिणामांची जोरदार चर्चा सुरू झाली. वाईन पिणं आरोग्याला पोषक की घातक? किती प्रमाणात अल्कोहोल पिणं सुरक्षित असतं? या सगळ्यामागे शास्त्रीय आधार आहे का याची ही सोपी गोष्ट लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
Feb 03, 2022•7 min
तुम्ही नोकरी करत असाल तर बजेटमध्ये तुमची नजर आयकराबद्दलच्या घोषणांवर असेल. इन्कम टॅक्सचे स्लॅब बदलून करमुक्त उत्पन्नाची मर्यादा वाढतेय का हा तुमच्या जिव्हाळ्याचा विषय असेल. पण यंदा तसं झालं नाही, खरंतर गेली काही वर्षं ही सवलत मिळालीच नाहीय. यामुळे पगारदारांचं, मध्यमवर्गीयांचं नुकसान झालंय का? विरोधक, सरकार आणि तज्ज्ञ काय म्हणतात? ऐका ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
Feb 02, 2022•7 min
गेल्यावर्षी निर्मला सीतारमण यांनी सादर केलेलं बजेट पेपरलेस होतं. म्हणजे, नेहमीसारखा कागद आणि फायलींवर पैसा खर्च न करता सगळे मंत्री आणि सभागृहाला चक्क ऑनलाईन कॉपी देण्यात आली. यावर्षीचं बजेट पुन्हा एकदा पेपरलेस तर होतंच. शिवाय ते डिजिटलही होतं असं म्हणावं लागेल. कारण, बँकिंगपासून शेती आणि आरोग्य क्षेत्रातही सरकारने डिजिटल व्यवहारांवर आणि सोयींवर भर द्यायचं ठरवलंय. इतकंच नाही तर देशात पहिल्या डिजिटल विद्यापीठाची घोषणाही सरकारने केलीय. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया डिजिटल क्षेत्रात नेमके काय बदल ...
Feb 01, 2022•5 min
रेल्वे भरती परिक्षेतील गोंधळामुळे बिहार आणि उत्तर प्रदेश बरोबरच देशभरातले विद्यार्थी सध्या चिडलेले आहेत. आधीच कोरोना काळात कमी झालेला रोजगार आणि त्यातच सरकारी भरती प्रक्रियेतल्या गोंधळामुळे तरुणांना संधी गमावाव्या लागत आहेत. त्यातच राष्ट्रीय पातळीवर जाहीर झालेल्या आकडेवारीत डिसेंबर 2020मध्ये देशात बेरोजगारीचा दर आतापर्यंतचा सर्वाधिक म्हणजे 7.91% असल्याचं समोर आलं आहे. देशात तरुणांना नोकऱ्या का मिळत नाहीएत? एकटा कोरोना याला जबाबदार आहे का, पाहूया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - सौतिक बिश्वास, ऋजुता लुक...
Jan 31, 2022•6 min
रशिया आणि यु्क्रेन दरम्यानचा तणाव दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच रशियाने युक्रेन सीमेवर तब्बल एक लाख सैनिक तैनात केल्याची बातमी आहे. त्यामुळे सध्या दोघांमध्ये युद्धविराम असला तरी रशिया कुठल्याही क्षणी युक्रेनवर प्रत्यक्ष हल्ला करेल अशी भीती पाश्चात्य देश आणि अमेरिकेला वाटत आहे. रशिया इतका आक्रमक का आहे? पाश्चात्य देश या मुद्यावर रशियाविरोधात का एकवटले आहेत? आणि रशिया-युक्रेन युद्ध झालंच तर जगावर, भारतावर त्याचा काय परिणाम होईल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - डेव्हिड ब्राऊन, ऋजुता लुकतुके लेखन...
Jan 28, 2022•7 min
अँटिबायोटिक्स म्हणजे प्रतीजैविक औषधांमुळे वैद्यकीय क्षेत्रात खरंतर क्रांती घडून आली. मलेरिया, न्युमोनिया यासारखे आजार एकेकाळी जीवघेणे ठरत होते. पण, त्यातून लोकांचा जीव वाचला. पण, यात अँटिबायोटिक्सचा जर अतीवापर किंवा गैरवापर झाला तर काय होतं याचा अनुभव आता जग घेतलंय. औषधांची परिणामकारकता कमी होऊन आपलं शरीर रोगांना प्रतिकार करणं थांबवू शकत नाही. त्यामुळे अँटिबायोटिक औषध घेऊनही लोकांचा मृत्यू ओढवतो. २०१९मध्ये जगभरात बारा लाख लोकांचा मृत्यू हा न्युमोनिया किंवा इतर श्वसनाचे विकार यामुळे झाला आहे. अँट...
Jan 27, 2022•5 min
पद्म पुरस्कार हे सरकारतर्फे दिले जाणारे नागरी सन्मान आहेत. विविध क्षेत्रांत असमान्य कार्य करणाऱ्या नागरिकांना हे पुरस्कार दिले जातात. पण या पद्म पुरस्कारांबद्दल आपल्याला किती माहिती आहे? हे का दिले जातात? पुरस्कार विजेत्यांची निवड कशी होते? आणि आजवर कोणी आणि का हे पुरस्कार नाकारले आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : अमृता दुर्वे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Jan 26, 2022•7 min
भर थंडीच्या काळात त्यांच्याकडे ऊर्जा संकट निर्माण झालंय. प्रचंड मागणी असूनही युरोपियन देशांना कमी गॅस पुरवठा होतोय. पुरेसा नैसर्गिक वायू मिळाला नाही तर युरोपातल्या देशांमध्ये ऊर्जा निर्मिती कमी होईल आणि परिणामी लोकांना या थंडीच्या काळात विजेचा तुटवडा भासेल. पण नेमका आताच युरोपात हा ऊर्जा तुटवडा का निर्माण झालाय? आणि याचा रशिया आणि युक्रेनमधल्या तणावाशी काय संबंध आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले...
Jan 25, 2022•7 min
महात्मा गांधींना आवडणाऱ्या इंग्रजी गीताची धून 1950पासून प्रजासत्ताक दिन सोहळ्यातल्या ‘बीटिंग द रिट्रिट’ मध्ये सैन्यदलाचं संगीतपथक वाजवत असे. पण 72 वर्षांपासून वाजणारी ही धून या वर्षापासून वाजणार नाही. त्यावरून राजकीय आरोप प्रत्यारोपही होत आहेत. या गाण्याची आणि वादाची ही सोपी गोष्ट. लेखन/निवेदन - मयुरेश कोण्णूर एडिटिंग - निलेश भोसले
Jan 25, 2022•8 min
आता नवीन तयार केलेल्या नॅशनल वॉर मेमोरियलच्या ज्योतीमध्ये अमर जवान ज्योती विलीन करण्यात आली. पण असं का करण्यात आलं? हे करून काय साध्य होतंय? तब्बल 50 वर्षांपासून शहिदांना सलामी देत असलेल्या एका ज्योतीचं महत्त्व कमी केलं जातंय का? याची कारणं ऐतिहासिक आहेत की राजकीय? पाहूया अमर जवान ज्योतीची ही सोपी गोष्ट. लेखन–निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
Jan 21, 2022•8 min