सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

सोपी गोष्ट : ओमिक्रॉन BF.7 व्हेरियंट किती घातक आहे? त्याची लक्षणं काय आहेत?

हे वर्षं संपता संपता कोरोना व्हायरसचा नवा व्हेरियंट आलेला आहे. चीनमध्ये कोव्हिडची तिसरी लाट आणणाऱ्या कोरोना व्हायरसच्या BF.7 या व्हेरियंटचे रुग्ण भारतात आढळल्याची माहिती समोर आली आहे. BF.7 व्हेरियंटचे भारतात गुजरातमध्ये दोन तर ओडिशात एक रुग्ण सापडला आहे. हा नवा व्हेरियंट किती धोकादायक आहे आणि त्याची लक्षण का आहेत? जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

Dec 22, 20225 min

औषधं घेऊन थांबवता म्हातारपण लांबवता येतं का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अनुवंशशास्त्रज्ञ डेव्हिड सिनक्लेअर गेली 20 वर्षं वृद्धत्व याविषयावर संशोधन करत आहेत. त्यांच्यामते काही अगदी सोप्या सवयींद्वारे वृद्धत्व लांबवून आपण दीर्घ आणि निरोगी आयुष्य जगू शकतो. तरुण दिसण्याच्या उद्योगाची आजची उलाढाल 110 अब्ज डॉलर्स इतकी आहे आणि 2025 पर्यंत 600 अब्ज डॉलरपर्यंत पोहोचेल असा एक अंदाज आहे. म्हातारपण अपरिहार्य नाही असा संशोधकांचा दावा आहे. सिनक्लेअर यांचं म्हणणं आहे की म्हातारपण अपरिहार्य नाहीये. ते नैसर्गिक नसून एक आजार आहे, त्यातून बरं होता येईल असा विचार करायला हवा. लेखन – अनघ...

Dec 21, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : सर्व धर्मांच्या मुलींची लग्न एकाच वयात व्हावी अशी मागणी का होतेय?

दिल्ली हायकोर्टात एक केस आली होती. एका अल्पवयीन मुस्लीम मुलीने आपल्या पतीसोबत राहण्याचं स्वातंत्र्य आणि त्यासाठी सुरक्षा मागितली होती. यावर निकाल देताना कोर्टाने त्या मुलीचं लग्न वैध ठरवलं होतं. राष्ट्रीय महिला आयोगाने आता याविरोधात सुप्रीम कोर्टात धाव घेतली आहे आणि सगळ्या धर्मांच्या महिलांसाठी लग्नाचं वय समान असावं अशी याचिका दाखल केली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आधीच मुलींचं लग्नाचं वय 18 वरून 21 करण्यासाठी लोकसभेत विधेयक घेऊन आल्या आहेत. पण त्या विधेयकावर सध्या स्थायी समिती विचारमंथन कर...

Dec 20, 20224 min

कोटामधले विद्यार्थी आत्महत्या का करतात? त्यांचे मृत्यू रोखायचे कसे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोटा शहर – देशभरातल्या IITमध्ये प्रवेश करू पाहणाऱ्यांसाठीची पंढरी. याच कोटातून आता तीन विद्यार्थ्यांनी स्वतःचं आयुष्य संपवल्याची बातमी येतेय. ही बातमी धक्कादायक आहेच, पण ही काही पहिली वेळ नाहीय, जेव्हा कोटा या बातमीमुळे चर्चेत आलंय. काय आहे कोटाचं कोचिंग विश्व? आणि इथे विद्यार्थी आत्महत्या का करतात? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. वार्तांकन - मोहर सिंग मीणा, बीबीसी हिंदीसाठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर

Dec 20, 20225 min

‘कृत्रिम सूर्य’ तयार करण्याचा हा प्रयोग - न्युक्लिअर फ्युजन काय आहे? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

ऊर्जेचा एका नवा स्रोत म्हणजे न्यूक्लियर फ्युजन विकसित करण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करतायत. सूर्य आणि बाकीच्या ताऱ्यांनाही प्रकाशित करणारं हे न्यूक्लियर फ्युजन म्हणजे नेमकं काय आहे? गेली शंभर वर्ष शास्त्रज्ञ त्यावर काम का करत आहेत? उर्जेचा हा स्रोत माणसाचं जगणं कसं बदलू शकतो आणि त्यात भारत काय योगदान देतो आहे? जाणून घेणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये.

Dec 15, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : म्हैसाळ सिंचन योजना काय आहे?

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधल्या सीमावादाला पाणी प्रश्नाचीही किनार आहे. सांगलीत गेली कित्येक वर्ष पाणीटंचाईचा सामना करणाऱ्या 42 गावांनी कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त केली होती. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोमय्या यांनी दावा केला आणि हा वाद पुन्हा उफाळून आला. त्यानंतर या गावकऱ्यांना पाणीपुरवठा करण्यासाठी म्हैसाळ विस्तारित योजनेचं टेंडर काढायचं आश्वासन महाराष्ट्र सरकारनं दिलं आहे. पण ही योजना नेमकी काय आहे? अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/articles/cjq7pgnxw41o संशोधन – सरफराज सनदी निवेदन – ...

Dec 13, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : निर्भया फंडचा योग्य वापर होतो आहे का?

निर्भया फंड सध्या पुन्हा चर्चेत आहे. या निधीतून आणलेल्या गाड्या महिलांच्या नाही, तर VIP नेत्यांच्या सुरक्षिततेसाठी वापरत असल्याचा आरोप होतो आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या गटातले आमदार आणि खासदारांसाठी या गाड्या वापरत असल्याचं वृत्त प्रसिद्ध झाल्यापासून ही चर्चा सुरू झाली. सरकारनं याविषयी अजून कोणतं स्पष्टीकरण जाहीर केलेलं नाही. पण निर्भया फंडच्या वापरावर यामुळे पुन्हा प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Dec 12, 20226 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे?

छत्रपती शिवाजी महाराजांच्या वेशभूषेतला अक्षय कुमार पाहून सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहेत. अक्षय कुमार महाराजांसारखा अजिबात दिसत नाही, अशी टीका होते आहे. पण मग शिवाजी महाराज नेमके कसे दिसायचे, असा प्रश्नही पुन्हा विचारला जातो आहे. याच प्रश्नाचं उत्तर शोधायचा प्रयत्न आपण करणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Dec 07, 20226 min

सोपीगोष्ट पॉडकास्ट : चॅटजीपीटी नव्या जगाचा मंत्र होणार का?

गेल्या आठवडाभरापासून चॅटजीपीटी हे नाव तुम्ही ऐकलं असेल. सांगकाम्या बाळूप्रमाणे तुमच्या मनातल्या प्रश्नांच्या उत्तरांसह भाषांतर, कथा अगदी साहित्य रचणारा चॅटबॉट आता आपल्या सेवेसाठी सज्ज झाला आहे. माणसाचा हा मित्र भविष्यात माणसालाच रिप्लेस करणार का? निवेदन- गुलशनकुमार वनकर लेखन-पराग फाटक व्हीडिओ एडिटर- अरविंद पारेकर

Dec 06, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : मोबाईल फोनमधील पेमेंट ॲप्स सुरक्षित ठेवण्याचे सोपे मार्ग माहितीये?

UPI Apps वापरुन आपण पैशांची देवाणघेवाण करत असतो. बहुतेक यूपीआय व्यवहार हे गुगल पे, पेटीएम आणि फोनपेसारख्या थर्ड-पार्टी खासगी कंपन्यांच्या माध्यमातून करण्यात येत असल्याने, या माध्यमांमधून होणारे व्यवहार 30 टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, यासाठी काही नियम लागू करण्यात येत आहेत. यासाठी RBI ने काय निकष घालून दिलेत? आपली ही ॲप्स सुरक्षित कशी ठेवायची? पाहूया आजच्या सोपी गोष्टमध्ये.

Dec 05, 20225 min

2023 मध्ये भारतात आर्थिक मंदी येणार का? नोकऱ्या जाणार का? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

GDPचे ताजे आकडे आलेत, ज्यात एप्रिल ते जून 2022 या तिमाहीत 13.5 टक्क्यांवरून आता जुलै ते सप्टेंबर या तिमाहीत थेट 6.3 टक्क्यांवर आला आहे. खरंतर अर्थव्यवस्थेचे आकडे अनेकांच्या डोक्यावरून जातात. कळतच नाही की यामुळे महागाई कमी होणार की आणखी वाढणार? नोकऱ्या राहणार की जाणार? देश नेमका प्रगती करतोय की पुढे आर्थिक मंदी येणार? समजून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये. विश्लेषण – आलोक जोशी, ज्येष्ठ पत्रकार लेखन, सादरीकरण – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Dec 02, 20226 min

एड्सची लागण झालीच तर काय? HIVवरच्या 10 प्रश्नांची उत्तरं | BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

1 डिसेंबर म्हणजे जागतिक एड्स दिन. दरवर्षी लाखो लोकांना HIVची लागण होऊन एड्स हा आजार झाल्याचं कळतं. आणि उपचार उपलब्ध नसल्यामुळे आजवर जगभरात 4 कोटींपेक्षा जास्त लोकांचा बळीही या रोगाने घेतलाय. पण एड्स होतो कसा? तो टाळावा कसा? आणि HIVची लागण झालीच तर काय करावं? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं, या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - टीम बीबीसी मराठी लेखन, निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - शरद बढे

Dec 01, 20225 min

धारावीची झोपडपट्टी अदानी कशी बदलणार? BBC News Marathi सोपी गोष्ट 739

धारावी ही आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी आहे, असं म्हणतात. या धारावीचा पुनर्विकास प्रकल्प पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. कारण गेल्या 18 वर्षांपासून रखडलेल्या या पुनर्विकास प्रकल्पासाठीचा लिलाव नुकताच अदानी समुहाने जिंकला. 60 हजारहून अधिक झोपड्या आणि 10 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेल्या धारावीचा पुनर्विकास कसा होणार? निवेदन - दीपाली जगताप एडिटिंग- अरविंद पारेकर

Nov 30, 20226 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : आरक्षणाचा फायदा नेमका कोणाला?

EWS म्हणजे Economically Weaker Sections अर्थात आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक. 2019 मध्ये केंद्र सरकारने घटनादुरुस्ती करून आर्थिक निकषांवर खुल्या प्रवर्गातील घटकांना 10 टक्के आरक्षण जाहीर केलं. हे 10 टक्के आरक्षण नेमकं कोणासाठी आहे? या आरक्षणासाठी पात्रतेचे निकष काय आहेत? आणि त्याचा फायदा नेमका कोणाला होणार आहे? EWS अंतर्गत सरकारने शिक्षण आणि नोकरीत दहा टक्के आरक्षण देण्याची तरतूद केली आहे.

Nov 29, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : चीनमध्ये कोव्हिड लॉकडाऊन विरोधात हजारो लोक रस्त्यावर

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या झिरो कोव्हिड पॉलिसीला लोकांचा तीव्र विरोध आहे. चीनच्या उरुमकी शहरात 2 दिवसांपूर्वी एका इमारतीला आग लागली. त्यात 10 जणांचा मृत्यू झाला. शी यांच्या कडक लॉकडाऊनच्या धोरणांमुळे इथं मदत पोहोचण्यास उशीर झाला आणि त्यामुळेच 10 लोकांचा मृत्यू झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. या घटनेवरून जे आंदोलन सुरू झालं त्याचं लोण आता देशभरात पसरताना दिसतंय

Nov 28, 20225 min

पॉलिग्राफ टेस्ट काय असते? आफताब पूनावालाच्या टेस्टमधून काय निघणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, त्याने कुठली हत्यारं वापरली, तिच्या मृतदेहाची विल्हेवाट कशी लावली, याचे अनेक तपशील बाहेर येत आहेत. पण अजूनही कोर्टात मांडण्यासाठी ठोस पुरावे कमी पडतायत. त्यामुळेच पोलिसांनी आफताबच्या नार्को आणि पॉलिग्राफ टेस्ट्सची मागणी कोर्टाकडे केली होती. पॉलिग्राफ टेस्ट नेमकी काय असते? ती का आणि कशी केली जाते? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Nov 25, 20225 min

गोवरची जगभरात साथ येणार? तुमच्या मनातल्या 10 प्रश्नांची उत्तरं BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

कोरोनाचं आरोग्य संकट मावळत असतानाच आता जगभरात ठिकठिकाणी गोवरचा उद्रेक होऊ शकतो, असा इशारा WHOने दिला आहे. गोवर, ज्याला measles ही म्हटलं जातं, हा एक वेगाने पसरणारा आजार आहे, आणि तो पूर्ण लसीकरणानेच टाळता येतो. जर याची साथ आलीच, तर तुम्ही आम्ही काय करायला हवं, जाणून घेऊ या 10 प्रश्नोत्तरांमधून आजच्या सोपी गोष्ट मध्ये. लेखन, निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Nov 24, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कर्नाटकने महाराष्ट्राच्या 40 गावांवर दावा का केलाय?

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधला सीमावाद गेली अनेक दशकं सुरू आहे. तो सोडवण्यासाठी शिंदे सरकारने दोन मंत्र्यांची समन्वयक म्हणून नेमणूक केली आहे. पण कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या एका विधानाने या वादाला नव्याने तोंड फुटलंय. कर्नाटक सरकार महाराष्ट्राची, सांगलीतली जवळपास 42 गावं ताब्यात घ्यायचा विचार करतंय का असा प्रश्न यामुळे उपस्थित होतोय.

Nov 23, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : राज्यपालांना पदावरून हटवता येतं का?

कुलपती या नात्याने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी 19 नोव्हेंबरला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या पदवीप्रदान सोहळ्यासाठी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना D. Lit पदवी देऊन गौरवण्यात आलं. यावेळी या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत आपल्या भाषणात राज्यपालांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर त्यांना पदावरून हटवण्याची मागणी विरोधकांनी केलीय. परंतु राज्यपाल हे घटनात्मक पद असताना त्यांना हटवणं ...

Nov 22, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : COP27 करारानं नेमकं काय साधलं?

इजिप्तमध्ये COP27 या हवामान परिषदेच्या अखेरीस एका ऐतिहासिक करारावर 197 देशांनी स्वाक्षरी केली. या कराराअंतर्गत हवामान बदलाचे परिणाम भोगणाऱ्या विकसनशील देशांसाठी आंतरराष्ट्रीय निधी उभारला जाणार आहे आणि श्रीमंत आणि विकसित देश त्यासाठी पैसा पुरवतील. भारत आणि पाकिस्ताननं या निधीसाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

Nov 21, 20225 min

लिव्ह-इन रिलेशनशिप कायदा काय आहे?

श्रध्दा वालकर या वसईच्या 28 वर्षीय तरुणीची आफताब या तिच्या प्रियकराने दिल्लीत हत्या केली. श्रध्दा आणि आफताब यांच्या प्रेमसंबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यामुळे दोघं दिल्लीत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहायचे. या घटनेमुळे लिव्ह-इन रिलेशनशिपची संकल्पना पुन्हा चर्चेत आली आहे. खरंच लिव्ह-इन रिलेशनशिप म्हणजे काय असतं? कायद्यात याबद्दल नेमकं काय म्हटलंय? आणि अशा जोडप्यांना भारतात कायदा काय संरक्षण देतो? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये...

Nov 18, 20224 min

नार्को टेस्ट म्हणजे काय? श्रद्धा वालकर हत्या प्रकरणात आफताब पूनावालाची ही चाचणी किती महत्त्वाची? सोपी गोष्ट पॉडकास्ट

वसईच्या श्रद्धा वालकरचा खून आफताब पूनावालाने कसा केला, याचे वेगवेगळे आणि धक्कादायक तपशील रोज समोर येत आहेत. पण त्याने आतापर्यंत दिलेले जबाब आणि त्याच्याकडून मिळेले दस्तावेज, जसं की ऑनलाईन व्यव्हार, सोशल मीडिया चॅट्स, यांमधून काही विसंगत माहिती पोलीसांसमोर आली. त्यामुळे पोलिसांनी आफताबची नार्को टेस्ट करण्याची मागणी कोर्टाकडे केली होती, जी कोर्टाने मंजूरही केली आहे. पण ही नार्को टेस्ट नेमकी काय असते? ती कशी आणि कशासाठी केली जाते? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्ट मध्ये.

Nov 17, 20224 min

गोवर म्हणजे काय? मुंबईत गोवरचे रुग्ण का वाढत आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

मुंबईमध्ये गोवरच्या रुग्णांची संख्या ही वाढत चालली आहे. आतापर्यंत गोवरमुळे 3 बालकांचा मृत्यू झाला आहे. तर सध्या मुंबईत गोवरचे निश्चित निदान झालेले 142 रुग्ण आहेत, शिवाय 1079 रुग्णांना ताप - पुरळ अशी लक्षणं आहेत, आणि ते गोवरचे संशयित म्हणून धरले जातायत. मुंबईत गोवरच्या वाढत्या संसर्गामुळे केंद्रीय आरोग्य पथकही दाखल झालंय. गोवर हा आजार नेमका काय आहे? गोवर रुग्णांची संख्या अचानक वाढतेय? त्याची लक्षणं काय आहेत आणि त्यासाठी काय काळजी घ्यायची, या सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळवू या आजच्या सोपी गोष्टमध्ये...

Nov 16, 20223 min

ट्विटर, मेटा आणि ॲमेझॉनवर नोकर कपातीची वेळ का आली आहे? BBC News Marathi

बदलतं बिझनेस मॉडेल आणि अनिश्चित अर्थव्यवस्थेने संपूर्ण तंत्रज्ञान उद्योगात मोठी घसरण झाली आहे. इलॉन मस्कने कंपनी विकत घेतल्यानंतर काही दिवसांतच ट्विटरमधल्या 50% कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकलं. नोहेंबरच्या दुसर्‍या आठवड्यात मेटा या फेसबुक आणि इंस्टाग्रामच्या मालक कंपनीने 11,000 कर्मचार्‍यांना काढून टाकत असल्याची घोषणा केली. म्हणजे एकूण कर्मचाऱ्यांपैकी 13 टक्के. जर अ‍ॅमेझॉनने10,000 कर्मचाऱ्यांना काढून टाकलं तर एकूण कर्मचारी संख्येपैकी 3 % लोकांना ते घरी पाठवतील. लेखन - प्राजक्ता पोळ निवेदन - ग...

Nov 15, 20223 min

डायबेटीस बरा होऊ शकतो का? तो रोखण्यासाठी काय करायचं? BBC News Marathi

काही वेलनेस सेंटर आणि ऑनलाईन शॉपिंग पोर्टल्स कडून अशी जाहिरात केली जाते की त्यांनी तयार केलेल्या उत्पादनांमधून मधुमेह पूर्णपणे बरा होतो. पण मधुमेह पूर्णपणे बरा होऊ शकतो का? जागतिक मधुमेह दिनानिमित्त याबाबत सविस्तर पाहणार आहोत आजच्या सोपी गोष्टमध्ये... लेखन - पद्मा मीनाक्षी, प्राजक्ता पोळ निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - अरविंद पारेकर

Nov 15, 20223 min

G20 परिषदेच्या चिन्हातलं कमळ भारताचं की भाजपचं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

G20 राष्ट्रगटाचं अध्यक्षपद आता भारताकडे आलंय. त्यानिमित्तानं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी G20 अध्यक्षपदाच्या नव्या लोगोचं 8 नोव्हेंबरला अनावरण केलं आणि एका वादाला तोंड फुटलं. या लोगोतल्या कमळावर विरोधी पक्षांनी टीका केलीय. नेमके काय आक्षेप आहेत? सरकारची या लोगोमागची भूमिका काय आहे? आणि मुळात G20चं अध्यक्षपद म्हणजे नेमकं काय असतं? जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमधून. लेखन, निवेदन - जान्हवी मुळे एडिटिंग - अरविंद पारेकर

Nov 12, 20224 min

शिवचरित्रावरील चित्रपट हे कलाकारांचं स्वातंत्र्य की इतिहासाचा विपर्यास? BBC News Marathi

मराठीत सध्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारीत सिनेमांची लाटच आली आहे. पण या सिनेमांतून खरंच इतिहास मांडला जातो आहे का? की या सिनेमांच्या माध्यमातून आजच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्याचा किंवा राजकीय अजेंडा पुढे ढकलण्याचा प्रयत्न होतो? लेखन – अमृता कदम निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Nov 10, 20226 min

डोनाल्ड ट्रंप या निवडणुकीनंतर पुन्हा कमबॅक करतील का? | BBC News Marathi

आठ नोव्हेंबरला अमेरिकेत तिथल्या संसदेसाठी निवडणुका होतायत. या मिडटर्म इलेक्शन म्हणजे मध्यावधी निवडणुकांकडे जगाचंही लक्ष लागलं आहे. मिडटर्म इलेक्शन इतकं महत्त्वाचं का आहे? या निवडणुकीच्या निकालाचा अमेरिकेच्या राजकारणावर आणि पर्यायानं जगावर काय परिणाम होऊ शकतो? जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Nov 08, 20226 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android