अभिव्यक्ती स्वातंत्र्य किंवा Freedom of Expression हे शब्द सहसा कोणत्यातरी वादाच्या संदर्भानेच येतात. त्यामुळेच बहुतेक वेळा त्यांचा विचारही एकाच बाजूने केला जातो. आपण या बाजूंमध्ये अडकून न पडता या प्रकरणाच्या मुळात शिरू या. त्याची व्याख्या, त्याच्यावरचे निर्बंध हे सगळं पाहू या. संशोधन – सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
Dec 06, 2021•6 min
सुरुवातीच्या काळात ऑक्सफर्डमध्ये संशोधन झालेल्या (भारतात आपण तिला कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो) कोरोना लशीमुळे काही लोकांमध्ये रक्ताच्या गुठळ्या तयार होऊन त्यांचा मृत्यू झाला होता. हे प्रमाण अत्यल्प असलं तरी लोकांमध्ये त्यामुळे लशीबद्दल संभ्रम निर्माण झाला. त्यानंतर संशोधकांनी याचा अभ्यास करून गुठळ्या तयार होण्याचं कारण शोधून काढलं आहे. लशीच्या सुधारित आवृत्तीसाठी याचा खूप मोठा उपयोग होणार आहे. हे संशोधन आणि त्याचं महत्त्व जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - जेम्स गॅलाघर लेखन, निवेदन - ऋजुता लुक...
Dec 04, 2021•4 min
सोयापेंड आयातीवरून सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. खासदार अमोल कोल्हे यांनी हा मुद्दा लोकसभेतही मांडला होता. सोयापेंड आयातीवरून नेमका काय वाद निर्माण झालाय? या आयतीचे शेतकरी आणि बाजारपेठेवर काय परिणाम होऊ शकतात? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : अमृता दुर्वे, श्रीकांत बंगाळे लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
Dec 02, 2021•6 min
दक्षिण आफ्रिकेत आढळलेला कोरोना ओमिक्रॉन हा नवा व्हेरियंट आतापर्यंत जगभरातल्या 12 देशांमध्ये सापडलेला आहे. या व्हेरियंटमध्ये आधीच्या डेल्टा, डेल्टा प्लस वा इतर व्हेरियंटपेक्षा वेगळं काय आहे? आणि या व्हेरियंटचं निदान कसं केलं जातंय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन : टीम बीबीसी लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
Dec 01, 2021•5 min
ओमिक्रॉनवर सध्याच्या लशी कितपत प्रभावी ठरतील, हे अजून स्पष्ट नसलं, तरी लशीमुळे गंभीर आजाराचा धोका किमान काही प्रमाणात कमी होऊ शकतो, याविषयी जगभरातल्या तज्ज्ञांचं एकमत असल्याचं दिसतं. पण भारतात अजूनही कोव्हिड लसीकरणाचं प्रमाण लोकसंख्येच्या तुलनेत अजूनही कमीच आहे. अशा परिस्थितीत भारत ओमिक्रॉनचा सामना करण्यासाठी सज्ज आहे का? संशोधन - जान्हवी मुळे, मयांक भागवत लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
Nov 30, 2021•6 min
ओमिक्रॉन या कोरोनाच्या सर्वांत नवीन व्हेरियंटमुळे जगात अनेक ठिकाणी चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. आतापर्यंत सर्वांत गंभीर मानल्या गेलेल्या डेल्टा व्हेरियंटपेक्षाही हा व्हेरियंट जास्त वेगाने पसरू शकतो अशी शक्यता वर्तवली जात आहे. हा व्हेरियंट किती घातक आहे? याच्यावर लशी काम करतील का? लॉकडाऊन लावण्याची वेळ येणार आहे का? या सगळ्या प्रश्नांची ही उत्तरं. संशोधन, लेखन, निवेदन – सिद्धनाथ गानू एडिटिंग- शरद बढे
Nov 30, 2021•7 min
आतापर्यंत जगात 26 कोटी लोकांना कोरोना व्हायरसचा संसर्ग झालेला आहे. पण, काही लोक असेही आहेत, खासकरून आरोग्यसेवक जे सतत कोव्हिड रुग्णांच्या संपर्कात आहेत. पण, विषाणूशी इतका जवळचा संबंध येऊनही त्यांना कोव्हिड झाला नाही. जगातील असे काही लोक संशोधकांसाठी प्रेरणादायी ठरले आहेत नवीन कोरोना लशीच्या संशोधनासाठी. कोरोनाच्या संपर्कात येऊनही कोव्हिड न झालेल्या लोकांचा अभ्यास करून संशोधकांनी नव्या कोरोना लशीचा फॉर्म्युला शोधला आहे. येणाऱ्या काळात हे संशोधन कोरोनाविरोधातील लढ्याला नवी दिशा देऊ शकतं. सोपी गोष्...
Nov 26, 2021•4 min
भारतात थंडीच्या काळात सहसा टोमॅटो स्वस्त होतात. पण सध्या देशभरात टोमॅटोच्या किंमती 70 ते 110 रुपये किलोदरम्यान आहेत. कशामुळे हे भाव इतके वाढले? हवामान बदलाचा पिकांवर कसा परिणाम होतोय? आणि या पुढच्या काळातही असंच होत राहणार का? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन, लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
Nov 25, 2021•6 min
23 नोव्हेंबरला केंद्र सरकारनं जाहीर केलं की भारतात बिटकॉईनसारख्या डिजिटल करंसीविषयी कायदा बनवण्याच्या दिशेनं काम सुरू झालं आहे. यंदा संसदेच्या हिवाळी अधिवेशनात त्यासंदर्भातलं विधेयक मांडलं जाणार आहे. क्रिप्टो करंसीवर कायद्याची गरज का आहे आणि मुळात क्रिप्टो करन्सी काय असते? संशोधन – अमृता दुर्वे, मोहम्मद शाहीद लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
Nov 24, 2021•6 min
भारतात गावं-शहरं स्वच्छ ठेवण्याची मोहीम रुजावी यासाठी केंद्र सरकारनं 2016 साली स्वच्छ सर्वेक्षण पुरस्कार सुरु केले. त्यात गेली सलग पाच वर्ष इंदूरनं बाजी मारली आहे. पण या सर्वेक्षणात महाराष्ट्र नेमका कुठे आहे? गाडगे महाराजांचं राज्य स्वच्छतेच्या बाबतीत पहिल्या स्थानावर का नाही? महाराष्ट्रातली शहरं स्वच्छ राखण्यात कोणत्या अडचणी आहेत? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
Nov 24, 2021•5 min
पेटीएमची मालक कंपनी One 97 Communications च्या IPO साठी लोकांनी भरपूर बोली लावली. पण प्रत्यक्ष बाजारात त्याच्या शेअर्सची किंमत घसरली आणि अनेकांना मोठ्या प्रमाणात तोटा झाला. पेटीएमला शेअर मार्केटमध्ये भाव का नाही मिळाला? येणाऱ्या काळात इंटरनेट कंपन्यांच्या IPO बद्दल काय सावधगिरी बाळगायची? संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग – निलेश भोसले
Nov 23, 2021•6 min
धर्मावरून होणारे वाद हे तसे जगाला नवीन नाहीत. इस्त्रायलमधला ज्यू-ख्रिश्चन आणि मुस्लीम धर्मियांमधला संघर्ष तसंच भारतातलं हिंदू-मुस्लीम द्वंद्वं अशी ज्वलंत उदाहरणं त्यासाठी देता येतील. या धार्मिक वादांमधून मोठी मोठी युद्धं घडलीत. आणि आंतरराष्ट्रीय राजकारण पेटलंय. ईजिप्त, इस्त्रायल आणि मध्य-पूर्व देशांमध्ये सध्या नवा धार्मिक वाद उभा राहतोय तो अब्राहमला देव मानणाऱ्या अब्राहमी धर्मावरून. काय आहे हा नवीन धर्म? आणि त्यावरून वाद का निर्माण होतोय? पाहूया सोपी गोष्टमध्ये…
Nov 19, 2021•5 min
त्रिपुरातील हिंसाचाराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अमरावती, मालेगाव, नांदेड, औरंगाबादसह इतर काही ठिकाणी मुस्लीम संघटनांनी बंद पुकारला होता. काही ठिकाणी निदर्शनं करण्यात आली. या आंदोलनाला अमरावती, मालेगावसह काही ठिकाणी हिंसक वळण लागलं. या हिंसाचाराच्या मागे रझा अकादमी असल्याचा आरोप काही नेत्यांनी केला आहे. रझा अकादमी म्हणजे काय आहे? ही संस्था कोणाची आहे? त्यांची कार्यपद्धती काय? रझा अकादमी राजकीय पक्षाशी संबधित आहे का? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन : दीपाली जगताप निवेदन : अमृता दुर्वे ...
Nov 18, 2021•6 min
हवामान बदलाचा मुद्दा निघाला की आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची भूमिका आणि धोरणं अनेकदा चर्चेच्या केंद्रस्थानी असतात. ग्लासगोमध्ये नुकतीच पार पडलेली COP26 हवामान परिषदही त्याला अपवाद नव्हती. या परिषदेअखेर सर्व सहभागी देशांमध्ये नवा 'हवामान करार' झाला. पण त्यानंतर भारत आणि चीन या दोन देशांवर टीका होते आहे. संशोधन - नवीन खडका, रजनी वैद्यनाथन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग- निलेश भोसले
Nov 17, 2021•5 min
जगातल्या कोणत्याही ठिकाणी असलेल्या प्रदुषणापेक्षा दहापट जास्त प्रदुषण उत्तर भारतात आहे. हे प्रदुषण पसरत जातंय आणि यामुळे भारतातील लोकांचं आयुष्य अडीच ते 10 वर्षांनी कमी होऊ शकतं असा अंदाज शिकागो विद्यापीठाच्या संशोधनाने व्यक्त केला आहे. भारतातील प्रदुषणामागे काय कारणं आहेत? संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले.
Nov 16, 2021•7 min
एकीकडे पेट्रोल-डिझेलचे भाव वाढलेत आणि दुसरीकडे कारची किंमतही वाढलीय. महागाईचा दुहेरी फटका का बसतो आहे? भारतासह जगभरात कारच्या किमती का वाढल्या आहेत? जाणून घ्या सोपी गोष्टच्या या भागात. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले.
Nov 16, 2021•6 min
संपकरी एसटी कर्मचाऱ्यांना भाजप नेते चिथावत आहेत, भरकटवत आहेत आणि ते नंतर त्यांची जबाबदारी घेणार नाहीत असा आरोप परिवहन मंत्री अनिल परब यांनी केला आहे. भाजपचे नेते म्हणतात की हे लोकांचं आंदोलन आहे आणि सरकार अहंकारी आहे. दोन्ही बाजूने केल्या जाणाऱ्या या आरोपांमध्ये किती तथ्य आहे? ऐकू या आजची सोपी गोष्ट. संशोधन- दीपाली जगताप लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
Nov 12, 2021•5 min
गेले दोन दिवस राज्यात संध्याकाळनंतर पारा घसरतोय. 10 नोव्हेंबरला पुण्यामध्ये 10 अंश सेल्शियस तापमान नोंदवण्यात आलं. इतरही ठिकाणी तापमान नेहमीपेक्षा कमी आहे. नोव्हेंबरच्या सुरुवातीलाच राज्यात इतकी थंडी का आली? यंदाचा हिवाळा कसा असणार आहे? उत्तर भारतात काश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश अशा ठिकाणी ऑक्टोबर अखेरपासूनच बर्फवृष्टीला सुरुवात झालीय. हे सगळं कशामुळे होतंय? ला निना आणि एल निनो या हवामान विषयक संज्ञा काय आहेत? आणि त्यांचा जगभरातल्या हवामानावर काय परिणाम होतो? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. ...
Nov 11, 2021•6 min
इन्स्टाग्राम या सोशल मीडिया अॅपचा मुलांच्या मानसिक आरोग्यावर नकारात्मक आणि प्रतिकूल परिणाम होतोय असा एक निष्कर्ष या अॅपची मुख्य कंपनी मेटाच्याच एका अंतर्गत अहवालात निघाला होता. आणि त्यानंतर अख्ख्या अमेरिकेत आणि हळू हळू जगभरात गहजब माजला. खरंच इन्स्टाग्रामचा असा परिणाम मुलांच्या मनावर होतो का? नेमका काय परिणाम होतो? आणि वाईट परिणाम टाळण्यासाठी काय करावं जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये... संशोधन - शिओना मॅक्युलम लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
Nov 11, 2021•6 min
दिवाळीचा हंगाम हा शेअर बाजारातल्या गुंतवणूकदारांसाठी आयपीओचा हंगाम म्हटला जातो. कारण, साधारण या सुमारास बाजारात नवीन आयपीओ म्हणजे इनिशिअल पब्लिक ऑफर्स येतात. पण, आयपीओ म्हणजे नेमकं काय, त्यात गुंतवणूक करावी की न करावी? गुंतवणूक करताना काय काळजी घ्यावी याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन, लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
Nov 09, 2021•7 min
कोरोना साथीच्या दोन वर्षांच्या काळात कोरोना अनेकदा बदलला; त्यात जनुकीय बदल झाले. त्याचवेळी शास्त्रज्ञांचा असाही अभ्यास सुरू होता की, कुठल्या प्रकारच्या लोकांना याचा धोका सर्वाधिक आहे आणि का? याचं एक उत्तर असं आहे की, दक्षिण आशियाई वंशाच्या लोकांमध्ये शास्त्रज्ञांना एक असा कोव्हिड जिन्स आढळून आला आहे ज्यामुळे फुप्फुसाला इजा होऊन कोव्हिडमुळे मृत्यू होण्याचं प्रमाण या लोकांमध्ये दुप्पट आहे. पण, म्हणून घाबरून जाण्याची गरज आहे का? या नव्या कोव्हिड जिन आणि त्याच्या संशोधनाबद्दल आज जाणून घेऊया सोपी गोष...
Nov 09, 2021•3 min
गेली काही वर्ष राज्यातली परिवहन सेवा तोट्यात आहे. कोव्हिडच्या लॉकडाऊनचा एसटीलाही मोठा फटका बसला. लॉकडाऊनचा बराच काळ एसटीची सेवा पूर्णपणे बंद होती. तर एसटी सेवा सुरू झाल्यानंतरही प्रवाशी संख्येत घट झालेली आहे. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेत व्हावेत, पगारवाढ मिळावी, घरभाडं भत्ता आणि महागाई भत्ता वाढवावा या मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन केलं. त्यानंतर राज्य सरकारने महागाई भत्ता आणि घरभाडं भत्ता वाढवण्याची घोषणा केली. पण एक कर्मचारी संघटना एसटी महामंडळाचं विलीनीकरण करण्यात यावं या मागणीसाठी आंदोलन क...
Nov 05, 2021•8 min
शेअर बाजारातल्या चढउतारांबद्दल नेहमी चर्चा होत असते. जगभरातल्या घडामोडींचे परिणाम शेअर बाजारावर होत असतात. स्टॉक मार्केटमध्ये नेमकी किती गुंतवणूक करावी? त्यासाठी काय करावं लागतं? आणि यात पैसे बुडायचा किती धोका असतो? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन, निवेदन : ऋजुता लुकतुके व्हिडिओ एडिटिंग : शरद बढे
Nov 04, 2021•6 min
2021च्या संपूर्ण वर्षात पेट्रोल - डिझेलच्या दरांत सतत वाढ झालेली आहे. गेल्या काही दिवसांत या दोन्हींच्या दरांनी 100 रुपयांचा पल्ला ओलांडलेला आहे. नेमक्या कोणकोणत्या गोष्टींचा परिणाम इंधनाच्या दरांवर होतो? आंतरराष्ट्रीय घडामोडी याला कारणीभूत असतात का? आणि देशातलं सरकार इंधनाच्या किंमती कमी करू शकतं का, जाणून घेण्यासाठी पहा सोपी गोष्ट संशोधन : अमृता दुर्वे लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Nov 04, 2021•5 min
2070 पर्यंत भारतातील कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण शून्यवर आणले जाईल, असं मोदी यांनी ग्लासगो येथे झालेल्या परिषदेत म्हटलंय. या परिषदेचं उद्दिष्ट 2050 पर्यंत कार्बन उत्सर्जन नेट झिरोवर आणण्याचं आहे. पण भारताने यासाठी आणखी 20 वर्षं लागणार असल्याचं म्हटलंय. कार्बन डाय ऑक्साईडच्या उत्सर्जनात भारताचा जगात तिसरा क्रमांक लागतो. चीन आणि अमेरिका पहिल्या दोनमध्ये आहेत. भारताने आणखी काय जाहीर केलंय आणि ही उद्दिष्टं गाठण्याच्या मार्गात काय अडथळे असतील? समजून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट संशोधन : टीम बीबीसी लेखन...
Nov 02, 2021•6 min
तीव्र अशा उष्णतेच्या लाटा (हीटवेव्हज), विध्वंसकारी पूर आता आपल्यासाठी न्यू नॉर्मल ठरणार आहेत, आपल्या जगण्याचाच एक भाग होणार आहेत असं जागतिक हवामान संघटनेने म्हटलं आहे. 2021 मधली हवामान बदलाची स्थिती यासंबंधी जो एक रिपोर्ट प्रकाशित झालाय त्यात एका शब्दाला अधोरेखित केलंय – ‘आपल्या डोळ्यादेखत बदलणारी परिस्थिती.’ ’द स्टेट ऑफ क्लायमेट’ असं नाव असणारा हा रिपोर्ट भविष्यात आपल्यापुढे काय वाढून ठेवलं आहे याची एक झलक दाखवतो. वाढतं तापमान, वाढती समुद्राची पातळी, अतिभयंकर नैसर्गिक आपत्ती असं सगळं त्यात आहे....
Nov 01, 2021•5 min
मागचे सतरा महिने भारत आणि चीन दरम्यानच्या सीमेवर तणाव आहे. जून 2020मध्ये गलवान इथं दोन्ही देशांच्या सैनिकांमध्ये झालेला रक्तरंजित संघर्ष कुणी विसरू शकणार नाही. त्यातच आता चीनच्या कम्युनिस्ट सरकारने देशात नवीन सीमा सुरक्षा कायदा आणलाय. चीनसाठी तो सीमेचं सार्वभौमत्व अबाधित राखण्यासाठी केलेला कायदा आहे. पण, या कायद्यामुळे तिथलं सैन्य दळ आणि सीमेवरच्या राज्यांनाही वेळ प्रसंगी पोलिसी कारवाई करण्याचं स्वातंत्र्य मिळणार आहे. हा चिनी कायदा नेमका काय आहे आणि त्यामुळे भारत-चीन सीमा वाद आणखी चिघळणार आहे का...
Oct 29, 2021•5 min
आर्यन खान आणि इतर आरोपींवर NDPS कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. हा कायदा नेमका काय आहे? इतर कायद्यांच्या तुलनेत हा कायदा कठोर आणि वेगळा आहे का? आर्यन खानकडे ड्रग्ज मिळाली नाहीत, त्याने अंमली पदार्थांचं सेवनही केलेलं नव्हतं. मग त्याला जामीन मिळणं कठीण का झालं? जाणून घेण्यासाठी पहा ही सोपी गोष्ट. संशोधन : टीम बीबीसी लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हिडिओ एडिटिंग : निलेश भोसले
Oct 27, 2021•7 min
73 हजार किलो कोकेनचं स्मगलिंग केलेल्या एका ड्रग माफियाची ही गोष्ट आहे. दाइरो आंतोनियो उसुगा उर्फ ओतोनिएल या ड्रग तस्कराला कोलंबियात अटक झाली. अमेरिकेत त्याच्यावर खटला भरला गेलाय. कोण आहे हा ओतोनिएल? ऐका सोपी गोष्ट. लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
Oct 27, 2021•4 min
‘पुढची गाडी फ्लेक्स इंजिन असलेली घ्या, म्हणजे खर्चही कमी होईल आणि प्रदूषणही’ असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले. पेट्रोल आणि इथेनॉलवर चालू शकेल असं इंजिन लवकरच सगळ्या नव्या गाड्यांमध्ये बसवणं आपण बंधनकारक करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. फ्लेक्स फ्युएल इंजिन काय असतात, ती कसं काम करतात आणि त्यांचे फायदे-तोटे काय हे सांगणारी ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
Oct 26, 2021•6 min