तुमचा कधी फोन हरवलाय किंवा कधी चोरीला गेलाय का? मग तो फोन कधीही परत येत नाही. मग आपण आधी रडतो, मग पोलिसात तक्रार करतो, ते सिम कार्ड ब्लॉक करून घेतो आणि पुढे नवीन फोन आणि डुप्लिकेट सिम घेऊन आपल्या कामाला लागतो. पण तुमचे हरवलेले किंवी चोरीला गेलेले फोन परत मिळवता यावेत, यासाठी आता सरकारने एक नवीन पोर्टल आणलं आहे. पण ते कसं काम करेल? त्याने खरंच फायदा होणार का? लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
May 17, 2023•7 min
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
May 16, 2023•6 min
सुप्रीम कोर्टात महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाच्या निकाल वाचनात पहिला सर्वात मोठा धक्का एकनाथ शिंदे गटाला बसलाय. शिंदे गटानं गुवाहाटीतून निवडलेले पक्षाचे व्हिप अर्थात प्रतोद भरत गोगावले यांची निवड सुप्रीम कोर्टाने अवैध ठरवली. पण हे व्हिप म्हणजे नेमकं काय? आणि त्यावरूनच आता शिंदे सरकारच्या अडचणी वाढू शकतात का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
May 13, 2023•7 min
तुम्ही सहसा जेवण ऑर्डर करायला स्विगी किंवा झोमॅटो वापरता, टॅक्सीसाठी ओला किंवा उबर आणि शॉपिंगसाठी फ्लिपकार्ट, ॲमेझॉन, मिंत्रा किंवा आणखी काही... आता कल्पना करा तुम्हाला या सगळ्या ऑनलाईन ॲप्सची तुलना एकाच ॲपवर करता आली तर? आणि जर ते ॲप सरकारी असेल तर?
May 11, 2023•6 min
‘द केरला स्टोरी’ या एका सिनेमावरून सध्या देशात वादंग उठलंय. काही राज्यांनी तो टॅक्स फ्री केलाय, तर काही राज्यांनी त्यावर बंदी घातलीय. म्हणजे दोन वेगवेगळ्या टोकाची पावलं टाकायला लावणारा हा सिनेमा आहे तरी काय? तो किती खरा? किती खोटा आहे? आणि त्यावरून राजकारण का होतंय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
May 10, 2023•7 min
AI म्हणजेच Artificial Intelligence खरंच इतकं प्रगत झालंय का की तज्ज्ञांनाही आता त्यातला फरक करता येत नाहीय? भविष्यात AI मानवापेक्षाही जास्त हुशार होऊ शकतं, अशी भीती खरी ठरतेय का? AIचा धोका अचानक का वाढलाय? AIमुळे समाजाला खरंच किती धोका? पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
May 09, 2023•5 min
DRDO मधली एका शास्त्रज्ञाला महाराष्ट्राच्या दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) अटक केल्यानंतर हनी ट्रॅप हा शब्द पुन्हा तुमच्या कानावर पडला असेल. या शास्त्रज्ञाकडून माहिती मिळवण्यासाठी पाकिस्तानी व्यक्तीने ‘हनी ट्रॅप’ वापरून हे सगळं केल्याचा ATS ला संशय आहे. पण हनी ट्रॅप म्हणजे काय प्रकार आहे? याआधी अशा कुठल्या घटना घडल्या आहेत?
May 08, 2023•6 min
मणिपूर राज्यात सध्या जाळपोळ, हिंसाचार आणि अशांतता पसरली आहे, कारण तिथल्या मैतेई समुदायाला ST म्हणजे अनुसूचित जमातीमध्ये स्थान द्यायचं की नाही, यावरून वाद सुरू आहे. या सगळ्याबद्दल जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - दिलीप कुमार शर्मा, बीबीसी हिंदीसाठी निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
May 05, 2023•4 min
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना ड्रोन हल्ल्याने मारण्याचा युक्रेनने प्रयत्न केला, असा आरोप रशियाने केलाय. मात्र युक्रेनने हा आरोप फेटाळलाय. पण वर्षभरापासून युद्धात अडकलेल्या दोन देशांमध्ये तणाव आणखी वाढलाय. नेमकं काय घडलंय? रशियन राष्ट्राध्यक्षांवर खरंच असा हल्ला होऊ शकतो का? हे सगळं रशियानेच घडवून आणलं असेल अशी शंका का घेतली जातेय? आणि यामुळे रशिया युक्रेन युद्धाचा पुढचा गिअर टाकला जाईल का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – शरद बढे
May 04, 2023•6 min
मुंबईच्या वाडिया ग्रुपची गो फर्स्ट, जी आधी गो एअर होती, तिने तीन दिवसांसाठी सर्व उड्डाणं रद्द केली आहेत. गो फर्स्टने 2 मे रोजी घोषणा केली की त्यांच्याकडे इतकाही पैसा उरला नाहीय की ते त्यांच्या नियोजित फ्लाईट्स उडवू शकतील. परिणामी त्यांना 3 आणि 4 मेच्या सर्व फ्लाईट्स रद्द कराव्या लागत आहेत. नेमकं काय झालंय? आणि किंगफिशर, जेट एअरवेजप्रमाणेच गो फर्स्टचा लास्ट होणार का? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
May 04, 2023•5 min
25 एप्रिल 2023 रोजी केंद्रीय जल शक्ती मंत्रालयाने पहिल्यांदाच वॉटर बॉडीज सेन्ससचा अहवाल सादर केला. देशात जिथे-जिथे पाणी साठवलं जाऊ शकतं, अशा सर्व जागांची गणना आणि सर्वेक्षण या अहवालासाठी करण्यात आलं. 2018-19 दरम्यान झालेल्या या गणनेनुसार, देशभरात एकूण 24 लाख 24 हजार 540 पाण्याचे साठे आहेत. यापैकी सर्वाधिक तळी हे पश्चिम बंगालमध्ये आहेत, सर्वाधिक जलाशयं आंध्र प्रदेशात तर सर्वाधिक जल संधारण योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राचा पहिला नंबर लागतो. आता यापैकी कुठल्या राज्याने कशी बाजी मारलीय? हे समजून घ्याय...
May 04, 2023•7 min
17 सप्टेंबर 2022 रोजी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी नामिबियाहून 8 चित्ते भारतात आणले गेले. त्यानंतर दक्षिण आफ्रिकेतून 12 चित्ते आणले गेले. अशा एकूण 20 चित्त्यांपैकी आतापर्यंत दोन चित्त्यांचा जीवही गेलाय. असं काय झालं की हे परदेशी पाहुणे भारतात, मध्य प्रदेशातल्या कूनो राष्ट्रीय उद्यानात येऊन दगावले? त्यांच्यासाठी ही जागा पुरेशी नव्हती की त्यांना इथलं हवामान मानवलं नाही? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – नितीन श्रीवास्तव, बीबीसी प्रतिनिधी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरवि...
May 01, 2023•5 min
अमेरिका, रशिया, दक्षिण कोरिया, भारत, जपान आणि चीन या सगळ्यांचे यान चंद्राच्या दिशेने झेपावलेत. यापैकी अमेरिका आणि चीनला आतापर्यंत चांगलं यश आलेलं दिसलंय. पण भारत, इस्रायल आणि आता जपानच्या पदरी निराशा आली आहे. आपण चंद्रावर लँड केलंय, तिथून माती दगडही पृथ्वीवर परत आणलेत. मग अजूनही चंद्रावर लँड करणं इतकं अवघड का आहे? पाहा ही सोपी गोष्ट. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
May 01, 2023•5 min
ऑलिम्पिक आणि कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताचा झेंडा फडकवणारे स्टार कुस्तीपटू साक्षी मलिक, बजरंग पुनिया, विनेश फोगाट सध्या दिल्लीच्या रस्त्यावर ठिय्या मांडून बसलेत. त्यांचं आंदोलन सुरू आहे बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध. बृजभूषण हे उत्तर प्रदेशमधून भाजपचे खासदारही आहेत. आणि WFIचे अध्यक्ष म्हणून त्यांनी लैंगिक शोषण केलंय, असा आरोप या कुस्तीपटूंनी केला आहे. या कुस्तीपटूंचे नेमके आरोप काय आहेत? त्यावरून क्रीडा विश्वातलं राजकारण का तापलंय? आणि अद्याप यात काही कारवाई का नाही झालीय? पाहू या आजच्या सोपी गो...
Apr 29, 2023•7 min
2015मध्ये पहिल्यांदा कोकणात एका मोठ्या रिफायनरीचा प्रस्ताव आला. ही 'जगातली सर्वांत मोठी रिफायनरी' असेल, अशी घोषणा करण्यात आली. पण या प्रकल्पासाठी जमीन संपादित करायला जेव्हा सुरुवात झाली, तेव्हा स्थानिकांनी याला विरोध सुरू केला. या प्रकल्पाने पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील अशा कोकणात निसर्गाचा ऱ्हास होईल, मच्छीमारांचं नुकसान होईल, अशी भीती स्थानिकांनी वर्तवली. नंतर उद्धव ठाकरेंच्या सरकारने हा प्रकल्प रत्नागिरीमधल्याच बारसूमध्ये होईल, अशी घोषणा केली. आता तिथेही लोक रस्त्यावर उतरलेत. काय आहे हा र...
Apr 27, 2023•5 min
जम्मू काश्मिरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना त्या राज्यातल्या कथित रिलायंस इन्श्यूरन्स घोटाळ्याप्रकरणी सीबीआयनं चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नेमकं हे प्रकरण काय आहे, जाणून घेऊयात. काही दिवसांपूर्वीच द वायर या न्यूज वेबसाईटला दिलेल्या मुलाखतीमुळे सत्यपाल चर्चेत आले होते. मोदींचे निकटवर्तीय असलेले लोक दोन फाईल्स पास करण्यासाठी लाच देऊ इच्छित होते, असा मलिक यांचा दावा आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे? संशोधन – अभिनव गोयल निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 25, 2023•5 min
फुटबॉलपटू रोनाल्डो, अभिनेत्री आलिया भट आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, यांच्यात काय एक गोष्ट समान आहे, सांगा? कालपर्यंत या सगळ्यांचे ट्विटर अकाउंट व्हेरिफाईड होते, त्यांच्या नावापुढे ब्लू टिक दिसत होतं, पण आता नाहीय. फक्त यांचंच नव्हे तर अनेक मोठ्या व्यक्तिमत्त्वांचं व्हेरिफिकेशन बॅज 20-21 एप्रिलच्या रात्रीतून ट्विटवरून उडालं आहे. पण मग उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या अकाउंटवर तर ब्लू टिक दिसतंय, आणि पंतप्रधान मोदींच्या खात्यावर तर राखाडी अर्थात ग्रे टिक आहे. असं कसं? ही ट्विटर व्हेरिफिकेशनची ...
Apr 22, 2023•6 min
जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात... त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार? दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा? कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय. हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – अहमन ख्वाजा लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 21, 2023•4 min
जगभरातले सुमारे 2 अब्ज मुस्लीम लोक रमजानचा पवित्र महिना संपत आला की आकाशाकडे पाहू लागतात... त्यांना प्रतीक्षा असते की चंद्र कधी निघणार. कारण हाच चंद्र ठरवत असतो की रमजान ईद कधी येणार? दरवर्षी हा गोंधळ असतो की हा सण नेमका कधी साजरा करायचा? कुणी म्हणतंय 21 एप्रिलला ईद आहे तर कुणी 22 एप्रिलला साजरं करायचं म्हणताय. हाच गोंधळ सोडवण्याचा प्रयत्न करू, या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – अहमन ख्वाजा लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 21, 2023•4 min
सुदानमध्ये सध्या देशाचं लष्कर आणि निमलष्करी दल एकमेकांसमोर उभे ठाकलेत. सुदान ईशान्य आफ्रिकेतला एक मोठा देश. इथल्या साडेचार कोटींपेक्षा जास्त लोकसंख्येत मुस्लीम बहुसंख्य आहेत. पण सुदान जगातल्या सर्वांत गरीब देशांपैकी एक आहे. राजधानी खार्तूममध्ये 15 एप्रिलपासून सुदानी लष्कर आणि निमलष्करी दलात संघर्ष पेटलाय. या संघर्षात जोरदार गोळीबार, हवाई हल्ले होतायत, अनेक निष्पाप बळी जातायत. फक्त सुदानीच नाही इतर देशांचेही लोक तिथे अडकलेत.
Apr 20, 2023•7 min
पुन्हा उन्हाळा आलाय, पुन्हा पारा चढलाय आणि पुन्हा उष्णतेमुळे लोक हैराण झालेत. अशा उन्हात आपली लाही लाही होऊ नये, यासाठी काय करायला हवं?
Apr 18, 2023•6 min
माजी खासदार आणि उत्तर प्रदेशचा बाहुबली नेता अतीक अहमदला भीती होती की उत्तर प्रदेशात नेल्यावर त्याचा एन्काउंटर केला जाईल, पण 13 एप्रिलला त्याचा नव्हे तर त्याच्या मुलाचा झांशीजवळ एन्काउंटर झाला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी यानंतर पोलिसांची पाठ थोपटली आहे, तर विरोधकांनी याला खोटा एन्काउंटर म्हटलं आहे. काय आहे नेमकं प्रकरण? एखादा एन्काउंटर खरा की खोटा, हे कसं ठरतं? आणि मुळात पोलिसांना कुणाला ठार करण्याचा अधिकार कायदा देतो का? पाहू या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिट...
Apr 18, 2023•6 min
भारतात समलिंगी व्यक्तींच्या लग्नाला कायदेशीर मान्यता द्यायची की नाही, याविषयी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी 18 एप्रिलपासून सुरू होते आहे. लोकांच्या हितासाठी ही सुनावणी लाईव्ह स्ट्रीमही केली जाणार आहे, असं न्यायालयानं म्हटलं आहे. या सुनावणीतून काय अपेक्षित आहे? जगभरात समलिंगी विवाहाविषयी कायदा काय सांगतो, जाणून घेऊयात. संशोधन – गीता पांडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 17, 2023•7 min
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Apr 13, 2023•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Apr 12, 2023•5 min
नुकताच बनारसी पान आणि उत्तर प्रदेशात पिकणाऱ्या लंगडा आंब्यासह आणखी काही वस्तूंना GI टॅग मिळाला. पण हा टॅग आहे काय? तो देतं कोण? आणि त्यामुळे कुणाला कसा फायदा होतो? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 11, 2023•5 min
एकेकाळी भारतात नेमके किती वाघ होते, याची ठोस आकडवारी सांगता येणार नाही. पण एकोणिसाव्या आणि विसाव्या शतकात त्यांची संख्या वेगानं रोडावू लागली. यामागचं मुख्य कारण होतं शिकार आणि त्यासाठी बंदुका आणि धातुच्या सापळ्यांचा वापर. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर
Apr 10, 2023•6 min
नुकतंच फोक्सवागन आणि श्कोडा कंपन्यांच्या या गाड्यांना नुकतंच सेफ्टीच्या बाबतीत 5 स्टार रेटिंग मिळालं. तर मारुती सुझुकीच्या या गाड्यांना एक आणि दोन स्टार रेटिंग. पण मुळात कोणती गाडी किती सुरक्षित हे ठरतं कसं? पण हे रेटिंग देतं कोण? भारतीय गाड्या किती सुरक्षित आहेत? पाहा या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 07, 2023•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.
Apr 06, 2023•5 min
ओपेक प्लस राष्ट्रगटानं कच्च्या तेलाचं उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा अचानक वाढल्या आहेत. हा ओपेक प्लस गट काय आहे? त्यांनी अचानक तेलाचं उत्पादन कमी का केलं आहे? आणि या निर्णयाचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 06, 2023•6 min