माझ्या बुद्धीचे प्रयोग | Marathi Podcast | Mazya Budhhiche Prayog | - podcast cover

माझ्या बुद्धीचे प्रयोग | Marathi Podcast | Mazya Budhhiche Prayog |

आपण जसे आहोत तसे का आहोत? सामाजिक, सांस्कृतिक, मानसिक आणि बौध्दिक घटकांमुळे आपली identity नेमकी कशी आणि का घडत असेल? लोक एकमेकांशी आणि आपल्याशी जसे वागतात ते तसे का वागत असावेत ? या आणि अश्या अनेक प्रश्नांवर माझ्या बुद्धीचा प्रयोग करून उत्तरे शोधायचा प्रयत्न? थोडा खोडकर, बराचसा प्रामाणिक, काहीसा तात्त्विक, पुरेसा तार्किक असा एक Unique मराठी podcast.
Last refreshed:
Follow this podcast in the Metacast mobile app to refresh it and see new episodes.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

Ep 09 बंद नाही केला, खुप मोठ्ठा ब्रेक घेतला... ❤️. | माझ्या बुध्दीचे प्रयोग | मराठी पॉडकास्ट |

" माझ्या बुद्धीचे प्रयोग. " हा आपला पॉडकास्ट बंद नाही केला. खूप मोठ्ठा ब्रेक घेतला. अति भावूक होऊन कधी कुणासमोर भडास काढली की भावूकतेचा भर ओसरल्यावर जो संकोच किंवा जी कुचंबणा होते त्याविषयी हा एपिसोड. तुम्हाला हा एपिसोड रिलेट होईल अशी आशा करतो. नेक्स्ट एपिसोड लगेच घेयून येतोय. . Mazya Budhhiche Prayog | Marathi Podcast | Marathi Storytelling | Funny | unique Podcast #Marathi #storytelling #गोष्ट #कथा #comedy

May 24, 20216 minSeason 1Ep. 9

Ep ०८ | परीस आणि पश्चात्ताप | Marathi Podcast | माझे बुद्धीचे प्रयोग |

नर्मदेच्या पात्रात परीस सापडतो असं रहस्य कळल्यावर, एक तरुण परीस शोधण्यासाठी आयुष्य पणाला लावतो. परीस सापडून सुध्दा " गवसत " नाही.( जराश्याअस्वस्थ मनाने record केला आहे आपल्या Podcast मधला हा Episode ) ह्या episode मध्ये सांगतोय मला भेडवणारा एक भीषण मुद्दा… जुनं वर्ष सरताना थोड आयुष्य निसटून गेल्या सारखं वाटतंय, पोटभर जगलोच नाही अजून; अशी खंत वाटतेय.. म्हणून. . | मराठी पॉडकास्ट | कथा | गोष्टी | story | stories | storytelling | New Podcast Episode...

Dec 30, 202026 minSeason 1Ep. 8

Ep 07 | बूँदसे गयी वह वापस क्यों नहीं आती | Marathi Podcast | Mazya Budhhiche Prayog |

बूँद से गयी वह क्यू नही आती लहानपणी ही गोष्ट काय सांगून गेली? इज्जत जपण्याची गोष्ट आहे… आणि एकदा गेली की परत येत नाही, इज्जत का सवाल आयुष्य खूप अवघड करून ठेवतो इज्जत उराशी बाळगून ठेवल्याने कमीपणा येतो नवीन गोष्टी ट्राय करायला भीती वाटते अश्या ह्या भाव कमी केला तर आयुष्य संपन्न समृद्ध आणि मुक्त होईल का? #Marathi #prayog #birbal #badshah #story # #storytelling #vivekanand #sakal #bhave highschool #saswad

Nov 22, 202012 minSeason 1Ep. 7

EP 06 - गौतम बुद्ध आणि संताप | Marathi Podcast |

गौतम बुद्धाची संतपा विषयीची बोधकथा मला भलताच प्रयोग करायला उद्युक्त करून गेली. 🧐🤓 मला स्वप्नात सुध्दा कधी वाटलं नव्हतं की ह्या गोष्टीमुळे मी एक दिवस बाबांचा बेदम मार खाणारे. 😂😂 | हा Podcast अधिक सुंदर बनवण्या करता मला मदत कराल? तुमचा feedback मला खूप मदत करेल 💌👉 https://www.facebook.com/dhananjay.mhasawade #Marathipodcast #gautambudhha #budhhicheprayog #story #storytelling #funny

Aug 30, 202019 minSeason 1Ep. 6

Ep 05 गोष्ट गाढव आणि गाढवपणाची | Marathi Podcast |

ऐकावं जनाच करावं मनाचं, हे पूर्वी इतकं सोपं राहील आहे का? Social Media वर साधी सभ्य माणसं सुध्दा क्रूर, संतापी मतं मांडताना का दिसतात? आपली मतं आपलीच असतात का? News, social, Entertainment Media आपल्या न कळतं आपली मतं बदलायचा प्रयत्न का करतायत ? हा | Marathi Podcast | आवडल्यास सबसक्राईब करा, शेअर करा... धन्यवाद.

Jun 07, 202018 minSeason 1Ep. 5

EP ०४ - विवेकानंद आणि माकडं | Marathi Podcast |

विवेकानंदाना माकडांची भीती वाटली तेव्हा त्यांनी काय केलं? त्या गोष्टी नी प्रेरित होउन मी माझ्या आयुष्यातल्या माकडांना समोरा गेलो, पण विवेकानंदांच्या गोष्टी पेक्षा माझ्या गोष्टीचा शेवट काहीतरी भलताच कसा झाला? आणि ह्यातून भीती विषयी कोणता बुध्दीचा प्रयोग जन्माला आला? त्याविषयी हा पॉडकास्ट एपिसोड...

May 05, 202016 minSeason 1Ep. 4

Ep०३- गोष्ट चष्मा हरवलेल्या आजोबांची | माझे बुध्दीचे प्रयोग |

एका आजोबांचा चष्मा हरवतो आणि त्यांची मदत करायला गर्दी जमा होते... पण चष्मा हरवण्या विषयी आजोबा असं काही बोलून जातात की गर्दी थक्क होऊन जाते... Podcast record करताना पाऊस पडत होता... I hope episode ऐकताना त्याचा फार त्रास होणार नाही कानाला... | Maze budhhiche parayog | Marathi podcast | #storytelling #marathi #shortstory #corona #janatacarfue #rain #sound

Mar 28, 202010 minSeason 1Ep. 3

०२ | महापुरात अडकलेल्या काकाची गोष्ट | Maze budhhiche prayog | Marathi Podcast |

महापुरात अडकलेल्या काकाची गोष्ट ऐकून श्रद्धेचे "conditions apply" स्वरूप प्रकर्षाने जाणवते... आणि त्यावरून खंडोबाचा माझ्यावर झालेला कोप (?) आणि दत्त महाराजा सोबत माझी खुन्नस... असा हा पॉडकास्ट ऐकुन परमेश्वर कपाळाला हात लावून बसेल की मला शाबासकी देईल..? देव जाणे.. 😂😂

Mar 10, 202022 minSeason 1Ep. 2
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android