खोड्या आणि इतर कथा  Khodya aani itar Katha - podcast cover

खोड्या आणि इतर कथा Khodya aani itar Katha

Voicemantrabingepods.com
दिलीपराज प्रकाशन ने प्रकाशित केलेल्या व सांत्वना शुक्ल ने कथन केलेला हा पॉडकास्ट आहे शाळकरी मुलांच्या गोष्टींचा . हा पॉडकास्ट योगेश सोमण यांच्या खोड्या आणि इतर कथा या पुस्तकावर आधारित आहे यात खोडकर मुलांच्या गमतीदार गोष्टी आहेत .पिंट्या , झिपऱ्या ,चिन्या,रघ्या, बाप्पा, ढब्ब्या ,गुड्डी यांच्या उपदव्यापी गॅंग मधले सगळेजण दिवसभरात काही न काही खोड्या करत असतात . या कथांमधून त्यांच्या निरागस खोड्यांचे वर्णन आहे .सर्वच वयाच्या श्रोत्यांना त्या आवडतील . मुलांना करमणुकीचा तर मोठ्यांना आठवणींचा आनंद घेता येईल.
Download Metacast podcast app
Podcasts are better in Metacast mobile app
Don't just listen to podcasts. Learn from them with transcripts, summaries, and chapters for every episode. Skim, search, and bookmark insights. Learn more

Episodes

शेवगा

मुलांच्या खोड्यांमुळे अन बालकनीत नारळ पडल्याने शेजारचे आजी आजोबा खूप रागावतात . सोसायटीच्या मीटिंग मध्ये तक्रार करतात . नंतर कॉर्पोरेशन ची माणसे सोसायटी मधील दोन झाडे तोडायला येतात तेव्हा मुलांना फार वाईट वाटते . कारण ती झाडे म्हणजे मुलांचे मित्रच असतात पिंट्या तर मनातल्या मनात सॉरी म्हणतो त्या झाडांना अन त्यावर राहणाऱ्या पक्षांना Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 29, 202211 minSeason 1Ep. 7

कान

भुयार खणण्याची विचित्र कल्पना प्रत्यक्षात आणताना पिंट्याची फजिती होते . भुयार खणताना कानात खडे गेल्याने पिंट्याचा कान दुखावला जातो. बाबांचा मारही खावा लागतो ते वेगळंच . शेवटी डॉक्टर काकांच्या मदतीने कान बरा होतो Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 25, 202213 minSeason 1Ep. 6

भुयार

सहज गप्पा मारता मारता या खोडकर मुलांच्या डोक्यात एक भन्नाट कल्पना येते . " आपण भुयार खणले तर ?" अन मग काय ? ती कल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी ते काय काय उद्योग करतात याचे गमतीदार वर्णन या गोष्टीत आहे .. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 24, 202213 minSeason 1Ep. 5

गुंडू

हि कथा आहे गुंडू या छोट्याशा गोंडस कुत्र्याच्या पिल्लाची .. त्याला सांभाळताना या मुलांची खूप धावपळ , गडबड होते पण तरीही किती प्रेमाने ते त्याला सांभाळतात याचे चित्र गुंडू या कथेत रंगवले आहे Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 22, 202215 minSeason 1Ep. 4

कैरी

कैरी या कथेत कैरी चोरतानाचा किस्सा रंगवला आहे. झाडावरच्या रसाळ कैऱ्यांकडे प्रथम गुड्डीचे लक्ष जाते . ती सर्वांचे लक्ष तिकडे वेधते. वा ! हिरव्या हिरव्या आंबट कैऱ्या बघून. सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटते आणि मग ही खोडकर गॅंग जी धमाल करते त्याचेच गमतीदार वर्णन या कथेत आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 19, 202211 minSeason 1Ep. 3

क्रिकेट

क्रिकेट या कथेत झिपऱ्या कॅप्टन असलेल्या या खोडकर गॅंगने विरुद्ध गटाबरोबर खेळलेल्या क्रिकेट मॅचचे चित्तथरारक वर्णन आहे . Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 18, 202216 minSeason 1Ep. 2

खोड्या

या कथेत पिंट्याने भुताचा वेष करून अनिताची कशी फजिती केली त्याचे गमतीदार वर्णन आहे. Learn more about your ad choices. Visit megaphone.fm/adchoices

Aug 18, 202212 minSeason 1Ep. 1
For the best experience, listen in Metacast app for iOS or Android
Open in Metacast