अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप कायदेशीर पुन्हा चर्चेत आहेत. पॉर्न स्टार स्टॉर्मी डॅनियल्सला गप्प करण्यासाठी पैसे दिल्याप्रकरणी डोनाल्ड ट्रंप यांची चौकशी सुरू आहे. पण या सगळ्याचा ट्रंप यांना तोटा होईल की फायदा? ट्रंप यांना तुरुंगात जावं लागेल का आणि शिक्षा झाली, तर ट्रंप पुन्हा राष्ट्राध्यक्ष होऊ शकतात का? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 04, 2023•5 min
वेदोक्त आणि पुराणोक्त हे शब्द पुन्हा चर्चेत आले आहेत. अनेकांना लोकांना कोल्हापूरचे राजर्षी शाहू महाराज आणि त्यांच्या बाबतीत घडलेले वेदोक्त प्रकरण याचा संदर्भ ऐकून माहिती असेल. सव्वाशे वर्षांपूर्वी वेदोक्ताच्या मुद्द्यावरून दीर्घकाळ चर्चा, मंथन, टीका, आरोप-प्रत्यारोप यांमुळे महाराष्ट्राचं वातावरण ढवळून निघालं होतं. पण हे प्रकरण नेमकं काय होतं? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Apr 03, 2023•6 min
पगार येतो, पण पुरतंच नाही असं तुमचं होतं का? प्रयत्न करूनही व्यवस्थित गुंतवणूक होत नाही, त्यावर मनासारखा परतावा मिळत नाही? जवळपास सगळ्याच सर्वसामान्य लोकांचं असं होत असतं. कितीही ठरवलं तरी आर्थिक गणित जमत नसेल तर हा आजची सोपी गोष्ट खास तुमच्यासाठीच आहे. पाहुया की अशा कोणत्या गोष्टी आहेत ज्यामुळे तुम्हाला येत्या आर्थिक वर्षात तुमच्याकडच्या पैशांचं अधिक चांगलं नियोजन करता येईल. संशोधन – आयव्हीबी कार्तिकेय लेखन – अनघा पाठक निवेदन – सिद्धनाथ गानू एडिट – अरविंद पारेकर
Mar 31, 2023•4 min
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी या दोन नेत्यांची तुलना सध्या सोशल मीडियावर होते आहे. कारण आहे, इस्रायलमध्ये सुरू असलेलं आंदोलन. नेमकं इस्रायलमध्ये काय सुरू आहे आणि भारताशी त्याची तुलना का केली जाते आहे. संशोधन - सर्वप्रिया सांगवान, जान्हवी मुळे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
Mar 29, 2023•6 min
25 मार्चला पंजाबच्या फझिल्कामध्ये आणि अमेरिकेच्या मिसीसीपी राज्यालाही टोरनॅडो वादळांचा मोठा तडाखा बसला आणि त्यात किमान 25 जणांचा मृत्यू झाला आहे. पण टोरनॅडो म्हणजे नेमकं काय असतं? हे वादळ कशामुळे येतं? आणि भारताला, विशेषतः महाराष्ट्राला त्यापासून किती धोका आहे, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे
Mar 27, 2023•5 min
गेल्या काही वर्षांत अवकाळी पाऊस आता आपल्यासाठी 'अवकाळी' राहिला नाहीये. खरंतर ऋतूंच टाइमटेबलच बदललेलं दिसतं. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा असं नियमित चक्र पाहायला मिळत नाही... या बदलाची कारणं काही असो, पण अवकाळी पाऊस येऊ दे की उष्णतेची लाट...हवामान विभागावर खापर फुटतंच...कार्टून्स, मीम्स, व्हॉट्स फॉरवर्ड...हवामान विभागाची खिल्ली उडवायचा चान्स लोक सोडत नाहीत. पण किती जणांना हवामान विभाग काम कसं करतो, ते माहितीये. या विभागाची स्थापना कधी आणि कशी झाली? हवामानाचे अंदाज ते लावतात कसे? याबद्दलच जाणून घेऊया ...
Mar 27, 2023•4 min
दरवर्षी 20 मार्चला वर्ल्ड हॅपिनेस डे म्हणजे जागतिक आनंद दिन साजरा केला जातो. त्यानिमित्तानं संयुक्त राष्ट्रांतर्फे वर्ल्ड हॅपिनेस इंडेक्स तयार केला जातो. दरवर्षी त्यावरून चर्चा आणि वादही होतात. हा कसला निर्देशांक आहे? तो कसा तयार करतात आणि त्यात भारत कुठल्या स्थानावर आहे? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 22, 2023•6 min
गेल्या काही आठवड्यांत भारतात आणि महाराष्ट्रातही इन्फ्लुएंझा म्हणजे फ्लूच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ होते आहे. यात H3N2 या फ्लूच्या विषाणूसोबतच H1N1 म्हणजे स्वाईन फ्लूची लागण झालेल्या रुग्णांचाही समावेश आहे. त्यातच राज्यात आणि विशेषत: मुंबईत कोव्हिडची रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांत झपाट्यानं वाढतेय. याशिवाय देशात काही ठिकाणी विशेषतः लहान मुलांमध्ये अॅडिनो विषाणूचाही प्रादुर्भाव जाणवतोय. पण हा अॅडिनोव्हायरस काय आहे? त्याची लक्षणं कोरोना विषाणू आणि इन्फ्लुएन्झापेक्षा किती वेगळी आहेत? तिन्ही व्हायर...
Mar 21, 2023•6 min
अमृतपाल सिंग आणि खलिस्तानी चळवळीचं समर्थन करणारी वारिस पंजाब दे ही त्याची संघटना सध्या चर्चेत आहेत. अमृतपालच्या अटकेच्या हालचाली सुरू झाल्यापासून त्याचे पडसाद पंजाबच्या आणि देशाच्या राजकारणात आणि अगदी लंडनमध्येही उमटलेले पाहायला मिळाले. पण हा अमृतपाल सिंग कोण आहे? वारिस पंजाब दे ही संघटना चर्चेत का आहे? संशोधन – अरविंद छाबरा, झोया मतीन लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 20, 2023•6 min
महाराष्ट्रातले सुमारे 18 लाख शासकीय कर्मचारी पेन्शनसाठी संपावर गेलेत, आणि अशात एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय – आमदारांना किती पेन्शन मिळतं? याच प्रश्नाचं उत्तर आणि हे पेन्शनचं गणित समजून घेणार आहोत, आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – दिपाली जगताप निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
Mar 17, 2023•5 min
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान चर्चेत आहेत. (यांना पोलिसांनी अटक केली आहे). 14 मार्चला लाहोर पोलीस इम्रान खान यांना जमान पार्क येथील निवासस्थानी अटक करण्यासाठी गेले, तेव्हा खान यांच्या समर्थकांनी निदर्शनं केली. या आंदोलनाला हिंसक वळण लागलं. तेव्हापासून जगाचं लक्ष या घटनेकडे वेधलं गेलं. पण इम्रान खान यांना पोलीस अटक करायला का आले? त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप असलेलं तोशाखाना प्रकरण काय आहे? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 16, 2023•6 min
स्टार्ट-अप्समध्ये लोकप्रिय असलेली सिलिकॉन व्हॅली बँक अर्थात SVB 10 मार्च 2023 रोजी बुडली आणि त्याचा फटका भारतातल्या स्टार्ट-अप्सनाही बसला. असं का घडलं?सिलिकॉन व्हॅली बँक महत्त्वाची का होती? या घटनेचे भारतीय कंपन्यांवर काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात. संशोधन - विनीत खरे लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 15, 2023•6 min
जगातले सर्वांत प्रतिष्ठेचे समजले जाणारे ऑस्कर पुरस्कार नेमके कोण देतं? तिथे कोणते आणि कसे सिनेमे पाठवले जातात? भारतात आजवर कुणा-कुणाला ऑस्कर पुरस्कार मिळालेत? आणि 'स्लमगडॉग करोडपती'साठी ए आर रहमानला दोन पुरस्कार कसे मिळाले होते? समजून घेऊ या, या सोपी गोष्टमध्ये लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
Mar 14, 2023•8 min
इस्राएलमध्ये लाखो लोक सरकारविरोधात शनिवारी रस्त्यावर उतरले. गेले दहा आठवडे तिथे निदर्शनं सुरू आहेत आणि या विरोधाचं कारण आहे, पंतप्रधान बेंजमिन नेतन्याहू यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं मांडलेला न्यायव्यवस्थेतल्या बदलांचा प्रस्ताव. नेमके हे बदल काय आहेत? त्याला विरोध का होतो आहे आणि या घडामोडींवर जगानं का लक्ष ठेवायला हवं, जाणून घेऊयात लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 13, 2023•4 min
RSS ची महिला संघटना राष्ट्र सेविका समितीशी निगडित असलेल्या संवर्धिनी न्यास या संस्थेने गरोदर महिलांसाठी गर्भ संस्कार अभियानाची सुरुवात केली आहे. मात्र गर्भावस्थेतले मूल खरंच शब्द किंवा भाषा शिकू शकतो का गर्भावस्थेत मूल काही आवाजांना प्रतीक्रिया देतं, पण त्या ध्वनीचा अर्थ बाळांना कळतो का? ? विज्ञानात याबाबत मतमतांतरं आहेत. संशोधन – सुशीला सिंग लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – निलेश भोसले
Mar 09, 2023•5 min
बाबा रोज घराबाहेर पडतात. आई दिवसभर बहुदा घरातच राहते आणि क्वचितच, आठवड्यातून एकदा वगैरे बाहेर जाते असं चित्र भारतात अनेक घरांमध्ये दिसतं. काही मोजक्या शहरांचा, प्रदेशांचा अपवाद सोडला तर भारतीय शहरांमध्ये महिलांचं घराबाहेर पडण्याचं प्रमाण बरंच कमी आहे, असं एका नव्या अभ्यासातून पुन्हा समोर आलं आहे. नेमकी यामागची कारणं काय आहेत आणि ही परिस्थिती बदलणं का महत्त्वाचं आहे, जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – सौतिक बिस्वास लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – शरद बढे...
Mar 08, 2023•6 min
दरवर्षी 8 मार्चला जगभरात महिला दिन साजरा केला जातो. या दिवसामागे महिला हक्कांसाठी लढ्याची एक शतकाहून अधिक जुनी परंपरा आहे. तसंच महिला दिनाच्या कार्यक्रमांमध्ये, सेलिब्रेशन किंवा आंदोलनामध्ये जांभळ्या रंगाचा वापर केला जातो. यामागची कारणं काय आहेत? पुरुष दिवसही कधी साजरा केला जातो का? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 07, 2023•5 min
होळी, धुळवड आणि रंगपंचमीला रंग खेळताना जरा सावधच राहा असा इशारा डॉक्टर्स देतात. पण म्हणजे नेमकी काय काळजी घ्यायची, याविषयी आम्ही त्वचारोगतज्ज्ञांना विचारलं. रंग साफ कसे करायचे, कुठल्या परिस्थित डॉक्टरांची मदत घ्यायची, जाणून घ्या. संशोधन – बुशरा शेख लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 06, 2023•7 min
विधिमंडळाला 'चोरमंडळ' म्हटल्यावरून विधानसभेत खासदार संजय राऊत यांच्याविरोधात भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. त्यावर नेमकं पुढे काय होणार हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होईल. पण यानिमित्तानं विधिमंडळाचे विशेषाधिकार आणि हक्कभंग पुन्हा चर्चेत आले आहेत. हक्कभंग म्हणजे नेमकं काय असतं, त्याची प्रक्रिया काय आहे आणि संजय राऊतांवर काय कारवाई होऊ शकते, जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Mar 02, 2023•6 min
तुम्ही किंवा तुमचे आईबाबा, किंवा आणखी कुणीही नोकरी करत असेल, तर एक प्रश्न नेहमी चर्चेत असतो – 60नंतर काय? पेन्शन आहे का? आपल्यापैकी काही जणांना पेन्शन मिळतही असेल किंवा काही जण पेन्शनसाठी झगडत असतील. पण आता सुप्रीम कोर्टाच्या एका आदेशामुळे काही आजी-माजी कर्मचाऱ्यांना वाढीव पेन्शनचा मार्ग मोकळा झाला आहे. ही EPS, EPF, EPFO ची भानगड आहे तरी काय? लाखो आजी-माजी कर्मचाऱ्यांचं पेन्शन वाढण्यासाठी 3 मार्च ही तारीख का महत्त्वाची आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. वार्तांकन – टीम बीबीसी लेखन, निवेद...
Feb 28, 2023•7 min
गेल्या दोन आठवड्यांत महाराष्ट्रासह उत्तर भारतातही उष्णता चांगलीच जाणवू लागली आहे. त्यातच पॅसिफिक महासागरात एल निनोची स्थिती निर्माण होईल असं भाकितही अमेरिकेतील हवामानतज्ज्ञांनी केलंय. याचा भारतातल्या हवामानावर काही परिणाम होईल का? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Feb 28, 2023•5 min
इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीचं किमान वय सहा वर्ष हे निश्चित करण्यात आलं असून, ते काटेकोरपणे पाळलं जावं असे केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने सगळ्या राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना पुन्हा एकदा दिलेत. आता हे वय सहा वर्ष असं कोणी निश्चित केले?शाळेत जाण्याचे योग्य वय काय आहे, जाणून घेऊयात लेखन – जान्हवी मुळे निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Feb 23, 2023•5 min
ब्रिटिश ब्रॉडकास्टिंग कॉर्पोरेशन, हे नाव तुम्ही, तुमच्या आईवडिलांनी आणि तुमच्या आजीआजोबांनीसुद्धा ऐकलंय, पाहिलंय आणि वाचलंयसुद्धा. पण ही संस्था नेमकी काय आहे? ती कशी काम करते? तिला पैसा नेमका कुठून येतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
Feb 21, 2023•6 min
एअर इंडिया 470 नवीन विमानं खरेदी करतेय. कशी असतील ही विमानं आणि यामुळे भारताच्या हवाई प्रवासाला टेकऑफ करता येईल का? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – टीम बीबीसी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Feb 18, 2023•6 min
तुर्की आणि सीरियात आलेल्या शक्तिशाली भूकंपामुळे हजारो लोकांचा जीव गेला. 6 फेब्रुवारीला इथे भूकंपाचे धक्के जाणवले होते पण दहा दिवसांनीही बचाव कार्य संपलेलं नाही. अनेक ठिकाणी ढिगारे उपसण्याचं काम सुरू आहे. भारताच्या NDRFच्या टीमनंमही इथे ऑपरेशन दोस्त अंतर्गत मदत कार्याला हातभार लावला आहे. पण अशा आपत्तीनंतर ही बचाव पथक नेमकं कसं काम करतात? संशोधन – टीम बीबीसी लेखन - जान्हवी मुळे निवेदन – विशाखा निकम एडिटिंग – अरविंद पारेकर
Feb 17, 2023•5 min
तुर्की आणि सीरियात झालेल्या भूकंपानंतर भारतात आणि महाराष्ट्रात अशी आपत्ती ओढवण्याची शक्यता किती आहे, याविषयी चर्चा होते आहे. महाराष्ट्रातल्या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरांना अशा भूकंपाचा खरंच किती धोका आहे? इथे मोठा भूकंप कधी झाला होता? बांधकामं करताना आणि अशा इमारतीत राहताना काय काळजी घ्यायला हवी, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Feb 15, 2023•6 min
तुर्की आणि जपान या दोन्ही देशांना भूकंपाचा मोठा धोका असतो. पण एकीकडे जपानमध्ये गेल्या वर्षी आलेल्या भूकंपात तीनच जणांचा जीव गेला. तर दुसरीकडे, तुर्की आणि सीरियात यंदा आलेल्या भूकंपात मृतांचा आकडा ३३ हजारांवर गेलाय. हे एवढं नुकसान कशानं झालं? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Feb 13, 2023•5 min
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला, आणि त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय. त्यांनी नंतर तो शूट करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Feb 11, 2023•5 min
काही दिवसांपूर्वी अमेरिकेच्या आकाशात एक हॉट एअर बलून दिसला. त्यांना वाटलं तो चीनसाठी हेरगिरी करतोय, आणि नंतर त्यांनी तो लक्ष्य करून पाडून टाकला. पण एक प्रश्न पडतो – सॅटलाईटच्या काळात कुणी असा फुगा का वापरेल? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन : गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Feb 11, 2023•5 min
पंतप्रधान नरेंद्र मोदी 10 फेब्रुवारीच्या मुंबई दौऱ्यादरम्यान बोहरा मुस्लिम समुदायाच्या एका कार्यक्रमात सहभागी होतील. अंधेरी पूर्व मधल्या मरोळ इथे 'अरेबिक अकादमी'च्या उद्घाटनप्रसंगी मोदी उपस्थित राहणार आहेत. मोदींच्या या कार्यक्रमाचा संबंध मुंबईसह राज्यात नजीकच्या भविष्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकांशी आहे का अशी चर्चा सुरू आहे. पण खरंच असं आहे का? दाऊदी बोहरा मुस्लीम कोण आहेत आणि त्यांचं मुंबईतलं स्थान महत्त्वाचं का आहे? संशोधन – मयुरेश कोण्णूर निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर...
Feb 09, 2023•5 min