सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

सोपी गोष्ट पॉडकास्ट: जीडीपीच्या परिक्षेत नरेंद्र मोदी पास की, नापास?

30 मे ला नरेंद्र मोदी सरकारने 7 वर्षांचा कालावधी पूर्ण केला. तर 31 मे ला देशाची वर्षभरातली आर्थिक कामगिरी सांगणारा जीडीपी विकास दर जाहीर झाला. देशाचं हे आर्थिक रिपोर्ट कार्ड असं सांगतंय की, आर्थिक वर्षं 2020-21 मध्ये देशाचा आर्थिक विकासदर उणे किंवा वजा 7.3% होता. म्हणजे आपली अर्थव्यवस्था इतक्या टक्क्यांनी घसरली किंवा आकुंचन पावली. पण मग याचा अर्थ काय? याचा आपल्यावर किती आणि कसा परिणाम होणार आहे? आपली कामगिरी इतर देशांच्या तुलनेत कशी होती? हे समजून घेऊया आज सोपी गोष्टमध्ये… संशोधन- ऋजुता लुकतुके ...

Jun 01, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मेहुल चोकसी यांची हिरे व्यापारी ते फरार गुन्हेगार होण्यापर्यंतची गोष्ट

पंजाब नॅशनल बँकेत बनावट कागदपत्रं सादर करून तब्बल 13,600 कोटी रुपयांची कर्ज उचलणारा मेहुल चोक्सी 2018 मध्ये भारतातून पळून जाण्यात यशस्वी झाले. अँटिग्वा देशाने त्यांना नागरिकत्वही दिलं. त्यानंतर दोन वर्षांनी आता त्यांना जवळच्या डॉमनिका बेटांवर अटक झाली आहे. भारताने आंतरराष्ट्रीय गुन्हेगार प्रत्यार्पण कायद्याचा आधार घेऊन त्यांना भारतात आणण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. पण, या हालचालींनी यश येईल का? मूळात मेहुल चोकसी यांचा प्रथितयश व्यापारी, पीएनबी घोटाळा ते देशातून फरार होणं हा सगळा प्रवास समजू...

May 31, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड-19 संसर्ग झाल्यामुळे मधुमेह होण्याचा धोका आहे का?

आजारातून बरं झाल्यानंतरही अनेकदा त्याचे दुष्परिणाम दीर्घकाळ सहन करावे लागतात. तशीच काहीशी गत कोव्हिडची. कोव्हिड-19 मुळे नव्याने होणाऱ्या मधुमेहावर सध्या जगभरात संशोधन सुरू आहे. डायबेटोलॉजिस्ट सांगतात की कोव्हिडमुळे नव्याने मधुमेह होण्याचं प्रमाण 10 टक्के आहे. यामागे काय कारणं आहेत? हे होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी? संशोधन- मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

May 28, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना व्हायरस चीनच्या लॅबमधून पसरला का याचा बायडन सरकार का करतंय तपास?

कोरोना व्हायरसचा उगम नेमका कसा झाला? तो चीनच्या लॅबमध्ये जन्माला आला होता या दाव्याला आजवर धुडकावलं गेलं. पण आता अमेरिकन राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांनी गुप्तचर यंत्रणांना या दाव्याचीही सखोल शहानिशा करण्याचे आदेश दिलेत. अनेक तज्ज्ञांनीही हा व्हायरस प्रयोगशाळेत जन्मलेला असण्याची शक्यता पूर्णतः फेटाळता येणार नाही असं म्हटलंय. नेमकं सत्य काय आहे? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन, लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

May 27, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारताला अफगाणिस्तानमध्ये तालिबान सत्तेत परत येण्याची चिंता का आहे?

अमेरिकन सैन्य 20 वर्षं अफगाणिस्तानात राहूनही तालिबान आणि त्यांच्याशी संबंधित इतर कट्टरतावादी गटांचं कंबरडं मोडू शकलं नाही. तिथली लोकशाही प्रक्रिया अजूनही पूर्णपणे स्थिरावू शकलेली नाही. त्यामुळेच अमेरिका बाहेर पडल्यानंतर अफगाणिस्तानात अस्थिरता निर्माण होण्याची भीती आहे. लोकशाही सरकार जाऊन तालिबान सत्तेत आलं तर भारतासाठी चिंतेचं कारण ठरेल का? संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

May 27, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाव्हायरस उपचारासाठी मोदी सरकारची आयुष्मान भारत योजना कामी आली का?

गरीबांना कोरोनाचे उपचार ‘आयुष्मान भारत’ योजनेत मोफत मिळणार असल्याची घोषणा सत्यात उतरली का?

May 25, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस भारतात लहान मुलांना कधीपासून मिळणार?

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांना संसर्गाचा धोका जास्त असेल असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. संसर्गापासून वाचण्यासाठी लसीकरण हा सगळ्यात प्रभावी मार्ग आहे असं जगभरातल्या जाणकारांचं सांगणं आहे. सध्या भारतात लहान मुलांना लस दिली जात नाही पण जगातल्या काही देशांमध्ये हे केलं जातं. लहान मुलांना लस देण्याचे काय फायदे आहेत? त्यादृष्टीने भारतात काय हालचाली सुरू आहेत? ऐका आजची ही सोपी गोष्ट संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

May 24, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: काँग्रेस टूलकिट वापरून नरेंद्र मोदींची बदनामी करत असल्याचा भाजपचा दावा खरा की खोटा?

कोव्हिड काळात काँग्रेस पक्ष नरेंद्र मोदींची बदनामी करण्यासाठी टूलकिटचा वापर करत असल्याचं उघड झाल्याचा दावा भाजपने केलाय. #CongressToolkitExposed असा हॅशटॅग वापरून भाजप नेत्यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं पण हे टूलकिट फेक असल्याचं अल्ट न्यूजच्या फॅक्ट चेकमध्ये समोर आलं. भाजप खोटारडा पक्ष असल्याचं काँग्रेस म्हणते तर हे खोटं असल्यास खुशाल काँग्रेसने या सगळ्याची चौकशी करावी असं भाजप म्हणतो. नेमकं प्रकरण काय आहे? कोव्हिड काळात हे राजकारण का सुरू आहे? ऐका आजची सोपी गोष्ट. संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवे...

May 21, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना होम टेस्ट किट काय आहे? गुळणी करून कोरोनाची चाचणी कशी करायची?

कोरोनाची टेस्ट म्हटली की डोळ्यासमोर येतो स्वॉब आणि पीपीई किट घातलेले लोक. पण आता घरच्या घरीच कोरोना टेस्ट करता येणार आहे. पुण्याच्या माय लॅब या कंपनीने विकसित केलेलं घरच्या घरी टेस्ट करण्याच्या किटला ICMR ने मान्यता दिली आहे. तसंच नागपूरच्या नीरी या संस्थेने विकसित केलेल्या सलाईनच्या पाण्याची गुळणी करून सँपल घेण्याच्या तंत्रालाही मान्यता मिळाली आहे. काय आहेत या टेस्ट आणि त्यांचा कसा फायदा होईल? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- प्रवीण मुधोळकर, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग-...

May 20, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारने इस्रायल पॅलेस्टाईन संघर्षात इस्रायलची बाजू का घेतली नाही?

इस्रायल आणि हमास यांच्यात गेले काही दिवस तीव्र संघर्ष सुरू आहे. अनेक लोकांचे यात जीव गेलेत, अनेक बेघर झालेत. पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात भारत आणि इस्रायल यांच्यातले संबंध अधिक दृढ झाल्याचं चित्र आहे. दोन्ही पंतप्रधानांनी एकमेकांच्या देशांना भेटी दिल्या. पण तरीही भारताने सध्याच्या संघर्षात इस्रायलची बाजू घेतलेली नाही. उलट पॅलेस्टाईनच्या न्याय्य उद्दिष्टांना भारताचं समर्थन असल्याचं राजदूतांनी संयुक्त राष्ट्रांना सांगतलं. मोदी सरकारच्या काळात भारताने इस्रायलची बाजू का घेतली नाही? ऐका आजच्या सोपी ...

May 17, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर का वाढवलं?

ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर आता 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे इतकं वाढवण्यात आलं आहे. याचा अर्थ हा की, पहिल्या डोस नंतर दुसरा डोस तीन ते चार महिन्यांनी घ्यायचा आहे. त्यामुळे उलट लसीची परिणामकारकता वाढते असं संशोधनातून दिसून आलंय. तुमच्यापैकी अनेकांना सध्या दुसरा डोस मिळवताना अडचणी येतायत. कारण, लशीच उपलब्ध नाहीएत. अशावेळी तर या निर्णयाने मोठाच दिलासा मिळाला असेल. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये समजून घेऊया कोव्हिशिल्ड लशीच्या दोन डोसमधलं अंतर वाढल्यामुळे काय फायदा...

May 14, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इस्त्रायल - पॅलेस्टाईन एकमेकांशी सारखे का भांडतात?

इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यातला संघर्ष पुन्हा एकदा पेटला आहे. आणि दोन दिवसांच्या रॉकेट हल्ल्यांनंतर हा संघर्ष युद्धाचं रुप घेतो की काय, अशी भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर इस्त्रायल आणि पॅलेस्टाईन दरम्यानचा मूळ वाद नेमका काय आहे हे समजून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - बीबीसी टीम लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - ऋजुता लुकतुके, अमृता दुर्वे एडिटिंग - निलेश भोसले

May 13, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऐन ईदच्या सणाला इस्त्रायल देश का पेटलाय?

एकीकडे अख्खं जग कोव्हिडचा सामना करत असताना मध्य-पूर्व आशियातल्या गाझा पट्टीत आणि जेरुसलेममध्ये वेगळाच संघर्ष सुरू झालाय. इस्त्राएलनं गाझा पट्टीतली १३ मजली हनाडी टॉवर ही इमारत पाडल्यानंतर हमास या कट्टरतावदी संघटनेनं इस्त्रायलच्या दिशेनं 130च्या वर रॉकेट्स डागली. आणि यात तेल अवीव हे इस्त्रायलचं महत्त्वाचं शहरही त्यांनी सोडलं नाही. या सगळ्यात आतापर्यंत तीसच्यावर नागरिकांचा जीव गेलाय. जेरुसलेम या धार्मिक स्थळावरून ज्यू, ख्रिश्चन आणि मुस्लिमांमधला वाद पुरातन आहे. त्यातच ऐन ईदच्या सणाला कोणती नवी ठिणग...

May 12, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना रुग्णांना स्टिरॉईडचा फायदा होतो की तोटा?

डेक्झामेथेझॉन आणि इतरही काही स्टिरॉईड्स सुरुवातीच्या काळात कोरोना रुग्णांचा जीव वाचवणारी औषधं म्हणून गौरवली गेली. पण, दुसऱ्या लाटेत स्टिरॉईड्सच्या अतीवापराचे परिणामही बघायला मिळत आहेत. सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांमध्ये सुरुवातीच्या दिवसांत स्टिरॉईडचा वापर झाल्यामुळे उलट संसर्ग वाढल्याचीही काही उदाहरणं आहेत. म्हणूनच आज कोरोना रुग्णांसाठी स्टिरॉईडचा वापर कसा आणि कुठे करायचा जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये… संशोधन - मयांक भागवत लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले...

May 11, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनानंतर कान, डोळ्यांना येणारी काळी बुरशी

कोव्हिड19च्या आजारातून बरे झालेल्या काही रुग्णांना नंतर काळी बुरशी किंवा म्युकोर मायकोसिसचा संसर्ग झाल्याचं आढळून आलं आहे. आणि त्यामुळे नाक, कान, डोळा किंवा अगदी मेंदूपर्यंत संसर्ग पोहोचून अर्धांग वायूचा झटका किंवा डोळे काढण्यापर्यंत वेळ आली आहे. काळी बुरशीचा संसर्ग असलेल्या या आजाराला शास्त्रीय नाव आहे म्युकोर मायकोसिस. या आजाराविषयी आज सविस्तर जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम वार्तांकन सहाय्य - निलेश पाटील लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

May 10, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? सरकार काय सांगतं? | सोपी गोष्ट 333

मोदी सरकारकडे कोरोनाग्रस्तांसाठी आलेली मदत गेली कुठे? असा सवाल विचारला जातोय.

May 07, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लशीचा डोस मिळायला उशीर झाला तर काय होईल?

कोरोना लसीचा एक डोस घेतल्यानंतर त्या व्यक्तीला दोन आठवड्यात कोरोनापासून संरक्षण मिळतं आणि मधल्या वेळेत या व्यक्तीला कोरोना झालाच तरी इतरांना संसर्ग होण्याचा धोका 49%नी कमी होतो, असं युकेमधील एक संशोधन सांगतं. भारतात सध्या लशीच्या तुटवड्यामुळे काहींना लसीचा दुसरा डोस मिळालेला नाही. अशावेळी दुसरा डोस मिळायला उशीर झाला, दुसरा डोस मिळालाच नाही तर काय होईल या प्रश्नांची उत्तरं बघूया सोपी गोष्टमध्ये संशोधन - मयांक भागवत, बीबीसी आरोग्य टीम लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले...

Apr 30, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस 18+ साठी कोविनवर नोंदणी झाली, पण लस कधी मिळणार? सोपी गोष्ट 327

18 वर्षांवरील सर्वांना लस मिळणार असं सरकारने जाहीर केलं. त्यासाठी नोंदणीही सुरू झाली. पण लसीकरणासाठी अपॉइंटमेंट मिळत नाही अशीच परिस्थिती सगळीकडे पाहायला मिळतेय. असं का होतं आहे? 18 वर्षांच्या वरच्या लोकांना देण्यासाठी राज्यांकडे पुरेशा लशी आहेत का? महाराष्ट्राने याबद्दल काय निर्णय केलाय? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Apr 29, 20214 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना ऑक्सिजन व्हेंटिलेटर PM केअर्स फंडमधून किती आले? किती चालले? सोपी गोष्ट 326

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. अनेक रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडतेय. कोव्हिडच्या संकटाशी लढण्यासाठी सुरू केलेल्या PM केअर्स फंडमधून किती व्हेंटिलेटर घेतले गेले? त्यातले किती प्रत्यक्षात हाती आले आणि किती कार्यान्वित झाले? बीबीसीने सरकारी कागदपत्रं आणि माहिती अधिकारा वापर करून या प्रश्नांचा पाठपुरावा केला. ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- कीर्ती दुबे, टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Apr 29, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: प्रोनिंगमुळे कोरोना रुग्णांचा जीव वाचतो का?

प्रोनिंग' म्हणजे पोटावर पालथं झोपणं. श्वास घेण्यासाठी त्रास होणाऱ्या कोव्हिड रुग्णांसाठी हे वरदान ठरू शकतं, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटलंय. आणि या पद्धतीला वैद्यकीय मान्यताही दिली आहे. रुग्णामधील ऑक्सिजन पातळी कमी झाली किंवा श्वास घ्यायला त्रास होत असले तर घरच्या घरी प्रोनिंग करून रुग्णाचा जीव वाचू शकतो. तेव्हा शास्त्रीय प्रोनिंग कसं करायचं आणि त्याचे फायदे जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये.... संशोधन - बीबीसी मराठी टीम लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

Apr 27, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत परमोच्च बिंदू नेमका कधी आणि किती येईल?

महाराष्ट्रात आणि देशात सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं आहे. आताच रुग्णांना ऑक्सिजन आणि औषधांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यातच वेगवेगळ्या सर्वेक्षणांच्या अहवालानुसार, अजून देशात दुसऱ्या लाटेचा परमोच्च बिंदू म्हणजे पीक आलेलाच नाही. तो मे महिन्याच्या मध्यावर येणार आहे. आणि तोपर्यंत दर दिवसाला रुग्णसंख्या 5 लाखांपर्यंत जाऊन पोहोचलेली असेल, असा अंदाज आहे. अशावेळी आपण नेमकं काय करायचं कोरोनाची ही लाट नक्की कधी ओसरेल जाणून घेऊया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - ऋजुता लुकतुके लेखन, निवेदन - ऋजुता...

Apr 26, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना काळात ऑक्सिजन तुटवडा का आहे? ऑक्सिजन पुरवठा सुरळीत कसा होणार? सोपी गोष्ट 323 (BBC News Marathi)

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ऑक्सिजन तुटवडा एक मोठी समस्या बनली आहे. देशातली ऑक्सिजनची मागणी पूर्ण करण्यासाठी परदेशातून ऑक्सिजन आयात करण्याचाही प्रयत्न सुरू आहे. रेल्वे, विमानामार्फत ऑक्सिजनची वाहतूक केली जात आहे. पण मुळात ऑक्सिजनचा तुटवडा का पडला? आरोग्य यंत्रणा बेसावध होती का? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Apr 23, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना व्हायरस म्युटेशन ट्रिपल म्युटंट काय आणि किती घातक आहे? | सोपी गोष्ट 322

कोरोना व्हायरसची विविध म्युटेशन्स म्हणजे उत्परिवर्तनं जगभरात सापडत आहेत. भारतात सापडलेल्या म्युटेटेड कोरोनाबद्दल चिंता व्यक्त केली जात आहे. महाराष्ट्रात दुसऱ्या लाटेत ‘डबल म्युटंट’चा मोठा हात असल्याचं तज्ज्ञ सांगतात. पण आता ट्रिपल म्युटंटबद्दल बोललं जात आहे. तो काय आहे? त्यापासून आपल्याला किती धोका आहे? कोरोनाची आणखी किती म्युटेशन्स पाहायला मिळतील? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – बीबीसी मराठी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

Apr 22, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लक्षणं असूनही रिपोर्ट निगेटिव्ह का येतो? HRCT टेस्ट कधी करतात? सोपी गोष्ट 321

कोरोनाचा संसर्ग शोधण्यासाठी कोरोना चाचणी करणं गरजेचं असतं. पण जर लक्षणं असूनही टेस्ट रिपोर्ट ‘निगेटिव्ह’ आला तर? असं होण्याची कारणं काय असतात? रिपोर्ट निगेटिव्ह येऊनही लक्षणं असतील तर काय करायचं? सध्या अनेक कोव्हिड रुग्णांची केली जाणारी HRCT टेस्ट काय असते? ती कोणत्या रुग्णांनी करावी? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन – मयांक भागवत, सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भोसले

Apr 21, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लस 18 वर्षांवरच्या सर्वांना पुरेल इतका साठा भारताकडे आहे का?। सोपी गोष्ट 320

18 वर्षांवरील सर्व व्यक्तींना कोरोनाची लस 1 मे पासून घेता येणार आहे. एप्रिलच्या सुरुवातीला अनेक राज्यांनी ही मागणी केली होती, पण तेव्हा केंद्र सरकारने अशाप्रकारच्या मागण्या चिंताजनक आहेत म्हणत खूप टीका केली होती. मग आता दोन आठवड्यांत परिस्थितीत काय बदल झाला? सरसकट प्रौढांचं लसीकरण करण्याचा निर्णय का घेतला गेला? सगळ्यांना देता येतील इतक्या लशी भारताकडे आहेत का? नसतील तर त्या मिळवण्याची योजना काय आहे? ऐका आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग - निलेश भ...

Apr 20, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनामुळे महाराष्ट्रात संपूर्ण लॉकडाऊन उद्धव ठाकरे करतील?

गुढी पाडव्यापासून राज्यात कडक निर्बंध आहेत. आठवडा उलटला तरी राज्यातल्या कोरोनाच्या केसेस वाढतानाच दिसत आहेत. अनेक ठिकाणी नियमांचं उल्लंघन होताना पहायला मिळत आहे. अशा परिस्थितीत संपूर्ण लॉकडाऊनशिवाय पर्याय नसल्याचं अनेक मंत्री म्हणत आहेत. ज्यांनी यापूर्वी लॉकडाऊनचा विरोध केला ते मंत्रीही आता त्याला पाठिंबा देताना दिसत आहेत. हे मतपरिवर्तन कसं झालं? कोरोनाचा प्रसार मंदावण्यासाठी लॉकडाऊनशिवाय दुसरा पर्याय उपलब्ध नाही का? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन - बीबीसी मराठी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गा...

Apr 19, 20216 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android