सोपी गोष्ट - podcast cover

सोपी गोष्ट

BBC Marathi Audiowww.bbc.co.uk

दिवसातली सगळ्यांत मोठ्या गुंतागुंतीच्या बातमीचे सर्व पैलू अगदी सोप्या भाषेत.

Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लहान मुलांना कोरोना झाला तर काय काळजी घ्यायची?

भारतात कोरोनाची परिस्थिती आता इतकी बिकट झालीये की, दिवसाला 2 लाखांपेक्षा जास्त रुग्णांची नोंद होतेय. त्यातच एक चिंतेची गोष्ट म्हणजे, मुंबईत लहान मुलांमध्ये कोव्हिड होण्याचं प्रमाण तब्बल 65%नी वाढलंय. खासकरून महानगरांमध्ये मुलांमधल्या कोव्हिडचं प्रमाण वाढलेलं दिसतंय. आणि यात पाच वर्षांच्या आतल्या मुलांचा प्रामुख्याने समावेश आहे. अशावेळी लहान मुलांमध्ये कोव्हिडची दिसणारी लक्षणं नेमकी काय आहेत? त्यावर काय उपचार आहेत? आणि मुलांसाठी नेमकी काय खबरदारी घ्यायची? याचबद्दल बोलूया आजच्या सोपी गोष्टमध्ये......

Apr 16, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोव्हिड परिस्थिती हाताळताना राज्यसरकारने केलेल्या 7 संभाव्य चुका

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भारतात 24 तासांत 2 लाख रुग्णांची विक्रमी नोंद झालीये. आणि महत्त्वाचं म्हणजे यातले किमान 25% रुग्ण हे महाराष्ट्रातले आहेत. सध्याची परिस्थिती पाहता राज्यात हॉस्पिटल बेड्स, औषधं, ऑक्सिजन यांचा तुटवडा जाणवतोय. अनेक जणांना रेमडेसिविर मिळत नाहीये. अनेकांना ऑक्सिजन मिळत नाहीये तर हॉस्पिटलमध्ये बेड मिळवायलाही झगडावं लागतंय. याच पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी राज्यात लॉकडाऊनसारखेच कडक निर्बंध लावलेत. पण महाराष्ट्रावर ही वेळ का आली? आज सोप्या गोष्टीमध्ये जाणून घेऊया राज्य सरकारकडून ...

Apr 15, 20218 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: लॉकडाऊनविषयी तुमच्या मनातल्या 7 प्रश्नांची उत्तरं

‘ब्रेक द चेन’ मोहिमे अंतर्गत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पुन्हा कडक निर्बंध पुढच्या पंधरा दिवसांसाठी लागू केले आहेत. पण, त्यांचं भाषण संपल्या संपल्या सोशल मीडियावर आणि बीबीसीच्या फेसबुक आणि युट्यूब चॅनलवरही सगळ्यांचे धडधडा प्रश्न यायला लागले. कलम 144, संचारबंदी म्हणजे नेमकं काय? आम्हाला कुठल्या कामासाठी बाहेर पडता येईल? असे अनेक प्रश्न तुमच्या मनात आहेत. अशाच महत्त्वाच्या 7 प्रश्नांची उत्तर सोपी गोष्टमध्ये… लेखन, निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग - निलेश भोसले

Apr 14, 20218 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोनापासून वाचण्याचे ‘हे आहेत 9 फंडे

एक वर्ष उलटून गेलंय, संपूर्ण जगात कोरोनानं थैमान घातलंय. पहिली लाट जात नाही तोच दुसऱ्या लाटेनं कहर केलाय. तज्ज्ञांच्या मते दुसरी लाट ही पहिल्या लाटेपेक्षा भयंकर आहे. आणि त्यामुळेच आपल्याला अधिक काळजी घ्यायला सांगितल जातंय. लस आहे पण ती आपला 100% बचाव करू शकते का? तर नाही... आणि म्हणूनच आपल्याला कोरोनासोबत आणि आपली काळजी घेत जगावं लागणार आहे. आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया कोरोनासोबत जगण्याचे 9 फंडे…आणि ते ही स्वीत्झर्लंडमधल्या मऊ, लुसलुशीत चीजच्या तुकड्यांबरोबर... लेखन - ऋजुता लुकतुके निवेदन - स...

Apr 14, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: रेमडेसिविर जीव वाचवत नाही, तर मग त्यावरून एवढा गदारोळ का?

एकीकडे रेमडेसिविर या औषधासाठी कोव्हिड रुग्णांचे नातेवाईक जीवाचं रान करताना दिसतायत. महाराष्ट्रभर या औषधाचा तुटवडा जाणवत आहे. दुसरीकडे, जागतिक आरोग्य संघटनेनं ऑक्टोबर 2020मध्येच या औषधामुळे कोव्हिड रुग्णाचा जीव वाचत नाही, असा निर्वाळा दिला आहे. जागतिक आरोग्य संघटनेचं हे मत असताना राज्यात रेमडेसिविरचा वापर का होत आहे? रेमडेसिविरमुळे रुग्णाला काय मदत मिळते? याविषयी जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबीसी टीम लेखन,निवेदन - ऋजुता लुकतुके एडिटिंग- निलेश भोसले

Apr 12, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात कोरोना लसींचा तुटवडा का निर्माण झाला?

कोरोनाची दुसरी लाट देशभरात सुरू झाली आणि १ एप्रिलपासून केंद्रसरकारने ४५ वर्षांवरच्या वयोगटातल्या सगळ्यांसाठी लसीकरण मोहीम खुली केली. लसीकरणाची व्याप्ती तर वाढली. पण, देशातल्या वाढलेल्या गरजेला पुरे पडतील इतक्या लशी देशात उपलब्ध आहेत का, असा प्रश्न आता निर्माण झालाय. केंद्रसरकारने वारंवार हे नाकारलं असलं तरी देशात लशींचा तुटवडा भासतोय असं उत्पादक कंपनी सिरम इन्स्टिट्यूटनेही म्हटलंय. लस पुरवठ्याच्या बाबतीत नेमकी परिस्थिती काय आहे? लसीचा तुटवडा का झालाय, जाणून घेऊया आजची सोपी गोष्टमध्ये… संशोधन - ब...

Apr 09, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लसीमुळे खरंच रक्ताच्या गुठळ्या होतात का?

ऑक्सफर्ड ॲस्ट्राझेनेका लस घेतल्यावर शरीरात रक्ताची गुठळी तयार होणं हा अगदीच क्वचित आढळणारा साईड इफेक्ट आहे, असं काल युरोपीयन युनियनच्या औषध नियामक संस्थेनं स्पष्ट केलं. आणि युरोपातल्याच काय जगातल्या सगळ्याच देशांमध्ये लोकांना हायसं वाटलं असणार. कारण, भारतातही ज्या दोन लसींना मान्यता मिळालीय त्यातली एक ऑक्सफर्ड - अँस्ट्राझिनिकाची लस आहे, जिला आपण कोव्हिशिल्ड म्हणून ओळखतो. भारतात रक्ताच्या गुठळ्या होण्याच्या फारशा घटना समोर आल्या नव्हत्या. पण, धास्ती तर वाटतेच. तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊय...

Apr 08, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात सरसकट लसीकरण शक्य आहे का?

भारतात कोरोनाची सुरुवात होऊन आता एक वर्ष उलटून गेलंय. पण पहिली लाट जाते ना जाते तोच दुसरी लाट धडकलीये. गेल्या 24 तासात देशात एकूण 1,15,436 रुग्णांची नोंद झालीये. गेल्या वर्षभरातील देशातील ही सर्वोच्च रुग्णसंख्या आहे. तर त्यातले 55,469 रुग्ण एकट्या महाराष्ट्रात सापडलेत. म्हणजे देशातील रुग्णसंख्येच्या जवळपास 50% रुग्ण महाराष्ट्रात सापडतायत. हे आकडे सांगण्याचं कारण म्हणजे, एक प्रश्न सातत्याने विचारला जातोय की, राज्यात कोरोनाचा इतका कहर आहे मग सरसकट लसीकरण का केलं जात नाहीये? लसीकरणासाठीची वयोमर्याद...

Apr 07, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: व्लादिमीर पुतिन यांनी रशियन राजकारणावर पकड कशी मिळवली?

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन आता 2036 पर्यंत रशियाचे अध्यक्ष राहू शकणार आहेत. एका घटनादुरुस्तीमुळे पुतिन यांना हे शक्य होणार आहे. 36मध्ये पुतिन 83 वर्षांचे असतील. तोपर्यंत ते निवडणुका जिंकत राहिले आणि प्रकृतीनेही साथ दिली तर ते सर्वोच्च पदावर राहू शकतील. आणि त्यांनी तोपर्यंत आपला कार्यकाळ पूर्ण केला तर ज्येष्ठ नेते स्टॅलिन यांना मागे टाकून ते रशियातले सगळ्यात जास्त काळ अध्यक्षपद भूषवलेले नेते असतील. आहे ना विलक्षण? मूळात पुतिन हे साधंसुधं व्यक्तिमत्व नाहीच आहे मूळी. आंतरराष्ट्रीय राजका...

Apr 06, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: भारतात नक्षलवादी चळवळ कशी फोफावली?

क्रांती म्हणजे कुठली मेजवानी नव्हे, एखादा सुरेख निबंध लिहिणं नव्हे. तर क्रांती हा सत्ताधाऱ्यांविरोधातला सशस्त्र उठाव आहे. चीनमधल्या कम्युनिस्ट क्रांतीचे आद्य नेते माओ त्से तुंग यांचं हे प्रसिद्ध वाक्य आहे. आज मला आठवलं कारण, याच विचारांनी प्रेरित झालेल्या देशातल्या नक्षली गटांनी ३ एप्रिलला बिजापूरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाबरोबर केलेला संघर्ष आणि यात २२ जवानांचा झालेला मृत्यू. १९६७ पासून भारतात नक्षलवादी गट सक्रिय आहेत. पण, त्यांच्या नेमक्या मागण्या का आहेत, सरकारबरोबर त्यांचा संघर्ष अशा वारं...

Apr 05, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: कोरोना लॉकडाऊनशिवाय दुसरे पर्याय काम करत नाहीत का?

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे महाराष्ट्रात पुन्हा एकदा लॉकडाऊनची चर्चा सुरू झाली आहे. जगात इतरही अनेक देशांनी अनेकदा लॉकडाऊन लावले आहेत. पण तसं न करताही कोरोनाचा संसर्ग दूर ठेवता येतो का? एकीकडे काही देश कोरोनाचं संकट थोपवण्यासाठी अनेकदा लॉकडाऊन लावतायत तर दुसरीकडे एकदाही लॉकडाऊन न केलेले देश आहेत. यातला नेमका कोणता उपाय अधिक चांगला? ऐकू या आजच्या सोपी गोष्टमध्ये. संशोधन- सिद्धनाथ गानू लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Apr 01, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: इलेक्टोरल बाँड्स काळा पैसा राजकारणापासून दूर ठेवू शकतात का?

2017 मध्ये मोदी सरकारने अर्थसंकल्पात इलेक्टोरल बाँड्स किंवा निवडणूक रोखे घोषित केले. हे बाँड्स राजकीय पक्षांना देणगी देण्यासाठीचं एक साधन आहे. पण राजकीय पक्षांना या बाँड्समार्फत मिळालेल्या देणग्या घोषित न करण्याचं बंधन नाही. तसंच या बाँड्समार्फत कोण देणगी देतंय ते सुद्धा गुप्त ठेवलं जातं. या सगळ्यामुळे राजकारणतील पारदर्शकतेला तडा जातो असा अनेकांचा दावा आहे. यामुळे भ्रष्टाचाराला वाव मिळू शकतो का? सामान्य माणसांवर या सगळ्याचा काय परिणाम होतो? या सगळ्या प्रश्नांची उकल करण्याचा हा प्रयत्न. संशोधन - ...

Mar 31, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात अडकलेलं 'एव्हर गिव्हन' जहाज कसं बाहेर निघालं?

दोन लाख टन वजनाचं ‘एव्हरग्रीन’ नावाच्या तैवानी मालवाहतूक कंपनीचं ‘एव्हरगिव्हन’ हे जहाज सोमवारी अखेर सुएझ कालव्यातून मोकळं झालं. साधारण आठवडाभर हे जहाज काव्याच्या दक्षिणेकडच्या टोकाशी अडकून पडल्याने या कालव्यात अक्षरशः ट्रॅफिक जाम झाला होता. या बोटीच्या दोन्ही बाजूने 350 पेक्षा जास्त जहाजं आणि बोटी अडकून पडल्या. मधल्या काळात जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं. अधिक तपास केल्याशिवाय ही बोट मुळात अडकलीच कशी याचा उलगडा होणार नाही. ही बोट सोडवण्यासाठी काय काय करावं लागलं? यात कुणी म...

Mar 29, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: सुएझ कालव्यात कशी अडकली महाकाय बोट?

दोन लाख टन वजनाचं तैवानी कंपनीचं ‘एव्हरग्रीन’ हे जहाज मंगळवारी जगप्रसिद्ध सुएझ कालव्यात अडकलं. आणि त्यामुळे या कालव्यात चक्क ट्राफिक जाम झाला आहे. पर्यायी कालव्यातून तात्पुरती वाहतूक सुरू झाली असली तरी सध्या तीसच्यावर जहाजं अजून अडकून पडली आहेत. आशियाला युरोपशी जोडणारा हा महत्त्त्वाचा जलमार्ग आहे. आणि तिथेच ट्राफिक जाम झाल्यामुळे जगभरात रोज 9 अब्ज 60 कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान होतंय. पण, बोटीचा हा अपघात घडला कसा, त्याचे काय परिणाम जगाला भोगावे लागणार आहेत, पाहूया सोपी गोष्टमध्ये... संशोधन - बीबी...

Mar 26, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: देशाचे आगामी सरन्यायाधीश एन रमण्णा नेमके कोण आहेत?

देशाचे मावळते सरन्यायाधीश शरद बोबडे यांनी पुढचे सरन्यायाधीश म्हणून नुतलापट्टी वेंकट रमण्णा यांच्या नियुक्तीची शिफारस राष्ट्रपतींकडे केली आहे. पण त्याचवेळी रमण्णा यांच्या विरोधात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री वाय एस जगनमोहन रेड्डी यांनी सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेली याचिक न्यायालयाने फेटाळली आहे. किंबहुना ही याचिका फेटाळल्यावरच रमण्णा यांच्या शिफारसीचं पत्र बोबडे यांनी पाठवलं. पण, सरन्यायाधीश पगासाठी नाव सुचवलेले रमण्णा त्यांच्याच राज्यात वादग्रस्त का ठरलेत? त्यांच्या विरोधातले वाद काय आहेत? आणि त्...

Mar 25, 20215 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: महाराष्ट्रात खरंच पुन्हा लॉकडाऊन लागेल का?

एकीकडे देशात पहिला राष्ट्रीय लॉकडाऊन लागला त्याला २४ मार्चला एक वर्ष होतंय. आणि त्याचवेळी राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला सुरुवात होऊन पुन्हा लॉकडाऊन लागेल का अशी चर्चा सुरू झालीय. फेब्रुवारीच्या मध्यापासून देशभर सरासरी चाळीस हजार नवीन रुग्ण सापडतायत. आणि त्यातले साठ टक्के रुग्ण महाराष्ट्रात आहेत. आणि म्हणून लोकांच्या मनात भीती वाढतेय की, पुन्हा लॉकडाऊन लागेल का? तेव्हा आज सोपी गोष्टमध्ये बोलूया खरंच लॉकडाऊनची शक्यता किती आहे. आणि मूळात लॉकडाऊनचा निर्णय घेताना कोणते निकष राज्यसरकार लावत असतं. ...

Mar 24, 20216 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: तुम्ही तुमचं पॅन कार्ड आधारला जोडलं का?

तुमचं पॅनकार्ड आणि तुमचं आधारकार्ड ही तुमची दोन महत्त्वाची सरकारी ओळखपत्रं आहेत. आणि आता ती ऑनलाईन जोडणं किंवा एकमेकांना लिंक करणं केंद्रसरकारने अनिवार्य केलंय. त्यासाठी शेवटची मुदत आहे ३१ मार्च पर्यंतची. तोपर्यंत तुम्ही तसं केलं नाहीत तर तुमचं पॅनकार्ड इनअँक्टिव्ह किंवा तात्पुरतं स्थगित होऊ शकतं. तुमच्या पुढच्या सगळ्या ऑनलाईन बँकिंग किंवा इतर आर्थिक व्यवहारांसाठी हे महत्त्वाचं आहे बरं का! म्हणूनच आज सोपी गोष्टमध्ये जाणून घेऊया पॅन आधारशी कसं जोडायचं, का जोडायचं आणि नाही जोडलं तर काय होईल? संशोध...

Mar 23, 20217 min

सोपी गोष्ट पॉडकास्ट: पाकला का करायची आहे भारताशी मैत्री?

भारत पाकिस्तान दरम्यान सीमेवर होणाऱ्या चकमकी अलीकडे कमी झाल्यात असं वाटतं का? कारण न्यूजपेपर आणि वेबसाईटवर तशा बातम्या तरी कमी झाल्यात. अधिकृत बातमी असं सांगते की, मागच्या तीन आठवड्यात सीमेपलीकडून असा कुठलाही मोठा गोळीबार झालेला नाही. उलट, भारत आणि पाकिस्तानने २००३च्या युद्धविराम कराराचं पुन्हा पालन करायचं ठरवलं आहे अशी बातमी तुम्हाला बघायला मिळेल. आणि भर म्हणून मंगळवारी दोन देशांमधला सिंधू नदी पाणी वाटपाच्या प्रश्नावरही दोन्ही देशांदरम्यान चर्चा होणार आहे. यावेळी शांततेचा आणि युद्धविरामाचा प्रस...

Mar 22, 20217 min

कोरोना लस, कोविन अॅप आणि इतर प्रश्नांची उत्तरं (BBC News Marathi)

कोरोनाच्या लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू झाला खरा पण त्यातही अनंत अडचणी येतायत. अनेकांनी तांत्रिक बिघाडांबद्दल तक्रार केलीय. पण त्यापलीकडेही अनेक प्रश्न आहेत, शंका आहेत. कोरोना लसीकरणाबद्दल तुम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं आम्ही तज्ज्ञांकडून मिळवली. ऐका ही सोपी गोष्ट. संशोधन- मयांक भागवत लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Mar 04, 20215 min

मुंबई वीज पुरवठा चीनच्या सायबर हल्ल्याने बंद झाला होता? सोपी गोष्ट 285 (BBC News Marathi)

मुंबईत ऑक्टोबर 2020 मध्ये अचानक काही तास लाईट गेले आणि कधीही न झोपणारं शहर ठप्प झालं. यात घातपात होता का याची चौकशी राज्य सरकार करत होतं. आता यामागे सायबर हल्ला असल्याचं सरकारने मान्य केलंय. पण तो चीनी हल्लेखोरांनी केला की नाही हे मात्र ते स्पष्टपणे सांगत नाहीयत. मुंबईत नेमकं काय घडलं होतं? असे सायबर हल्ले कसे केले जातात? संशोधन- बीबीसी मराठी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Mar 02, 20214 min

कोरोना व्हायरसपासून लहान मुलांची काळजी कशी घ्यायची? सोपी गोष्ट 283

कोरोना व्हायरसची महाराष्ट्रातली रुग्णसंख्या पुन्हा वाढायला लागली आहे. वाशिम, सातारा, सोलापुरात जवळपास 300 पेक्षा अधिक शाळकरी विद्यार्थी कोव्हिड पॉझिटिव्ह झाले. कोरोनाचा संसर्ग लहान मुलांना होतच नाही असा अनेकांचा ग्रह आहे. लहान मुलांची कोरोनाच्या काळात काळजी कशी घ्यायची? शाळांनी मुलांच्या सुरक्षिततेसाठी काय उपाय करायला हवे? जाणून घ्या आजच्या सोपी गोष्टमधून. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Feb 26, 20216 min

बँकांचं खाजगीकरण केलं तर तुमचा फायदा की तोटा? सोपी गोष्ट 282

मोदी सरकारने या बजेटमध्येच बँकांच्या खाजगीकरणासंबंधी घोषणा केली होती. पंतप्रधान मोदींनी बुधवारी दिलेल्या एका भाषणाने सरकार नेमक्या किती बँकांचं खाजगीकरण करणार याबद्दल पुन्हा चर्चा सुरू झाली आहे. खाजगीकरणाने बँकांचा, ठेवीदारांचा आणि सरकारचा फायदा होणार की तोटा? जाणून घ्या. संशोधन, लेखन, निवेदन - सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Feb 25, 20215 min

फेसबुक आणि गुगल ऑनलाईन बातम्या दाखवणं बंद करू शकतात? सोपी गोष्ट 281

तुम्ही फेसबुक, गुगल किंवा इतर ऑनलाईन प्लॅटफॉर्म्सवर बातम्या पाहत असाल. त्या फुकट असतात. पण ही ॲप्स चालवण्यासाठी पैसे लागतातच. या कंपन्यांना हा पैसा कुठून मिळतो? त्या पैशाच्या वाटपावरूनही वाद आहेत. मग या कंपन्या आपल्या प्लॅटफॉर्म्सवर बातम्या दाखवणं थेट बंद करू शकतात का? जाणून घ्या सोपी गोष्ट च्या या भागात. संशोधन- टीम बीबीसी लेखन, निवेदन- सिद्धनाथ गानू एडिटिंग- निलेश भोसले

Feb 24, 20215 min

कोरोना व्हायरस : रामदेवबाबांच्या पतंजली कोरोनिलवर महाराष्ट्रात बंदी, डॉक्टर्स कोरोनिलबद्दल काय म्हणतात? #सोपीगोष्ट 280

योग गुरू बाबा रामदेव यांनी त्यांच्या पतंजली कंपनीने तयार केलेलं कोरोनिल औषध लाँच केलं. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमामध्ये, हे औषध कोरोनावर परिणामकारक असण्याचा दावा करण्यात आला. तर या औषधाला WHO, IMF आणि इतरांकडून मान्यता मिळेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कोरोनिलच्या विक्रीवर बंदी घालण्यात आलीय. कोरोनिलविषयी काय दावे करण्यात आले? आणि त्यावर कोणी काय प्रतिक्रिया दिलेली आहे? जाणून घेण्यासाठी ऐका ही सोपी गोष्ट संशोधन : मयांक भागवत लेखन,निवेदन : अमृता दुर्वे व्हि...

Feb 23, 20216 min

कोरोना व्हायरस : डबलमास्किंग म्हणजे एकावेळी दोन मास्क घातल्याने जास्त संरक्षण मिळतं का? #सोपीगोष्ट 279

एका ऐवजी 2 मास्क एकावेळी वापरणं अधिक सुरक्षित असल्याचं अमेरिकेच्या सेंटर फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेन्शनने म्हटलंय. कोव्हिड 19 पसरवणाऱ्या Sars –CoV2 या मूळ विषाणूच्या तुलनेत त्याचे नवीन व्हेरियंट्स हे अधिक Transmissible म्हणजे पसरण्याजोगे असल्याचं म्हणत डॉ. अँथनी फाऊची यांनी लोकांना डबल मास्किंगचा सल्ला दिलाय. असं करावं का, त्यामुळे कोव्हिडपासून डबल संरक्षण मिळतं का? त्यामुळे गुदमणार नाही का? आणि महत्त्वाचं म्हणजे डबल मास्किंगसाठी कोणते मास्क वापरायचे? समजून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये. सं...

Feb 22, 20216 min
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android