तामिळनाडूमध्ये NEET परीक्षा दिल्यानंतर सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात जागा न मिळाल्याने आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची यादी मोठी आहे. मात्र अशाप्रकारे मृत्यू झालेल्या विद्यार्थ्याच्या वडिलांनीही आत्महत्या केल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. आता तामिळनाडू सरकारने राज्यातून NEET हद्दपार करायचं ठरवलंय. पण काय असते ही परीक्षा? ती रद्द झाली तर काय पर्याय काय? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Aug 17, 2023•5 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Aug 16, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Aug 15, 2023•5 min
हवाईच्या माऊई बेटावरचं लहायना हे अख्खं शहर या वणव्यात बेचिराख झालं आहे. ही विनाशकारी आग नेमकी कशामुळे लागली, याचा तपास अजून सुरू आहे. पण हा वणवा कोरडं, उष्ण वातावरण आणि वादळी वारे यांमुळ जास्त पसरला आहे, यावर बहुतांश तज्ज्ञांचं एकमत झालंय. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Aug 15, 2023•5 min
तब्बल 47 वर्षांनंतर रशियाचं एक रॉकेट चंद्राच्या दिशेने झेपावलंय. पण रशियाचं हे लुना 25 रॉकेट भारताशी अक्षरशः स्पर्धा करतंय. आणि त्याला इस्रोच्या चंद्रयानच्या आधी चंद्रावर पोहोचायचंय. असं खरंच शक्य आहे का? आणि रशियाला भारताच्या आधी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँड का करायचंय? समजून घेऊ या.. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Aug 12, 2023•6 min
प्रत्येकाला पैशांची गरज असते, पण कर्ज नकोय. फेडणार कोण? एखादा कर्जाचा हफ्ता चुकला तर काय - आपली गाडी, घर जप्त होईल का? असे कॉल्स आणि असलं टेन्शन तुम्हालाही येत असेल. आपण एखादं कर्ज फेडताना एखादा हफ्ता चुकला की काय होईल? बँक कधी तुमच्या घरी एजंट पाठवून जप्ती करू शकतं? आणि कर्ज घेताना तुमचे काय अधिकार आहेत? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Aug 11, 2023•5 min
3 ऑगस्ट 2023 रोजी केंद्रीय संपर्क, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी लोकसभेत The Digital Personal Data Protection Bill, 2023 मांडलं. मंत्री अश्विनी वैष्णव म्हणाले की या विधेयकाद्वारे भारतीय नागरिकांची डिजिटल प्रायव्हसी सुरक्षित ठेवणारा देशातला पहिला कायदा बनेल. नागरिकांच्या डेटाचा गैरवापर रोखण्यासाठी दोषींना शिक्षेची तरतूदही या कायद्यात करण्यात आली आहे. लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Aug 09, 2023•6 min
कॉलेजचे दिवस आयुष्यातले बेस्ट दिवस असे म्हणतात. पण अशात काही जणांसाठी कॉलेज हा एक धक्कादायक अनुभव असतो... तो रॅगिंगमुळे. आता काळ बदललाय तसं रॅगिंगचं स्वरूप आणि व्याख्याही. आज रॅगिंग म्हणजे नेमकं काय? ते फक्त कॉलेजमध्येच होतं का, की शाळेतही होऊ शकतं? आणि तुमच्यासोबत किंवा तुमच्या मुलांसोबत रॅगिंग झाली तर काय करावं? पाहू या सोपी गोष्टमध्ये... वार्तांकन - रवी प्रकाश, बीबीसी हिंदीसाठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Aug 09, 2023•6 min
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांनाम तोशाखाना प्रकरणात भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली अटक झाली असून त्यांना तीन वर्षांसाठी कारावासाची शिक्षा सुनाण्यात आली आहे. या शिक्षेमुळे ते येत्या निवडणुकीत लढण्यासाठी अपात्र ठरतील. मग ही इम्रान यांच्या राजकीय कारकीर्दीची अखेर मानायची का? जाणून घेऊयात. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Aug 08, 2023•5 min
नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आलेल्या एकूण 20 चित्त्यांपैकी एकापाठोपाठ एक 9 चित्त्यांचे मृत्यू झालेत. इथे चार बछड्यांना जन्मही दिला, पण त्यापैकीही तीन दगावले. यासाठी कुणी या चित्त्यांच्या मानेभोवती लावलेल्या रेडिओ कॉलरला दोष देतंय तर कुणी वातावरणाला. खरंच या चित्त्यांचे मृत्यू का होतायत? आणि ते रोखायला भारताने काय करायला हवं? पाहू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Aug 04, 2023•7 min
पावसाळा येताच विविध साथीच्या रोगांच्या रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचं पाहायला मिळतं. त्यात डेंग्यूच्या साथीचादेखील समावेश असतो. महाराष्ट्रातही दरवर्षी डेंग्यूचे रुग्ण मोठ्या संख्येनं आढळत असतात. यंदाही तेच चित्र पाहायला मिळत आहे. अशात हा आजार नेमका काय आहे? तो कसा होतो आणि त्यापासून बचाव कसा करायचा? समजून घेऊयात. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – निलेश भोसले
Aug 02, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Aug 01, 2023•4 min
पंतप्रधानांनी दावा केलाय - जगातल्या पहिल्या तीन अर्थव्यवस्थांमध्ये भारत असेल. ही आकडेवारी कशी ठरते? तर जीडीपीच्या वाढीच्या दरावर. गेल्या 9 वर्षांत भारताचा जीडीपी 83 टक्क्याने वाढला असला तरी तुमच्यातले काही लोक म्हणतील की आमचा पगार आणि खर्च याची सांगड पूर्वी होती तशीच आहे किंवा त्यापेक्षा वाईट आहे. आमची आर्थिक स्थिती सुधारलेली नाही. हे कसं? देशाची अर्थव्यवस्था वाढणं ही चांगलीच गोष्ट आहे, पण त्या वाढलेल्या उत्पन्नाचं वाटप आणि वितरण कसं आहे? जीडीपीच्या बाबतीत भारत आज जगात पाचव्या क्रमांकावर आहे,पण ...
Jul 31, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Jul 28, 2023•4 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Jul 27, 2023•4 min
मणिपूर - गेल्या अडीच-तीन महिन्यांपासून आपण सातत्याने हे एक नाव बातम्यांमध्ये ऐकतोय, पाहतोय. पण आजही मणिपूर अशांत आहे. आता एक धक्कादायक व्हीडिओ समोर आलाय, ज्यात दोन महिलांना एक जमाव नग्न करून घेऊन जाताना दिसतोय. कुकी आणि मैतेई या दोन प्रमुख जमातींमधला संघर्ष इतका का चिघळलाय? इथल्या या दोन समुदायांचा लोकांना एकमेकांवर, सरकारवर आणि लष्करावरही भरवसा का नाही? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन – राघवेंद्र राव, बीबीसी प्रतिनिधी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर...
Jul 26, 2023•6 min
रायगड जिल्ह्यातल्या इर्शाळवाडी गावावर 19 जुलैच्या रात्री दरड कोसळली. किमान 100 लोक ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याची भीती व्यक्त केली जातेय, मृतांचा आकडा वाढतोच आहे. दरवर्षी पावसाळा आला की हिमालयापासून सह्याद्रीपर्यंत, सगळीकडून अशा दरडी कोसळण्याच्या, भूस्खनलनाच्या बातम्या येतात, व्हीडिओही येतात. पण मुळात भूस्खलन म्हणजे काय? ते का होतं? आणि ते टाळता येतं का? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन - निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर
Jul 26, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Jul 26, 2023•6 min
दिवसातली सगळ्यांत मोठी बातमी सोप्या भाषेत
Jul 25, 2023•6 min
DES - भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय. 23 जूनला बिहारचे मुख्यमंत्री नितिश कुमार यांच्या निमंत्रणावरून काँग्रेस, आप, तृणमूल काँग्रेस, समाजवादी पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (UBT) आणि PDPसह अनेक विरोधी पक्षांचे नेते पाटण्यात एकत्र आले होते...
Jul 19, 2023•5 min
भाजपप्रणित National Democratic Alliance NDAने आधीच स्पष्ट केलं आहे की 2024च्या निवडणुका नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातच लढणार. आणि त्यांना सत्तेतून खाली खेचण्यासाठी विरोधी पक्ष एकवटलेत. त्यांच्या आघाडीचं नाव INDIA अर्थात India National Developmental Inclusive Alliance असं जाहीर करण्यात आलंय. वार्तांकन – प्रियंका, बीबीसी हिंदी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Jul 18, 2023•8 min
स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीनिमित्त 15 ऑगस्ट 2023 पर्यंत देशात 75 वंदे भारत ट्रेन्स सुरू करण्याची घोषणा पंतप्रधान मोदींनी केली होती. चकचकीत दिसणाऱ्या या आधुनिक ट्रेन्स भारतात सोशल मीडियावर तर लोकप्रिय झाल्या आहेत. पण प्रत्यक्षात अनेक मार्गांवर या गाड्यांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत नसल्याचं आकडेवारीवरून दिसून आलं आहे. लेखन – चंदन जजवाडे निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Jul 18, 2023•6 min
तुम्ही कधी ऑनलाईन गेम्स खेळले आहेत का? म्हणजे असे ऑनलाईन फँटसी गेम्स, जे Dream 11, MPL, Rummy Circle, A23, PokerBaazi सारख्या ॲप्सवर खेळले जातात. जर हो, तर तुमच्यासाठी एक वाईट बातमी आहे. सरकारने आता यावर 28 टक्के GST लावला आहे. 10 जुलैला GST काउंसिलच्या 50व्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. याचा फटका नेमका कुणाला आणि कसा बसेल? समजून घेऊ या वार्तांकन - निखिल इनामदार आणि हिमांशु भयाणी लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Jul 14, 2023•5 min
वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टर प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरातला पळवला, असे आरोप गेल्या वर्षी आपण ऐकले होते. पण आता या महत्त्वाकांक्षी सेमीकंडक्टर प्रकल्पातून फॉक्सकॉनने माघार घेतली आहे. त्यावरूनही राजकारण सुरू झालंय. काय होता हा वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प, ज्यावरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलं होतं? आणि तो आता रद्द झाल्यानंतरही मोदी सरकार आशावादी का आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. लेखन-निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर
Jul 11, 2023•5 min
क्लस्टर बाँब किंवा क्लस्टर म्युनिशनचा हवेतून जमिनीवर मारा केला जातो. हा बाँब म्हणजे अनेक लहान लहान बाँब्सचा संच असतो. तो जेव्हा टाकला जातो तेव्हा त्यातून असे अनेक लहान लहान बाँब्स जमिनीवर कोसळतात. यातले काहींचा लगेच स्फोट होतो पण काही मात्र तसेच राहतात. जगातील 100 पेक्षा अधिक देशांनी याचा वापर न करण्याचा करार केला आहे. लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Jul 11, 2023•3 min
काही फरक सोडले तर थ्रेड्स ॲप ट्विटरसारखंच आहे हे आपण पाहतोय. थ्रेड्स ट्विटरशी मैत्रीपूर्ण स्पर्धा करेल असंही मेटाच्या टॉप मॅनेजमेंटने म्हटलंय. पण ट्विटरला ही गोष्ट रुचलेली नाही. मेटाविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा विचारही ट्विटरच्या मॅनेजमेंटने बोलून दाखवलाय. इलॉन मस्कने म्हटलं की “स्पर्धा ठीक आहे पण फसवणूक नाही.” लेखन - निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर
Jul 10, 2023•4 min
3 जुलै 2023 रोजी शेकडो इस्रायली सैनिक, ड्रोन्स आणि बुलडोझर्सच्या सोबत जेनिनमध्ये घुसले. दोन दिवस ही कारवाई चालली आणि यादरम्यान चकमकी उडाल्या. त्यात 12 पॅलेस्टिनी मारले गेले आणि एका इस्रायली सैनिकाचा मृत्यू झाला. पण जेनिनमध्ये भडका का उडाला? हा रेफ्युजी कँप नेमका कुठे आहे आणि तिथल्या घडामोडींचे काय पडसाद उमटू शकतात, जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Jul 10, 2023•5 min
जुलै महिन्याच्या मध्यावर चंद्रयान-3 अवकाशात झेपावेल असं इंडियन स्पेस रिसर्च ऑर्गनायझेशन अर्थात इस्रोनं जाहीर केलं आहे. चंद्रयान-3 हे भारताच्या चांद्र अभियानातलं तिसरं यान आहे. या मोहिमेत चंद्रावर सॉफ्ट लँडिंगचा म्हणजे अलगदपणे यान उतरवण्याचा प्रयत्न केला जाईल. ही मोहीम कशी असेल आणि ती का महत्त्वाची आहे? लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Jul 06, 2023•5 min
शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशनचं अध्यक्षपद यंदा भारताकडे असून दिल्लीत 4 जुलै 2023 रोजी या संघटनेच्या व्हर्च्युअल परिषदेत सदस्य देशांचे राष्ट्रप्रमुख सहभागी झाले होते. पण ही संघटना कशी स्थापन झाली आणि ती नेमकं काय काम करते? भारत त्यात का सहभागी झाला आहे? जाणून घेऊयात. लेखन, निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर
Jul 06, 2023•5 min
17 वर्षांचा नाहेल M नावाचा एक तरुण पॅरिसजवळच्या नॉनटेअर उपनगरात गाडी चालवत असताना पोलिसांनी त्याची गाडी अडवली. पोलिसांनी त्याच्यावर बंदूक रोखली, पण त्या तरुणाने गाडी पळवली, त्यामुळे त्याच्यावर गोळी झाडण्यात आली. ती गाडी पुढे जाऊन धडकली, पण तोवर नाहेलच्या छातीत गोळी घुसली होती. उपचारांदरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेचे व्हीडिओ व्हायरल झाल्यानंतर सध्या पॅरिसभोवतीचा भाग पेटला आहे. एका किशोरवयीन मुलाच्या अशा मृत्यूनंतर लोक रस्त्यांवर उतरून आंदोलनं करू लागले. काय झालं नेमकं, की एका तरुणाच्या मृत्य...
Jul 01, 2023•5 min