"राज"कारण " Rajkaran - podcast cover

"राज"कारण " Rajkaran

Sakal Mediaaudiowallah.com
सरकारनामा हे महाराष्ट्रातील एकमेव आघाडीचे राजकीय वृत्तपत्र आहे. राजकीय घडामोडींचे सखोल विश्लेषण, निवडणूक मोहिमांचे एंड-टू-एंड कव्हरेज आणि राजकीय वर्तुळातील महत्त्वाच्या घडामोडींची सविस्तर माहिती, ही याची खासियत आहे. राजकारणी आणि राजकारण प्रेमींमध्ये हे एक प्रसिद्ध नाव आहे. ह्याचं कव्हरेज अधिक परिपूर्ण बनवण्याच्या दिशेने पाऊल टाकत, सरकारनामा ने लाँच केला आहे "राज'कारण": एक पॉडकास्ट,  ज्या मध्ये राजकारणाशी संबंधित महत्त्वाच्या ऐतिहासिक घटनांचा समावेश आहे. काय घडलं होतं....काय होती घटनेमागची कारणं.... राजकारणाचा भूतकाळातला धांडोळा....धमाल किस्से, कुरघोड्या, शह-काटशहाचं राजकारण, महत्वाचे राजकीय क्षण, घडलेले राजकीय गुन्हे आणि बरंच काही... https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Sarkarnama is the only leading political news publisher in Maharashtra. It offers an in-depth analysis of political events, end-to-end coverage of election campaigns, and other important happenings in the political circle. It is a known name among politics and also political aficionados. Taking a step toward making the coverage more holistic, Sarkarnama presents " 'Raj'karan" - a podcast that covers important historical political events. What exactly happened? What were the exact reasons? What led to the political turmoil? Check out some amazing political tales, conspiracies, defining political moments, unheard stories, political crimes, and more on Sarkanarma's Special Podcast... Millions of listeners seek out Bingepods (Ideabrew Studios Network content) every day. Get in touch with us to advertise, join the network or click listen to  enjoy content by some of India's top audio creators. studio@ideabrews.com https://www.youtube.com/playlist?list=PLoyxzOigm2YjwDBS-4JIND68oee4I2aU1 Android | Apple
Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

वसंतदादा पाटीलः गाव तेथे कार्यकर्ता असलेला मुख्यमंत्री

राज्यातील सहकार, शिक्षण क्षेत्रातील प्रगतीची मुहूर्तमेढ वसंतदादा पाटील यांनी त्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या काळात रोवली होती.

Jun 29, 202413 minSeason 1Ep. 98

वरचढ होण्याच्या भीतीने अंतुले यांना दखवला 'हात'

1999 च्या निवडणुकीत औरंगाबाद मतदारसंघात माजी मुख्यमंत्री ए. आर. अंतुले यांची लढत चंद्रकांत खैरे यांच्याशी झाली होती. हा मतदारसंघ शिवसेनचा बालेकिल्ला असला तरी मुस्लिमांची संख्या लक्षणीय आहे. बाहेरुन आलेले अंतुले वरचढ ठरतील अशी भीती काही काँग्रेस नेत्यांना होती.

Mar 22, 202415 minSeason 1Ep. 84

...सुबोध मोहितेंचे विमान जर चुकले नसते तर?

नशिबात नसलं तर समोर आलेलंही हाती लागत नाही असं काहीसं माजी मंत्री सुबोध मोहितेंबाबत झालंय….एक विमान चुकल्यानं त्यांची विधान परिषदेची आमदारकी गेली आणि तेव्हापासून त्यांचं नशिब त्यांना सतत हुलकावण्या देतं….

Mar 01, 202410 minSeason 1Ep. 81

मराठ्यांचा लढवय्या, जिगरबाज योद्धा (Maratha Reservation And Manoj Jarange Patil)

बहुतांश राजकीय नेते मराठा समाजातील असतीलही, मात्र मराठा समाजातील सर्वच नागरिक श्रीमंत नाहीत. शेतीची विभागणी झालीये..... त्यामुळे बहुतांश जणांना चार-पाच एकरांपेक्षा अधिक जमीन नाही. त्याच पावसाचा भरवसा नसतो. पिके आली तरी त्याला भाव मिळेल की नाही याची शाश्वती नसते. महागाईचे संकट तर पाचवीला पूजलेलेच आहे. ही परिस्थिती अनुभवल्यामुळेच जरांगे पाटील यांनी हा गरजवंत मराठ्यांचा लढा सुरू केलाय

Nov 24, 202314 minEp. 66

अकारण बदनाम आझमघढ | Infamous Azamgarh | RAJ’KARAN PODCAST

अबू सालेम, जयपूर, अहमदाबाद दिल्ली बाँबस्फोटांच्या सूत्रधारांमुळे आझमगडचं नाव एकेकाळी चर्चेत आलं होतं. पण देशविरोधी कारवायांचं केंद्र म्हणून आझमगडला बदनाम करण्यापूर्वी त्याच्या इतिहासात डोकावल्यास वेगळंच सत्य समोर येतं.

May 12, 202310 minSeason 1Ep. 41

मथुराचा लढा (Changes in Rape Related Law due to Tribal Girls fight)

बलात्काराबाबतच्या कायद्यात आज अनेक कडक तरतुदी आहेत...या तरतूदी सहजासहजी केल्या गेलेल्या नाहीत...या तरतुदी बदलण्यात कारणीभूत ठरली ती एक अनाथ आदिवासी मुलगी...या मुलीसाठी देशभर छेडल्या गेलेल्या लढ्याची दखल राज्यकर्त्यांना आणि न्यायालयांना घ्यावी लागली आणि त्यातून बलात्कार कायद्यातले बदल अंमलात आले...

Mar 10, 20239 minSeason 1Ep. 35

खेळातलं राजकारण आणि राजकारणातला खेळ | Politics in Cricket and Sports Field

बऱ्‍याच वर्षांनंतर महाराष्ट्र क्रिकेट संघटनेत खरी निवडणूक झाली….राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार संघटनेच्या अध्यक्षपदी निवडले गेले…त्यानंतर आता या संघटनेकडून अपेक्षा वाढल्या आहेत…

Jan 27, 20238 minSeason 1Ep. 29

राज आणि राणें एकत्र आले असते तर?

नारायण राणे आणि राज ठाकरे हे दोन्ही उद्धव ठाकरेंचे विरोधक…मग हे दोघं एकत्र का आले नाहीत असा प्रश्न साहजिकच पडतो….खरंच का नाही आले दोघं एकत्र…

Oct 28, 20226 minSeason 1Ep. 16

A Dispute Between Sharad Pawar and Madhavrao Godbole | का झाले होते शरद पवार आणि माधवराव गोडबोलेंमध्ये वाद...

दिवंगत माजी केंद्रीय मंत्री माधवराव गोडबोले हे चर्चेतलं व्यक्तिमत्त्व....दिल्लीत त्यांच प्रस्थही मोठं होतं....याच गोडबोलेंनी दिवंगत पंतप्रधान पी. व्ही. नरसिंहराव यांची बाबरी प्रकरणात पाठराखणही केली होती...हेच गोडबोले आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात एकदा चांगलेच वाद झाले होते.....

Oct 14, 20225 minSeason 1Ep. 14

राजकारणाचा प्रवास मोहिते पाटील घराण्याचा

मोहिते-पाटील हे अकलूज तालुक्याच्या आणि परिणामी सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणाला दिशा देणारं घराणं..... त्यामुळे त्यांचे राजकारण संपू शकत नाही..... असं बोललं जातं काय आहे वस्तुस्थिती

Oct 07, 202214 minSeason 1Ep. 13

कहाणी किस्सा कुर्सिका..ची

एखादी लेखणी जशी राजकारण्यांच्या उरात धडक भरवू शकते...तसाच एखादा चित्रपटही राजकारण्यांच्या नाकाला झोंबू शकतो....हीच आजची आमची सत्यकथा आहे

Sep 30, 20226 minSeason 1Ep. 12

Why Nitishkumar is an Important Person in Indian Politics | नितीशकुमारांचे का आहे देशाच्या राजकारणात महत्त्व

नितीशकुमार यांचं राजकीय भान, त्यांची प्रशासकीय पकड, त्यांनी केलेली अनेक चांगली कामं असं सगळं जमेला धरूनही, सहकाऱ्यांनी निश्र्चिंत राहावं असे भरवशाचे नेते ते कधीच नव्हते. तरीही बिहारमध्ये नितीशकुमार हे दखलपात्र नेतृत्व आहे....हे मात्र सर्वांना मान्य करायलाच हवं.....

Sep 23, 202216 minSeason 1Ep. 11

The only leader whose superfast paths were constantly interrupted | असे एकमेव नेते, ज्यांच्या सुपरफास्ट मार्गांमध्ये सातत्याने अडथळे आणले गेले

देशभरात त्यांनी उभारलेल्या महामार्गांचा चित्रपट डोळ्यांपुढे मांडण्यात येतो.... गेल्या आठ वर्षांत तब्बल ७२ हजार किलोमीटर राष्ट्रीय महामार्ग बांधणारे......दरदिवशी ३७ किलोमीटरचा महामार्ग बांधून रेकाॅर्डब्रेकर करणारे.... वडोदऱ्याजवळ २४ तासांत अडीच किलोमीटरचा चौपदरी सिमेंट काँक्रीटचा रस्ता उभारून विश्वविक्रम करणारे असे एकमेव नेते

Sep 16, 20229 minSeason 1Ep. 10

कहाणी बारामतीतल्या एका संघर्षाची

त्यामुळे नाराज काकडे गटाने कै. बाबालाल काकडे यांना मैदानात उतरवलं आणि इथून पवार-काकडे यांच्यातला राजकीय संघर्ष सुरू झाला.

Sep 09, 202213 minSeason 1Ep. 9

ओबीसींना ताकद देऊन काँग्रेसला हादरे देणारा नेता: व्ही. पी. सिंह

पुण्यातील झुणका भाकर केंद्रात जाऊन तेथील भाकरीची चव चाखणारा, जनता दल नावाच्या प्रयोगातून आणि मंडलच्या आयोगातून काँग्रेसची पाळुमुळे खच्ची करणारा नेता

Sep 02, 20227 minSeason 1Ep. 8

स्वतंत्र भारतातला पहिला घोटाळा 'जीप स्कँडल'

दरवर्षी आपल्या देशात कुठल्या ना कुठल्या नव्या घोटाळ्याचा पर्दाफाश होतच असतो. बोफोर्स, चारा घोटाळा, २ जी स्पेक्टर्म स्कॅम अगदी अलीकडचा आॅगस्टा वेस्टलँड स्कॅम, सत्यम गैरव्यवहार असे काही गाजलेले घोटाळे..... १९४७ साली देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि पुढच्या काही महिन्यातच एक मोठा गैरव्यवहार उघडकीला आला....

Aug 26, 20225 minSeason 1Ep. 7
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android