सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

डेंग्यू, झिका या रोगांचा प्रसार ही अचाट पद्धत रोखेल? BBC News Marathi

डासांद्वारे पसरणाऱ्या डेंग्यू, यलो फीव्हर आणि झिकासारख्या आजारांना रोखण्यासाठी संशोधकांनी एक अनोखा मार्ग शोधून काढलाय. नर डासांना बधीर केल्यास त्यांचं मादीसोबत मिलन होऊ शकत नाही आणि परिणामी पैदास होत नसल्याचं संशोधनात आढळलंय. कोणत्या प्रजातीच्या डासांवर हे संशोधन करण्यात आलं? आणि ऐकण्याची क्षमता डासांसाठी इतकी महत्त्वाची का आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - मिशेल रॉबर्ट्स निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

Nov 07, 20243 min

इस्रोने लेहमध्ये सुरू केलेलं ॲनालॉग स्पेस मिशन काय आहे? BBC News Marathi

इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन म्हणजेच इस्रोने (ISRO) भारताचं पहिलं अॅनालॉग स्पेस मिशन (Analog Space Mission) लेहमध्ये सुरू करत असल्याचं जाहीर केलंय. भविष्यातल्या अंतराळ मोहीमांसाठीची तयारी म्हणूनच पृथ्वीवर करण्यात येणारी ही तयारी असते. ह्यूमन स्पेसफ्लाईट सेंटर, इस्रो, AAKA स्पेस स्टुडियो, युनिव्हर्सिटी ऑफ लडाख, IIT मुंबई या सगळ्यांनी मिळून आणि लडाख अटॉनॉमस हिल डेव्हलपमेंट काऊन्सिलच्या मदतीने या मोहीमेला सुरुवात करण्यात आली आहे. ॲनालॉग स्पेस मिशन काय आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट आण...

Nov 07, 20245 min

सोपी गोष्ट: 'तुम्हाला डिजिटल अरेस्ट होतेय, हा फोन कट करू नका नाहीतर...'

पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही त्यांच्या ताज्या ‘मन की बात’मध्ये डिजिटल अरेस्टचा उल्लेख केला. आपण पोलीस वा तपास अधिकारी असल्याचं भासवत एखाद्या व्यक्तीला वेठीला धरून पैसे उकळण्याचा हा प्रकार आहे. डिजीटल अरेस्ट म्हणजे नेमकं काय? खरंच पोलीस असं कुणाला डिजिटल अरेस्ट करू शकतात का? फ्रॉडचा हा नवा प्रकार काय आहे? त्यापासून सावध कसं रहायचं? आजची सोपी गोष्ट याचबद्दल. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 29, 20245 min

ग्लासगो कॉमनवेल्थ स्पर्धांमधून हे 9 खेळ का वगळण्यात आले? | BBC News Marathi

कॉमनवेल्थ ही जगभरातल्या देशांची संघटना आहे ज्यातल्या देशांचा ब्रिटीश साम्राज्याशी ऐतिहासिक संबंध आहे वा होता. युनायटेड किंग्डमसह या कॉमनवेल्थमध्ये 54 देश आहेत. राष्ट्रकुल स्पर्धा 1930 मध्ये सुरू झालेल्या या स्पर्धा दर 4 वर्षांनी होतात आणि यामध्ये वेगवेगळ्या खेळांचा समावेश असतो. 2026 च्या राष्ट्रकुल स्पर्धा ग्लासगोमध्ये होणार आहेत. आणि हे आयोजन करताना आयोजकांनी 19 पैकी तब्बल 9 खेळ वगळले आहेत.असं का करण्यात आलं? भारतीय अॅथलीट्सची यावर प्रतिक्रिया काय आहे? आणि मुळात कॉमनवेल्थ स्पर्धा आता गरजेच्या आ...

Oct 24, 20245 min

इलॉन मस्क आणि मुकेश अंबानी यांच्यात भारतातल्या इंटरनेटसाठी चढाओढ का? | BBC News Marathi

भारत ही इंटरनेट क्षेत्रासाठी जगातली एक महत्त्वाची बाजारपेठ आहे आणि भारतातल्या सॅटलाईट ब्रॉडबँड मार्केटमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सध्या जगातल्या दोन सर्वाधिक श्रीमंत व्यक्तींमध्ये चढाओढ सुरू आहे. या दोन व्यक्ती आहेत टेस्ला, एक्स, स्पेस एक्स या कंपन्यांचे मालक इलॉन मस्क आणि भारतीय अब्जाधीश, रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष आणि कार्यकारी संचालक मुकेश अंबानी. मस्क आणि अंबानींमध्ये नेमकी कोणत्या क्षेत्रात चढाओढ सुरू आहे? हे क्षेत्र इतकं महत्त्वाचं का आहे? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून रिपोर्ट ...

Oct 23, 20247 min

US निवडणुकीत इलॉन मस्क, टेलर स्विफ्ट हे ट्रंप, कमला हॅरिस यांना जिंकवणार? BBC News Marathi

प्रसिद्ध व्यक्तींकडून दुसऱ्या एखाद्या क्षेत्रातली व्यक्ती, वस्तू, सेवा वा उत्पादनाविषयी सांगितलं जाणं वा त्याची जाहिरात करणं, ही पद्धत जगभर प्रचलित आहे. आणि हे राजकारणातही केलं जातं. म्हणजे भारतात होताना तर आपण पाहिलंच आहे. पण सध्या अमेरिकेत त्यांच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार सुरू आहे आणि तिथेही दोन्ही पक्षांच्या उमेदवारांच्या बाजूने अनेक सेलिब्रिटी मैदानात उतरलेयत. याचा ट्रम्प वा हॅरिस यांना किती फायदा होतोय? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिं...

Oct 22, 20246 min

महाराष्ट्रातून मान्सून परतला, पण अजूनही पाऊस का पडतोय? | BBC News Marathi

देशातून मान्सून परतला, असं हवामान विभागाने 15 ऑक्टोबरला जाहीर केलं होतं. पण असं असलं तरी राज्यात अनेक ठिकाणी गेले काही दिवस भरपूर पाऊस पडलेला आहे. हा पाऊस कशामुळे पडतोय? हा अवकाळी पाऊस आहे का? राज्यात थंडी कधी येईल? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

Oct 21, 20244 min

व्हॉट्सअॅपवरून मेसेज पाठवायला पैसे लागत नाहीत, मग ते पैसे कसे कमवतं? | BBC News Marathi

व्हॉट्सॲप हे मेसेजिंग ॲप Meta य़ा कंपनीच्या मालकीचं आहे. फेसबुक आणि इन्स्टाग्रामही याच मेटा कंपनीच्या मालकीचे आहेत. व्हॉट्सॲपवरून मेसेज पाठवण्यासाठी आपल्याला पैसे द्यावे लागत नाहीत. भारतामध्ये व्हॉट्सॲपचे दरमहा 50 कोटींपेक्षा अधिक ॲक्टिव्ह युजर्स आहेत. मग व्हॉट्सॲप पैसे कसे कमवतं? समजून घेऊयात या सोपी गोष्टमधून रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

Oct 18, 20246 min

NASA Europa Clipper निघालंय गुरू ग्रहाच्या चंद्रावरची जीवसृष्टी शोधायला | BBC News Marathi

गुरू ग्रहाच्या (Jupiter) युरोपा (Europa) नावाच्या चंद्राच्या दिशेने नासाचं युरोपा क्लिपर (Europa Clipper) हे अंतराळ यान झेपावलंय. ही फक्त युरोपावर आयुष्याच्या खुणा शोधणारी ही मोहीम नाही. तर युरोपावर जीवसृष्टी निर्माण होण्याजोगी परिस्थिती आहे का, हे याद्वारे शोधलं जाईल. गुरूचा हा युरोपा नावाचा चंद्र कसा आहे? आणि त्याकडे जाणारं हे यान कसं आहे? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

Oct 17, 20245 min

THAAD: US इस्रायलला अँटी-मिसाईल सिस्टिम का देतंय? | BBC News Marathi

1 ऑक्टोबरला इराणने इस्रायलवर 200 बॅलिस्टिक क्षेपणास्त्रं डागली होती. यातली बहुतेक आकाशातच नष्ट करण्यात आल्याचं इस्रायली लष्कराने म्हटलं होतं पण त्यातली अनेक मध्य आणि दक्षिण इस्रायलमध्ये पडली. या हल्ल्याला अजून इस्रायलने प्रत्युत्तर दिलेलं नाही. आणि आता इस्रायलला त्यांची हवाई हल्ल्यांपासूनची सुरक्षा वाढवण्यासाठी High Altitude Anti - Missile System म्हणजे अधिक उंचीवरून येणारी क्षेपणास्त्रं रोखणारी यंत्रणा आणि त्यासाठीचं लष्करी पथक पुरवणार असल्याचं अमेरिकेने जाहीर केलंय. अमेरिकेने इस्रायलला दिलेली ...

Oct 16, 20245 min

खलिस्तानच्या मुद्द्यावरून 40 वर्षांपूर्वीही जेव्हा तणाव निर्माण झाला होता... | BBC News Marathi

भारत आणि कॅनडा या दोन्ही देशांमध्ये तणावाचे वातावरण आहे. दोन्ही देशांनी आपल्या देशातील मुत्सद्द्यांना परतण्याचे आदेश दिले आहेत. पण या दोन देशांमध्ये तणाव निर्माण होण्याची ही पहिली वेळ नाही. जस्टिन ट्रुडो यांचे वडील पिएर ट्रुडो कॅनडाचे पंतप्रधान असतानाही दोन देशांत तणाव निर्माण झाला होता. भारत - कॅनडा संबंधांमध्ये आजपर्यंत काय - काय घडलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

Oct 15, 20247 min

रूप कंवर: भारतातलं शेवटचं सती प्रकरण पुन्हा चर्चेत का आलंय? | BBC News Marathi

राजस्थानच्या दिवरालामध्ये 4 सप्टेंबर 1987 रोजी 18 वर्षांची रूप कंवर तिच्या पतीच्या चितेवर सती गेली. आणि देशभर गदारोळ झाला. ती स्वतःहून सती गेली की तिला असं करण्यास भाग पडलं गेलं यावरून वाद झाले. याचे सामाजिक, राजकीय आणि कायदेशीर पडसादही उमटले. भारतातलं हे सतीचं शेवटचं प्रकरण होतं. रूप कंवरच्या मृत्यूनंतर काय घडलं होतं? आता 37 वर्षांनंतर हे प्रकरण पुन्हा का चर्चेत आलंय? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

Oct 14, 20245 min

हे यान लघुग्रह पृथ्वीवर धडकण्यापासून वाचवेल | BBC News Marathi

पृथ्वीच्या दिशेने जर एखादा लघुग्रह येत असेल तर तो पृथ्वीवर आदळण्यापासून रोखण्यासाठी आपल्याला काही करता येईल का, हे शोधणारं हेरा आंतरराष्ट्रीय मिशन नुकतंच झेपावलं. दोन वर्षं प्रवास करून हे यान Dimorphos नावाच्या एका अंतराळातल्या लघुग्रहापर्यंत पोहोचेल. हे यान काय करणार आहे? कोणत्या लघुग्रहाच्या दिशेने ते चाललंय?समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. a रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

Oct 14, 20245 min

अंटार्क्टिकातली वाढणारी हिरवळ ही पृथ्वीसाठी धोक्याची घंटा का आहे? BBC News Marathi

अंटार्क्टिकाचं हवामान पृथ्वीवरच्या इतर कोणत्याही ठिकाणापेक्षा कोरडं, वादळी, बर्फाळ आणि थंड आहे. पण अंटार्क्टिकामधली वाढत जाणारी ही हिरवळ मात्र पृथ्वीसाठी धोक्याची घंटा आहे. अंटार्क्टिका प्रदेश हा पृथ्वीचा Thermostat म्हणजे तापमान नियंत्रक मानला जातो. आणि म्हणूनच या भागात होणारे हवामान बदलाचे परिणाम तुमच्या - आमच्या आयुष्यावरही परिणाम करणारे असतील. अंटार्क्टिकात नेमकी कोणती हिरवळ वाढली? त्याचे परिणाम काय होतील? आजची सोपी गोष्ट याचबद्दल रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर...

Oct 09, 20245 min

नोबेल मिळालेले जेफ्री हिंटन यांना Godfather of AI का म्हटलं जातं? BBC News Marathi

जेफ्री हिंटन यांना 2024 साठीचं भौतिकशास्त्राचं नोबेल AI मध्ये पायाभूत संशोधन करणारे जॉन हॉपफील्ड यांच्यासोबत विभागून मिळालंय. जेफ्री हिंटन यांना AIचे जनक का म्हटलं जातं? आणि ज्या तंत्रज्ञानाचा विकास करण्यात त्यांचा इतका मोठा वाटा आहे, तेच त्यांना धोकादायक का वाटतं? आजची सोपी गोष्ट याचबद्दल रिपोर्ट आणि निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 09, 20246 min

अमेरिकेचं राष्ट्राध्यक्षपद जिंकण्यासाठी ही 7 राज्यं ठरणार निर्णायक | BBC News Marathi

अमेरिकेतल्या बहुतेक राज्यांचे कल हे दोनपैकी कोणत्या राजकीय पक्षाच्या बाजूने आहे हे गेल्या काही वर्षांतल्या निवडणुकांमधून स्पष्ट झालंय. रिपब्लिकन पक्षाच्या बाजूने कल असणाऱ्या राज्यांना Red States म्हटलं जातं. तर डेमोक्रॅटिक पक्षाच्या बाजूने असणाऱ्या पक्षांना Blue States म्हटलं जातं. पण जी राज्यं या दोनपैकी कुठल्याही बाजूने झुकू शकतात..किंवा फिरू शकतात, त्यांना Swing States म्हटलं जातं. ही राज्य कोणती आहेत? आणि या राज्यांमध्ये असं काय आहे की ज्यामुळे निवडणुकीचा निकाल फिरू शकतो? आजची सोपी गोष्ट याच...

Oct 08, 20246 min

इस्त्रायल - इराण संघर्षात जगातले कोणते देश कुणाच्या बाजूने?

7 ऑक्टोबर 2023 ला हमासने इस्रायलवर एक मोठा - सुनियोजित हल्ला केला. तेव्हापासून इस्रायलचा गाझा पट्टीत हमाससोबत संघर्ष गेल्या वर्षभरापासून सुरू आहे.यामुळा गाझा आणि वेस्ट बँकमध्ये 40 हजारांपेक्षा जास्त लोकांचा जीव गेलाय. लेबनॉनमधल्या हिजबुल्लासोबतच्या संघर्षाची तीव्रता एकीकडे वाढतेय. इस्रायलने जमीनवरूनही लेबनॉनवर हल्ला केलाय. असतानाच इराणने 1 ऑक्टोबरच्या रात्री इस्रायलवर क्षेपणास्त्रं डागली. लेबनॉन - इस्रायल - इराण संघर्षात जगातले कोणते देश यापैकी कुणाच्या बाजूने आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये ...

Oct 08, 20247 min

माशीच्या मेंदूचा अभ्यास मानवी मेंदू समजून घेण्यासाठी कसा मदत करेल? BBC News Marathi

माश्या म्हटलं की आपल्या डोळ्यांसमोर एक ठराविक चित्र उभं राहतं. पण या माशा चालू शकतात, उडू शकतात, आणि नर माशी मादीला आकृष्ट करण्यासाठी गाणीही म्हणते... मुळातच लहानशा कीटकाच्या शरीरातला टाचणीपेक्षा लहान आकाराचा मेंदू हे सगळं करू शकतो. माशीच्या मेंदूचा अभ्यास करून पहिल्यांदाच या मेंदूतल्या जाळ्याचं चित्र प्रसिद्ध करण्यात आलंय आणि ही न्यूरोसायन्समधली मेंदूबद्दलच्या संशोधनातली प्रचंड मोठी घडामोड असल्याचं म्हटलं जातंय. माशीच्या मेंदूचा अभ्यास का केला? आणि त्याचा माणसाच्या मेंदूशी काय संबंध? आजची सोपी ...

Oct 08, 20245 min

आदिवासी म्हणजे नेमकं कोण? धनगर - धनगड वाद काय आहे?

राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसोबत धनगर समाजाच्या आरक्षणाचा मुद्दाही गाजतोय. सध्या धनगर समाजाचा समावेश भटक्या जमातीत होतो. पण आपल्याला अनुसूचित जमाती संवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी या समाजाकडून केली जातेय. मात्र आदिवासी नेत्यांचा याला विरोध आहे. मग आदिवासी म्हणजे नेमकं कोण? कोणत्याही समुदायाला आदिवासी समूहात समाविष्ट करण्याचे निकष कोणते? भटक्या जमाती आणि आदिवासी यांच्यात फरक काय आहे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - गुलशन वनकर एडिटिंग - अरविंद पा...

Oct 04, 20245 min

सोपी गोष्ट: हिमालयातल्या नदीमुळे वाढतेय एव्हरेस्टची उंची?

जगातलं सर्वोच्च शिखर असणाऱ्या माऊंट एव्हरेस्टचीही उंची वाढतेय आणि अशी उंची वाढण्यामागचं कारण असू शकतं एक नदी. एव्हरेस्टची उंची जितकी असायला हवी, त्यापेक्षा 15 ते 50 मीटर्स जास्त आहे आणि अरुण नदीमुळे हे घडत असल्याची शक्यता असल्याचं एका संशोधनातून समोर आलंय. अरुण नदी कुठून वाहते? शिखरांची उंची वाढण्यात नदीचा काय संबंध? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - अमृता दुर्वे एडिटिंग - अरविंद पारेकर

Oct 03, 20245 min

संतोष हा हिंदी सिनेमा युकेची अधिकृत ऑस्कर एन्ट्री कसा ठरला? BBC News Marathi

'लापता लेडीज' हा सिनेमा या वर्षी भारताकडून ऑस्करसाठी पाठवण्यात येतोय. पण यावर्षी ऑस्करच्या स्पर्धेत आणखी एक हिंदी सिनेमा आहे. आणि युनाटडेट किंग्डमची ऑफिशियल ऑस्कर एन्ट्री आहे. यावर्षी 'संतोष' हा सिनेमा त्यांची ऑस्करसाठीची ऑफिशियल एन्ट्री असल्याचं जाहीर करण्यात आलंय. क हिंदी सिनेमा युकेकडून ऑस्करचा दावेदार कसा ठरतोय? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट - अमृता दुर्वे निवेदन - गुलशन वनकर एडिटिंग - मयुरेश वायंगणकर

Sep 27, 20244 min

इस्रायलने लेबनॉनवर हल्ला का केलाय? हिजबुल्लाहने प्रत्युत्तर कसं दिलं? BBC News Marathi

हिजबुल्लाह या सशस्त्र गटावर इस्रायलने केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये लेबनॉनमध्ये एका दिवसात जवळपास 500 जण मारले गेले तर हजारो जखमी झाले. हा गेल्या काही दशकांमधला सर्वात भीषण हल्ला आहे. हिजबुल्लाहने या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून रॉकेट्स डागली. इस्रायलने लेबनॉनवर हा हल्ला का केला? यामुळे आता मोठ्या युद्धाची स्थिती निर्माण झालीय का? रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

Sep 26, 20246 min

एन्काऊंटर म्हणजे काय? अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला का? BBC News Marathi

एन्काउन्टर म्हणजे काय? पोलीस दलात एन्काउन्टर स्पेशलिस्ट असं पद असतं का? बदलापुरातल्या लहान मुलींवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातला आरोपी अक्षय शिंदेचा पोलिसांच्या ताब्यात असतानाच मृत्यू झाला आणि पुन्हा एकदा एन्काउंटरची चर्चा तापली. एन्काउन्टर म्हणजे नेमकं काय? कायदा याबद्दल काय सांगतो? आणि यापूर्वीची कोणती एन्काऊन्टर्स चर्चेत आली होती? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

Sep 25, 20246 min

पृथ्वीला दोन महिन्यांसाठी मिळणार दुसरा चिमुकला चंद्र | BBC News Marathi

2024 PT5 नावाचा एक लघुग्रह (Asteroid) सप्टेंबर अखेर ते नोव्हेंबरपर्यंत पृथ्वीचा Mini Moon म्हणजे लहानसा चंद्र बनेल. सप्टेंबरच्या अखेरपासून ते नोव्हेंबर पर्यंत पृथ्वीला अजून एक छोटा चंद्र - Mini Moon मिळणार आहे. आपल्या चंद्राच्या सोबतीला येणारा हा चिमुकला चंद्र नेमका काय आहे? आणि तो दोनच महिने पृथ्वीच्या कक्षेत का असेल? रिपोर्ट आणि निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविंद पारेकर

Sep 24, 20244 min

प्रेग्नन्सीदरम्यान बदलतो मेंदू, संशोधनातून झालं सिद्ध | BBC News Marathi

प्रेग्नन्सीच्या काळात विसराळूपणा वाढणं, गोंधळ होणं, अचानक ब्लँक होणं असं झाल्यास त्याला प्रेग्नन्सी ब्रेन किंवा बेबी ब्रेन म्हटलं जातं. पण ही फक्त एक संकल्पना नसून प्रेग्नन्सीच्या काळात मेंदूत खरंच बदल होतात, हे आता अभ्यासातून समोर आलंय. गर्भार राहण्यापूर्वी, गरोदरपणाच्या 9 महिन्यांच्या काळात आणि त्यानंतर मेंदूमध्ये काय बदल होतात याचा पहिल्यांदाच सखोल अभ्यास करण्यात आला आणि त्यामध्ये हे बदल दिसून आले. समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये. रिपोर्ट : टीम बीबीसी निवेदन : अमृता दुर्वे एडिटिंग : अरविं...

Sep 20, 20245 min

हवामानाचा अचूक अंदाज वर्तवण्यासाठीचं 'मिशन मौसम' काय आहे? BBC News Marathi

11 सप्टेंबरला कॅबिनेटने मिशन मौसम नावाच्या योजनेची घोषणा केली. 5 वर्षांमध्ये दोन टप्प्यांमध्ये राबवलं जाईल. यासाठी पुढच्या दोन वर्षांत 2000 कोटींचा निधी दिला जाणार आहे. Ministry of Earth Science - म्हणजेच पृथ्वी विज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारित येणाऱ्या या मिशन मौसमद्वारे हवामानाबद्दल काम करणाऱ्या देशातल्या 3 मोठ्या संस्थांमधल्या पायाभूत सुविधा आणि तंत्रज्ञानाचा विकास करण्यात येणार आहे. India Meteorological Department (IMD) म्हणजेच हवामान खातं, National Centre for Medium Range Weather Forecasting...

Sep 19, 20246 min

GNSS : टोल भरण्याची ही नवीन पद्धत काय आहे? BBC News Marathi

उपग्रह आधारित नव्या टोल आकारणीमुळे टोल नाक्यांवर होणारी गर्दी आणि कोंडी कमी होईल किंवा संपुष्टात येईल अशी अपेक्षा आहे. एप्रिल 2025 पासून GNSS आधारित टोलची अंमलबजावणी होण्याचा अंदाज आहे आणि कालांतराने ही यंत्रणा Fastag ची जागा घेईल आणि Fastags बंद होतील. कदाचित यापुढे टोलनाक्याला लांब रांगा लागणार नाहीत आणि तुम्हाला टोलची ठराविक रक्कम भरावी न लागता तुम्ही जितका प्रवास केलाय तेवढ्यासाठीच पैसे भरावे लागतील.टोल आकारणीसाठी येऊ घातलेल्या ग्लोबल नेव्हिगेशन सॅटलाईट सिस्टीम - GNSS हे होऊ शकतं. काय आहे GN...

Sep 19, 20245 min

इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमध्ये अंतराळवीर राहतात कसे? जेवतात, झोपतात कसे? BBC News Marathi

पृथ्वीपासून 400 किलोमीटर्स दूरच्या उंचीवर अंतराळात राहताना कसं वाटतं? तिथे ते खातात - झोपतात कसे? व्यायाम कसे करतात? कपडे धुतात का? आणि...अंतराळस्थानकात वास असतो का कसला? इंटरनॅशनल स्पेस स्टेशनमधलं अंतराळवीरांचं आयुष्य कसं असतं हे जाणून घेण्यासाठी पहा, हा व्हीडिओ रिपोर्ट : जॉर्जिना रेनर्ड निवेदन : सिद्धनाथ गानू एडिटिंग : अरविंद पारेकर

Sep 17, 20246 min

डोनाल्ड ट्रम्प कमला हॅरिस US निवडणुकीतले 9 महत्त्वाचे मुद्दे | BBC News Marathi

5 नोव्हेंबरला होऊ घातलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी सध्याच्या डेमोक्रॅटिक उप-राष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस आणि रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांच्यात चढाओढ आहे. कोणते मुद्दे आहेत जे अमेरिकेच्या प्रेसिडेन्शियल इलेक्शनमध्ये महत्त्वाचे ठरतायत? आणि त्याबद्दल राष्ट्राध्यक्षपदाच्या दोन्ही उमेदवारांची मतं काय आहेत? समजून घेऊयात सोपी गोष्टमध्ये रिपोर्ट - टीम बीबीसी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - शरद बढे

Sep 12, 20247 min

स्पेसएक्स पोलारिस डॉन मिशन काय आहे? अंतराळ पर्यटन सुरू होणार? BBC News Marathi

खासगी पैशांतून स्पेसवॉकसाठी स्पेस एक्सच्या फाल्कन 9 रॉकेटने 10 सप्टेंबरला झेप घेतली. अब्जाधीश जेरर्ड आयझॅकमन हे अंतराळवीर नसूनही स्पेसवॉक करणारे पहिले व्यक्ती ठरण्याची शक्यता आहे. या मोहीमेचं नावं आहे पोलारिस डॉन. जेरर्ड आयझॅकमन यांच्या Shift4 या उद्योगाने निधी दिलेल्या तीन अंतराळ मोहीमांपैकी ही पहिली मोहीम आहे. फाल्कन 9 च्या या पोलारिस डॉन मोहीमेत जेरर्ड आयझॅकमन यांच्यासोबत त्यांचा जवळचा मित्र असणारे निवृत्त एअर फोर्स पायलट स्कॉट 'किड' पोटीट आणि स्पेस एक्सचे दोन इंजिनियर्स अॅना मेनन आणि सारा गि...

Sep 11, 20247 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android