सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

नवऱ्याच्या संपत्तीत गृहिणींचा समान वाटा असतो का? BBC News Marathi

पत्नीचाही पतीच्या संपत्तीत समान वाटा असू शकतो का? याच एका प्रश्नाचं उत्तर हायकोर्टाच्या ताज्या एका आदेशातून मिळताना दिसतंय. तज्ज्ञांनुसार हा एक मोठा निर्णय आहे, यामुळे पहिल्यांदाच एखाद्या न्यायालयाने पतीच्या कमाईत पत्नीच्या योगदानाला मान्यता दिली आहे, तसंच गृहिणींच्या संपत्तीच्या अधिकाराची व्याप्ती वाढवली आहे. काय आहे हे प्रकरण? आता यामुळे काय बदलणार? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन: उमंग पोद्दार, बीबीसी प्रतिनिधी लेखन-निवेदन: गुलशनकुमार वनकर एडिटिंग: अरविंद पारेकर

Jun 29, 20235 min

पुरात स्वतःचा जीव कसा वाचवाल? मृत्यू कसा टाळाल? BBC News Marathi

गेल्या काही वर्षांमध्ये भारताने, महाराष्ट्राने सातत्याने पूर आणि पुरामुळे होणारं नुकसान पाहिलंय. सरकारी आकडेवारीनुसार देशाच्या एकूण 329 दशलक्ष हेक्टर क्षेत्रफळापैकी 40 दशलक्ष हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्र पूरप्रवण आहे. आणि दरवर्षी हे क्षेत्र वाढत चाललंय. राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (NDMA)नुसार दरवर्षी सरासरी 75 लाख हेक्टर भागात पूर येतो, त्यात सुमारे 1600 जीव गमावले जातात, आणि पिकं, घरं आणि संपत्तीचं नुकसान सरासरी 1805 कोटी रुपयांच्या घरात जातं. आणि अर्थात अनेक ठिकाणी पुरामुळे मृत्यूसुद्ध...

Jun 28, 20236 min

बंड फसलं, आता पुतिन पुढे काय करतील? BBC News Marathi

वागनर ग्रुपचं बंड अवघ्या 24 तासांत मोडलं. पण या घडामोडी म्हणजे रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना बसलेला मोठा धक्का आहे, असं अनेक तज्ज्ञांना वाटतं. पुतिन यापुढे काय पावलं उचलतील? वागनर ग्रुपचं काय होईल? युक्रेन युद्धावर आणि पर्यायानं जगावर याचा काय परिणाम होईल? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Jun 26, 20235 min

मान्सून आणि अर्थव्यवस्था यांचं काय कनेक्शन? BBC News Marathi

साधारणपणे 1 जूनला मान्सून येणार, असं सांगितलं जातं. पण यंदा तर जूनचे तीन आठवडे उलटून गेल्यावरही मान्सूनचा काही थांगपत्ता नाही. मान्सून यावा आणि त्याने पुरेसं बरसावं, अशी अपेक्षा फक्त शेतकऱ्यांनाच नाही तर भारतीय अर्थव्यवस्थेतल्या सर्वच घटकांना असते. पण का? भारतीय अर्थव्यवस्थेचं आणि मान्सूनचं हे नातं काय आहे? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – मानसी देशपांडे, बीबीसी मराठीसाठी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Jun 24, 20236 min

‘वर्क फ्रॉम होम’ बंद झाल्यामुळे महिला कर्मचाऱ्यांची अडचण झाली आहे का? BBC News Marathi

लॉकडाऊनमध्ये आपल्यापैकी अनेकांनी पायजामे किंवा बॉक्सर्समध्येच घरून कामं केली, मीटिंग्स, प्रेझेंटेशन्स अटेंड केले. पण आता कोरोना मागे पडलाय, ऑफिसेस पूर्णपणे उघडलीयेत आणि म्हणून वर्क फ्रॉम होमचा पर्याय कंपन्या काढून घेतायत. त्यामुळेच की काय अनेक जण, प्रामुख्याने महिला ऑफिसला दररोज जाण्यापेक्षा नोकरी सोडणं पसंत करताना दिसतायत. असं का होतंय? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – सुशील सिंह, बीबीसी प्रतिनिधी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Jun 23, 20234 min

सेन्सॉर बोर्ड कसं काम करतं? आदिपुरुषवर रिलीजनंतर बंदी येऊ शकते? BBC News Marathi

‘आदिपुरुष’ या सिनेमाने पहिल्या तीन दिवसांत 200 कोटींची कमाई तर केलीय, पण अनेकांनी यातले संवाद आणि पात्रं पाहून या सिनेमावर बंदी घालण्याची मागणी केलीय. खरंतर हा विषय फक्त आदिपुरुषपुरता मर्यादित नाहीय; ‘द केरला स्टोरी’, ‘द काश्मीर फाईल्स’, ‘पद्मावत’ पासून ते अगदी ‘आंधी’ आणि ‘बँडिट क्वीन’पर्यंत, आजवर अनेक सिनेमे बॅन झालेत किंवा त्यांच्यावर बंदी घालण्याची मागणी रिलीजच्या आधी आणि नंतरही झाली आहे. पण ज्या सिनेमाला आधीच सेन्सॉर बोर्डाने क्लिअर केलं आहे, त्यावर आता अशी बंदी येऊ शकते का? पाहू या आजच्या स...

Jun 22, 20235 min

ITR कसा फाईल करायचा? जाणून घ्या सोप्या शब्दांत | BBC News Marathi

दरवर्षी 31 जुलैपर्यंत इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे आयकर परतावा दाखल करणं अपेक्षित असतं. पण इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे काय, ते का भरायला हवं आणि त्यासाठीची ऑनलाईन प्रक्रिया काय आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 22, 20236 min

तुम्हालाही एका झटक्यात कॅब मिळत नाही?

अगदी ऐनवेळी ड्रायव्हरने कॅब रद्द केल्याने अनेकांना समस्येचा सामना करावा लागलेला असू शकतो. कधीकधी हे ड्रायव्हर तुम्हाला स्वतःहून कॅब रद्द करायलाही भाग पाडतात. पण मुळात कोठेही जाण्यासाठी आपण कॅब बुक केली तर ड्रायव्हर ऐनवेळी ती रद्द करू शकतात का? हे ग्राहक हक्कांचं उल्लंघन आहे का? असं घडलं तर काय ग्राहक म्हणून काय करावं? वार्तांकन - पेडागडी राजेश, बीबीसी तेलुगू लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 20, 20235 min

परदेशात शिक्षणाला जायचंय? मग हे ऐकाच

परदेशात शिकायची इच्छा कुणाची नसते? परदेशी डिग्री, मोठ्या पगाराची नोकरी करायची, आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं. पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात, ती कागदपत्रंच खोटी निघाली तर? अलिकडेच अशी 700 प्रकरणं समोर आली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले

Jun 17, 20235 min

परदेशात शिक्षणाला जायचंय? मग याकडे लक्ष द्या

परदेशात शिकायची इच्छा कुणाची नसते? परदेशी डिग्री, मोठ्या पगाराची नोकरी करायची, आणि जमलंच तर तिथलंच नागरिकत्व असं स्वप्न अनेकांचं असतं. पण ज्या भरवशावर तुम्ही तिथे शिक्षणासाठी गेलात, ती कागदपत्रंच खोटी निघाली तर? अलिकडेच अशी 700 प्रकरणं समोर आली आहेत. काय आहे नेमकं प्रकरण? आपल्यावर अशी वेळ येऊ नये म्हणून काय करायला हवं? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले

Jun 16, 20235 min

रक्तदान कुणी करावं? कुणी करू नये? 6 प्रश्न, 6 उत्तरं | BBC News Marathi

जगभरात 14 जून हा दिवस 'जागतिक रक्तदान दिन' म्हणून साजरा केला जातो. या दिवशी रक्तदानाची गरज, त्याचं महत्त्व आणि फायदे याबद्दल लोकांमध्ये जागृती करण्याचा प्रयत्न केला जातो. रक्तदान करण्यासाठी काही विशिष्ट बाबींची पूर्तता करणं आवश्यक असतं. जागतिक आरोग्य संघटना आणि राष्ट्रीय एड्स नियंत्रण संस्थेनं (NACO) यासाठीच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. रक्तदानाविषयी 6 मुद्द्यांमध्ये समजून घेऊया. लेखन - टीम बीबीसी मराठी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले

Jun 14, 20235 min

प्रेमात क्रूर गुन्हे कसे घडतात? अशा गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? BBC News Marathi

मुंबईजवळच्या मीरा रोड परिसरात एका 56 वर्षीय पुरुषाने त्याच्यासोबत राहणाऱ्या 32 वर्षीय महिलेची हत्या केली, तिच्या शरीराचे तुकडे केले आणि काही विचित्र प्रक्रिया करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. यामुळे सर्वांनाच काही महिन्यांपूर्वीच्या श्रद्धा वालकर प्रकरणाची आठवण झाली. खरंतर अशा प्रकारची ही काही घटना पहिली नव्हती. पण खरंच इतका क्रूर प्रकार कुणी कसं करू शकतं? आणि असं करून ही या गुन्हेगारांचा शोध कसा लागतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - सौतिक बिस्वास, बीबीसी...

Jun 13, 20236 min

मुलांना ऑनलाईन सुरक्षित कसं ठेवायचं? त्यांचा खासगीपणा कसा जपायचा? BBC News Marathi

मुलांनी फोन्स - टॅब्स वापरण्याचं प्रमाण आता वाढलंय. कधी गेमिंग, कधी व्हीडिओज - सोशल मीडियाचा टाईमपास किंवा मग ऑनलाईन शाळा - क्लास - अभ्यास यासाठीसुद्धा. मग ती नेमकं काय पाहतायत, ऑनलाईन काय करतायत यावर बारीक लक्ष देणं पालकांसाठी अशक्य. मग तुमच्या मुलांची ऑनलाईन प्रायव्हसी जपण्यासाठी, ऑनलाईन जगातल्या धोक्यांपासून त्यांना दूर ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Jun 13, 20235 min

ओडिशा रेल्वे अपघाताची चौकशी CBI का करणार आहे? BBC News Marathi

ओडिशाच्या बालासोर रेल्वे अपघाताची चौकशी CBIला सोपवण्यात आलीय. तीच CBI जिला सुप्रीम कोर्टाने ‘पिंजऱ्यात बंद पोपट’ म्हटलं होतं, जिचा गैरवापर सत्ताधारी करत असल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्ष करतात. खरंतर अशा रेल्वे अपघातांचा तपास स्वतः भारतीय रेल्वे करतं. मग ओडिशा अपघाताची चौकशी CBIकडे का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - चंदन कुमार जजवाडे लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 08, 20236 min

चक्रीवादळं कुठून कशी येतात? त्यांची नावं कोण ठेवतं? 5 प्रश्न, 5 उत्तरं | BBC News Marathi

आतापर्यंत मान्सून मुंबई किंवा कोकणातच काय तर केरळमध्येही पोहोचलेला नाही. दुसरीकडे अरबी समुद्रात बिपरजॉय चक्रीवादळ घोंघावतंय. या वादळामुळे मान्सून लांबलाय का? मुळात चक्रीवादळ काय असतं? त्याचं नाव कोण ठेवतं? जाणून घेऊ 5 बेसिक प्रश्नांची उत्तरं आजच्या सोपी गोष्ट मध्ये. संशोधन - टीम बीबीसी मराठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 08, 20236 min

रायगड अजूनही UNESCO जागतिक वारसा स्थळांच्या यादीत का नाहीय? BBC News Marathi

रायगड. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी. इथेच हिंदवी स्वराज्याची स्थापनी झाली, महाराजांचा राज्याभिषेक झाला. खरंतर 800 वर्षं जुन्या या किल्ल्याने त्याच्या आधी आणि त्याच्या नंतरही बरंच काही पाहिलंय. मग असा समृद्ध इतिहास असलेल्या हा किल्ला जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान का नाही? या यादीत कुणाला स्थान मिळतं? आणि त्याने खरंच काय बदलतं? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Jun 05, 20237 min

महाराष्ट्रातले पैलवान दिल्लीतल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाविषयी गप्प का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

पैलवान विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनियानं भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण शरण सिंग यांच्याविरुद्ध पुकारलेल्या आंदोलनानं भारतीय कुस्तीचं विश्व ढवळून निघालं आहे. त्यातच 28 मे रोजी दिल्ली पोलिसांनी आंदोलकांवर कारवाई करतानाची दृश्यं पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. कुस्तीमध्ये हरयाणा विरुद्ध उत्तर प्रदेश असे दोन गट झाल्याचंही चित्र आहे. पण महाराष्ट्रातले बहुतांश पैलवान या सगळ्या प्रकरणावर फार काही बोलताना दिसले नाहीत. यामागची कारणं काय आहेत? जाणून घेऊयात. निवेदन...

May 30, 20236 min

पाळी काय असते, हे पुरुषांना कसं कळेल? पुरुषांसाठी विशेष BBC News Marathiचा सोपी गोष्ट पॉडकास्ट

मासिक पाळी नैसर्गिक प्रक्रिया आहे हे मुलांना आणि पुरुषांना माहीत आहे का? स्त्रियांच्या आयुष्यातील या गोष्टीकडे पुरुष, मुलं एक रहस्य असल्यासारखं बघतात. आपल्या समाजात मासिक पाळीबाबत समज गैरसमज आहेत. त्यातही आणखीन अशा काही प्रथा आहेत, ज्यामुळे स्त्रियांचा जीव धोक्यात येतो. पण पुरुषांना, मुलांना जर मासिक पाळीविषयी या गोष्टी माहिती असतील तर त्यांचं आयुष्य खूप सोपं होऊ शकतं. पाहा नासिरुद्दीन यांच्या लेखनावर आधारित हा व्हीडिओ. निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

May 30, 20235 min

राज्यात सरकारी शाळांमध्ये एकसमान गणवेशाची सक्ती कशासाठी?

येत्या 15 जूनपर्यंत राज्यातील शाळा सुरू होत आहेत. नवीन दप्तर, नवीन वह्या-पाठ्यपुस्तकं आणि नवीन गणवेश खरेदी करत विद्यार्थी आणि पालकांची तयारी सध्या सुरू आहे. अशावेळी महाराष्ट्र राज्य सरकारच्या शिक्षण विभागाने मात्र नुकताच एक मोठा निर्णय घेतला आहे. यापुढे येत्या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्रातील शाळांमध्ये सर्व विद्यार्थ्यांना एकसारखा गणवेश असेल. परंतु हा निर्णय राज्यातील सरसकट सर्व शाळांसाठी आहे का? ? राज्य सरकारने असा निर्णय घेण्यामागचं कारण काय असावं? आणि यावर टीका का होत आहे? जाणून घेऊयात लेख...

May 25, 20235 min

नवीन संसद भवनाच्या उद्घाटनावर विरोधक बहिष्कार का टाकतायत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नवी दिल्लीतलं नवीन संसद भवन बनून तयार आहे. 28 मे 2023 ला त्याचं उद्घाटन होत आहे. पण हे उद्घाटन करणार कोण – पंतप्रधान की राष्ट्रपती, यावरून आता वाद रंगला आहे. या संसद भवनाचं लोकार्पण पंतप्रधान मोदींच्या हस्ते होतंय. सर्व विरोधी पक्षांनी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे की या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांना आमंत्रण देण्यात आलेलं नाही. देशातल्या अनेक विरोधी पक्षांनी एकत्रितपणे या कार्यक्रमावर बहिष्कार टाकलाय. कसं आहे हे नवीन संसद भवन? ते कसं उभारण्यात आलं? आणि आता त्यावरून वाद का रंगलाय? प...

May 24, 20237 min

2000च्या नोटा बदलून घेताना ‘काळा पैसा’ बाहेर निघेल का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

तुम्ही जिथे-जिथे 2000ची नोट ठेवली आहे, तिथून ती काढून बँकेत जमा करायची वेळ आली आहे. 2016मध्ये जन्माला आलेली ही नोट अवघ्या साडेसहा वर्षातच का कालबाह्य होतेय? या नोटेमुळे खरंच काळा पैसा रोखता आला का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. अधिकचं वार्तांकन – मानसी देशपांडे लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

May 24, 20236 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : केजरीवालांचे अधिकार मोदींना कमी करायचेत?

दिल्लीच्या नोकरशाहीविषयीचे, अधिकाऱ्यांच्या नेमणुकांचे निर्णय घेण्याचे अधिकार दिल्लीच्या सरकारकडेच असतील असं सर्वोच्च न्यायालायाच्या घटनापीठानं स्पष्ट केलं. पण आठच दिवसांत केंद्र सरकारनं एक अध्यादेश आणला, जो या निर्णयाविरोधात असल्याचा आरोप विरोधी पक्ष करत आहेत. याकडे काहीजण आम आदमी पक्ष आणि भारतीय जनता पक्षातली चढाओढ म्हणूनही पाहतायत तर काहींना हा भारतीय संघराज्य प्रणालीवरचा हल्ला वाटतो आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे? जाणून घेऊया. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

May 23, 20236 min

कृत्रिम साखर खाऊ नका, WHOने का सांगितलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

डायबिटीस, मधुमेह, साखर – आपल्या रक्तातली साखरेची पातळ वाढली की आपण साखर, गोडधोड सारंकाही सोडून पर्याय म्हणून काही कृत्रिम साखरेकडे वळतो. आणि आता, फक्त मधुमेह असलेलेच नाही तर आता निरोगी दिसणारी तरुण मंडळीसुद्धा साधं कोल्डड्रिंक नाही तर डायट सोडासारखे पर्याय घेतायत. पण आता यातली कृत्रिम साखरसुद्धा फायद्याची नाही तर नुकसान करणारी ठरू शकते, असं जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) म्हटलं आहे. पाहा WHOचा इशारा नेमका काय, आणि त्याचा अर्थ काय? लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर...

May 20, 20236 min

प्रसूती रजा किती मिळावी – 3, 6 की 9 महिने? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आई होण्यासाठी मिळणारी रजा अर्थात मॅटर्निटी लीव्ह किती असावी - 3 महिने, 6 महिने की त्याहून जास्त? अनेकांच्या मनात या प्रश्नाची वेगवेगळी उत्तरं आणि तर्क असू शकतात. भारतात हा कालावधी 26 आठवडे करण्यात आला असला, तरीही तो सर्व कंपन्यांसाठी सक्तीचा नाही. आणि आता अनेकांना वाटतंय की ही रजा जास्त वेळ असावी. पण कंपन्यांना ते चालणार का? पाहू या आज मॅटर्निटी लीव्हची ही सोपी गोष्ट. लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले

May 18, 20235 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android