सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

SIP की एकरकमी मोठी रक्कम? म्युच्युअल फंडमध्ये कशी गुंतवणूक फायद्याची?

सोशल मीडियावर सध्या फायनान्शियन इन्फ्लुएन्सर्स - ज्यांना हल्ली Finfluencers म्हटलं जातं, त्यांची भरपूर रील्स SIP, Mutual Funds याबद्दल असतात. इतके पैसे गुंतवलेत, तर इतक्या काळाने इतके लाख वा कोटी होतील असं सांगितलं जातं... म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताना एकदाच मोठी रक्कम गुंतवणं चांगलं की SIP करणं? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

Dec 30, 20244 min

PPF खात्यात पैसे गुंतवण्याचे काय फायदे असतात? त्याची प्रक्रिया काय असते? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

गुंतवणूक करताना ती एकाच ठिकाणी न करता वेगवेगळ्या पर्यायांमध्ये विभागून करा असं सगळे गुंतवणूक सल्लागार सांगतात. प्रत्येक पर्यायाचं स्वरूप वेगळं असतं... त्यातली जोखीम वेगवेगळी असते. जोखीम कमी असणारा, स्थिर परतावा देणारा गुंतवणुकीचा एक पर्याय म्हणजे PPF - पब्लिक प्रॉव्हिडंट फंड. काय आहे ही योजना, यात गुंतवणूक कशी करायची आणि याचे फायदे काय आहेत. समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये... रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - शरद बढे

Dec 25, 20244 min

डोनाल्ड ट्रम्प या भारतीयांना अमेरिकेतून बाहेर काढणार का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

20 जानेवारी 2025 ला डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष होतील, त्यानंतर तब्बल 18,000 भारतीयांवर अमेरिकेतून परत पाठवलं जाण्याची - Deportation ची टांगती तलवार असणार आहे. का करण्यात येणार आहे ही कारवाई? डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर इमिग्रेशनबद्दलची धोरणं कशी बदलण्याचा अंदाज आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये

Dec 25, 20246 min

प्लास्टिकबद्दलची 'ही' धक्कादायक गोष्ट माहितीये का? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

प्लास्टिक ही गोष्ट अचंबित करणारी आहे. म्हणजे, या प्लास्टिकमुळे जगभरात ताजं अन्नं एका ठिकाणाहून दुसरीकडे पाठवलं जाऊ शकतं. हे प्लास्टिक आपल्याला ऊब देतं.. किंवा थंड ठेवतं..पावसापासून कोरडं ठेवतं. लशी - औषधांची मोठ्या प्रमाणात अब्जावधी लोकांसाठी जगाच्या एका टोकापासून दुसरीकडे सुरक्षित वाहतूकही प्लास्टिकमुळे शक्य होते. पण जसे फायदे तसे तोटे... याच प्लास्टिकचं आपल्या मातीतलं - आपल्या समुद्रांमधलं - अगदी प्राण्यांच्या, पक्ष्यांच्या आणि माशांच्या पोटातलं प्रमाण दिवसेंदिवस वाढतंय. आता पृथ्वीवर असलेल्या ...

Dec 23, 20247 min

EPF - एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News

दर महिन्याला पगारातून प्रॉव्हिडंट फंडची रक्कम कापली जाते. तितकीच रक्कम तुम्ही जिथे नोकरी करता ती कंपनी वा संस्थाही तुमच्या खात्यात भरत असते आणि त्यातून तुमच्या निवृत्तीच्या पेन्शनची तजवीज होते. पेन्शनची ही रक्कम कशी मोजायची? EPF - म्हणजे एम्प्लॉईज प्रॉव्हिडंट फंड काय आहे? या EPFO चे नियम समजून घेऊ आजच्या सोपी गोष्टमधून रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

Dec 21, 20245 min

सुनीता विल्यम्स यांचा अंतराळातला मुक्काम वाढला कारण... | सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अडकलेले अंतराळवीर - सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांचं पृथ्वीवर परतणं पुन्हा लांबणीवर गेलंय. जून 2024 मध्ये आठ दिवसांच्या मोहीमेसाठी बोईंग स्टारलायनरमधून गेलेले अंतराळवीर बोईंगच्या यानातल्या तांत्रिक अडचणींमुळे इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्येच अडकले आहेत. फेब्रुवारी 2025 हे अंतराळवीर पृथ्वीवर परततील असं नासाकडून यापूर्वी सांगण्यात आलं होतं. पण आता या अंतराळवीरांना परत आणण्यासाठी जाणाऱ्या यानाचा लाँच पुढे गेलाय. नेमकं काय झालं? सुनीता विल्यम्स - बुच विल्मोर यांचा परतीचा...

Dec 20, 20245 min

मुंबई शहरात फेरी बोटींसाठी काय नियम आहेत? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

नीलकमल बोटीला अपघात झाला त्यावेळी बचावासाठीच्या कोणत्याही पूर्वसूचना देण्यात आलेल्या नव्हत्या, कोणीही लाईफजॅकेट घातलं नव्हतं, बोट बुडायला लागल्यावर जॅकेट्स घातली असं या अपघातातून बचावलेल्यांनी सांगितलंय. बोटींच्या सुरक्षिततेसाठी काय नियम आहेत? त्यांच्या अंमलबजावणीची जबाबदारी कुणाची? पाहा, आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

Dec 19, 20246 min

फिटनेस ट्रॅकर वापरल्याने मानसिक आरोग्यावर काय परिणाम होतोय?

मोबाईल फोनसाठीची ऍक्सेसरी म्हणून सुरुवातीला बाजारात आलेली Wearable Technology म्हणजे तुम्ही अंगावर घालून फिरू शकता अशा गॅजेट्समध्ये गेल्या 10 वर्षांमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. फिटनेस बँड्स, वॉचेस आणि आता अगदी रिंग्स बाजारात आहेत. ही टेक्नॉलॉजी काही प्रमाणात फायद्याची ठरतेय. पण यामुळे काही वेगळ्याच गंभीर समस्याही उभ्या राहतायत. आजच्या सोपी गोष्टमध्ये समजून घेऊयात फिटनेस ट्रॅकर्स तुमच्यासाठी धोकादायक कसे ठरू शकतात... आणि त्यासाठी काय करायचं... रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निले...

Dec 16, 20246 min

भारताच्या अर्थव्यवस्थेची प्रगती का मंदावली? सोपी गोष्ट

जीडीपीची ताजी आकडेवारी सांगते की जुलै ते सप्टेंबर या काळामध्ये भारतीय अर्थव्यवस्थेच्या प्रगतीचा हा दर 5.4% वर आलाय. गेल्या सात तिमाहींमधला हा निचांकी दर आहे आणि रिझर्व्ह बँकेने व्यक्त केलेल्या 7 टक्क्यांच्या अंदाजापेक्षा बराच कमी देखील आहे. भारतीय अर्थव्यवस्था मंदावतेय का? काय कारणं आहेत यामागे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

Dec 16, 20245 min

रिटायरमेंट प्लानिंगसाठीचा NPS चा पर्याय काय आहे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

रिटायरमेंट प्लानिंग.. म्हणजे निवृत्तीनंतरची तजवीज... म्हणजे वयाच्या एका ठराविक टप्प्यानंतर आपल्याकडे किती पैसे असायला हवेत, पैशांचा नियमित स्त्रोत कुठून - कसा सुरू राहू शकतो वगैरे गोष्टी. तज्ज्ञांच्या मते तुम्ही नोकरी करायला सुरुवात करता, तेव्हाच रिटायरमेंट प्लानिंगला सुरुवात करायला हवी. यासाठी अनेक मार्ग आहेत. पण आज आपण जाणून घेऊ यासाठीचा एक मार्ग NPS - म्हणजे National Pension Scheme बद्दल आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - दिनेश उप्रेती निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

Dec 10, 20245 min

सुनीता विल्यम्स अंतराळात शेती का करतायत? सोपी गोष्ट पॉडकास्ट

सुनीता विल्यम्स अंतराळात लेट्यूस उगवून पाहतायत. अंतराळात शेती करता येते का? अंतराळात शेती करून काय साध्य होणारे? यापूर्वी असा प्रयोग झालाय का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

Dec 10, 20245 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सीरियातल्या घडामोडींचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो?

गेल्या 14 वर्षांपासून सुरू असलेल्या गृहयुद्धाला आता सीरियात नवे वळण मिळाले आहे. असद कुटुंबाची 53 वर्षांपासून असलेली सत्ता उलथून टाकण्यात बंडखोरांना यश आले आहे. सशस्त्र बंडखोर गट हयात-तहरीर-अल-शामच्या नेतृत्त्वात असद सरकारविरोधात मोहीम सुरू झाली होती. एकापाठोपाठ एक अनेक शहरांवर या बंडखोर गटाने ताबा मिळवला.अवघ्या 11 दिवसांत 50 हून अधिक वर्षांची राजवट उद्ध्वस्त झाली. सीरियातील या घडामोडांनंतर अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. या बदलाचे त्या देशावर, मध्य-पूर्वेतल्या भूभागावर तर परिणाम होतीलच पण सोब...

Dec 10, 20246 min

गुगल मॅप्स काम कसे करतात? ते चुकतात कशामुळे? सोपी गोष्ट पॉडकास्ट

उत्तर प्रदेशातल्या बरेलीमध्ये अर्धवट बांधकाम झालेल्या पुलावरून कार कोसळल्याने तीन जणांचा मृत्यू झाला. गुगल मॅप्सनुसार गाडी चालवत निघालेल्या या लोकांनी मॅपमध्ये दाखवलेला रस्ता निवडला आणि अपघात झाल्याचं सांगितलं जातंय. गुगल मॅप्सचं काम नेमकं कसं होतं? कोणत्या रस्त्याने जायचं, ट्रॅफिक किती आहे, हे कसं मोजलं जातं? आणि या अॅपकडूनही माहिती देताना चुका कशा होऊ शकतात? पहा सोपी गोष्ट रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

Dec 10, 20246 min

म्युच्युअल फंड म्हणजे काय? त्यातल्या गुंतवणुकीचे धोके काय आहेत? सोपी गोष्ट

म्युच्युअल फंड म्हणजे काय? या म्युच्युअल फंडमध्ये कोणते प्रकार आहेत? त्यामध्ये गुंतवणूक कशी करायची? आणि मुख्य म्हणजे त्यामध्ये धोके कोणते आहेत? पहा सोपी गोष्ट रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

Dec 10, 20246 min

डाएटमुळे कॅन्सर बरा होऊ शकतो का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

माजी भारतीय क्रिकेटर नवज्योत सिंग सिद्धू यांनी एक पत्रकार परिषद घेत आपली पत्नी नवज्योत कौर कॅन्सरमधून पूर्णपणे बरी झाल्याचं जाहीर केलं. हे सगळं पत्नीने पाळलेल्या एका विशेष डाएटमुळे झालं, असा दावा सिद्धू यांनी केलाय. त्यांचा हा व्हीडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय. 'आपल्या पत्नीची कॅन्सरसाठीची ट्रीटमेंट सुरू होती, किमोथेरपी - रेडिएशन करण्यात आलं होतं, पण बायको वाचण्याची शक्यता अगदी कमी असल्याचं डॉक्टरांनी म्हटलं होतं, पण डाएटच्या जोरावर तिचा स्टेज 4 कॅन्सर पूर्ण बरा झाला,' असा दावा सिद्धू य...

Nov 26, 20246 min

गौतम अदानींनी भारतात लाच दिल्याचा आरोप, अमेरिका कारवाई का करतंय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

गौतम अदानींच्या नावे न्यूयॉर्कच्या न्यायालयात आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. अझुर पॉवर (Azure Power) आणि अदानी ग्रीन एनर्जी या कंपन्यांशी संबंधित हे प्रकरण आहे. SECI सोबतचा करार व्हावा म्हणून लाच देण्याची योजना आखल्याचा आरोप अदानींवर करण्यात आलाय.अदानी ग्रीन एनर्जी कंपनीने कर्ज आणि बाँड्सद्वारे वेगवेगळ्या गुंतवणूकदारांकडून 3 अब्ज डॉलर्स उभे केले. आंतरराष्ट्रीय आणि अमेरिकन गुंतवणूकदारांकडून भांडवल उभारताना अदानींनी आपल्या कंपनीच्या लाचविरोधी धोरणांविषयी चुकीची आणि फसवी माहिती दिल्याचाही आरोप अमेरिके...

Nov 26, 20246 min

गृह कर्जाचं गणित नेमकं कसं असतं? कर्ज लवकर कसं फेडायचं? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

घर विकत घेण्यासाठी घेण्यात येणारं कर्ज म्हणजे होमलोन. हे गृहकर्ज घेताना अनेक गोष्टींचा अभ्यास करावा लागतो. कोण कोणत्या गोष्टींची काळजी घ्यायला हवी? गृहकर्जाचा हप्ता कसा मोजला जातो? आपल्यासाठी योग्य कालावधी कसा ठरवायचा? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये लेखन आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

Nov 26, 20245 min

रशियात हल्ले करायला दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रं वापरण्याची परवानगी, युक्रेनला काय फायदा होईल? BBC News Marathi | सोपी गोष्ट

रशियाविरुद्धच्या युद्धामध्ये युक्रेनला अमेरिका, युकेसारख्या देशांचं पाठबळ मिळतंय. पण आता त्यांना या देशांकडून देण्यात आलेली लांब पल्ल्याची क्षेपणास्त्रं रशियाच्या भूमीत हल्ला करण्यासाठी वापरता येणार आहेत. शिवाय अमेरिका युक्रेनला Landmines म्हणजे भू सुरुंग पुरवणार आहे. यामुळे युद्धामधली बाजी युक्रेन पलटवू शकेल का? जो बायडन यांच्याजागी डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर काय होईल? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले...

Nov 26, 20245 min

एक्झिट पोल्सचे अंदाज का चुकतात? ते कसे केले जातात? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

निवडणुकीसाठीचं मतदान झाल्यानंतर एक्झिट पोल्सचे आकडे झळकायला लागतात. विविध संस्थांनी केलेल्या या पाहण्यांच्या अंदाजात अनेकदा मोठी तफावत असते. तर प्रत्यक्ष निकाल आल्यानंतरही एक्झिट पोल्सनी मांडलेले अंदाज चुकल्याचं लक्षात येतं. असं का होतं? एक्झिट पोल्स कसे करतात? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : निलेश भोसले

Nov 26, 20246 min

समुद्राखाली ज्वालामुखी कसा काय? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

समुद्राखालीही ज्वालामुखी आहेत - हे तुम्हाला माहित्येय का? यातले काही सक्रीय आहेत. तर काही निद्रिस्त आहेत. संशोधकांना आर्क्टिक समुद्राच्या तळाशी एक प्रचंड मोठा ज्वालामुखी सापडलाय. अमेरिकन कोस्ट गार्डच्या icebraker हीली (Healy) या जहाजावरच्या संशोधकांच्या क्रू ला हा शोध लागलाय. जाणून घेऊयात याच ज्वालामुखीबद्दल आजच्या सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

Nov 26, 20245 min

मुलांच्या वाढीवर जातीचा कसा परिणाम होतोय? BBC News Marathi

लहान मुलांची उंची त्यांच्या वयासाठी अपेक्षित उंचीइतकी नसेल, तर याला Stunting - वाढ खुंटणं म्हटलं जातं. पुरेसं पोषण मिळत नसल्याची ही खूण असल्याचं मानलं जातं. भारतामध्ये आणि आफ्रिकेतल्या सहारा वाळवंटाच्या दक्षिणेकडच्या देशांमध्ये - म्हणजे Sub Saharan Africa भागामध्ये लहान मुलांची वाढ अशी खुंटण्याचं प्रमाण अधिक आहे. भारतातलं हे प्रमाण सहारा वाळवंटाखालच्या आफ्रिकन देशांपेक्षाही अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय.यासाठी अनेक गोष्टी कारणीभूत ठरत असल्या तरी सगळ्यात महत्त्वाचं कारण ठरतोय - जातीभेद. ...

Nov 19, 20246 min

क्रेडिट कार्डचं बिल कसं भरताना काय खबरदारी घ्यायची? BBC News Marathi

क्रेडिट कार्डच्या वापराबद्दल अनेक समज गैरसमज आहेत. हे कार्ड वापरण्यात खरंच खूप धोके आहेत का? त्याचा वापर करताना आपण कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात? रोजच्या व्यवहारात क्रेडिट कार्ड वापरून आपला काही फायदादेखील होऊ शकतो का? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

Nov 19, 20245 min

डोनाल्ड ट्रम्प निवडून आल्यामुळे रुपया घसरला? महागाई वाढणार का? BBC News Marathi

गेल्या काही दिवसांत डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरामध्ये मोठी घसरण होत, रुपयाने निचांक गाठलाय. यासाठी वेगवेगळ्या गोष्टी कारणीभूत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचा अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय झाल्याने रुपयाच्या दरावर त्याचा काय परिणाम झालाय? आणि या गोष्टीचा सामान्य नागरिकांच्या आयुष्यावर काय परिणाम होतो? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : मयुरेश वायंगणकर

Nov 19, 20244 min

सुनीता विल्यम्स यांची अंतराळात तब्येत बिघडतेय का? BBC News marathi

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधल्या एका फोटोवरून जगभरातल्या लोकांना सुनीता विल्यम्स यांच्या तब्येतीची काळजी वाटली. बोईंग स्टारलायनरमधून 8 दिवसांच्या चाचणी मोहीमेसाठी अंतराळात गेलेले सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर हे स्टारलायनरमधल्या बिघाडांमुळे अंतराळ स्थानकातच अडकले. प्रवाशांना परत घेऊन येण्यासाठी स्टारलायनर सुरक्षित न ठरल्याने सप्टेंबर 2024 मध्ये हे यान रिकामंच पृथ्वीवर परत आणलं गेलं. फेब्रुवारी 2024 मध्ये सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर स्पेस एक्स्च्या यानाने पृथ्वीवर परततील. अंतराळातल्या या प्रदीर...

Nov 13, 20245 min

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयाचा हवामान बदल रोखण्याच्या प्रयत्नांवर काय परिणाम होईल? सोपी गोष्ट BBC News Marathi

डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेचे नवीन राष्ट्राध्यक्ष झाल्याने हवामान बदल रोखण्यासाठीच्या प्रयत्नांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जातेय. डोनाल्ड ट्रम्प यांनी हवामान बदल हा एक भ्रम, स्कॅम असल्याचं यापूर्वी म्हटलं होतं. तर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या कार्यकाळात त्यांनी अमेरिकेचा पॅरिस करारातला सहभाग काढून घेतला होता. यावेळीही ते बाहेर पडतील अशी भीती व्यक्त करण्यात येतेय. ट्रम्प यांच्या विजयामुळे काय आणि कसे परिणाम होऊ शकतात? जगभरातल्या पर्यावरण तज्ज्ञांना ही भीती का वाटतेय? समजून घेऊयात सो...

Nov 11, 20245 min

बिटकॉईनचा शोध लावणाऱ्या सातोशी नाकामोटोंचं गूढ! सोपी गोष्ट BBC News Marathi

जागतिक क्रिप्टोकरन्सी मार्केटमध्ये बिटकॉईनचं स्थान महत्त्वाचं आहे. अब्जावधींचं मूल्य असणाऱ्या बिटकॉईनचा शोध लावणारी व्यक्ती - सातोशी नाकामोटो, नेमकी कोण आहे, हे अजूनही जगाला माहिती नाही. ही व्यक्ती कशी दिसते, किती वयाची आहे हे स्पष्ट झालं नाही. आजवर अनेकांनी आपणच सातोशी नाकामोटो असल्याचा दावा केलाय. पण हे दावे खरे ठरलेले नाहीत. काय अजून माहिती आहे या सातोशी नाकामोटोंबद्दल... समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

Nov 11, 20245 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android