स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) -  A Marathi audiobook podcast forum - podcast cover

स्टोरीटेल कट्टा (Storytel Katta) - A Marathi audiobook podcast forum

Santosh Deshpandewww.storytel.com
A Marathi podcast about Audiobooks and books. Where every once in a while, we will be talking about everything that is Audiobooks. It will feature author interviews, voice artist interviews, book lovers and more. The podcast is powered by Storytel. स्टोरीटेल कट्टा आहे एक आगळं-वेगळं गप्पांचं ठिकाण. इथं रंगतात गप्पा पुस्तकांविषयी, ऑडिओबुक्स विषयी. इथं उलगडतं लेखक-कलाकारांचं अंतरंग...त्यांचं रसिकांशी असणारं नातं. शिवाय, स्टोरीटेल घेऊन येत असलेल्या अनेक बोलक्या पुस्तकांची थेट ओळखही इथं होईल.
Last refreshed:
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

महाराष्ट्रात हिंदी सक्तीची? खरे काय?

नव्या शैक्षणिक धोरणानुसार महाराष्ट्रात पहिलीपासून तिसरी भाषा म्हणून हिंदीला प्राधान्य देण्याकडे सरकारचा कल असल्याचे दिसताच त्यावर मोठा वादंग सुरु झाला आहे. या पार्श्वभूमीवर, सरकारच्या भूमिकेवर मराठीप्रेमी नागरिकांकडून आक्षेप घेतला जात आहे. अ.भा.वि.प.च्या विद्यार्थी चळवळीतून पुढे आलेले आणि शिक्षणक्षेत्राचे अभ्यासक प्रा. धनंजय कुलकर्णी यांनी याच वादंगावर आपली रोखठोक भूमिका मांडली. राज्यात मराठीला डावलून हिंदीचा पुरस्कार होत असल्याच्या टिकेवर त्यांनी मांडलेली दुसरी बाजू ऐकायला हवी.

Jun 24, 202521 minEp. 372

पी.आर.चं बदलतं जग..

पब्लिक रिलेशन्स (पीआर) किंवा जनसंपर्क क्षेत्रात मागील काही वर्षांत अनेक स्थित्यंतरे आली आहेत. मूळात हे `पीआर` क्षेत्र कसे विकसित झाले, सध्या ते कुठे आहे, भविष्यात त्यातील संधी काय असणार या विषयी अनेकांना कुतुहल आहे. अनेक नामवंत संस्था व वलयांकित व्यक्तींसाठी `पीआर`चा चेहरा म्हणून प्रसिद्ध असणारे या क्षेत्रातील नामवंत तज्ज्ञ तुषार जोशी यांच्याशी संतोष देशपांनी यांनी याच विषयावर संवाद साधला आणि त्यातून अनेक विषयांची सहज उलगड होत गेली. चाकोरीबाहेरील काही जाणू इच्छिणाऱ्या, करु इच्छिणाऱ्या प्रत्येकान...

Jun 09, 20251 hr 12 minEp. 371

नाना पाटेकरांमधला `माणूस` समाजासाठी बोलतो तेव्हा...

निवृत्त सनदी अधिकारी चंद्रकांत दळवी यांनी लोकसहभागातून सातारा जिल्ह्यातील आपल्या निढळ या गावाचा चेहरामोहरा बदलून टाकला. त्यांच्या या प्रेरणादायी कार्याची उलगड करणारे सुनील चव्हाण यांनी लिहिलेले पुस्तक निढळ – ग्रामविकासाचा दळवी पॅटर्न नुकतेच प्रकाशित झाले. प्रसिद्ध अभिनेते व नाम फाउंडेशनचे अध्यक्ष नाना पाटेकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. या कार्यक्रमात नानांचे भाषण अत्यंत भावस्पर्शी, मनस्वी, दिशादर्शक होते आणि म्हणूनच ते संस्मरणीय देखील होते. कलाकार असलो तरी आपण समाजाकडे कसे पाहतो, लोकसहभाग...

May 30, 202527 minEp. 370

अस्वस्थ जगात गुंतवणुकीच्या स्मार्ट संधी!

अस्वस्थ जगात गुंतवणुकीच्या स्मार्ट संधी अर्थात, श्रीमंत बनण्याचे रहस्य! गुंतवणुकीच्या पारंपरिक मार्गाने न जाता असे कोणते मार्ग आहेत जे तुम्हाला खऱ्या अर्थाने श्रीमंत बनवतील, सध्या जगभरात अस्वस्थता असताना गुंतवणूक करायची असेल तर त्यासाठी काय करायला हवे, सोन्याचे भाव वाढतील की कमी होतील, गुंतवणुकीचे नेमके नियोजन का व कसे करायचे या व अशा प्रश्नांची उलगड गुंतवणूक सल्लागार संदीप भुशेट्टी यांनी केली आहे. त्यांचा स्वतःचा गुंतवणूकदार ते वेल्थ क्रिएटर हा प्रवास कसा झाला, याविषयी संतोष देशपांडे यांनी त्या...

May 22, 202535 minEp. 369

ऑपरेशन सिक्रेटस्, सरप्राइजेस् आणि सैनिकांचे मनोधैर्य

`ऑपरेशन सिंदूर`च्या निमित्ताने अनेक गोष्टींवर चर्चा, विश्लेषण होते आहे. त्याचवेळी अशा लष्करी ऑपरेशनच्या वेळी सिक्रसी (गुप्तता), सरप्राइजेस का आणि किती महत्त्वाचे असते, सीमेवर लढणाऱ्या सैनिकाचे मनोधैर्य कसे असते, कसे टिकते याविषयी ब्रिगेडियर सुमंत दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला संवाद.

May 10, 202548 minEp. 368

खडतर मार्ग...परखड भूमिका (शरद पोंक्षे)

शरद पोंक्षे म्हणजे एक अवलिया कलाकार. आपल्या कट्टर सावरकरभक्तीमुळे अनेक वादळे ओढवून घेत विचारांशी असणारी बांधिलकी जोपासणारे व्यक्तिमत्व. कलाजीवनात आणि समाजजीवनात अशा आव्हानांना भिडताना, त्यांना नेमके काय जाणवते, याची उलगड संतोष देशपांडे यांसमवेतच्या त्यांच्या या संवादातून होते.आवर्जून ऐकावा असा हा हटके पॉडकास्ट.

May 03, 202556 minEp. 367

सावधान...Information Warfare चालू आहे!

इन्फर्मेशन वॉरफेअर म्हणजेच माहिती युद्धतंत्र हे माध्यमांच्या मदतीने केले जाणारे एक प्रकारचे युद्धच असते. त्यात शत्रू राष्ट्राकडून मीडिया युजर्स, चॅनल्स यांचा वापर केला जातो. कळत-नकळत अनेक जण त्यात ओढले जातात आणि त्याचा फायदा शत्रूला होतो. काश्मीरमध्ये पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर उद्भवलेल्या प्रसंगानंतर भारत सरकारने प्रसारमाध्यमे तसेच समाजमाध्यमकर्त्यांना मार्गदर्शक तत्वे आखून दिली आहेत. या पार्श्वभूमीवर, संरक्षण माध्यमांचे अभ्यासक प्रा. विनय चाटी यांनी संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादात या...

Apr 30, 202526 minEp. 366

लाखमोलाचे सोने, पुढे काय?

सोन्याचा भाव लाखांवर पोहोचला आहे. या पार्श्वभूमीवर, असे नेमके कशामुळे घडले, भारतीयांना सोन्याचे इतके आकर्षण का आहे, सोन्यातील गुंतवणूक फायदेशीर ठरते का, भविष्यात याकडे कसे पाहायला हवे अशा अनेक बाबींचा उहापोह ज्येष्ठ संपादक, अर्थक्रांती प्रतिष्ठानचे विश्वस्त यमाजी मालकर यांनी संतोष देशपांडे यांसोबतच्या या विशेष पॉडकास्टमध्ये केला आहे. सोन्याविषयी कुतूहल असणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून ऐकावा असा हा वेगळा संवाद.

Apr 28, 202530 minEp. 365

चित्रपटांतून `इतिहास` शोधावा का?

चित्रपट असो वा साहित्यकृती त्याला इतिहासाची पार्श्वभूमी असेल तर त्यातून वाद निर्माण होतात. अलीकडच्या काळात रायगडावरील वाघ्यावरुन उफाळून आलेला वाद असो, छावा चित्रपटामुळे निर्माण झालेले वातावरण असो वा फुले चित्रपटाच्या ट्रेलवरवरुन सुरु झालेला वादंग असो....चित्रपट अथवा लेखनाकडे आपण इतिहास म्हणून खरंच पाहावा का, त्यातून समाजात जाणाऱ्या संदेशाकडे कसे पाहिले जातेय, त्यातून कलास्वातंत्र्याचा संकोच होतोय का, कलास्वातंत्र्य देखील सोयीचे असेल तरच त्याचा पुरस्कार होतो का या व अशा अनेक वादग्रस्त मुद्द्यांवर...

Apr 19, 202550 minEp. 364

प्राण्यांशी संवाद साधताना...

प्रत्येक प्राण्याला मन असतं, ते व्यक्त करणारी त्यांची एक भाषाही असते. मात्र, मानवी जीवनात येणाऱ्या प्राण्यांच्या मनात काय चाललं आहे, ते काय बोलू पाहतात हे काही आपल्याला नेमकं लक्षात येत नाही. अशा वेळी टेलिपथिक अॅनिमल कम्युनिकेशन हे तंत्र उपयोगी येतं. त्यातील तज्ज्ञ असणाऱ्या प्राणीप्रेमी पत्रकार उमा कर्वे ही चक्क प्राण्यांशी संवाद साधते. हे नेमके कसे जमते, प्राणी तिच्याशी काय बोलतात, त्यांच्याशी बोलून तिला काय जाणवते या व अशा अनेक प्रश्नांची उलगड करणारा हा विशेष पॉडकास्ट. जागतिक पाळीव प्राणी दिना...

Apr 12, 202538 minEp. 363

तेजोमय भारत`मित्रा`!

मित्रा देसाई... जगापुढे भारतीयत्वाची खरी ओळख पुढे आणण्यासाठी संशोधन, लेखन आणि संवादातून तेजोमय भारत सारखी संकल्पना पुढे आणणारी, शीतळा, फ्लॅग ऑफ अनंता यांसारख्या जगाचे लक्ष वेधणाऱ्या पुस्तकांची लेखिका आणि तेजोमय भारत सारख्या संकल्पनेतून भारताचा खरा इतिहास जगापुढे उलगडू पाहणारी ऑस्ट्रेलियात राहणारी मराठमोळी लेखिका. अत्यंत अभ्यासपूर्वक, सप्रमाण आपले मुद्दे मांडून त्याची उलगडून स्टोरीटेलिंग म्हणजेच गोष्टीरुपांत जगापुढे आणू पाहणारी ही विदुषि संतोष देशपांडे यांच्याशी जेव्हा संवाद साधते त्यातून कित्येक...

Mar 25, 202551 minEp. 362

दिल्लीतील सच्चाईशी `सामना`!

शिवसेनेसारख्या महाराष्ट्रातील पक्षाचे मुखपत्र म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या सामना या दैनिकाचे दिल्लीतील ब्युरो चिफ नीलेशकुमार कुलकर्णी यांनी गेली अनेक वर्षांत दिल्लीतील राजकारण विशेषतः तेथील मराठीजनांचा प्रभाव अनुभवलेला आहे. पत्रकारितेच्या निमित्ताने अनेक राजकारण्यांशी जवळून संबंध आला आहे. त्यांची नोंद ठेवतानाच दिल्लीतील संसदेच्या आठवणींचा पट उलगडणारे पुस्तक त्यांनी नुकतेच प्रसिद्ध केले आहे. `संसद भवन ते सेंट्रल व्हीस्टा` हे ते बहुचर्चित पुस्तक. त्यानिमित्ताने संतोष देशपांडे यांच्याशी संवाद साधताना न...

Mar 21, 202534 minEp. 361

निवेदनातील `स्नेहल`वाट...

निवेदन हे करिअरचे क्षेत्र म्हणून निवडून अत्यंत मेहनतीतून त्यात आपले स्वतःचे स्थान निर्माण करण्याची किमया स्नेहल दामले यांनी साधली आहे. अभ्यासपूर्ण, आशयघन आणि संयत अशा निवेदनशैलीमुळे स्नेहलला रसिकप्रियता लाभली आहे. सांस्कृतिक, सांगीतिक आणि राजकीय अशा तिन्ही प्रकारांतील कार्यक्रमांना तिचे निवेदन, सूत्रसंचालन उंची देऊन जाते. पुण्यातील प्रतिष्ठीत वसंतोत्सव असो, अ.भा. मराठी साहित्य संमेलन असो, जागतिक मराठी परिषदेचे संमेलन असो वा अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभा असोत स्नेहलने आपली कारकिर्द बहरत ने...

Mar 17, 202555 minEp. 360

पुस्तकं झपाटून टाकतात तेव्हा...

पुस्तक वाचनातून उत्तम वाचकच घडतो असं नव्हे तर त्यातून प्रेरणा घेत उत्तम लेखकही घडू शकतो. साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित युवा लेखक, संपादक प्रणव सखदेव हे त्याचेच एक आदर्श उदाहरण. प्रणव सखदेवचा लेखनाकडे झालेला प्रवास, त्यातील अनुभव, त्याचे चौफेर वाचन आणि साहित्यनिर्मितीकडे पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन याची उलगड करणारा हा स्पेशल पॉडकास्ट.

Mar 10, 202536 minEp. 359

पाकिस्तान abnormal का आहे?

पाकिस्तानची आजची अवस्था पाहता देश म्हणून तो सपशेल अपयशी असल्याचे पुढे येते. प्रत्येक आघाडीवर त्याची केवळ पिछेहाटच नव्हे तर तर दयनीय अवस्था झालेली आहे. हे असे का झाले, त्यांचा नेमका प्रॉब्लेम काय आहे, तेथील लष्कर काय करते, राज्यकर्ते दिशाहीन का आहेत, तिथे मध्यमवर्ग का नाहीय या व अशा प्रश्नांची मालिका पुढे येते. त्याचीच संगतवार मांडणी करणारे `पाकिस्तान का मतलब क्या` हे पुस्तक नुकतेच दाखल झाले आहे. सध्या बेस्टसेलर म्हणून गाजत असलेल्या या पुस्तकाचे लेखक, ज्येष्ठ पत्रकार-संपादक श्रीधर लोणी यांच्याशी ...

Mar 07, 202543 minEp. 358

मिशन जेएनयू

देशातील सर्वात प्रतिष्ठीत शिक्षणसंस्थांपैकी एक आणि सर्वात राजकीयदृष्ट्या संवेदनशील संस्था म्हणून जवाहरलाल नेहरु विद्यापीठ (जेएनयू) ओळखली जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत विद्यापीठातील आंदोलनांच्या अतिरेकामुळे ही सरकारच्या दृष्टीने चिंतेची बाब ठरली होती. तथापि, गेल्या अडीच-तीन वर्षांत चित्र बदलते आहे. विद्यापीठाच्या नेतृत्वात आणि पायाभूत सुविधांमध्ये नवीन बदल होत असल्याने परिस्थिती सुधारताना दिसते आहे.हे बदल काय आहेत? विद्यापीठाची शैक्षणिक प्रतिष्ठा टिकवण्याच्या दृष्टीने हे बदल कसे सकारात्मक भूमि...

Feb 08, 202535 minEp. 357

दिल्लीत मराठी माणूस रमतो का?

देशाची राजधानी दिल्ली मराठ्यांच्या शौर्याची साक्ष देते. मात्र, तरीही मराठीजनांना दिल्ली कायमच दूर वाटते. आगामी मराठी साहित्य संमेलन यंदा दिल्लीत होते आहे. या पार्श्वभूमीवर, दिल्लीतील टीव्ही माध्यमात कार्यरत असणारे युवा पत्रकार सोमेश कोलगे यांच्य़ाशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला आणि त्यातून अनेक वेगळ्या बाबींची उलगड झाली. मराठी माणूस दिल्लीत रमतो का, तेथील मराठी संस्कृती कशी आहे, अन्य घटकांना मराठीजनांविषयी काय वाटते अशा अनेक बाबींवर सोमेश कोलगे यांनी या सहजगप्पांमधून प्रकाश टाकला आहे.

Feb 03, 202521 minEp. 355

स्टोरीटेलवरची एआय गोष्ट, डीपसीक आणि अमेरिका!

स्टोरीटेलवर नुकतीच संपूर्ण एआय निर्मिती असणारी गोष्ट दाखल झाली आहे. या पार्श्वभूमीवर, हा प्रयोग नेमका काय आहे, चीनच्या डीपसीकने अमेरिकेची झोप का उडवली आहे आणि ट्रम्पतात्यांचे धोरण काय सांगते अशा साऱ्या गोष्टींची गप्पांमधून उलगड केली आहे, योगेश दशरथ आणि संतोष देशपांडे यांनी. नवी आणि वेगळी माहिती देणारा हा पॉडकास्ट जरुर ऐका आणि संपन्न व्हा!

Jan 31, 202523 minEp. 356

रहस्यकथांची, `वागळे की दुनिया`!

रहस्यकथा आवडणाऱ्या वाचकांना एक नवा लेखक लाभला आहे. त्याचं नाव सौरभ वागळे. स्वतः आयआयटीएन असलेल्या या युवा लेखकाने रहस्यकथा या साहित्यप्रकारात आपली अशी एक दुनिया उभी केली आहे. त्यास वाचकांचा विशेषतः तरुणाईचा मोठा प्रतिसाद लाभतो आहे. म्हणूनच, स्टोरीटेल कट्ट्यावर संतोष देशपांडे यांनी सौरभला त्याची ही दुनिया उलगडून दाखवण्यासाठी बोलतं केलं आहे. नव्या पिढीतील हा आश्वासक लेखक नेमकं काय वाचतो, त्याच्या लेखनामागच्या प्रेरणा कोणत्या आहेत, ऑफीस आणि लेखन यांचा मेळ तो कसा साधतो, त्याच्या कथांमधील मुख्य पात्र...

Jan 18, 202532 minEp. 354

११५ वर्षांपूर्वी...मराठी जाहिराती!

मनोरंजन हा मराठीतील पहिला दिवाळी अंक १९०९ मध्ये प्रसिद्ध झाला. या अंकातील वैविध्यपूर्ण संपादकीय लेखनाबरोबरच यात प्रसिद्ध झालेल्या जाहिरातीही अत्यंत रंजक होत्या. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी या विशेष पॉडकास्टमध्ये. ११५ वर्षांपूर्वीच्या या जाहिरातींमधून त्या काळातील व्यवसाय, उद्योग ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जाहिरातींमध्ये कशी भाषा वापरली जायची, हे ऐकणे रंजक ठरेल. तेव्हा अनुभवू या एक प्रकारचा `टाइम ट्रॅव्हल`!

Jan 11, 202538 minEp. 353

२०२५ साठीचे सोप्पे संकल्प

नवे वर्ष लागल्यानंतर असे कोणते साधे-सोपे संकल्प आपण करु शकतो आणि ते पूर्ण करु शकतो, ज्यामुळे आपल्या जीवनात नवे पर्व येईल..त्याविषयी वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी.

Jan 04, 202514 minEp. 352

पाकिस्तान बनलयं भिकारीस्तान!

जगात दहशतवाद पसरवण्याबद्दल आधीच प्रसिद्ध असलेल्या पाकिस्तानची ओळख आता भिकाऱ्यांचा निर्यातदार अशीही बनली आहे. या पार्श्वभूमीवर, पाकिस्तान आणि सौदी अरब यांच्यातील संबंधही बिघडण्याच्या मार्गावर आहेत. खुद्द पाकिस्तानात भिक मागणे हा एक मोठा व्यवसाय होऊन बसला आहे. हे सारं नेमकं काय चाललं आहे, याचा संतोष देशपांडे यांनी घेतलेला आढावा.

Dec 28, 202414 minEp. 351

समलैंगिक ओळख उघड झाली तेव्हा...

अशोक रावकवी.... देशातील एलजीबीटीक्यू समाजाचे प्रतिनिधित्व करणारे मोठे नाव. पुण्यात झालेल्या मूकनायक २०२४ या एलजीबीटीक्यू समूहाच्या साहित्य संमेलनात त्यांनी एका सत्रात आपले अनुभव सांगितले. या प्रसंगी, त्यांनी आपली समलैंगिक ओळख उघड झाली तो क्षण पुस्तकातून ज्या लेखातून मांडला, त्याचेही प्रकट वाचन झाले. खरे तर हे मोठे धाडसच म्हणायचे. मात्र, त्यांनी ते दाखवले. तेव्हाचे हे रेकॉर्डिंग.

Dec 24, 202428 minEp. 350

आता जगात `गर्जे मराठी`!

जगभरातील मराठीजनांमध्ये आत्मविश्वास जागवत त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रातील उद्योग-व्यवसायांत उभं करण्यासाठी गर्जे मराठी ही संस्था उदयास आली. आता ही संस्था एक चळवळ बनली आहे. त्याचाच वेध घेतला आहे, संतोष देशपांडे यांनी गर्जे मराठीचे संस्थापक अध्यक्ष आनंद गानू यांसमवेतच्या या संवादातून. प्रत्येक मराठीजनास अभिमान वाटावा, अशा या विचारांना ऐकणं म्हणजे मनात नव्या प्रेरणा जागवणं...

Dec 16, 202445 minEp. 349

पुस्तक वाचन टाळण्याच्या ५ सबबी!

अशी कोणती कारणं आहेत, जी आपणास पुस्तकांपासून किंवा वाचनापासून दूर ठेवतात... खरं तर ही कारणं नव्हेत तर चक्क सबबी आहेत. या सबबी कोणत्या आणि त्यामुळे आपण काय गमावत आहोत, याचा वेध घेतला आहे संतोष देशपांडे यांनी, तुमच्यासमवतेच्या संवादातून.

Dec 07, 202415 minEp. 348

दिल्लीचे तख्त...फोडले की राखले?

दिल्ली आणि महाराष्ट्रातील संबंध हा नेहमीच चर्चेचा विषय राहिला आहे. मराठ्यांनी दिल्लीचे तख्त फोडले असे म्हणतात...तर महाराष्ट्रगीतात महाराष्ट्र हे दिल्लीचेही तख्त राखतो असे म्हणतात. या अनुषंगाने इतिहासाचे संशोधक व प्रसिद्ध साहित्यिक संजय सोनवणी यांनी दिल्ली आणि महाराष्ट्रातील ऐतिहासिक संबंधांचा वेध संतोष देशपांडे यांसमवेतच्या संवादातून घेतला आहे. प्रत्येकाने आवर्जून ऐकावा, असा हा स्पेशल पॉडकास्ट.

Nov 30, 202442 minEp. 347

`स्टोरीटेल`ची ७ वर्षे!

जगातील एक आघाडीचा ऑडिओ स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म म्हणून ओळखले जाणारे स्टोरीटेल भारतात येऊन ७ वर्षे पूर्ण होत आहे. त्यानिमित्ताने, स्टोरीटेल इंडियाचे प्रमुख योगेश दशरथ यांच्याशी संतोष देशपांडे यांनी साधलेला हा संवाद.

Nov 25, 202418 minEp. 346

ट्रम्पतात्या जिंकले..`अमेरिकन भाऊ`चं काय म्हणणंय?

अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक डोनाल्ड ट्रम्प यांनी जिंकली. ते कसे जिंकले, आता ते काय करतील, भारताला त्याचा फायदा आहे का, अमेरिकेतील भारतीय त्याकडे कसे बघतात अशा अनेक प्रश्नांची उकल करण्यासाठी अमेरिकेतील प्रसिद्ध युट्यूबर अमेरिकन भाऊ अर्थात राहुल पाटील यांना बोलतं केलं आहे, संतोष देशपांडे आणि योगेश दशरथ यांनी. मित्रांमधल्या सहज गप्पांमधून अमेरिकेच्या भविष्याविषयी होणारं हे भाष्य फार गंभीरपणे घेऊ नये..मात्र त्याची नोंद जरुर ठेवावी अशा अनेक गोष्टी इथे उलगडतील.

Nov 16, 202426 minEp. 345

गाण्यातली `मेलडी` अन् त्याचे `मेकर्स` !

कोणतंही गाणं आपल्यापर्यंत पोहोचतं, त्यामागे त्या गायकासह अनेकांचे प्रचंड कष्ट असतात. एरव्ही गाणं म्हणणं आणि ते स्टुडिओत रेकॉर्ड करणं यात मोठा फरक आहे. कला, शास्त्र, तंत्र आणि प्रतिभा या सर्व गुणांचा मिलाफ स्टुडिओत पाहायला मिळतो. याच विषयावर प्रसिद्ध गायक अवधूत गांधी आणि डॉन स्टुडिओत रेकॉर्डिंग विभागाची धुरा वाहणारे प्रसिद्ध साउंड इंजिनिअर तुषार पंडीत यांच्याशी संतोष देशपांडे यांनी संवाद साधला. यातून गायक आणि रेकॉर्डर यांच्यातील एक आगळं नातं पुढं आलं. आपापल्या क्षेत्रात उत्तुंग कामगिरी करणारे हे ...

Nov 09, 202441 minEp. 344

दिवाळीनंतरचे `राजकीय फटाके`

महाराष्ट्रातील यंदाची विधानसभेची निवडणूक अनेक अर्थांनी अभूतपूर्व अशी आहे. विविध राजकीय पक्षांमध्ये सत्तेत येण्यासाठी तुंबळ लढाई सुरु झालेली आहे. दुसरीकडे सामान्य मतदारही कमालीचा अस्थिर झाल्याचे चित्र आहे. या साऱ्या चित्राकडे पाहता सध्याचे राजकारण कोठे जाते आहे, कोणाचे काय चुकते आहे, कोणत्या पक्षाची काय बलस्थाने आणि उणीवा आहेत आणि मतदारांनी नेमके काय करायला हवे याविषयी ज्येष्ठ राजकीय विश्लेषक, सल्लागार राजेंद्र हुंजे यांनी आपली परखड मते मांडली आहेत, संतोष देशपांडे यांसमवेत रंगलेल्या या दिवाळी स्प...

Nov 01, 202432 minEp. 343
Hosted on Transistor
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
Open in Metacast