Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more
निवृत्तीनंतर बऱ्याच नागरिकांमध्ये एकटेपणा, नैराश्य, भीती, जीवन नकोसे वाटणे अशा समस्या जडतात. संगीताद्वारे या सर्व गोष्टींवर आपण चांगल्याप्रकारे मात करू शकतो. याच विषयावर आपण या भागात बोलणार आहोत.
या भागामध्ये आपण संगीतोपचारामधील एक प्रयोग अभ्यासणार आहोत. या प्रयोगामध्ये २-३ मिनिटे आपल्याला डोळे मिटून पुढे चालू असलेले वाद्यसंगीत, झोपून किंवा आरामदायक स्थितीमध्ये बसून, संगीत लहरी आपल्या डोक्यापासून ते पायाच्या बोटांपर्यंत वाहत आहेत वाहत आहेत असा अनुभव घेत घेत ऐकायचे आहे.
मानवी जीवनाचा विकास हा मुख्यत्वे मनाच्या अवस्थेनुसार घडत असतो. मनाची अवस्था जशी असेल तशी शरीर प्रक्रिया घडते. मनाच्या प्रसन्नेतेवरच आपल्या सर्व आरोग्याचा खेळ अवलंबून असतो. मनात जे भाव निर्माण होतात त्यानुसार त्या माणसाची वैचारिक प्रगल्भता लक्षात येते. धैर्यशील मन मोठमोठ्या संकटांवर मत करू शकते, तेच हळवे मन आपल्याला कमजोर बनवते. मनाची चंचलता हि तुमच्या प्रगतीला आड येते आणि जीवन अस्थिर बनवते. स्थिर, समाधानी, सुखी आणि शांत जीवनाचा आनंद घ्यायचा असेल तर मनाला शक्तिशाली बनवणे गरजेचे असते. मनाच्या विवि...
प्रत्येक चिकित्सेमध्ये काही सिद्ध झालेल्या पद्धती किंवा तंत्र असतात तसेच संगीतोपचारामध्ये विविध प्रकारचे तंत्र उपलब्ध आहेत. या भागामध्ये आपण संगीतोपचारासाठी वापरण्यात येणारे तंत्र म्हणजेच techniques समजावून घेणार आहोत
संगीतोपचारामध्ये संगीताची निवड ही एक महत्वाची प्रक्रिया आहे. योग्य संगीत निवडणे हे शारीरिक दोष निवारणासाठी अत्यंत गरजेचे आहे. या भागात आपण या विषयावरील विविध पैलुंचा अभ्यास करणार आहोत.
संगीत ऐकणे हे आपल्या शरीरासाठी खूप प्रभावी आहे. संगीतोपचारामागील विज्ञान तसेच शरीरात असणारे विविध संप्ररके आणि रसायने हे संगीत ऐकल्याने कसे परिणाम घडवतात ते आपण या भागात पाहणार आहोत.