लालमपऱ्या आणि संगणेश Lalamparya Aani Sanganesh - podcast cover

लालमपऱ्या आणि संगणेश Lalamparya Aani Sanganesh

Voicemantrabingepods.com
बालमित्रांनो, तुम्हाला रोजच्या अगदी भरगच्च वेळापत्रकामुळे वैताग आला असेल ना ! तुमची मनाची मेमरी रिफ्रेश करायला ऐका हा छानसा कवितांचा संग्रह. निसर्ग, पर्यावरण, डोंगर-दऱ्या, चिमण्या-कावळे, पशुपक्षी अशा तुमच्या आवडत्या विषयांबरोबरच 'पाठीवरचे थोर दप्तराचे ओझे, पाहुनिया त्याला गाढवही लाजे' अशा आजच्या काळातील तुम्हा विद्यार्थ्यांची वेदना या कवितांमधील शब्दातून व्यक्त झालीये. त्याच बरोबर स्वप्न आणि गोष्टी मधली परिराणी चेटकीण हि आहे. झुक झुक गाडी अन थंडीची कूडकुडी ही तुम्ही यातून अनुभवालच. पण मोबाईल साठीचा हट्ट ही तुम्हाला वाटेल जणू आपणच करतोय !श्रीगणेशाच्या आगमनाचं किती कौतुक असतं ते कुणीही शब्दात सांगू शकणार नाही. पण ज्ञानरूपी गणेश-संगणेश म्हणजे तुमचा लाडका 'कम्प्युटर' त्याचा उंदीर रूपी माऊस वाहनासह तुम्हाला इथं भेटेल !... आणि मग तुम्ही अभ्यासासाठी रिफ्रेश व्हाल ! दिलीपराज प्रकाशन तर्फे या कविता तुमच्यासाठी घेऊन आल्या आहेत शोभाताई बडवे म्हणजेच लग्नाआधीच्या शोभाताई चिंधडे. या कवितांना स्वरबद्ध केलय गौरी कुबेर यांनी. या कवितांमधून तुमच्या मनातही संगीत रुंजी घालू लागेल. मग करा ऐकायला सुरुवात !

Episodes

फुलपाखरू व्हावे

दोस्तांनो, तुम्हाला ठाऊक आहे ? एक फुलपाखरू माझा दोस्त आहे ... भेटूयात का त्याला? अहो खोडकर बिट्टू हि तुमची वाट बघतेय ... कधी वारा होऊ या तर कधी चमचम तारा... खेळूया धम्माल खेळ ... लालमपऱ्या आणि संगणेश च्या समवेत... १४. एकेकाची जीभ १५. सरडा १६. येईल का मज १७. फुलपाखरू व्हावे १८. मज्जा आली Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Sep 01, 202210 minSeason 1Ep. 9

पण ची गम्मत

दोस्तांनो, या भागात खास तुमच्या साठी आणलाय एक युरोपियन बगळा आणि एक काळुंद्रा कावळा... ऐका त्यांच्या मजेदार गप्पा !‘सुई ला असतं नाक पण सर्दी होत नाही, नळाला असते धार पण बोट कापत नाही’ ऐकुयात या 'पण' ची गंमत... ७. आमचं बाळ ८. झुकझुक गाडी मध्ये ९. तृषार्त हरणे १०. कावळा बगळा ११. बागेत बहर १२. पण ची गम्मत १३. पृथ्वीमाता Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 31, 202212 minSeason 1Ep. 8

ऐकावे कुणाचे

मित्रांनो, घरातले मोठे आपल्याला –“हे कर , ते करू नकोस” असं का बरे सांगत असतात? ढगांच्या वेगवेगळ्या आकारात तुम्हाला वेगवेगळे चित्र दिसतात का? तुम्ही पक्षी आणि प्राण्यांची संगीत सभा पाहिली आहे का ? मोबाईल च्या विश्वात काय काय बरे लपले असेल ? असे प्रश्न तुम्हाला पडतात का ... मग नक्की ऐका लालमपऱ्या आणि संगणेश चा हा भाग १. ऐकावे कुणाचे २. असे का? ३. असाच कधी मी ४. संगीतसभा ५. गाणे सात स्वरांचे ६. मोबाइल Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 31, 202212 minSeason 1Ep. 7

सोहळा दिव्यांचा

बालमित्रांनो थंडीचा महिना आला कि दिवाळीची तयारी सुरू होते. नवनवे कपडे, लख्ख दिव्यांनी उजळणारं आपलं घर, रांगोळया, ताई आणि दादा बरोबर नुसती धमाल ! तर या भागात आपण ऐकूयात दिवाळीची मज्जा कवितांच्या रूपाने १३. मिठागर १४. चिऊताईचे घरटे १५. थंडी १६. रांगोळी १७. दीपावली १८. किती पाहुनिया वाट १९. सोहळा दिव्यांचा Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 30, 20229 minSeason 1Ep. 6

गाणे पावसाचे जुळे

या भागात आपण जाऊयात लांब फिरायला, निसर्गातल्या गमतीजमती, पावसाचं गाणं, आणि झाडांचा नाच अनुभवायला ... दोस्तांनो, कल्पना करा आपल्या बरोबर पावसात खेळायला आई- बाबाही सोबतीला आले तर ... ६. झाडांचं गाणं ७. गाणे पावसाचे जुळे ८. वाऱ्याला पाहिलंत का ? ९. चंद्र पौर्णिमेचा १०. आई दारी हवी ११. सुट्टी घे १२. आई-बाबाही सामील Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 29, 202212 minSeason 1Ep. 5

पोपट, मोत्या, बोका

मित्रांनो तुम्हाला कुठली भाजी आवडते? परीक्षेचं नाव काढलं की माझ्या तर पोटात गोळाच येतो... शाळा पुन्हा उघडली कि मित्रांना भेटायची मज्जा निराळीच … नाही का ! या भागात ऐकूयात पोपट, मोत्या, बोक्याचे धमाल किस्से... १. भाजी जो खाई २. परीक्षा आल्या ३. पोपट, मोत्या, बोका, इत्यादी ४. रोपटे इवले ५. उघडल्या शाळा Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 27, 202210 minSeason 1Ep. 4

गोष्टी गमती जमतीच्या

दोस्तांनो, तुम्ही कधी निवडुंगाची बाग पाहिली आहे का? आगळे वेगळे निवडुंगाचे प्रकार तिथे आहेत... पण अशी बाग खरंच आहे का? की ती स्वप्नातली आहे?चला गमतीच्या गोष्टींनी भरलेला खजिना लुटायला ... १४. गोष्टी गमती जमतीच्या १५. कैरीची किमया १६. काल रात्री स्वप्नात १७. वॉशिंग मशीन १८. निवडुंगाची बाग Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 26, 20229 minSeason 1Ep. 3

शाळा चिमण्यांची

चिमण्यांच्या शाळेत काय बरं गंमत येत असेल ... या भागात ऐकूयात सणासुदीच्या गमतीजमती... आणि बरं का जाऊयात बारीकरावांच्या शेतावर ७. बिचारा सूर्य ८. शाळा चिमण्यांची ९. आमच्या घरी १०. वाचवा ११. स्वागत नववर्षाचे १२. सण संक्रांतीचा १३. गावाकडच्या शेतावर Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 25, 202210 minSeason 1Ep. 2

संगणेशाचे गीत

बालमित्रांनो, पहिल्या भागात आपण ऐकूयात लालमपऱ्यांच्या गमती जमती... चिंटूला मिळाला छान छान नवा संगणक... झाडांचे महत्त्व ही आपण या भागात ऐकूयात आणि जाऊया दूर डोंगरावर आणि नदीच्या पलीकडे फिरायला. बरं का या भागात ऐकूयात कवितेतून एक नवीन गोष्ट...१. लालमपऱ्या २. संगणेश गीत ३. एक रोप लावू या ४. येणार तुम्ही? ५. गोष्ट ६. झाड Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 25, 202210 minSeason 1Ep. 1
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
Open in Metacast