दिवस इतके बदललेत की आता कुठल्या गोष्टीबद्दल आपल्यात भावनाच शिल्लक राहिल्या नाहीत, सणांचा आनंद नाही, युद्धाचं दुःख नाही, भरभराटीचं सुख नाही, कितीही मिळालं तरी तृप्ती नाही. आयुष्य यांत्रिक झाली आणि आपण आपल्या पुढच्या पिढीच्याही नकळत तेच हातात देणार आहोत. आपल्यातली आपुलकी ही जुन्या पातळासारखी दिवसेंदिवस विरळ होत चाललीये. विरळ याकरिता कारण अजूनही काही लोक आहेत ज्यांच्यातल्या भावना माणूस असो वा प्राणी, नाती असो वा निसर्ग प्रत्येकासाठी आजही ज्वलंत आहेत. म्हणून ही आपुलकी विरळ का होईना पण जिवंत तर आहे. ...
Jun 02, 2022•9 min
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण डोन्ट वरी पुन्हा एकदा घेऊन आलोय एक नवी गोष्ट, एक नवा आनंद! Story Junction Marathi Podcast वर आजची स्टोरी खऱ्या आयुष्यावर आधारित आहे; आता तुम्ही म्हणाला कुणाच्या ? तर प्रत्येकाच्या! हि फेस प्रत्येक सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात एकदा नक्की येते आणि आयुष्य वाटेवर अनन्या ऐवजी पार वाट लावून जाते. तुम्ही जर जॉबलेस असाल तर हि स्टोरी तुमचीच आहे आणि जॉबलेस नसाल तरीहि तुमचीच आहे . Enjoy करा - मूर्खांचा बाजार डॉट कॉम Credits - Writer - Dipak Bhutekar Story Edito...
Feb 23, 2022•9 min
नमस्कार! आपण बऱ्याच दिवसानंतर भेटतोय खरं पण याचीच परतफेड म्हणून आम्ही घेऊन आलोय एक भन्नाट Podcast Series, 'The Last chapter'!! याशिवाय आजचा दिवस आपल्यासाठी फार विशेष आहे, कारण आज स्टोरी जंक्शन मराठी पॉडकास्टला एक वर्ष पूर्ण झालंय आणि शून्यापासून सुरू झालेल्या या प्रवासात आज विविध देशांमधून आपल्यासोबत ३०,००० हून अधिक लोक जोडले गेलेत. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे या Series चे सगळे Episodes upload केलेत; तर तुमच्या Entertainment मध्ये कुठेही खंड पडणार नाही याची आम्ही खात्री देतो. Enjoy करा - 'The ...
May 31, 2021•11 min•Season 2Ep. 1
सचिन डोक्यात राग घेऊन घराबाहेर पडला खरा पण पुढे काय? ते म्हणतात ना, तळ्यातल्या बेडकाला समुद्रातील अडचणींची कल्पना नसते; त्याप्रमाणेच सचिनलाही बाहेरच्या जगाची मुळीच कल्पना नाही. इथे जेवढे चांगले लोक आहेत त्याहून कैकपट विक्षिप्त, क्रूर आणि निर्दयी माणसांची गर्दी आहे, तिला तोंड दिलं तर जिंकला, नाहीतर संपला. मुळात सचिन आता जाणार तरी कुठे? कुठे राहणार? प्रश्न खूप आहेत, म्हणून आता वेळ न घालवता ऐका 'The Last chapter' चा दुसरा भाग, गोदावरी! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Med...
May 31, 2021•10 min•Season 2Ep. 2
स्वप्नांना ध्येय बनवून त्यांच्यामागे धावणं उत्तमच, पण तडकाफडकी निर्णय घेऊन आपण काही अनभिज्ञ अडचणींना निमंत्रण देत असतो. सचिननेही तेच तर केलं, कुठलाही मागचा पुढचा विचार न करता इथे आला. या नव्या शहराने शहराने त्याला गोंजारलं, थोपटलं, राहायला एक कोपरा आणि जीवाला क्षणिक विसावा दिला. पण रस्त्यातल्या मोजक्या काट्यांना सचिन फार लवकर कंटाळला. कदाचित त्याला आपल्या निर्णयावरच पश्चाताप झाला, पण गोष्ट इथे संपत नाही तर सुरु होते! कशी ते जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा तिसरा भाग, पुनर्जन्म! Credits...
May 31, 2021•10 min•Season 2Ep. 3
मागच्या एपिसोडमध्ये तुम्ही ऐकलंत की सचिनला राघवने कशाप्रकारे वाचवलं आणि फायनली सचिनला राहण्यासाठी घरही मिळालं. आयुष्याच्या वळणावर बऱ्याचदा अशा अडचणी समोर उभ्या राहतात तेव्हा वाटतं की बस, आता स्वतःला संपवावं. तेव्हा जरा थांबायला हवं आणि एकदा, फक्त एकदा विचारपूर्वक असा विचार करायला हवा की, खरंच संपलं सगळं? यहां हर चीज का सोल्युशन हैं मेरे भाई, इथे कधीच पर्याय संपत नाहीत. असो, सचिनच्या आयुष्यात आता ही काय नवीन भानगड येऊन ठेपलीये हे जाणून घेण्यासाठी ऐका 'The Last chapter' चा चौथा भाग बुकमार्क! Credi...
May 31, 2021•14 min•Season 2Ep. 4
गोष्ट जसजशी पुढे जातीये गुंता आणखीनच वाढत जातोय. राघव असा का वागतोय? सायली बिचारी गोड मुलगी आता कुठे जाणार? आणि सचिन यावर काही करणार की नाही?? मैत्रीत चढ-उतार तर येतातच पण इथे त्यामागचं नक्की कारण काय? तेच कळायला मार्ग नाही. असे अनेक प्रश्न आपल्याला पडले असले तरी त्यांची उत्तरं काही जास्त लांब नाही, सगळ्या गोष्टींचा उलगडा होईल, त्यासाठीच ऐका 'The Last Chapter'चा पाचवा भाग, अनपेक्षित! Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, Sound & Packaging - Ak...
May 31, 2021•17 min•Season 2Ep. 5
मित्रांनो, आता आपण या सिरीजच्या शेवटच्या भागात आहोत. जर तुम्ही द लास्ट चॅप्टरचे यापूर्वीचे 5 एपिसोड्स ऐकले नसतील तर आधी ते ऐका जेणेकरून तुम्हाला हा भाग कळेलही आणि या सिरीजची पूर्ण मजा घेता येईल. जर तुम्ही या आधीचे एपिसोड्स ऐकले असतील तर मागच्या भागात काय झालं हे तुम्हाला ठाऊक असेलच. तर आता पुढे काय होणार हे जाणून घेण्याची घाई झालीये ना? सो उगाच वेळ न घालवता ऐका 'The Last Chapter'चा शेवटचा एपिसोड पूर्णविराम.. Credits - Writer - Dipak Bhutekar Story Editor & Social Media - Sharda Bhawar SFX, S...
May 31, 2021•14 min•Season 2Ep. 6
प्रेम... कुणी माणसांवर करावं, कुणी प्राण्यांवर तर कुणी आपल्या कामांवर! प्रेम कुणावरही असो, अनुभव मात्र खूप देतं; कधी हळवा आनंद देतं तर कधी बोचणारे दुःख, कधी आयुष्याच्या सागरात हेलकावे खात-खात लांबवर घेऊन जातं तर कधी क्षणार्धात बुडवून सगळं संपवून टाकतं. तरीही प्रेम म्हणजे काळ, वेळ, परिस्तिथी, वय या सगळ्यांच्या मर्यादा न जुमानता हवंहवंसं वाटणारं एक सुख; जमीनजुमला, पैसाअडका या सगळ्यापेक्षा मोठं आणि मौल्यवान! आपल्या कामांवर असंच अथांग प्रेम करणाऱ्या एका बापाची ही गोष्ट... 'सांगता'! ही स्टोरी लिहिलीय...
Nov 20, 2020•9 min
ही गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा बाहेगावांवरून येणाऱ्यांना १४ दिवस क्वारंटाईन सेंटर्सला थांबवलं जात होतं. त्या काळात अनेकांनी काही नवनवीन अनुभव घेतले. हा एपिसोड म्हणजे आपल्या एका मित्राला क्वारंटाईनमध्ये आलेला असाच एक आगळावेगळा अनुभव! आपला हा मित्र त्याच्या गावाबाहेरच्या गेस्ट हाऊसमध्ये क्वारंटाईनसाठी थांबलाय. पण हे गेस्ट हाऊस हॉंटेड असून इथे एक भूत राहत असल्याचं त्याने लहानपणापासून ऐकलंय. त्याचा काही त्या गोष्टीवर विश्वास नसल्याने जाण्याआधी तो निर्धास्त असतो. पण तिथे गेल्यावर आणि प्रत्यक्ष राहिल्या...
Oct 27, 2020•30 min•Season 1Ep. 7
लॉकडाऊनमुळे अनेकांच्या आयुष्यात अनेक बदल झाले. काही कुटुंब पूर्वीपेक्षा अधिक जवळ आले तर काही आणखीनच दुरावले. मात्र या सर्वांपलीकडे काही कुटुंब अगदी उध्वस्तही झाले. अशाच एका कुटुंबाची ही गोष्ट आहे. सुखी, आनंदी असणाऱ्या या कुटुंबाच्या सुखाला नकळत गालबोट लागलं आणि घटनांच्या ग्रहणाने या कुटुंबाला कायमचं अंधारात ढकलून दिलं. या कुटुंबाचा कर्ता पुरुष हा एक मुलगा, पती आणि बाप तर आहेच, सोबतच तो एक साधाभोळा, सर्वसामान्य माणूस आहे जो आपल्या कुटुंबावर निस्वार्थ प्रेम करतो. या सामान्य व्यक्तीच्या आयुष्यात एक...
Jun 24, 2020•26 min•Season 1Ep. 6
शेतकऱ्याचं नशीब निसर्गावर अवलंबून असतं. जगाला अन्न पुरवणारा हा शेतकरी निसर्गाने साथ दिली नाही तर स्वतःच उपाशी राहतो. आजच्या गोष्टीतील शेतकऱ्याला सद्यस्थितीत निसर्गाने तर साथ दिली पण वेळेने नाही. रात्रंदिवस कुटुंबासोबत शेतात राबलेला हा शेतकरी सुगीच्या आशेने एक स्वप्न उराशी बाळगून बसलाय. पण वेळ अशी आली की त्याचं आणि त्याच्या कुटुंबाचं हे स्वप्न स्वप्नच राहून गेलं. ही स्टोरी लिहिलीये शारदा भवर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम...
Jun 13, 2020•12 min•Season 1Ep. 5
रोजच्या कमाईवर स्वतःचं आणि कुटुंबाचं पोट भरणारा एक व्यक्ती लॉकडाऊनमुळे कामधंदा गमावून बसतो आणि नाईलाजाने कुटुंबाला सोबत घेऊन गावचा रस्ता धरतो. जगण्याची नवी आशा मनात घेऊन गावची वाट पायी तुडवत हे कुटुंब निघालंय. पण ही वाट त्यांना एका वेगळ्याच वळणावर घेऊन जाते. लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्षातही अनेक मजूर, कामगार काम नसल्याने अशाच रीतीने आपापल्या गावी निघाले. दुर्दैवाने कित्येक लोक पोहचू देखील शकले नाहीत. आजची गोष्ट ही या सगळ्यांच्या आयुष्याचं एक कल्पनाचित्र आहे. ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवा...
Jun 10, 2020•9 min•Season 1Ep. 4
'लॉकडाऊनच्या गोष्टी' सिरीजमधील ही तिसरी गोष्ट! टायटलवरून तुम्हाला थोडाफार अंदाजा आलाच असेल की ही एका लग्नाची गोष्ट आहे. पण ज्यांचं लग्न व्हायचंय ते कपल आहे आजच्या पिढीतलं, ज्यांना पारंपरिक विवाह सोहळ्यात होणारा अनेक गोष्टींचा अपव्यय टाळावा असं वाटतं. पण त्यांचे आईवडील मात्र सगळ्याच ९० च्या दशकातील आईवडिलांसारखे आहेत. त्यातल्या त्यात यांना लव्ह मॅरेज करायचंय. इथेही घरचे नकार देतील अशीच शंका जास्त आहे. अशा सर्व छोट्या-मोठ्या अडचणींमधून शेवटी या कपलला मार्ग सापडतो की नाही आणि लॉकडाउनच्या काळात हे स...
Jun 05, 2020•8 min•Season 1Ep. 3
दंगली झाल्या की सर्वप्रथम गदा येते बस वर; फक्त बसवर नाही तर त्या बस मधून प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर आणि महत्वाचं म्हणजे ड्रायव्हर आणि कंडक्टरवर. पुढचा मागचा विचार न करता लोक सरळ बस पेटवून देतात. पण त्यात निर्दोष सर्वसामान्यांचा नाहक बळी जातो. आजची स्टोरी अशाच एक कंडक्टरच्या आयुष्याची आहे ज्याने दंगली पाहिल्या, जाळपोळ पाहिली, आयुष्याच्या चढ-उताराने त्याला नोकरी नकोशी वाटू लागली. पण लॉकडाऊन मुळे असं काही घडलं की त्याच्या जीवनाचा अर्थच बदलला. तर मग ऐका आजची स्टोरी 'प्रवास'! ही स्टोरी लिहिलीये दीपक ...
Jun 03, 2020•7 min•Season 1Ep. 2
लॉकडाऊनच्या गोष्टींमधील ही पहिली स्टोरी आहे एका कपलची, ज्यांचं अरेंज मॅरेज झालंय. हे दोघे एकमेकांच्या पूर्णपणे विरुद्ध स्वभावाचे आहेत. पण त्यांच्या याच स्वभावांमुळे लॉकडाऊनमध्ये त्यांच्या नात्यात एक आश्चर्यकारक बदल घडतो, पण तो चांगला की वाईट हे जाणून घेण्यासाठी हा एपिसोड आवर्जून शेवटपर्यंत ऐका. मित्रांनो, आयुष्यात अनेक गोष्टींची आपल्याला अपेक्षा असते, पण जे हवं ते सगळं मिळेलच असं नाही आणि बऱ्याचदा आपल्याला जे मिळतं ते आपल्याला हवं त्यापेक्षा कदाचित बेटरही असू शकतं! हेच सांगणारी आमची आजची स्टोरी ...
Jun 01, 2020•8 min•Season 1Ep. 1
एक व्यक्ती आपला जीव मुठीत घेऊन सैरभैर धावतोय, त्याला माहितीये थांबला तर संपला! पण असं काय लागलंय त्याच्यामागे आणि का तो त्याच्यापासून पळतोय? हे जाणून घेण्यासाठी ऐका आमचा आजचा पॉडकास्ट मरण्याच्या क्षणभर आधी कळलं… काही चुका माणसाला आयुष्यभर कळत नाहीत आणि जेव्हा कळतात तेव्हा फार उशीर झालेला असतो, मात्र तेव्हा गेलेली वेळ परत येत नाही. स्टोरीतून मी तुम्हाला संधी देतोय गेलेल्या वेळात परत जाण्याची, सगळं ठीक करण्याची... ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांन...
May 29, 2020•6 min
गप्प बसून अन्याय सोसणाऱ्याला आपण कोण आहोत हे आठवण करून देणारी आमची तिसरी स्टोरी …पण तुम्ही माणूस नाही! !" ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांनी व प्रोड्यूस केलीये आकाश जाधव ने. आमच्या स्टोरीज तुम्हाला कशा वाटतात हे आम्हाला कमेंट किंवा मॅसेज करून नक्की कळवा आणि अशाच एकापेक्षा एका भन्नाट स्टोरीज ऐकण्यासाठी व वाचण्यासाठी आमच्या www.D4mad.in या ब्लॉगला नक्की भेट द्या. For feedback or any queries please mail us on [email protected] - www.RJPrasad.in...
May 26, 2020•3 min
आपलं मन हे फारच चंचल असतं, त्याला स्थैर्य म्हणून कधी नसतंच. असंच एका तरुणाचं मन एका सुंदर तरुणीवर येऊन ठेपलंय आणि त्याचं महत्वाचं कारण आहे पाऊस! पावसात चिंब भिजलेली ती अनोळखी सुंदर मुलगी पाहून हा तरुण तिला दूर घेऊन गेला, तिच्या सोबत चहा प्यायला, तिच्या नाजूक बटांशी खेळला पण तिला याची खबरही नाही! आता तुम्ही म्हणाल "हे कसं शक्य आहे?" अहो शक्य आहे. ऐकून तर पहा आमची दुसरी स्टोरी " आणि गंमत म्हणजे तुला ठाऊकही नाही! " ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात आर जे प्रसाद देशमुख यांन...
May 26, 2020•4 min
आम्ही सादर करतोय आमची पहिली स्टोरी, " दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही !" एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा... ही स्टोरी लिहिलीये दीपक भुतेकर ने, आवाज दिलाय प्रसाद अर्थात ...
May 26, 2020•4 min
आम्ही सादर करतोय आमच्या पहिल्या वहिल्या गोष्टीचा ट्रेलर जीचं नाव आहे दंगलीत हरवलेली शुद्धलेखनाची वही ! एका सर्वसामान्य माणसाचं सर्वस्व असतं त्याचं कुटुंब! मात्र राग, द्वेष आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांमुळे व त्यांच्या क्षुल्लक चुकांमुळे रोज कित्येक निर्दोष लोक जीव गमावून बसतात. अशाच एका सामान्य माणसाची ही गोष्ट ज्याचे स्वप्न व अडचणी अगदी लहान-लहान आहेत पण त्यातच तो सुखी आहे; मात्र एक दिवस अचानक त्याच्यावर संकटाचं आभाळ कोसळतं आणि पुढे काय होतं ते तुम्हीच पहा... लवकरच.... ही स्टोरी लिहिलीये द...
May 23, 2020•34 sec