सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बलात्कार पीडितेची केली जाणारी '2 फिंगर टेस्ट' काय असते?

बलात्कार पीडितेवर करण्यात येणाऱ्या '2 फिंगर टेस्ट'वर सुप्रीम कोर्टाने बंदी आणली आहे. महिलेवर बलात्कार झालाय का नाही? हे तपासण्यासाठी ही चाचणी करण्यात येते.

Nov 04, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : कुंकू-टिकलीचा महिलांच्या कर्तृत्वाशी संबंध आहे का?

महिला पत्रकारानं टिकली लावली नाही म्हणून तिच्याशी बोलायला शिवप्रतिष्ठान संघटनेच्या मनोहर उर्फ संभाजी भिडे यांनी नकार दिला. 2 नोव्हेंबर 2022 रोजी मंत्रालयात हा प्रकार घडला, त्यानंतर राज्याच्या महिला आयोगानं भिडे यांना नोटीस पाठवली आहे. सोशल मीडियावरही तीच्या निधनानंतर महिलांचं कर्तृत्त्व संपतं का? याविषयी चर्चा सुरू आहे. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Nov 03, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : डिजिटल रुपी म्हणजे काय?

रिझर्व्ह बँकेने डिजिटल रूपी हे नवं चलन लागू केलं आहे. आता आपल्या खिशातला रुपया डिजिटल कसा झालाय? तो ऑनलाईन ट्रान्झॅक्शनपेक्षा वेगळा कसा असेल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Nov 02, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : ब्राझिलमधल्या सत्तापालटाचा भारताला फायदा होईल?

ब्राझीलमध्ये उजव्या विचारसरणीचे राष्ट्राध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना हरवून डाव्या विचारसरणीचे माजी राष्ट्राध्यक्ष लुला ड सिल्वा पुन्हा सत्तेत आले आहेत. अत्यंत अटीतटीच्या या निवडणुकीच्या निकालाकडे पर्यावरणाचा विजय म्हणूनही पाहिलं जातंय. लुला पुन्हा सत्तेत येण्याचा भारत-ब्राझील संबंधांवर काय परिणाम होईल? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Nov 01, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : गर्दीत अपघात टाळण्यासाठी काळजी घ्यायला हवी?

मांढरदेवी यात्रा आणि मुंबईच्या एलफिन्स्टन ब्रिजवरील दुर्घटनाही तुम्हाला आठवत असतील. अशा दुर्घटनांसाठी कोण जबाबदार किंवा त्या कशा टाळता येतील यावरही अनेकदा चर्चा होते. पण गर्दीत अडकल्यावर काय काळजी घ्यायला हवी?

Oct 31, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : इलॉन मस्कनी ट्विटरच्या सीईओला का काढलं?

जगातल्या सगळ्यात श्रीमंत माणसानं जगातल्या सर्वात प्रभावशाली सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सपैकी एकाची खरेदी केली आहे. इलॉन मस्क आता ट्विटरचे मालक बनले आहेत, त्यांनी कंपनीचा ताबा घेताच सीईओ पराग अग्रवाल यांची हकालपट्टी झाल्याचं वृत्त आहे. मस्क यांनी असं का केलं?

Oct 28, 20224 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : भारतीयांचं आरोग्य हवामान बदलामुळे धोक्यात?

भारतात उष्णतेच्या लाटेमुळे होणाऱ्या मृत्यूंमध्ये 55 टक्के वाढ झाल्याचं लॅन्सेट या मेडिकल जर्नलच्या ताज्या अहवालात म्हटलं आहे.नेमकं हा अहवाल काय सांगतो आणि हवामान बदलाचा माणसाच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो आहे? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 27, 20225 min

दिवाळीच्या फराळाचे हे पदार्थ कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट

लाडू, चकली, शेव, करंजी, शंकरपाळे, अनारसे... ऐकूनच तोंडाला पाणी सुटलं असेल ना? अशा फराळाशिवाय दिवाळीचा सण अपुरा वाटतो. दिवाळीत प्रत्येक भारतीय घरात फराळ केला जातो, प्रांतागणिक त्यात वैविद्ध आढळतं, पण पण तुम्हाला माहीतेय यातले काही पदार्थ परदेशातून आपल्याकडे आलेत आणि आता अगदी आपलेच झालेत! आजच्या सोपी गोष्टमध्ये जाणून घेणार आहोत, हीच दिवाळीच्या फराळाची गोष्ट. संशोधन - रश्मी वारंग निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 27, 20225 min

दिवाळीचे फटाके कुठून आले? BBC News Marathi | सोपी गोष्ट पॉडकास्ट

दिवाळी किंवा दीपावली – म्हणजे दिव्यांची रास. मग दिव्यांसोबतच फटाके या उत्सवाचा भाग कधी झाले? भारतात फटाके आले तरी कुठून? ते मुघलांनी आणले होते का? पाहा ही सोपी गोष्ट. संशोधन - राजीव लोचन, इतिहासकार, पंजाब विद्यापीठ निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 27, 20225 min

दिवाळीत सूर्यग्रहण, 'या' समजुती किती खऱ्या, किती खोट्या?

ग्रहणकाळात काय करायचं, काय नाही करायचं याचे सल्ले देणारे अनेक व्हीडिओ यूट्यूबवरही दिसून येतात. पण ग्रहण म्हणजे नक्की काय, त्याच्या समजुती खरंच योग्य आहेत का, ऐका सोपीगोष्टमध्ये.

Oct 24, 20224 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बीटीएस हा के-पॉप बँड लोकप्रिय का आहे?

बीटीएस हा जगप्रसिद्ध दक्षिण कोरियन बँड लवकरच सक्तीच्या सैन्यसेवेसाठी दाखल होणार आहे. हा बँड इतका लोकप्रिय का आहे आणि त्यांना सैन्यात सेवा का करावी लागते आहे, जाणून घेऊयात. निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 19, 20225 min

शी जिनपिंग चीनमध्ये पुन्हा सत्तेत आल्यास भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चीनमध्ये शी जिनपिंग सलग तिसऱ्यांदा सत्तेत येण्याच्या तयारीत आहेत. चायनीज कम्युनिस्ट पार्टीच्या राष्ट्रीय अधिवेशनात यावर शिक्कामोर्तब होईल. पण जिनपिंग पुन्हा सत्तेत आले, तर त्याचा भारतावर कसा परिणाम होईल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/international-63285315

Oct 18, 20225 min

भारत खरंच भुकेला आहे का? सोपी गोष्ट पॉडकास्ट | BBC News Marathi

सलग दुसऱ्या वर्षी भारताची जागतिक भूक निर्देशांकात घसरण झाली आहे. एकीकडे सरकार हा निर्देशांक म्हणजे देशाची प्रतीमा मलिन करण्याचे प्रयत्न असल्याचा आरोप करत आहे, तर दुसरीकडे कुपोषण ही देशातली मोठी समस्या असल्याचं तज्ज्ञ सांगतायत. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 17, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिक्षकांनी मुलांना मारहाण केली तर..

नोएडामध्ये घडलेल्या प्रकरणाचा पोलीस तपास करतायत. पण त्यामुळे शिक्षकांच्या शिक्षेच्या पद्धती चर्चेत आल्या आहेत. संशोधन – सुशीला सिंह निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 13, 20225 min

बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय आहेत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

दिल्लीमध्ये एका धर्मांतराच्या कार्यक्रमानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 22 प्रतिज्ञा पुन्हा चर्चेत आल्या आहेत. त्यातल्या आपण हिंदू देवीदेवतांची पूजा करणार नाही, अशा आशयाच्या प्रतिज्ञेवरून भाजप आणि आम आम आदमी पक्षामध्ये राजकारण सुरू झालं. आपच्या मंत्र्याला राजीनामाही द्यायला लागला. नेमकं काय झालंय? आणि मुळात आंबेडकरांनी दिलेल्या 22 प्रतिज्ञा काय सांगतात? निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर अधिक वाचा - https://www.bbc.com/marathi/india-63217207

Oct 11, 20226 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : शिवसेनेचा निवडणूक चिन्हांचा इतिहास

शिवसेनेचं चिन्ह गोठवल्यानंतर अंधेरीतल्या पोटनिवडणुकीत धनुष्यबाण हे चिन्ह दिसणार नाही. शिवसेनेनं दुसऱ्या एखाद्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची ही पहिलीच वेळ नाही. दरम्यान पक्षातल्या बंडानंतर उद्धव ठाकरे गटाने आता निवडणूक आयोगाकडे मशाल, उगवता सूर्य आणि त्रिशूळ या चिन्हांची मागणी केली आहे तर शिंदे गटानं त्रिशूळ, उगवता सूर्य आणि गदा या चिन्हांची मागणी केली आहे. संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 10, 20225 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : महात्म गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही?

विज्ञानाच्या जगात नोबेल मिळणं म्हणजे तुमच्या कामगिरीवर, यशावर शिक्कामोर्तब झाल्यासारखं मानलं जातं. पण हे पुरस्कार सुरू करणारे आल्फ्रेड नोबेल कोण होते? त्यांनी हे पुरस्कार का सुरू केले ? गणितासारख्या विषयात नोबेल पुरस्कार का दिला जात नाही? महात्मा गांधींना नोबेल कधीच का मिळालं नाही जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्टमध्ये संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Oct 06, 20226 min

दसरा मेळावा का सुरू झाला? दसऱ्याला राजकीय महत्त्व का आलं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे दसरा साजरा केला जातो, विशेषतः महाराष्ट्रात. इथे नागपूरपासून ते भगवानगड ते मुंबईपर्यंत, वेगवेगळ्या संस्था, संघटना, पक्ष आपापल्या परंपरेनुसार दसरा साजरा करतात. खूप आधीपासून दसऱ्याकडे राजकीय शक्तिप्रदर्शनाचा दिवस म्हणूनही पाहिलं जातं. हा दिवस इतका का महत्त्वाचा आहे? आणि याला राजकीय रंग कसा आला? पाहू या दसऱ्याची ही सोपी गोष्ट. वार्तांकन - टीम बीबीसी मराठी लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - निलेश भोसले

Oct 05, 20225 min

टोकनायझेशन ऑनलाईन बँकिंगमुळे सुरक्षित होणार आहे का? BBC News Marathi

तुम्हाला गेल्या काही दिवसांत बँकेचा मेल, मेसेज आलं असेल. तुमच्या ऑनलाईन ट्रान्झॅक्शनसाठी टोकन तयार केलंय असं काहीतरी. सध्या ऑनलाईन शॉपिंगसाठी जोरदार सेल सुरू आहेत. तुम्ही UPI वापरून सहज सटासट ही खरेदी करताना ती अधिक सुरक्षित व्हावी म्हणून ही नवी प्रणाली आलीय – टोकनायझेशन. टोकनायझेशनसाठी रिझर्व्ह बँकेने गेल्या २ वर्षांत अनेकदा मुदतवाढ दिली. पण आता मात्र हे करणं आवश्यक असणार आहे..

Oct 04, 20224 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मॅरिटल रेप आणि गर्भपाताबद्दल सुप्रीम कोर्ट काय महत्त्वाचं बोललंय?

महिलेचं लग्न झालेलं असो वा नसो, गर्भधारणा तिच्या इच्छेने झाली असो वा नसो, 24 आठवड्यांच्या आत गर्भपात करण्याचा तिला अधिकार आहे, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलंय. भारतातल्या गर्भपाताच्या कायद्याचा इतिहास पाहता, हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. पण यामुळे नेमकं काय बदलणार? यात मॅरिटल रेपबद्दलही सुप्रीम कोर्टाने काय म्हटलंय? पाहूया आजची सोपी गोष्ट संशोधन – टीम बीबीसी निवेदन – गुलशनकुमार वनकर एडिटिंग – अरविंद पारेकर

Sep 30, 20226 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट : बुद्धिबळात चीटिंगच्या आरोपांनी खळबळ का उडाली? | सोपी गोष्ट

नीमनवर चीटिंगचे आरोप आहेत मात्र त्यानं ते नाकारले आहेत, पण याआधी ऑनलाईन खेळात चीटिंग केल्याचं मान्य केलंय. नेमकं हे प्रकरण काय आहे आणि त्याचा बुद्धिबळावर काय परिणाम होईल? संशोधन – टीम बीबीसी निवेदन – जान्हवी मुळे एडिटिंग – अरविंद पारेकर

Sep 29, 20226 min

शिवसेना कुणाची? उद्धव ठाकरेंकडे आता कोणते पर्याय? | सोपी गोष्ट

शिवसेनेचं निवडणूक चिन्ह 'धनुष्यबाण' कोणाला मिळणार? याचा निर्णय आता केंद्रीय निवडणूक आयोग घेणार आहे. पुढील काही दिवसांत या प्रकरणाची सुनावणी निवडणूक आयोग सुरू करेल. यावेळी उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांना शिवसेना पक्षाअंतर्गत बहुमत सिद्ध करावं लागेल.

Sep 28, 20224 min

डार्ट मोहिमेतून नासा खरंच पृथ्वीचा जीव वाचवणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

नासा या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेनं सोमवारी आपलं एक यान जाणून बुजून एका लघुग्रहावर आदळवलं. नासाच्या डार्ट मोहिमेचाच हा भाग होता. आणि ही मोहीम पृथ्वीला वाचवण्यासाठी आखलेली होती. नासाची ही डार्ट मोहीम काय आहे? सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Sep 27, 20225 min

पीएफआयच्या कार्यकर्त्यांवर भारतात कारवाई का होतेय? । BBC News Marathi

मागच्या आठवड्यापासून राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालय यांनी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर कारवाईचा बडगा उगारला आहे. देशभरात 15 राज्यांमध्ये एकाच वेळी छापे घालून संघटनेच्या शंभरच्या वर कार्यकर्त्यांना या कारवाईत ताब्यात घेण्यात आलंय. ही संघटना आणि तिचे कार्यकर्ते देशात फुटीरतावादी कारवाया करत असल्याचा ठपका तपास यंत्रणेनं ठेवलाय. तर पीएफआय संघटनेकडूनही कारवाईचा निषेध होतोय. हे नेमकं काय प्रकरण आहे? आणि पीएफआय संघटना नेमकी काय आहे? तिच्यावर कारवाई का होतेय? जाणून घेऊया सोपी गोष...

Sep 26, 20226 min

मूनलाइटिंग म्हणजे काय? विप्रो, इन्फोसिस कर्मचाऱ्यांवर कारवाई का करतंय? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतातल्या मोठ्या आयटी कंपन्या आता अशा कर्मचाऱ्यांवर कारवाई करू लागल्या आहेत, जे सकाळच्या शिफ्टला एका ऑफिसमध्ये पूर्णवेळ काम करत आहेत, आणि दुपारहून सुटी झाल्यानंतर रात्री उशिरापर्यंत दुसऱ्या एका कामातून पैसे कमावत आहेत. इन्फोसिसने कर्मचाऱ्यांना ताकिद दिली आहे, तर विप्रोने चक्क 300 कर्मचाऱ्यांना याच कारणावरून कामावरून काढून टाकलंय. हा प्रकार आहे मूनलाइटिंग. हे चूक आहे की बरोबर? वैध आहे की बेकायदेशीर? बघू या ही सोपी गोष्ट. संशोधन - टीम बीबीसी मराठी निवेदन - गुलशनकुमार वनकर एडिटिंग - अरविंद पारेकर...

Sep 24, 20225 min

इराणमध्ये महिला सार्वजनिकरीत्या हिजाब का जाळतायत? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

अलीकडे इराणमध्ये एका 22 वर्षीय महिलेचा पोलीस कोठडीत मृत्यू झाल्यानंतर तिथे महिलांचं आंदोलन चांगलंच पेटलंय. ही महिला हिजाबसक्तीचा विरोध करत होती. आणि तिला अटक केल्यानंतर पोलिसांच्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झाल्याचा जनतेचा दावा आहे. इराण हा इस्लामिक रिपब्लिक देश आहे. आणि तिथे सार्वजनिक ठिकाणी महिलांनी काय परिधान करावं यासाठी कडक ड्रेसकोड आहे. त्या विरोधात 2014 पासून महिला तिथं आंदोलन करतायत. पण, या ताज्या हिंसक घटनेनंतर हिजाबविरोधी आंदोलन पुन्हा ऐरणीवर आलंय. यावेळी त्याची व्याप्तीही मोठी आहे. इराण...

Sep 22, 202219 min

जगात आर्थिक मंदी खरंच येणार का? भारतावर काय परिणाम होईल? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

आधीच कोव्हिडमुळे उद्भवलेल्या आर्थिक संकटात अनेकांच्या नोकऱ्या गेल्या. किंवा काही कुटुंबांनी घरातल्या कमावत्या व्यक्ती गमावल्या. आणि या धक्क्यातून सावरण्यापूर्वीच जागतिक मंदीची भीती घोंघावत आहे. जागतिक बँक आणि आंतरराष्ट्रीय नाणेनिधीनेही तसा अंदाज वर्तवला आहे. खरंच 2023मध्ये मंदीची परिस्थिती उद्भवू शकते का? मंदी आली तर भारतावर त्याचा काय परिणाम होईल, जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

Sep 21, 20225 min

पुरुषांच्या तुलनेत महिलांना कमी वेतन का मिळतं? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

भारतात महिलांना पुरुषांच्या तुलनेत कमी पगार मिळतो हे पुन्हा एकदा एका संशोधन अहवालाच्या माध्यमातून उघड झालं आहे. समान पात्रता आणि क्षमता असूनही हे रोजगाराचं प्रमाण पुरुषांमध्ये 41 टक्क्यांनी जास्त आहे. वेतन आणि रोजगाराच्या बाबतीत फक्त स्त्री-पुरुष अशीच असमानता नाही तर अल्पसंख्यांक (मुस्लीम) आणि अनुसूचित जाती, जमातीच्या लोकांनाही अशा असमानतेचा मुकाबला करावा लागत आहे. या परिस्थितीची कारणमीमांसा आणि उपाय जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - अरविंद पारेकर

Sep 19, 20225 min

नामिबियातून आलेले चित्ते भारताशी कसं जुळवून घेणार? BBC News Marathi सोपी गोष्ट पॉडकास्ट

चित्ता हा सगळ्यात वेगवान आणि चपळ प्राणी. पण, 75 वर्षांपूर्वी हा प्राणी भारतातून नामशेष झाला. चित्त्यांचं पुन्हा भारतात पुनर्वसन करण्यासाठी आता केंद्रसरकारने नामिबिया आणि दक्षिण आफ्रिकेतून चित्ते भारतात मागवले आहेत. आणि त्यातले पहिले आठ चित्ते 17 सप्टेंबरला भारतात दाखल होणार आहे. चित्त्यांचा हा विमान प्रवास कसा असेल आणि महत्त्वाचं म्हणजे भारतात आणल्यावर ते इथल्या वातावरणाशी कसं जुळवून घेतली याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - सौतिक बिस्वास लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भो...

Sep 16, 20225 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android