11 जुलै या जागतिक लोकसंख्या नियंत्रण दिनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राज्यासाठी प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायद्याचा मसुदा जाहीर केला. दोन पेक्षा जास्त मुलं असलेल्यांना आरक्षण, सरकारी अनुदान मिळणार नाही, असं हा कायदा सांगतो. आसाम, कर्नाटक या इतर राज्यांतही तशा प्रकारच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाचा लोकसंख्या वाढीचा दर 2.1% च्या आत राखणं हे या कायद्यांचं उद्दिष्ट आहे. पण, हा कायदा म्हणजे 2022च्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हिंदू-मुस्लीम कार्ड खेळण्याचा भाजपचा डाव आहे अ...
Jul 14, 2021•6 min
देशातील सर्व महत्त्वाच्या शहरांमध्ये पेट्रोल पाठोपाठ डिझेलनेही दरांची शंभरी गाठली आहे. इंधनाच्या किमती आटोक्यात ठेवायच्या असतील तर केंद्राने उत्पादन शुल्क आणि राज्यसरकारने मूल्यवर्धित कर कमी करणं गरजेचं आहे. पण, त्यामुळे सरकारला मिळणारा महसूल बुडेल या भीतीने दोन्ही सरकारं हे कर कमी करत नाहीएत. सामान्यांवर मात्र त्यामुळे महागाईचा बोजा पडतोय. पेट्रोलचे दर सरकार का कमी करत नाही जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
Jul 13, 2021•6 min
अमेरिकेतली हवामानाचा अंदाज व्यक्त करणारी वेबसाईट स्पेसवेदर डॉट कॉमवर सध्या एक इशारा झळकतोय. सूर्याच्या वातावरणात तयार झालेलं एक वादळ अती प्रचंड वेगाने अंतराळात फिरून आता पृथ्वीच्या दिशेनं सरकतंय. आणि ते पृथ्वीवरही धडकू शकतं. पण सोलार स्टॉर्म किंवा हे सौर वादळ नेमकं असतं काय? यामुळे आपल्यावर नेमका काय परिणाम होणार आहे? यामुळे पृथ्वीवरचं तापमान अचानक वाढेल का? इंटरनेट, जीपीएस बंद पडेल का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुक...
Jul 12, 2021•6 min
तुम्ही महिला असाल. आणि एकेदिवशी अचानक तुम्हाला कळलं की, तुमचा फोटो आणि सोशल मीडियावरची तुमची इतर माहिती वापरून इंटरनेटवर तुम्हाला बदमान करण्यात येतंय तर? फक्त बदनामीच नाही तर तिथं तुमच्याबद्दल अश्लील बोललं जातंय आणि तुम्हाला चक्क विकायला काढलंय तर? संताप तर येईलच पण, त्याचबरोबर काही क्षण अगदी असहाय्य पण वाटेल. काही मुस्लीम महिलांच्या बाबतीत अलीकडे तसंच झालंय. सुल्ली डिल्स नावाचं एक ओपन सोर्स ॲप त्यासाठी तयार करण्यात आलं होतं. आणि बदनामी झालेल्यांच्यामध्ये काही प्रथितयश मुस्लीम महिला पत्रकारही आह...
Jul 10, 2021•6 min
अफगाणिस्तानमध्ये सध्या नेमकं काय चाललंय? अमेरिकन सैन्य तिथून माघार का घेतंय? आणि अमेरिकेनं माघार घेतल्यावर पुन्हा तिथं तालिबानी राज्य येऊ शकेल का? अल् कायदा पुन्हा सक्रिय होईल का? असे कितीतरी प्रश्न सध्या तिथली परिस्थिती बघून विचारले जातायत. तसा हा देश गेली 20 वर्षं दहशतवाद आणि युद्धामुळे होरपळतोय. पण आता तिथं नेमकं काय घडतंय हे जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले
Jul 09, 2021•7 min
देशात हुंडाविरोधी कायदा 1961पासून अस्तित्वात असूनही 95% लग्नांमध्ये अजूनही हुंडा स्वीकारला जातो आणि दिला जातो. हा धक्कादायक अहवाल जागतिक बँकेनं दिला आहे. त्यासाठी बँकेच्या एका गटाने 27 राज्यांमधली 40,000च्या वर लग्नांमध्ये झालेल्या खर्चाचा अभ्यास केला आहे. काही ठिकाणी थेट हुंडा न देता त्याचं स्वरुप बदललंय. त्यामुळे आज पुन्हा वेळ आलीय हुंडा या दुष्ट आणि महिलांसाठी अन्यायकारक सामाजिक प्रथेबद्दल बोलण्याची. हुंड्याची प्रथा आणि तिचे सामाजिक दुष्परिणाम याविषयी बोलूया सोपी गोष्टमध्ये…. लेखन,निवेदन - ऋज...
Jul 08, 2021•7 min
कोरोना परिस्थितीमुळे थांबलेला केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तार अखेर बुधवारी होणार अशी चर्चा सर्वत्र आहे. आणि यात महाराष्ट्रातून नारायण राणे आणि हीना गावित यांना संधी मिळण्याची शक्यता आहे. पण, नरेंद्र मोदी आताच का मंत्रिमंडळ विस्तार करत आहेत? यामागे राजकीय समीकरणं आहेत की प्रशासकीय सोय? पाहूया आजची सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
Jul 07, 2021•6 min
कोरोनाच्या काळात MPSC स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना जोरदार फटका बसलाय. 2019पासून ही परीक्षा नियमित होत नाहीए, झाली तर नियुक्ती होत नाहीए आणि मुख्य स्पर्धा झाली तर मुलाखती होत नाहीएत. त्यामुळे रोजगाराच्या प्रतीक्षेत असलेल्या राज्यातील तरुण मुलांचा मात्र कोंडमारा होतोय. पण, MPSC परिक्षांच्या गोंधळाला नेमका जबाबदार कोण, याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
Jul 06, 2021•8 min
ईडीच्या अधिकाऱ्यांनी कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जरंडेश्वर साखर कारखाना जप्त करण्याची कारवाई केली आहे. हा साखर कारखाना राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जवळच्या नातेवाईकाचा आहे. त्यामुळे ईडीने केलेली कारवाई ही थेट अजित पवारांना धक्का आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हे प्रकरण नेमकं काय आहे आणि अजित पवार खरंच यात अडचणीत येऊ शकतील का, याविषयी बोलूया सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
Jul 05, 2021•7 min
प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
Jul 02, 2021•7 min
प्यू रिसर्च या आंतरराष्ट्रीय संस्थेनं अलीकडेच केलेल्या एका सर्वेक्षणात 64% भारतीय हिंदूंनी हिंदुत्व म्हणजेच राष्टीयत्व असल्याची भावना व्यक्त केली आहे. हिंदू असणं म्हणजे खरा भारतीय असं त्यांना वाटतं! असं हिंदूंना का वाटतं, पूर्वीपासून त्यांना असं वाटत होतं, की अलीकडे ही भावना बळावली आहे. राजकीय आणि सामाजिक अंगांनी याचा परामर्श घेऊया सोपी गोष्टमध्ये... लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले
Jul 01, 2021•6 min
मुंबईत एप्रिल-जून महिन्यात झालेल्या एक सीरो सर्व्हेत 18 वर्षांखालील 51% मुलांमध्ये कोरोना अँटीबॉडीज् तयार झाल्याचं स्पष्ट झालं आहे. आधीच्या महिन्यात हे प्रमाण 39% होतं. याचा अर्थ एकतर या मुलांना आधी कोरोना संसर्ग होऊन गेला आहे. किंवा ते कोरोना संसर्गग्रस्तांच्या संपर्कात आले आहेत. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा सगळ्यात जास्त धोका आहे असं बोललं जातं. त्या पार्श्वभूमीवर हा निकाल चांगलाच म्हणायला हवा. पण, त्याचं वैद्यकीय दृष्ट्या विश्लेषण आणि विश्वसनीयता समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये…. संशोधन - ऋजुत...
Jun 29, 2021•5 min
ज्योतिषशास्त्र अभ्यासक्रमाला विरोध आणि समर्थन का केलं जात आहे?
Jun 28, 2021•7 min
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काश्मिरी नेत्यांबरोबर 24 जून या दिवशी दिल्लीत बैठक घेतली. केंद्र सरकारला काश्मीरमध्ये निवडणुका घेण्यापूर्वी मतदारसंघांची पुनर्रचना करायची आहे, पण प्रादेशिक पक्षांना हे मान्य नाही. काश्मिरी पक्ष 370 च्या मुद्द्यावर न्यायालयीन लढाई सुरूच ठेवणार आहेत, केंद्राच्या लेखी तो विषय संपला आहे. जर गेल्या दोन वर्षांत कुणाच्यात भूमिकेत बदल झाला नसेल तर ही बैठक घेतल्याने काय साध्य झालं? यामागे अजून काय गणितं आहेत? ऐकू आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- सिद्धनाथ गानू, रियाझ मसरूर लेखन, न...
Jun 25, 2021•7 min
महाबळेश्वरच्या एका गुहेत काही वटवाघुळांमध्ये निपाह व्हायरस सापडला. या व्हायरसचा यापूर्वी चार वेळा भारतात उद्रेक होऊन गेला आहे. केरळमध्ये 2018 साली या व्हायरसमुळे 18 लोकांचा मृत्यू झाला होता. निपाहवर अजूनही कोणतीही लस नाही किंवा ठोस उपचारपद्धतीही नाही. वटवाघुळांमधून निपाहचा संसर्ग माणसांना होण्याची शक्यता किती असते? या व्हायरसपासून सुरक्षित कसं राहायचं? या सगळ्याची उत्तरं देणारी आजची ही सोपी गोष्ट. संशोधन-मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
Jun 24, 2021•5 min
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरी काल राष्ट्रमंचची बैठक झाली आणि पुन्हा एकदा चर्चेला उधाण आलं की, पवार नरेंद्र मोदी यांच्या विरोधात इतर पक्षांची एकत्र आघाडी उभी करण्याच्या प्रयत्नांत आहेत का? काल त्याविषयी काही घोषणा होईल असंही वाटलं होतं. पण, प्रत्यक्षात मोदी विरोधात अशा राष्ट्रीय आघाडीबद्दल काहीच बोललं गेलं नाही. अशावेळी सोपी गोष्टमध्ये बघूया शरद पवार यांनी अशी घोषणा करणं का टाळलं? सध्या नाही तरी भविष्यात अशी आघाडी उभी राहील का? तिचं नेतृत्व कोण करेल? संशोधन - ऋजुता लुकतुके ल...
Jun 23, 2021•7 min
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुन्हा एकदा देशातल्या विरोधी पक्षांची एकत्र मोट केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारला आव्हान देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यात ते किती यशस्वी होतात हे येणारा काळच सांगेल. पण, यातून शरद पवार यांची देशाचा पंतप्रधान होण्याची कित्येक वर्षांची इच्छा पुन्हा वर आली की काय असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे. यापूर्वीही शरद पवार यांनी 1990 च्या दशकांत काँग्रेस पार्टीत असताना दोनदा पंतप्रधान होण्याचा निकराचा प्रयत्न केला होता. जाणून घेऊया याच दोन प्रयत्नांविषयी जेव्हा ...
Jun 22, 2021•7 min
अयोध्येतल्या प्रस्तावित राम मंदिरासाठी जागा खरेदी करताना घोटाळा झाल्याचा आरोप एकदा नाही तर दोनदा झालाय. समाजवादी पार्टी आणि आम आदमी पार्टीने या मुद्यावरून राम जन्मभूमी न्यास ट्रस्ट आणि पर्यायाने भाजपला घेरण्याचा प्रयत्न केलाय. तर राम जन्मभूमी ट्रस्टचे सचिव चंपत राय आणि गृहमंत्री अमित शाह यांनी कुठल्याही प्रकारचा घोटाळा झाला नसल्याचं म्हटलंय. ट्रस्टने गोळा केलेले बहुतेक पैसे हे जनतेच्या वर्गणीतून गोळा केलेत. त्यामुळे इथे लोकांच्या विश्वासाचा प्रश्न आहेच. शिवाय पुढच्या वर्षी होणाऱ्या उत्तर प्रदेश ...
Jun 21, 2021•6 min
राज्यात कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची तयारी सुरू आहे. गर्दी वाढली आणि लोकांनी आरोग्याचे नियम पाळले नाहीत तर महिन्या दोन महिन्यांतच राज्यात तिसरी लाट येऊ शकते अशा बातम्या आल्या पण यावर स्पष्टीकरण देताना कोव्हिड टास्कफोर्सच्या डॉक्टरांनी सांगितलं की त्यांनी अशी कोणतीही कालमर्यादा दिली नव्हती. वेगाने पसरणारा डेल्टा आणि नव्याने आलेला डेल्टा प्लस व्हेरियंट, तसंच इतर कारणांमुळे राज्यात पुढची लाट लवकर येईल का? त्याचा जास्त फटका कुणाला बसेल? या सगळ्याबद्दलची ही सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्...
Jun 18, 2021•5 min
फुटबॉलर रोनाल्डोने कोकची बाटली सरकवून लोकांना पाणी प्या असं सांगितलं आणि नेहमी चर्चा होणारा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला. सॉफ्ट ड्रिंक्स किंवा कोल्ड ड्रिंक्स पिणं आरोग्यासाठी हानीकारक असतं का? कोल्ड ड्रिंक्स प्यायल्यानंतर प्रसन्न वाटतं, मग ती शरीरात जाऊन अपाय कसा करू शकतात? त्यांचं व्यसन लागू शकतं का? या सगळ्याची उत्तरं आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले
Jun 17, 2021•6 min
भारतात सोन्याला गुंतवणूक म्हणूनही महत्त्व आहे आणि सोन्याचे दागिने, इतर कलात्मक वस्तूंसाठी या धातूचं श्रृंगारिक मूल्यही मोठं आहे. आता 16 जून पासून केंद्रसरकारने सोन्याचे दागिने आणि वस्तूंचं हॉलमार्किंग अनिवार्य केलंय. हॉलमार्कचं प्रमाणपत्र असेल तरंच या वस्तू सोनार विकू शकेल. शिवाय सोनार आता 14, 18 आणि 22 कॅरेटचेच दागिने विकू शकणार आहेत. घाबरू नका, हॉलमार्किंग ग्राहकांच्या भल्यासाठीच आहे. पण, त्याचा नेमका फायदा काय? आता तुमच्याकडे असलेल्या वस्तूंवर हॉलमार्कचा शिक्का नसेल तर काय होईल या सगळ्या प्रश...
Jun 16, 2021•6 min
14 जून रोजी अडाणी एंटरप्राईजेस् कंपन्यांचे शेअर कोसळल्यामुळे गौतम अडाणी यांची नरेंद्र मोदींशी मैत्री, मागच्या दहा वर्षांत त्यांच्या कंपन्यांची झालेली भरभराट हे विषय पुन्हा ऐरणीवर आले आहेत. त्या निमित्ताने जाणून घेऊया देशातले दुसऱ्या क्रमांकाचे उद्योगपती गौतम अडाणी यांच्याविषयी आणि त्यांच्याभोवतीच्या वादांविषयी, आजच्या सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - शरद बढे
Jun 15, 2021•6 min
इस्त्रायलमध्ये बेंजामिन नेतन्याहू यांची बारा वर्षांची राजवट उलथून आठ पक्षांचं आघाडी सरकार सत्तेत आलं आहे. रविवारी तिथल्या संसदेत झालेल्या बहुमत चाचणीत नेतन्याहू यांच्या पक्षाचा एका मताने निसटता पराभव झाला. आता आठ पक्षांची एकत्र मोट बांधण्याचं अवघड काम नवे पंतप्रधान नेफ्ताली बेनेट यांना करायचं आहे. पण नेतन्याहू यांच्या पराभवासाठी हे आठ परस्परविरोधी विचारसरणीचे पक्ष कसे एकत्र आले? आणि या सत्ता बदलामुळे भारत आणि इस्त्रायल यांच्या मैत्रीवर काही परिणाम होईल का, जाणून घेऊया आजच्या सोपी गोष्टमध्ये... स...
Jun 14, 2021•6 min
महाराष्ट्रात राज्य शिक्षण मंडळाचं नवीन शैक्षणिक वर्ष 15 जूनपासून सुरू होईल. यंदाही सुरुवात ऑनलाईनच होणार आहे. आणि यावेळी मुलांना पहिले पंधरा दिवस एक खास ‘ब्रिज कोर्स’ पूर्ण करायचा आहे. ऑनलाईन शिक्षण पद्धतीत मुलांना मागच्या वर्षीचा अभ्यासक्रम किती समजला आहे हे शिक्षकांना कळावं आणि मुलांचीही काही संकल्पनांची उजळणी व्हावी यासाठी हा पाठ्यक्रम SCERT मंडळाने ठरवला आहे. हा ब्रिज कोर्स कुणाला करायचा आहे, तो अनिवार्य आहे का, कधी करायचा याविषयी जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - दीपाली जगताप लेखन,निव...
Jun 11, 2021•5 min
मुंबई शहरात पावसाळ्यात निर्माण होणारा पूराचा प्रश्न सोडवण्यासाठी मुंबई महानगरपालिकेनं टोकयोच्या धर्तीवर जमिनीखाली पाणी वाहून नेणारे बोगदे खणण्याचं ठरवलं आहे. या भूमिगत तळ्यांना होल्डिंग पाँड्स म्हणतात. आणि असा पहिला प्रकल्प येत्या दहा दिवसांत मुंबईच्या हिंदमाता परिसरात कार्यान्वितही होणार आहे. सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया होल्डिंग पाँड्स प्रकल्पाविषयी आणि या प्रकल्पामुळे तरी मुंबईची पूरस्थिती आटोक्यात येईल का याविषयी... संशोधन - मयांक भागवत, ऋजुता लुकतुके लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निले...
Jun 11, 2021•6 min
अपक्ष खासदार नवनीत राणा यांची खासदारकी धोक्यात आली आहे. अनुसूचित जातींसाठी राखीव असलेल्या अमरावती मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी नवनीत यांनी सादर केलेलं जातीचं प्रमाणपत्र बनावट असल्याचा निर्वाळा मुंबई हायकोर्टाने दिला आहे. यावर नवनीत राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यांच्याविरोधात शिवसेनेचं हे राजकीय षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केलाय. पण, जात प्रमाणपत्र रद्द झाल्यावर त्यांची खासदारकी धोक्यात आली आहे का, त्यांच्या जात प्रमाणपत्राचा नेमका घोळ काय आहे, जाणून घे...
Jun 09, 2021•6 min
2018मध्ये सर्वोच्च न्यायालयाने कलम 377 रद्द केलं. त्यामुळे समलैंगिक संबंधांना कायदेशीर मान्यता देशात मिळाली. पण, तरीही समलैंगिक लोकांचा लढा अर्धवट होता. कारण, कित्येक घरांमध्ये मुलगा किंवा मुलगी समलैंगिक आहे समजल्यावर ही लैंगिकता स्वीकारली जात नाही. आणि समलैंगिक भावना दडपण्यासाठी कन्व्हर्जन थेरपीचा सल्ला दिला जातो. आता मद्रास हायकोर्टाने एका महत्त्वपूर्ण खटल्यात अशी थेरपीही कायदेबाह्य केली आहे. समलैंगिकांना सामाजिक समानता बहाल करण्याबरोबरच अशी थेरपी देणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई करण्याबद्दल कोर्टान...
Jun 08, 2021•7 min
यंदा तुम्ही विवरणपत्र ऑनलाईन भराल तेव्हा तुमचा तो अनुभव वेगळा असू शकतो. कारण, सर्वसामान्य नागरिकांना विवरणपत्र ऑनलाईन भरता यावं आणि त्यांच्यासाठी ही प्रक्रिया सुटसुटीत आणि सोपी व्हावी यासाठी केंद्रीय प्रत्यक्ष करवसुली मंडळाने आपल्या वेबसाईटमध्ये (www.incometax.gov.in) काही महत्त्वपूर्ण बदल केले आहेत. आणि ही नवी वेबसाईट आजपासून जनतेसाठी खुली झाली आहे. जाणून घेऊया या नवीन वेबसाईटविषयी आणि त्यातील बदलांविषयी, सोपी गोष्टमध्ये... लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
Jun 07, 2021•5 min
बॉलिवूड अभिनेत्री जुही चावलाने 5G तंत्रज्ञानाच्या विरोधात दिल्ली हायकोर्टात एक याचिका दाखल केली आहे. या नेटवर्कमुळे पर्यावरणाची हानी होते. म्हणून ते प्राणी आणि माणसासाठीही सुरक्षित असल्याची ग्वाही कोर्ट देऊ शकतं का, असा सवाल त्यांनी विचारला आहे? त्यानिमित्ताने 5G तंत्रज्ञान, त्याचे फायदे आणि पर्यावरणाची होणारी हानी हे मुद्दे पुन्हा ऐरणीवर आले आहेत. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बघूया खरंच 5G अपायकारक आहे का? संशोधन- ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन- ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले
Jun 03, 2021•6 min
कोरोनाचा उद्रेक सुरू झाला तेव्हा गेल्यावर्षीच्या मे महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला ‘आत्मनिर्भर भारत’चा नारा दिला. आणि याच नावा अंतर्गत कामगार वर्ग आणि लघु, मध्यम उद्योजकांसाठी 20,00,000 कोटींचं एक पॅकेजही त्यांनी जाहीर केलं. आता एक वर्षं उलटलं. या वर्षभरात केंद्रीय आकडेवारी असं सांगते की, देशाचा जीडीपी विकास दर 7.3% नी कमी झाला आहे. मग आत्मनिर्भर भारत योजनेवर खर्च झालेले 20 लाख कोटी रुपये नेमके गेले कुठे? कोरोना काळात सरकारकडून लोकांना नेमकी किती आणि कशी मदत मिळाली? की मिळालीच नाही...
Jun 02, 2021•7 min